चायला आजचा दिवस काही वेगळाच गेला
आज सकाळी रेग्युलर कॉलेज वगैरे करुन आलो आणि अभ्यासाला बसलो तेवढ्यात लक्षात आले की आमचा नजीकचा भुत़काळ व नजीकचा भविष्यकाळ(दहावी आणि बारावी) यांची परिक्षा संपत असल्याचे लक्षात आले .वेळ बघतो तर दुपारचे एक वाजलेले ,बर विषय आला तो आला तो काही डोक्यातुन जाइचना. सारखे माझे गेल्या वर्षीचे दिवस आठवु लागले .दहावीची परीक्षा झाल्यावर आम्ही केलेली मजा ,जवळजवळ वीस जणानी एकत्र जावुन पाहीलेला वन टु थ्री हा बोगस चित्रपट .लेट खेळलेली रंगपंचमी वगैरे वगैरे . अचानक जणु काही २८ मार्च २००८ हा दिवस डोळ्यासमोर उभा राहिला. खरेतर आम्हा सगळ्याना दहावीचे पेपर सोपे गेलेले होते पण शेवटचा पेपर झाल्यावर अख्या शाळेत घातलेला दंगा आणि त्याला शिक्षकानी दिलेले प्रोत्साहन वगैरे लाख गोष्टी आणि महत्वाचे म्हणजे या गोष्टी डोक्यातुन जाइचनात जरा वेळाने सारख्या त्याच त्याच गोष्टी पुन्हा डोक्यात यायला लागलेल्या ,मग नववी दहावी त्यातल्या आठवणी ,आणि गेल्या तीन महिन्यात आपण आपल्या शिक्षकाना भेटलेलोच नाही हेदेखील लक्षात आले मग तसाच एका सराना फोन लावला त्यांच्याशी अर्धा तास बोललो.मग थोडे बरे वाटले .बाकी माझ्या मित्रानी आज असाच दंगा घातला हेदेखील मला समजले पण हा अनुभव मला नवा होता बाकी जुन्या आठवणी जाग्या व्हायच्या पुर्वीही ,त्यात शाळा खुप आवडती त्यामुळे शाळेतही जायचो अधुनमधुन पण आजचा नोस्टेलजीया काही वेगळाच होता .खरेतर मघाशी तीन चार मित्राना भेटल्यावर हा विषय संपायला हवा होता पण आत्ता पी सी वर बसलेलो असताना अचानक रेडीओवर माझी आवडती पुरानी जीन्सची
कट्यावर घालवलेला पहिला तास
मित्रांबरोबर मारलेली पहीली बंक
चेनची पहिली जीन्स पॅंट
लकी लकी म्हणुन जपलेली पहीली सॅक
काही गोष्टे कधी जुन्याच होत नाहीत
तशी पुरानी जीन्स
बाय द वे वय न वाढण्याला काय म्हणतात .........हा चिरतरुण ..येस
ही जाहीरात ऐकली
आणि पुन्हा ते सगळे डोक्यात आले
म्हटले मिपाकराना विचारु तरी की असे अनुभव तुम्हाला आलेले आहेत का तुम्ही कधी नोस्टेल्जीक होता
आणि हो अजुन एक गोष्ट असते आजचा दीवस आमच्या सारख्या विद्यार्थ्यांसाठी नवा असतो पण शिक्षक हा दिवस वर्षानुवर्षे बघत असतात तेव्हा त्यांच्या भावना काय असतात हे ही जाणून घ्यायची इच्छा आहे
तेव्हा प्लीज जरा तुमचे अनुभव शेअर करा
कारण कोणीतरी म्हटलेच आहे की
एखादी गोष्ट जीतकी जास्त पर्सनल तीतकी युनीव्हर्सल
असो...
तुमचा
नोस्टेल्जीक विन्या
( असो हे लिहिण्याचे प्रयोजन काहीच नाही .डोक्यातले व्यक्त केले की बरे वाटते आणि मी सध्या इथेच व्यक्त होतोय तेव्हा लिहिले निदान माझ्यामुळे इतराना पाच मिनिटे तरी जुन्या काळात डोकावता येइल बाकी तेवढे झाली तरी खुप झाले.)
प्रतिक्रिया
20 Mar 2009 - 10:32 pm | धनंजय
अकरावीत असताना "रिमझिम गिरे सावन" हे गाणे सारखे सारखे मनात येऊन अगदी रडवेले होईस्तोवर काही हरवल्याची कडूगोड भावना (नोस्टॅल्जिया) मनात येई.
वास्तविक हा चित्रपट मी पाहिलेला नाही, फक्त पहिल्या दोन ओळींचे शब्द मला येतात, आणि नेमके काय हरवले होते त्याबद्दल काहीच कळत नव्हते. अजूनही ते स्वप्नाळू गोडसर दुखणे कसचे होते ते कोडेच आहे.
(छोटेखानी स्फुट आवडले.)
20 Mar 2009 - 10:50 pm | भाग्यश्री
आहा! माझं प्रचंड आवडतं गाणं हे !! धन्यवाद धनंजय, इथे व्हीडीओ दिल्याबद्दल...
विनायक,
हाही लेख चांगला जमलाय.. मुद्दाम लिहायचं म्हणून लिहीण्यापेक्षा मनापासून वाटेल तेव्हा, मोकळं होऊन लिहीलेलं जास्त छान उतरते हे तुलाही आता पटले असेल, राईट? :)
पण प्लीज! शुद्धलेखनाकडे लक्ष दे.. इथे शुद्धलेखन म्हणजे र्ह्स्व,दीर्घ नव्हे (तेही महत्वाचे असतेच..डोळ्यांना खटकते इकडचे तिकडे झाले की!).. निदान तो शब्द जसा उच्चारला जातो तसातरी लिहीण्याचा प्रयत्न कर..
ते प्रचंड खटकतं! प्रेझेंटेशन चांगलं नसेल तर कंटेंट कडे काही दिवसांनी दुर्लक्ष नक्कीच होईल.. खूप त्रासदायक असतं असं वाचणं इतकंच सांगते..
पु.ले.शु..
21 Mar 2009 - 1:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विनायक,छोटेखानी स्फुट आवडले.
(गाणे ऐकायला जसे सुरेख आहे तसे पाहतांना आपलेही काही तरी हरवल्याचा भास नक्कीच होतो)
-दिलीप बिरुटे
(बावळट)
20 Mar 2009 - 11:03 pm | क्रान्ति
आज एकेक लेख वाचताना आठवणींचा पाऊस पडतोय! सुन्दर लिहिलाय.
http://www.youtube.com/watch?v=zuS4k378hKY
हा माझा नोस्टेल्जिया १०वी-११वीमधला{तेव्हाचा आणि आताचा पण!}
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
20 Mar 2009 - 11:57 pm | भडकमकर मास्तर
माझी दहावी २७ मार्च १९९१ ला संपली...
शेवटचा भूगोलाचा पेपर होता आणि उद्या आपली परीक्षा संपणार या सुखद विचारात गढून त्या शेवटच्या दिवशी अजिबात नीट अभ्यास झाला नाही, असे आठवते.
...
परीक्षा संपल्यावर तो दिवस तेव्हाच्या प्रथेप्रमाणे फाईव्ह मॅन आर्मी नामक चित्रपट व्हिडिओवर पाहून , त्यावर रग्गड चर्चा केली होती...
आता हसू येते पण ( परीक्षा होईपर्यंत कादंबर्या वगैरे वाचनावर आपणहून स्थगिती दिलेली होती म्हणून) त्याच दिवशी दुपारी सुहास शिरवळकरांची "बरसात चांदण्यांची" नामक कादंबरीसुद्धा वाचून संपवली होती..... तेव्हा फार आवडली होती.
नंतर मित्राच्या घराच्या गच्चीवर तीन चार जण झोपायला जाऊन पहाटेपर्यंत जागून सरत्या वर्षाचा आढावा घेत ( इतर गॉसिप वगैरे वगैरे ) चर्चा केल्याचे स्मरते....
अवांतर : या लेखात टंकनचुका (तुलनेने) कमी असल्याने प्रतिसाद दिला आहे....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Mar 2009 - 12:49 am | योगी९००
हा लेख आवडला. भाग्यश्री यांनी म्हणल्याप्रमाणे .. मुद्दाम लिहायचं म्हणून लिहीण्यापेक्षा मनापासून वाटेल तेव्हा, मोकळं होऊन लिहीलेलं जास्त छान उतरते. म्हणूनच प्रतिक्रिया देतोय.
बा़की शुद्धलेखनाबद्दल सांगण्याचा कंटाळा आला आहे. दिवस आणि दिन (दिवस या अर्थी) कायमच दीवस आणि दीन असे का टंकतोस? 'शिफ्ट' बटण जास्त वापरू नकोस. तश्या माझ्याही काही र्ह्स्व,दीर्घच्या चुका होतात. पण नेहमि वापरातले शबद मि बरोबरच लीहितो. (बघ कसे वाटते वाचायला हे वाक्य).
बाकी आठवणीविषयी...बर्याच वेळा काही गाणी ऐकली की काही आठवणी येतात. १० वी १२ वीचे दिवस, सांगलीच्या वालचंद मधले वसतीग्रुहातले दिवस..अश्या बर्याच आठवणी या लेखामुळे एकदम जाग्या झाल्या. गंमत म्हणजे कोल्हापुरला १२ वी च्या परीक्षेच्या २ दिवस आधी 'हम' चित्रपट अयोध्या टॉकिजला बघितला होता हे जास्त आठवते. बरेचसे नातेवाईक (आई, वडिल सुद्धा) एकत्र बरोबर गेलो होतो. तिकिटे काढेपर्यंत कोणी काही बोलले नाही, पण आत चित्रपट सुरू होण्याआधी २/३ नातेवाईकांनी चेष्टेत आणि बाबांनी खरोखरच झापले होते.
खादाडमाऊ
21 Mar 2009 - 1:14 am | बिपिन कार्यकर्ते
छान लिहिलं आहेस.
आजच आनंदयात्रीने लिहिलेला लेख वाच. प्रत्येक वाक्याला कमीत कमी १० तरी आठवणी आहेत मनात.
पुलेशु.
बिपिन कार्यकर्ते
21 Mar 2009 - 3:01 pm | विनायक पाचलग
आपणा सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार
शुद्धलेखनाच्या चुका जसा वेळ मिळेल आणि समजेल तशा दुरुस्त केलेल्या आहेत
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES
विनायक पाचलग
21 Mar 2009 - 6:15 pm | दशानन
नॉस्टेल्जीया म्हणजे काय ओ :?
* आम्हाला सत्ते पे सत्ताची गाणी आवडायची व डिस्को डान्सरची दहावीला होतो तेव्हा ;)
22 Mar 2009 - 8:27 am | प्राजु
कुठेही शब्दांचा महाभयंकर डोंगर किंवा अलंकारांनी न मढवता वाक्ये साधी आणि सोपी वाटली. लेख त्यामुळे वाचनीय झाला आहे.
वाचताना मलाही दहावीचा शेवटचा पेपर आठवला. नाही म्हंटलं तरी थोडाफार नॉस्टॅल्जिया झालाच.
असो..
विनायक,
खूप साधेपणाने लिहिलेले भावले. किप इट अप. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/