करायला गेलो आत्महत्या

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
30 Jan 2019 - 6:55 pm

केलेल्या कृत्यांचा पश्चाताप म्हणून

करायला गेलो आत्महत्या

टाकला दोर उभा वर पंख्यांला

राहत्या नव्या घरी

गच्चं मारुनी गाठ

दाखवणार होतो आयुष्याला पाठ

घेतला गळफास तेव्हा

गदागदा हलु लागले सिलिंग

फुसका बार निघतोय कि काय ?

याचे हळूहळू येऊ लागले फिलिंग

साला , नको तो डोक्याला ताप झाला

सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला

दोघेही उताणे एकावर एक पडलो

दोघेही जागच्या जागीच मोडलो

घातली बिल्डरच्या नावाने शिवी

साला बिल्डर हाय कि न्हावी ?

साल्याने एवढी मोठी इमारत बांधली

पण आत्महत्या करता येऊ नये

याची पुरेपूर काळजी घेतली

आत्महत्या बाजूलाच ह्रायली

पोलिसांची सूत्रं भराभर हलली

उचलून टाकले बिल्डरला तुरुंगात

माझे उर्वरित दिवस मात्र गेले फुकटचे सत्कारात

कुठली आत्महत्या नि कसलं काय ?

आजकाल कशाचाच भरवसा राहिला नाय

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

विनोदआईस्क्रीमखरवसगोडाचे पदार्थग्रेव्ही

प्रतिक्रिया

समीरसूर's picture

31 Jan 2019 - 11:12 am | समीरसूर

कविता आवडली... :-)

खिलजि's picture

31 Jan 2019 - 1:02 pm | खिलजि

धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2019 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

अल्लाऊद्दीन खिलजी पागोटे सरसावून विनोदी कविता लिहायला बसला आहे असे चित्र मनासामोर उभे राहिले ! =))

सोनू तुला माज्याव भरवसा नाय का

मित्रहो's picture

31 Jan 2019 - 11:52 pm | मित्रहो

कविता आवडली

वीणा३'s picture

1 Feb 2019 - 9:49 pm | वीणा३

मजेशीर :)

आनन्दा's picture

2 Feb 2019 - 6:51 am | आनन्दा

ज्जे बात!

चित्रगुप्त's picture

2 Feb 2019 - 9:36 am | चित्रगुप्त

फर्मास कविता.

सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला
दोघेही उताणे एकावर एक पडलो
दोघेही जागच्या जागीच मोडलो....

....सिलिंगसकट वरची बाई खाली आली ..... असे असते तर काय घडले असते तेही लिहा.

चित्रगुप्त साहेब , हि बाईची कल्पना एकदम जबरदस्त होती ... भन्नाट झाली असती कविता , आधीच डोक्यात आली असती तर.. अन हो पुनश्च धन्यवाद सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना ..