अडनिडी मुलं-४

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
26 Dec 2018 - 11:15 pm

आज सकाळी सकाळी ९:०० च्या दरम्यान बेल वाजली. आज कचरा घेणारी बाई लवकर आली कि काय म्हणत मी कचऱ्याच्या दोन्ही बादल्या घेवूनच दरवाजात धावले आणि दार उघडताच काळजात धस्स झाले. माझ्या घरी पूर्वी काम करणाऱ्या आणि माझ्या अडीनिडीला धावून येणाऱ्या मावशी दारात उभ्या होत्या. घरात पावूल कि दारात पावूल त्यांनी रडायला चालू केल. मलाही राहवले नाही. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागलो. मावशी तर धायमोकलून रडू लागल्या. मी गपा मावशी गपा एवढेच बोलत होते आणि त्या कशी गप्प बसू ओ मी म्हणून रडत होत्या. माझ्या टीनाने असा काय गुन्हा केला असेल ओ, काय म्हणून माझ्या लेकराला अशी शिक्षा म्हणून अजूनच रडू लागल्या. लेक पण त्यात सामील झाली आणि रडण्यात कधी ११ वाजले ते कळलेच नाही.

तर हि टीना म्हणजे मावशीची १७ वर्षाला २० दिवस कमी असलेली नात. मुलाची मुलगी. गोरीपान, नाकेशार, बारीक डोळ्यांची टीना अतिशय सुंदर पोरगी होती. मावशींचे पूर्ण कुटुंबच मिळेल ती मोलमजुरी करून खावून पिवूनसुखी असलेले कुटुंब. प्रत्येकजण वेगवेगळा राहतो, आजूबाजूलाच पण त्या पाची भावांच्यात टीना हि एकटीच पोरगी. एकटी असली म्हणून काय, घरातले काम, स्वयंपाक सर्व अगदी निगुतीने करणारी. तिची आई कोठेतरी शाळेत मावशी म्हणून काम करणारी. तर आईला सकाळी सहाला पोरगी डबा बनवणार. आई थोडाफार कामाला हात लावून जायची. पोरगी मागे सर्व मागचे धुणे भांडी, केरवारा आवरणार. मग कॉलेजला जाणार. हा तर ही टीना आम्हाला माहित झाली ती तिच्या दहावीच्या सुट्टीत. मावशीच्या बरोबर त्यांना मदत करू लागायला यायची. शांत, समंजस. तिनेही काही घरात काम धरले. मी मावशींना रागवायचे, एवढ्या लहान वयात पोरीला दुसऱ्या घरची कामे करायला लावता म्हणून पण ती फक्त हसायची. मावशी म्हणायच्या आहो आम्हीबी तिला नकोच म्हणतोय पण ती ऐकतच नाही . म्हणती, तेवढच माझ्या कालेजाला, कलासाला हुतील. बाप नकोच म्हणतोय पुढं शिकायला पण हि पोरगी ऐकतच नाही. दहावीची पूर्ण सुट्टी पोरगी काम करत होती. मार्क्सही ७५% मिळाले. घरचे सर्व काम करून पोरगीला मिळालेले मार्क्स चांगलेच होत. पोरगीने कॉमर्सला ११ विला एडमिशन घेतले. वह्या पुस्तकं, फॉर्म साठीचा खर्च, एकदोन नवीन ड्रेस असे सर्व सुट्टीत काम करून मिळवले. सोसायटीतल्या एकदोन जणींनी दिलेले ड्रेस पण नीट मापाचे करून घेतले. कॉलेजला पोरगी जायला लागली. घरी येवून काम , कधी कधी आजीच्या मदतीला. पोरगीला कधी पहिले कि मन अभिमानाने भरून यायचे. तर ही टीना १५ दिवसांपूर्वी रविवारी घरातून बिन चप्पलाची निघून गेली. स्वतचा छोट्या मोबईल मधले सर्व contact डिलीट केले आणि घरातून गेली.

त्याच्या पाच सहा दिवस तिच्या आईच्या छातीत गाठ उठली होती म्हणून त्याचे ऑपरेशन केले होते. ते कोन्द्व्याच्या मिलेतरी हॉस्पिटल मध्ये. हि पोरगी सकाळी घरकाम करून कोलेज करून आईकडे जायची. घरी येवून सर्व काम , आजीला थोडी मदत, अभ्यास . आईला शनिवारी घरी आणले , सर्व दवाख्नायचे कपडे धुतले . काम केले आणि रविवारी निघून गेली. मैत्रिणीकडे जावून आले म्हणून गेली . गुरुवारी जवळच्याच विहिरीत तिचे प्रेत सापडले .
काहीही सुगावा नाही, काहीही कोणाला कळले नाही, अगदी संशय सुद्धा आला नाही. मैत्रीनीकडे चौकशी केल्यावर कोणतरी आकाश नावाचा मुलगा होता एवढेच कळलेय . बाकी काहीच नाही. मावशी म्हणत आहेत , आमची पोरगी स्वता:हून असे काही करून घायची नाही तिला कोणीतरी मारून टाकलेय . अजून रिपोर्ट यायचे आहेत. अशी मस्त राहणारी मुलगी अशी जावूच कशी शकते ह्यावर मी सुन्न आहे. आईची इतकी माया करणारी , आजीची माया करणारी पोरगी अशी ठरवून घर सोडून जाते आणि होत्याचे नव्हते होते ह्याबद्दल चटका लागून राहिलाय. आतापर्यंत आपण श्रीमंत मुलांचीचर्चा करत होतो पण आता हि कष्टाळू मुलगी गेली तिचे काय? मावशी म्हणाल्या , पोराला घेवून घरी आली असती तरीबी लगीन करून दिल असत, माझी पोर अशी करणार नाही . कुण्या भाड्याने तिला मारली तेच कधी बी च्नागले होणार नाही. मी कोरत कचीरी करीन पण पोरगीला न्याव दिन.

का ? कसे ? कधी ? हे सर्व प्रश्न आता हवेत विरलेत .

समाजजीवनमानलेख

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

27 Dec 2018 - 1:40 am | मास्टरमाईन्ड

काही समजण्यापलिकडचं आहे.

मास्टरमाईन्ड's picture

27 Dec 2018 - 1:40 am | मास्टरमाईन्ड

असले अनुभव पाहिले / ऐकले की

मुक्त विहारि's picture

27 Dec 2018 - 4:34 am | मुक्त विहारि

सुन्न...

असं काही घडणं सर्वकाही निरर्थक होऊन जाण्याचे क्षण. काय बोलणार?

अशीच एक केस जवळुन बघीतली आहे. इतकी वर्ष झालीत पण त्या मुलीचा भोळा चेहरा विसरले नाहीये. आई - वडील ाचे
खुप कॉन्टँक्ट्स होते. नंतर कळलं मुलाची पण अगदिच चूक नव्हती,, पण दोघं घाबरसली .
समाज नावाच्य ा भुताचे बळी ..

अर्धवटराव's picture

27 Dec 2018 - 10:53 am | अर्धवटराव

पुढे काय झालं या केसमधे? आजीचा संशय खरा ठरला का ? :(

पंधरा वीस दिवस झालेत, अजुन रिपोर्टस यायचे आहेत असे काल मावशी म्हणाल्या.

यशोधरा's picture

27 Dec 2018 - 11:23 am | यशोधरा

आई गं..

दुर्दैवी घटना. टीनाला न्याय मिळो!

अशीच एक केस जवळुन बघीतली आहे. इतकी वर्ष झालीत पण त्या मुलीचा भोळा चेहरा विसरले नाहीये. आई - वडील ाचे
खुप कॉन्टँक्ट्स होते. नंतर कळलं मुलाची पण अगदिच चूक नव्हती,, पण दोघं घाबरसली .
समाज नावाच्य ा भुताचे बळी ..

सविता००१'s picture

27 Dec 2018 - 4:53 pm | सविता००१

सुन्न व्हायला होतं असं काही वाचून. टीनाला न्याय मिळो