मोदींनी मॅन व्हर्सेस वाइल्ड मध्ये जाण्याचं काय प्रयोजन असावं?

alokhande's picture
alokhande in जनातलं, मनातलं
30 Jul 2019 - 1:46 pm

डिस्कव्हरी हा एक जागतिक दर्जाचा चॅनल असून तो जगभर बघिताला जातो. आणि त्याच चॅनल वर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान या जगप्रसिद्ध शो मध्ये जाऊन काय सांगू इच्छितात. किंवा जगभरातील देशांना कोणता संदेश देत असावेत. का हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणायचा

राजकारणलेख

प्रतिक्रिया

मोदींना भटकायची आवड आहेच. साधू बनून ते हिमालयात राहणार होते. वाराणसीतल्या त्यांच्या गुरूने 'मना' केलं. "तू या अध्यात्मात वेळ घालवू नकोस."आता चांगला गाईड शोधला आहे.
(( फक्त एकच प्रश्न - त्यांच्याबरोबरचे ओफिसरही हे करणार का?))
-----

चौथा कोनाडा's picture

30 Jul 2019 - 2:10 pm | चौथा कोनाडा

मोदि साहेब पंढरपुरच्या येत्या कर्तिकी यात्रेलापण आळंदी ते पंढरपुर पायी चालत येणार आहेत असे ऐकले !

बाप्पू's picture

30 Jul 2019 - 2:14 pm | बाप्पू

तुम्ही ha प्रश्न ओबामा ना विचारला का??

मोदी प्रधानमंत्री जरी असले तरी त्यांनी कोणत्या शो मध्ये सहभागी व्हावे कोणत्या नको हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे.

ओडिसा मध्ये पूर वगैरे असताना असे जाणे ह्याचे विरोधक भांडवल करत आहेत

वामन देशमुख's picture

30 Jul 2019 - 3:21 pm | वामन देशमुख

>>> जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान या जगप्रसिद्ध शो मध्ये जाऊन काय सांगू इच्छितात.

नमो ही व्यक्ती पंतप्रधान आहेत, अनेक खात्यांचे केंद्रीय मंत्री आहेत, खासदार आहेत, मतदार आहेत भारत गणराज्य देशाचे नागरिक आहेत. यांपैकी कोणत्या भूमिकेतून ते बेअर ग्रिल च्या कार्यक्रमात सहभागी झालेत ते पाहावं त्यानंतर ते सहभागी होण्यातून काय काय सांगू इच्छितात ते पाहावं.

>>> किंवा जगभरातील देशांना कोणता संदेश देत असावेत.

एक किंवा अनेक संदेश असू शकतात, ते त्या कार्यक्रमातून कळेलंच.
BTW, या जगात, निळ्या रंगाचे शरीर असलेले, शेळीच्या स्तनातील दूध पिणारे, खारीक खाणारे, लहान मुले आवडणारे, देशासाठी कोलू ओढणारे, काथ्या कुटणारे ... इ. प्रकारचे अनेक प्रसिद्ध नेते होऊन गेले आहेत, त्या यादीत अजून एकाची भर... सर्वांनीच काही ना काही संदेश दिलेत. कुणाच्या संदेशाचे अध्याय झालेत, कुणाच्या संदेशाचे समग्र खंड झालेत तर कुणाच्या संदेशाचे रेडिओ कार्यक्रम झालेत त्यात अजून एकाची समृद्ध अडगळ!

>>> का हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणायचा

हवं तर पब्लिसिटी स्टंट म्हणा, राजकारण्यांना पब्लिसिटी हवीच असते, स्टंट मधून किंवा अजून कश्यातून, त्यात सद्य परिस्थितीत चूक / बरोबर असं काही नाही.

नाखु's picture

30 Jul 2019 - 5:06 pm | नाखु

माहितीसाठी
पंधरा वर्षे राज्यात आणि पाच वर्षे केंद्रात मॅन व्हरसेस वाईल्ड अनुभव असल्याने आता खर्या जंगलातला अनुभव घेतला तर काय हरकत आहे.

सगळ्यांनाच श्रमपरिहार करण्यासाठी बॅंकॉक येथे जाण्याची सवय नसते.

खुलासा पटलाच पाहिजे असा आग्रह नाही,आपण रडत राउतगीरी करु शकता.

शिक्का मोर्तब झालेला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

जॉनविक्क's picture

30 Jul 2019 - 6:03 pm | जॉनविक्क

पण निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणणे याक्षणी धाडसाचे ठरेल विशेषतः आत्ता त्याची गरज प्रकर्षाने नाही.

बाकी संदेश फार सोपा देत आहेत मोदी, तो म्हणजे he is man of substance. मोदी म्हणजे कणखर व्यक्तिमत्व हे अधोरेखित करायला हा कार्यक्रम नक्कीच चांगला आहे.

हेही आहे. त्यासोबतच जगभर हा कार्यक्रम बघीतला जाण्याने पर्यटनाच्या अनुषंगाने देखील बराच फायदा होण्यासारखा आहे. जगभरातील लोकांपर्यंत मोदींचं नाव पोहोचवण्यासाठी हा मार्ग खूपच उपयुक्त आहे.
तसेच मोदी म्हणजे हटके.. काहीतरी वेगळं.. हे बिंबवायला देखील मदत होते. धक्कातंत्राच्या बाबतीत मोदी खूप पुढे आहेत सगळ्यांच्या एवढे मात्र नक्की.

धर्मराजमुटके's picture

30 Jul 2019 - 6:07 pm | धर्मराजमुटके

मोदी भले लोकांना नाराज करत असतील पण आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही. तुम्हाला कसे प्रतिसाद आवडतील ? मोदींना शिव्या घालणारे की तारीफ करणारे ?त्या प्रमाणे प्रतिसाद पाडून देऊ.

सर्वसाधारण पारंपारीक असे जे " हिंदु मानस " आहे त्या ला मोदी फार व्यवस्थित अपील होतात उदा.
१- मोदीं चे आई ला अधिक महत्व देणे पत्नी ही दुय्यम स्थानावर ठेवणे हे एक
२- मोदींची फकिरी वृत्ती भिरकावुन देण्याची वृत्ती ( म्हणजे बोलण्यात तरी ) हम तो फकीर है ........हिंदु मानस याने फार इम्प्रेस होते.
३- मोंदीची गुढ साधना योग साधना तब्येत स्टॅमिना इ. सॅक्रेड सोर्स मधुन त्यांना मिळणारी पॉवर
४- या सर्वाला जोडुन आता " निर्भय" "साहसी" पौरुषत्व असणारे मोदी या ला आता बहुधा यातुन चालना देण्यात येइल.
सिमीलर उदाहरण म्हणजे पुतिन ते तायक्वांडो च्या डावात प्रतिस्पर्धी चित करतांना , बर्फात आंघोळ अशा टाइपच्या इमेजेस चालवतात
हे त्यासारखे प्रथमदर्शनी तरी भासते.

अभ्या..'s picture

30 Jul 2019 - 10:39 pm | अभ्या..

व्लादिमीर पुतीनच्या इमेज बिल्डिंग बद्दल जरी शंका असल्या तरी पुतीन ज्युडो चा ब्लॅक बेल्ट तोही 8 डॅन आहे. फार थोड्या लोकांना हा मिळाला आहे. त्याचा सराव हा पुतीनच्या जीवनशैलीचा भाग आहे. फिटनेसवरूनही ते दिसून येते. त्यात स्पेशल इमेज मेकिंग फोटोग्राफीसाठी काही केलेय असे नसावे.
बर्फाळ पाण्यातली आंघोळ मात्र ऑर्थोडॉकस ख्रिश्चन प्रथेसाठी केली. त्यात कदाचित राजकारण असेलही.

झेन's picture

31 Jul 2019 - 9:46 am | झेन

व्लादिमीर पुतीनच्या राजकारणाचे माहिती नाही पण फिटनेस रीयल वाटतो कॅमेरासाठी ईमेजबिल्डींग वगैरे नाही वाटत.

जॉनविक्क's picture

31 Jul 2019 - 4:56 pm | जॉनविक्क

पूतीन एक KGB अधिकारी होते राजकारणात येण्यापूर्वी त्यामुळे ज्यूडो वगैरे नक्कीच त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग असावा. 8 दान मिळवणे2 हि फार मोठी कमिटमेंट आहे.

पूतीन यांनी ज्या अवघड परीस्थितीत सत्ता मिळवली व देश सांभाळला त्याचे काहीही झाले तरी कौतुकच आहे त्यामुळे मला मोदिंमधे त्यांचीही छबी दिसतेच.

महासंग्राम's picture

31 Jul 2019 - 9:46 am | महासंग्राम

सॅक्रेड सोर्स मधुन त्यांना मिळणारी पॉवर

च्यायला मी चुकून सॅक्रेड गेम्स वाचलं

कपिलमुनी's picture

30 Jul 2019 - 10:08 pm | कपिलमुनी

शूटींग कधी केले म्हणे याचे ?

कानडाऊ योगेशु's picture

31 Jul 2019 - 7:28 am | कानडाऊ योगेशु

बहुदा पुलगामा हल्ल्याच्या वेळी ! फारच गदारोळ झाला होता तेव्हा.

तेजस आठवले's picture

30 Jul 2019 - 10:11 pm | तेजस आठवले

तो बिअर ग्रिल्स जिवंत अळ्या, सरडे, साप काय वाट्टेल ते चावून खातो आणि भूक भागवतो. मोदींनी बरोबर जंगलात हांडवो फाफडा नेला असणार. नाहीतर निर्जळी.
:D

हस्तर's picture

31 Jul 2019 - 12:45 pm | हस्तर

मोदींनी अक्खी काँग्रेस खाल्लीये

इरामयी's picture

31 Jul 2019 - 1:37 pm | इरामयी

खरं आहे. सगळ्या पक्षांतले असंतुष्ट नेते भाजपात येऊन भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण करतील अशी शक्यता वाटते.

तरी पण कोणीही बोलणार नाही

गब्रिएल's picture

31 Jul 2019 - 10:17 am | गब्रिएल

काय तुमीबी !!! आवो मोदी हेटर्सना खोट्याचा ख्येळ करत टीका कराय्ला कित्ती कित्ती तकलिफ व्हते. त्ये बगून मोदीना त्येंची कीव आली आसनार आनी मग त्येनी हेटर्सना कायतरी आराम पडावा म्हनून ह्यी योजना काडली हाये. लय दीस गप पडल्येले किती मोदी हेटर आत्ता हिते तल्वारी घ्येऊन भायेर पडल्येत त्ये बगा. 'सबका साथ सबका विकास आनी शेवटच्या मान्सापत्तूर आणंद' आशी योज्ना हा ही. =)) =)) =)) ;)

नाखु's picture

31 Jul 2019 - 4:41 pm | नाखु

आणि इथलेच १४ फारसा फरक नाही, अगदी आवर्जून शिव्या द्यायला पुढे,ते ४१ जसं बाकी समाजाच्या अन्यायाविरुद्ध मिठाची गुळणी धरून बसतात तसं या १४ चे आहे

त्याचं काय आहे, मोदींच्या असं लक्षात आलं की त्यांना आजवर बहुतेक सगळ्या टिव्ही चॅनल्सनी प्रसिद्धी दिली आहे. एक डिस्कव्हरी चॅनल शिल्लक राहिलं होतं. मग आता तेसुद्धा!

कानडाऊ योगेशु's picture

31 Jul 2019 - 2:36 pm | कानडाऊ योगेशु

बहुदा काही "प्राण्यांना" सुध्दा पक्षात घ्यायचे असावे.

भंकस बाबा's picture

31 Jul 2019 - 6:37 pm | भंकस बाबा

केदारनाथ गुहेत जाऊन बसल्यानंतर त्या गुहेचे बुकिंग मिळत नाही आहे. कोणाचा फायदा झाला?
जऱ उद्या पर्यटनाला फायदा होऊन देशात रोजगार वाढला तर फायदा कोणाला?
नक्कीच भाजपाला! मग अशा वेळी विरोधकांच्या पोटात दुखणारच! कारण हेच लोक तर बोंबा मारत होते ना कि रोजगार बुडाला?

एकुलता एक डॉन's picture

1 Aug 2019 - 10:58 pm | एकुलता एक डॉन
एकुलता एक डॉन's picture

1 Aug 2019 - 10:58 pm | एकुलता एक डॉन

्यूज चॅनल्स देखना बंद कर दिया था

सिर्फ डिस्कवरी देखते थे,

वहां भी मोदी आ गया

भड़का हुआ मोदी विरोधी....