मानवतेचे शत्रू

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Mar 2019 - 4:46 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

आज सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट असेल तर ती जागतिक दहशतवाद! एखाद्या देशाने समोरून हल्ला केला तर त्याला तशाच कृतीने उत्तर देता येतं. आपल्याशी कोण लढतं, त्याचं बळ किती, हे आपल्याला कळतं. पण दहशतवादाचं स्वरूप वेगळं असतं. दहशतवादी कपटाने हल्ला करत असल्यामुळे संखेने कमी असूनही ते खूप मोठं नुकसान करू शकतात. सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनाही लक्ष्य केलं जातं. एक दहशतवादी शेकडो बेसावध निशस्त्र लोकांना मारून मग स्वत: मरतो. आपल्याला अजून जागतिक दहशतवादाचं स्वरूप समूळ कळलं नाही, हे अनेक घटनांमधून लक्षात येतं.
मानवतेचे शत्रू आपल्या उंबरठ्यावर उभे आहेत. अनेक दहशतवादी भारतात कार्यरत आहेत. काही दबा धरून बसलेत. केवळ इराक- सिरियाच नव्हे तर जर्मनी, फ्रांस, तुर्कस्थान, इराण, अफगानिस्तान, नेपाळ, बांगलादेश, समुद्री अशा मार्गाने दहशतवाद आपल्या दारावर धडका देत आहे. पाकिस्तानला दहशतवादाव्यतिरिक्‍त कोणतंच धोरण नसल्याने आपल्यासाठी हा देश कायमची डोकेदुखी होऊन बसला. पाकिस्तानच्या पंतप्रधानाला प्रत्यक्षात कोणतेही अधिकार नसतात. म्हणून त्यांच्याशी बोलणी करणंही नेहमी निष्फळ ठरतं.
दहशतवाद्यांचे डाव यशस्वी झालेत तर आपण जीवंत असलोत तरी असं लिखाण करायला स्वतंत्र राहणार नाही. एकतर दहशतवादाचं स्वरूप आपल्याला अजून नीट कळलं नाही, त्याचं गांभीर्य जाणवलं नाही वा आपल्या छोट्या मोठ्या जातीय- धर्मीय- राजकीय- सामाजिक स्वार्थांसाठी आपण दहशतवाद्यांचं अप्रत्यक्षपणे समर्थन करीत नसलो तरी कानाडोळा करीत असतो.
जगात वहाबी पंथाचे लोक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. हिंसेवर विश्वास असलेले कट्टर पंथीय लोक दुसर्‍यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. सुन्नी शियांना मारताहेत. काश्मिरातल्या अमन सेतूवर भारत- पाकिस्तान व्यापार चालतो. ह्या व्यापाराचा फायदा घेऊन अनेक काळे उद्योग इथं सुरू असतात. तस्करी- हवाला मार्गाने आलेला पैसा दहशतवादी कृत्यात ओतला जातो. दलाल पैदा केले जातात. काश्मिरात कट्टरता- दहशतवाद उगवण्यासाठी पाकिस्तान (अनैतिक मार्गाने मिळवलेला) प्रचंड पैसा पाठवतो. म्हणून हा व्यापारमार्ग आता दहशती मार्ग होत चालला. शिया- सुफी हे नेमस्थ पंथ आहेत. यांची संख्या काश्मिरात कमी होत आहे. (काश्मीरमध्ये वाट चुकलेले लोक कमी आहेत, हे नेहमी लक्षात ठेवावं.)
धर्म कोणताही असो- धर्म विकायला काढणारे लोक, धर्माचा शस्त्राप्रमाणे वापर करणारे लोक, धर्माचा सत्तेसाठी उपयोग करणारे लोक, धर्माचे भांडवल करणारे लोक, धर्माचा व्यवसाय करणारे लोक, धर्माची ढाल धरणारे लोक, धर्माचा व्यापार करणारे लोक, काही काळ यशस्वी होत राहतात. पण कायमस्वरूपी यशस्वी होत नाहीत; हे सत्य असलं तरी या दरम्यानचा काळ मानवतेसाठी फार भयानक असतो. हा काळ खूप मोठं नुकसान करून जातो. ते नुकसान कधीही भरून निघणारं नसतं.
धर्मासाठी माणसं मारणार्‍याला फक्‍त नरक निश्चित असू शकेल. माणूसपणाचा आनंदही असे आतंकी या जन्मात घेऊ शकत नाहीत. दहशतवादी पशूसारखे मरतात. माणसाच्या उत्थापनासाठी निर्माण झालेल्या धर्माला काही लोक नरक बनवून टाकतात. मरणानंतरच्या सुंदर आयुष्याच्या अमिषाने ‘कुत्तेकी मौत’ मरणार्‍या आतंकींना माहीत नसतं, की मेल्यानंतर त्यांना नरकात सुध्दा सरड्याचा जन्मही पुन्हा मिळणार नाही. चिरंजीव होणं आणि स्वर्गातल्या पर्‍या उपभोगायला मिळण्याच्या कल्पना करणारे फक्‍त मुर्खांच्या नंदनवनात सापडतील. तरीही अनेकांचे ब्रेनवॉश करून दहशतवादाचे कारखाने पाकिस्तानात राजरोस सुरू आहेत. त्याची आग आपल्याला बसल्या जागी दिसते. त्या आगीचा धूर आपल्यापर्यंत पोचला आहे. अशा मानवतेच्या शत्रूंना वेळीच रोखायला हवं.
14 फेब्रुवारीच्या पुलवामा दहशती हल्ल्यानंतर आताच 26 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानातील काही दहशतवादी तळ आपल्या वायूदलाच्या हल्ल्यांनी नष्ट करण्यात आले. पाकिस्तानच्या निरपराध नागरिकांना यात झळ बसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. म्हणून हवाई दलाचे अभिनंदन. पाणी नाकातोंडाशी आलं होतं. अशा वेळी जगातला कोणताच देश स्वस्थ बसला नसता. असा वार करणं आवश्यक झालं होतं. अमेरिकेच्या बदलत्या परराष्ट्रीय धोरणांमुळे हे दोन सर्जिकल ट्राइक करणं आपल्याला शक्य झालं, हे ही लक्षात घ्यावं लागेल.
मात्र या कारवाईमुळे दहशतवादी संपले असा समज करून घेणं चुकीचं ठरेल. उलट आता पूर्वीपेक्षा जास्त खबरदारी घ्यावी लागेल. (पाकिस्तान हा जबाबदार आणि नेक देश असता तर त्याने दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारताची मदत घेतली असती.) 27 फेब्रुवारीच्या सकाळपासून येणार्‍या बातम्या पुन्हा अस्वस्थ करणार्‍या होत्या. 28 तारखेला वैमानिक अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेच्या घोषणेने थोडा‍ दिलासा मिळाला. युध्द टाळून दहशतवादी कारवाया बंद करायला पाकिस्तानला भाग पाडलं पाहिजे. यासाठी आयात- निर्यात, वाघा सरहद्द, काश्मिरातला अमन सेतू, दळणवळण, कलाकार, क्रिकेट, हुर्रियत आदींवर निर्बंध घातले तरी खूप काही साध्य होऊ शकतं. (काश्मिरातले नेते सत्तेत असताना भारताच्या बाजूने बोलतात आणि सत्तेबाहेर असताना पाकिस्तानची सहानुभूती मिळवतात. अशा नेत्यांमुळे काश्मिरी नागरिक गोंधळतात. पाठिंबा देतानाच अशा नेत्यांना वगळून काश्मीरचा मुख्यमंत्री निवडायला हवा.) या हवाई हल्ल्यांचं देशात (कोणत्याही बाजूने) राजकारण होणार नाही, अशी आशा बाळगू या.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

समाजलेख

प्रतिक्रिया

तुमच्या आख्या लेखा मध्ये फक्त एकदाच " सुन्नी शियानां मारतात " असा उल्लेख आला आहे . हे कस जमत बुवा तुम्हाला ? संपूर्ण जगात दहशतवादी हल्ल्या मध्ये मुस्लिमच सामिल असतात हे सूर्यप्रकाश इतके स्पष्ट असताना तुम्ही मात्र खूबी ने ' त्यांचा ' उल्लेख टाळून धाग्यातील जान हरवून टाकली .
शांतताप्रिय धर्मासाठी सतत भांडणाऱ्या तमाम पुरोगम्या मुळे लेख जरा सॉफ्ट लिहिला आहे अस वाटतंय .

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Mar 2019 - 4:42 pm | डॉ. सुधीर राजार...

दृष्टीकोनामुळे लेख तसा वाटला. तटस्थपणेही वाचून पहावा

बाप्पू's picture

1 Mar 2019 - 7:50 pm | बाप्पू

छान छान..
लेख कसा एकदम फेक्युलर... सॉरी... सेक्युलर वाटला..
एखाद्या काँग्रेस किंवा कम्युनिस्ट प्रवकत्याच्या मुलाने आंतरशालेय निबंध स्पर्धेत लिहला होता का??

सबका साथ सबका विकास

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Mar 2019 - 5:27 pm | डॉ. सुधीर राजार...

मनात घेतलं असतं तर हे करता आलं असतं. पण भाषणांत अडकले.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Mar 2019 - 4:43 pm | डॉ. सुधीर राजार...

वाचत चला. हळूहळू अशा वाचनाचीही सवय होईल

ललोखो,

लेख तटस्थपणेही वाचून पहावा म्हणून लेखक सुचवताहेत. मात्र तसा न वाचता हिंदूपक्ष घेऊनंच वाचवा असं माझं मत आहे. कारण की हिंदू भारताच्या ज्या प्रदेशातनं कमी झाले ते भूभाग भारतापासनं तुटले. केवळ तुटलेच नाही तर भारतविरोधीही झाले. त्यामुळे हिंदूंचा पक्षपाती असणं ही काळाची गरज आहे.

आ.न.,
-गा.पै.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Mar 2019 - 5:29 pm | डॉ. सुधीर राजार...

पक्षपातापेक्षा आपण मानव होऊ या. धर्म पाळायचाच तर मानवतावादी धर्म पाळावा. आणि धर्माच्या आहारी जाणार्‍यांना शब्दांचा मार दिलाच पाहिजे.

धर्म पाळायचाच तर मानवतावादी धर्म पाळावा. - नेमका कुठला? त्याचे निकष काय? ते कसे आणि कोण ठरवणार?

हा नवा धर्म सगळ्या मानव समाजाने सरसकट आणि विनाअट स्वीकारला तर ठीक आहे, अन्यथा अ धर्मातल्या लोकांनी मोठ्या संख्येने मानवता धर्म पाळायचे ठरवले आणि ब धर्मातल्या लोकांनी धर्मनिष्ठा अबाधित ठेवली तर अ विरुद्ध ब असा संघर्ष झाल्यास अ धर्म दुर्बळ ठरेल. अशा वेळी अ धर्मियांचा संहार किंवा पराभव झाला तर त्याचे उत्तरदायित्व मानवतावादी लोकांवर नसेल का?. असो.

जालिम लोशन's picture

3 Mar 2019 - 1:20 pm | जालिम लोशन

लेखकाला नेमके काय सांगायचे आहे हे समजले नाही. लेखाचा ऊद्देश कळला नाही. किंवा भावना पोहचली नाही

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Mar 2019 - 5:30 pm | डॉ. सुधीर राजार...

कोणताही धर्माला झुकते माप न देता मानवता धर्म पाळू या असं म्हणायचं आहे.

भंकस बाबा's picture

3 Mar 2019 - 9:47 pm | भंकस बाबा

जरा सपष्ट कराल का, मानवता का क़ाय तो धर्म कसा पाळायचा तो?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Mar 2019 - 5:16 pm | डॉ. सुधीर राजार...

आपला आणि परका नको. धर्मासाठी माणसं मरत मारणार असतील तर तो हवा कशााला?

जालिम लोशन's picture

4 Mar 2019 - 3:25 pm | जालिम लोशन

निसर्गधर्म म्हणजे मानवताधर्म आहे का? कारण जगातील प्रत्येक धर्म स्वतःला मानवतावादी धर्म म्हणवतो. कि तुम्हाला civilisations म्हणायचे आहे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Mar 2019 - 5:17 pm | डॉ. सुधीर राजार...

ज्या धर्मात आतंकी तयार होत नाहीत तो मानव धर्म

भंकस बाबा's picture

4 Mar 2019 - 6:00 pm | भंकस बाबा

जरा आतंकवादीची वाख्या सांगता क़ाय.
म्हणजे जो गोळ्या घालून निरपराध लोंकाचे मुडदे पाडतो तो आंतकवादी की जो आपल्या धर्मात लिहिलेल्या भंपक गोष्टिसाठी हठवादीपणा करतो तो आंतकवादी की जगाला नको असलेली समानता पाहिजे म्हणून समाजात काड्या घालणाऱ्याला तुम्ही आंतकवादी म्हणाल?

नाखु's picture

4 Mar 2019 - 10:08 pm | नाखु

आणि हिंदुत्ववादी पक्ष्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा.

मिपावर एक नवा पै चे योगदान न दिलेला वाचकांची पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

ओम शतानन्द's picture

6 Mar 2019 - 9:25 am | ओम शतानन्द

इतर कुठल्याही धर्माच्या लोकांपेक्षा मुस्लीम लोकांचे धर्मांध अतिरेकी बनण्याचे प्रमाण जास्त आहे, इतर कुठल्याही धर्माचा मनुष्य जेव्हा अधिकाधिक धार्मिकतेकडे झुकत असतो तेव्हा त्याच्यामध्ये दया शांती क्षमा प्रेम हे गुण येऊ लागतात , पण मुस्लीम मनुष्यच्या बाबतीत याच्या विपरित झालेले दिसते , असे का होत असावे

गामा पैलवान's picture

6 Mar 2019 - 1:47 pm | गामा पैलवान

ओम शतानन्द,

तुमच्या प्रश्नाचं उत्तर असंय की इस्लाम हा भारतीय हिंदू समजतात तशा अर्थाचा धर्म नाहीच्चे मुळी. ती वाळवंटी अरबी जमातीचं राजकीय महात्म्य वाढवणारी राजकीय मतप्रणाली आहे. तिचा अध्यात्मिक साधनेशी सुतराम संबंध नाही. धर्माच्या आडून राजकीय पोळी भाजणे हे तथाकथित मुस्लिम नेत्यांचं उद्दिष्ट आहे.

आ.न.,
-गा.पै.

ट्रेड मार्क's picture

7 Mar 2019 - 9:24 pm | ट्रेड मार्क

धर्मांधतेच्या नावाखाली इतर देश व भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणण्याचे हे मुस्लिमांचे षडयंत्र आहे. एखाद्या प्रदेशात कुठल्या ना कुठल्या मार्गाने शिरकाव करणे, अल्पसंख्यांक आणि त्यांच्या देशात त्रास सोसलेले म्हणून झुकते माप पदरात पडून घेणे, मग आपली लोकसंख्या वाढवणे (अनिर्बंध जन्मदर आणि सक्तीचे धर्मांतरण), त्यानंतर शरिया लागू करण्याची मागणी, पुढे सरकारी आस्थापनांत आणि राजकारणात वर्चस्व निर्माण करणे आणि मग संपूर्ण देश अधिपत्याखाली आणणे ही या लोकांची कार्यशैली आहे.

यात स्थानिक आणि जगभरात पेरलेले "मानवतावादी" आणि "सेक्युलर" या लोकांना मदत करत असतात. नजीकचे उदाहरण द्यायचे तर सीरिया मधून रेफ्युजी युरोपमध्ये पळून येत होते पण काही युरोपियन देश त्यांना स्वीकारायला तयार नव्हते. मग आयलान कुर्दीचा फोटो जगभर परत परत दाखवला गेला आणि या युरोपियन देशांमध्ये सेक्युलर आणि मानवतावाद्यांनी या रेफ्युजींना युरोपने स्वीकारावे म्हणून ऑनलाईन चळवळ उभारली. यात भावनिक आवाहन केले गेले जसे की -

The UK must welcome its fair share of refugees to ease this crisis. Here is how to show your support:
1. Take a picture of yourself holding a sign saying `Refugees welcome’,
2. Tweet it using hashtag refugeeswelcome,
3. Sign our petition at ind.pn/refugeeswelcome.

शेजारी इतके मुस्लिम देश असताना समुद्र ओलांडून युरोपपर्यंत यायची काय गरज होती? एकाही सेक्युलराने व मानवतावाद्याने सौदी, युएई किंवा इतर मुस्लिम देशांनी या रेफ्युजींना स्वीकारावे असा आग्रह का धरला नाही? का हे लोक स्थलांतरित होऊन फक्त युरोप, अमेरिका वगैरे देशांमध्ये जातात? ह्या रेफ्यूजीनी पुढे युरोपमध्ये काय धिंगाणा घातला हे तुम्हाला माहित असेलच. नसेल तर इथे आणि इथे वाचा. बहुतेक सगळ्या युरोपिअन देशात फुकट शिक्षण आणि वैद्यकीय सेवा आहे जी करदात्यांच्या पैश्यांतून चालवली जाते. तसेच बेरोजगारी भत्ता आणि फूड शेल्टर्स वगैरे पण आहेत जे सुद्धा करातून मिळणाऱ्या पैश्यांमधून चालवले जातात. यामुळे त्या देशातील स्थानिक जनतेला किती त्रास भोगावा लागला आणि लागतो आहे याची कोणाला फिकीर नाही. आता या रेफ्युजींनी त्यांच्या देशात परत जावे आणि तिथेच राहावे म्हणून युरोपिअन देश त्यांना पैसे देत आहेत. हा रिसर्च बघा.

सर्वसाधारणपणे आपण म्हणजे हिंदू लोक ज्या देशात स्थलांतरित होतो (रेफ्युजी म्हणुन नव्हे तर कामानिमित्त वगैरे) त्या देशातील कल्चरमध्ये आपण मिसळून जायचा प्रयत्न करतो. म्हणजे अमेरिकेत राहणारे हिंदू पण पाडवा, दसरा, दिवाळी बरोबर ख्रिसमस सुद्धा साजरा करतात. पण मुस्लिम जिथे जातात तिथे ते तिथल्या संस्कृतीत सामावून जायचा प्रयत्न करतात का? तर याचे उत्त स्पष्ट "नाही" असेच आहे. उलट ते मुस्लिम संस्कृती त्या देशात लादण्याचा प्रयत्न करतात. मला माझा धर्म प्रिय आहे तो मी माझ्या घरात पाळतो, इतरांवर जबरदस्ती करायला जात नाही. एवढेच नव्हे तर अगदी माझ्या घरातील कोणाला धर्म नसेल पाळायचा तर त्याची पण मोकळीक आहे. पण इतर कोणी त्याचा धर्म कसा चांगला आणि माझा धर्म कसा वाईट हे सांगत असेल तर मी का ऐकावे? जर तो त्याच्या धर्माप्रमाणे मी वागावे असे सांगत असेल तर मी का ऐकून घ्यावे?

इस्लाम हा धर्मच क्रूर आहे. हे लोक हलाल असल्याशिवाय मांस खात नाहीत. हलाल पद्धत म्हणजे काय तर त्या प्राण्याच्या गळ्याची शीर कापून त्यातून हळूहळू रक्त वाहून द्यायचे म्हणजे तो प्राणी तडफडत तीळतीळ मरणार. का त्या प्राण्याला एवढा त्रास द्यावा? या धर्मात स्त्रियांना कशी वागणूक दिली जाते हे आपणा सर्वांनाच माहित आहे.

सद्गुरूंचा हा व्हिडीओ बघा. बऱ्याच स्पष्टपणे विचार मांडलेत.
तुमच्या दाराशी एक जण आला आणि १०० प्रॉब्लेम्स सांगून त्याला तुमच्या घरात राहून देण्यासाठी विनवले. त्याची कहाणी ऐकून, शेजाऱ्याच्या दबावामुळे आणि तुमच्यातला मानवतावाद जागा झाला म्हणून तुम्ही त्याला कुटुंबासहित ठेवून घेतलेत. राहणे, खाणे पिणे तुमच्या पैश्यातून होते आहे कारण बिचार्याला काम धंदा नाहीये. पण मग हळूहळू ते कुटुंब हातपाय पसरायला लागलं, त्यांना पाहिजे तसेच अन्नपदार्थ घरात बनले पाहिजेत अशी जबरदस्ती होऊ लागली, तुमच्या घरातल्या स्त्रियांना असुरक्षित वाटेल असे प्रकार सुरु झालेतर तुम्ही किती दिवस ऐकून घ्याल? त्यात तुमच्या पेक्षा त्यांची संख्या जास्त असेल तर? तुमच्याच घरातून तुम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न होत असेल तर?

ज्या दिवशी आपल्याला हा मुस्लिम अजेंडा समजेल आणि आपण त्यावर ऍक्शन घेऊ तो सुदिन, अन्यथा नजीकच्या भविष्यात आपल्या घरात सुद्धा बुरखे दिसतील.

बाप्पू's picture

8 Mar 2019 - 3:07 pm | बाप्पू

सेकुलर मोड ON >>

काहीही काय बोलताय ट्रेड मार्क??
आतंकवादाचा आणि कोणताही धर्म नसतो. आणि आतंकवादी लोकांचा देखील. पिके पिक्चर बघितला नाही का?? ठप्पा किधर है वो दिखाव.. !!!
Xxxx धर्म शांततेची शिकवण देतो. हे सर्व लोक भरकटलेले असून त्यांचा आणि xxxx चा काही संबंध नाही. हे सर्व अमेरिका आणि इस्त्राईल चे कारस्थान आहे xxxx ला बदनाम करण्यासाठी.

सेकुलर मोड OFF.

सौन्दर्य's picture

9 Mar 2019 - 7:27 am | सौन्दर्य

अतिशय चपखल व मुद्देसूद विचार मांडलेत. अभिनंदन.

भंकस बाबा's picture

7 Mar 2019 - 11:27 pm | भंकस बाबा

ज्यानी हा मानवतावादी धागा काढला तेच आता गायब झाले आहेत. त्यामुळे इथे काही टायपुन फायदा नाही.
मानवतावाद , सेकुलरिज्म , बंधुभाव हे फक्त या देशातील हिंदू लोकांनी पाळन्याचे नियम आहेत

भंकस बाबा's picture

7 Mar 2019 - 11:27 pm | भंकस बाबा

ज्यानी हा मानवतावादी धागा काढला तेच आता गायब झाले आहेत. त्यामुळे इथे काही टायपुन फायदा नाही.
मानवतावाद , सेकुलरिज्म , बंधुभाव हे फक्त या देशातील हिंदू लोकांनी पाळन्याचे नियम आहेत

नाखु's picture

9 Mar 2019 - 7:23 am | नाखु

अत्यंत व्यग्र आणि विचारवंत डॉ असल्याने विचारांची देवाणघेवाण,साद प्रतिसाद असल्या कालबाह्य संकल्पनेचा अजिबात अंगिकार करीत नाहीत,या उपर हे विचारमोती आपल्याकरिता येथे देतात हेच त्यांचे मानवजातीवर अगणित उपकार आहेत.

वाचकांचीच पत्रेवाला नाखु

भंकस बाबा's picture

8 Mar 2019 - 6:11 pm | भंकस बाबा

पुलवामच्या अतिरेकी हल्ल्यात 40 जवान शहीद!
सर्व शांतिप्रिय मोहल्ल्यात जवानाना श्रद्धांजलि! अगदी मोठे पोस्टर लावून!
बालाघटमधे अतिरेकी कैम्प वायुसेनेच्या हल्ल्यात उद्ध्वस्त!
आता शांतिप्रिय मोहल्ल्यात स्मशानकळा, ना वायुसेनेच्या अभिनंदनाचे पोस्टर ना जल्लोष!
ह्यावरुन क़ाय ते समझा