चित्रपट सृष्टीत ब्रेक मिळणे , त्यानंतर यश मिळणे , त्यानंतर दीर्घ काळ टिकणे यासाठी नशिबाची साथ लागतेच , पण त्याच बरोबर परिश्रमाची तयारी , बदलाला सामोरे जाण्याची तयारी हे गुण लागतात.
अशा प्रकारे काही कलाकारांची प्रदीर्घ कारकीर्द झाली त्यात एक योगायोग असा झाला त्यांनी एकाच नावाचे दोन सिनेमे केले.
मला सापडलेली हि यादी
आणी काही नवीन असेल तर ऍड करा.
१)नास्तिक (१९५४) अजीत , नलिनी जयवंत
नास्तिक (१९८३)अमिताभ बच्चन , प्राण , हेमा मालिनी , नलिनी जयवंत
२)अफसाना (१९५१) अशोक कुमार (दुहेरी भूमिका),वीणा, कुलदीप कौर
अफसाना (१९६६) अशोक कुमार , प्रदीप कुमार , पद्मिनी
३)हिफाजत (१९७३)विनोद मेहरा , आशा सचदेव , अशोक कुमार
हिफाजत (१९८७)अनिल कपूर , माधुरी दीक्षित , अशोक कुमार
४)आन बान (१९५६) अजित,नलीनी जयवंत,प्राण
आन बान (१९७२) राजेंद्र कुमार ,राखी, प्राण
५)चिंगारी(१९५५) नलीनी जयवंत,शेखर,प्राण
चिंगारी (१९७१) संजय खान,लीना चंदावरकर, प्राण
६)संतान (१९७६)जितेंद्र,रेखा,अशोक कुमार
संतान (१९९३)जितेंद्र,मौसमी चॅटर्जी,दीपक तिजोरी , काजोल
७)बाझी(१९६८) धर्मेंद्र , वहिदा रहेमान
बाझी(१९८४) धर्मेंद्र , रेखा , मिथुन चक्रवर्ती
८)दीवार (१९७५) अमिताभ बच्चन , शशी कपूर
दीवार (२००४)अमिताभ बच्चन , संजय दत्त
९)औलाद (१९६८) जितेंद्र , बबिता
औलाद (१९८७) जितेंद्र , श्रीदेवी , जया प्रदा
१०)खानदान (१९४२) प्राण , नुराजहां
खानदान (१९६५) नूतन , सुनील दत्त , प्राण
११)दो दिलोंकी दास्तान (१९६६)ओम प्रकाश , प्रदीप कुमार,वैजयंती माला
दो दिलोंकी दास्तान (१९८५)ओम प्रकाश , संजय दत्त , पद्मिनी कोल्हापुरे
१२)दो फुल (१९५८)जीवन , बिपीन गुप्ता , उल्हास,बेबी नाझ,मा.रोमी
दो फुल (१९७३)जीवन,मेहमूद,विनोद मेहरा
१३) बाझी (१९५१)जॉनी वॉकर , देव आनंद , गीता बाली
बाझी( १९६८) जॉनी वॉकर , धर्मेंद्र , वहीदा रेहमान
१४)जाल (१९५२) जॉनी वॉकर , देव आनंद , गीता बाली
जाल (१९६७)जॉनी वॉकर , विश्वजीत , माला सिन्हा
प्रतिक्रिया
20 Dec 2018 - 4:18 pm | mrcoolguynice
बाझी :आमीर खान ,ममता कुल्करनी ?
20 Dec 2018 - 5:34 pm | चौथा कोनाडा
रोचक माहिती.
लहानपणी एक वही करून त्यात सिनेसृष्टीतील अभिनेते व त्यांची मुळ यांची यादी केली होती ते आठवलं
21 Dec 2018 - 9:26 am | कानडाऊ योगेशु
चित्रपटाच्या नावाचा कॉपीराईट २० वर्षांपर्यंत असतो अशी ऐकिव माहीती होती. ह्यावर क्लृप्ती म्हणुन मुख्या नावानंतर काही टॅगलाईन जोडण्यात येते. जसे कि दाग-द फायर.
इथे नास्तिक,दिवार,खानदान वगळता दोन्ही चित्रपटांमधला कालावधी २० वर्षांपेक्षा कमी आहे. त्याकाळी बहुदा ह्याप्रकाराकडे कोणी इतक्या गंभीरतेने पाह्त नसावे.
21 Dec 2018 - 2:23 pm | srahul
नास्तिक चं माहीत नाही , पण दिवार चं , दिवार लेट अस ब्रिंग हिरोज होम असं काहीतरी केलं होत.
21 Dec 2018 - 2:41 pm | चौथा कोनाडा
बरोबर ....
आणि त्यात दिवार हे नाव मोठ्ठं आणिहायलाईट केलं होतं
21 Dec 2018 - 10:02 am | स्पार्टाकस
कंगन या नावाचे तीन सिनेमे आले आहेत आणि तिन्हीमध्ये अशोककुमार होता.
१९३९ - अशोक कुमार, लीला चिटणीस, नाना पळशीकर
१९५९ - अशोक कुमार, निरुपा रॉय
१९७१ - अशोक कुमार, माला सिन्हा, संजीव कुमार.
21 Dec 2018 - 1:13 pm | srahul
धन्यवाद
21 Dec 2018 - 10:37 am | स्पार्टाकस
अशोककुमारप्रमाणेच एकाच नावाच्या तीन सिनेमात काम करणारी आणखीन एक अभिनेत्री म्हणजे सुलोचना - रुबी मायर्स.
१९२८ - अनारकली (मूक)
१९३५ - अनारकली (बोलपट)
१९५३ - अनारकली. (या सिनेमात अनारकली होती बीना रॉय आणि सुलोचना जोधाबाईच्या भूमिकेत होती).
ही सुलोचना आणि मराठी आणि हिंदी सिनेमातल्या सुलोचनाबाई वेगवेगळ्या. त्या सुलोचना लाटकर.
एकाच नावाच्या दोन सिनेमात काम केलेला आणखीन एक कलाकार आठवला तो म्हणजे विक्रम कपूर
देवदास - १९३५ (सैगलचा) आणि १९५५ (दिलीप कुमारचा)
21 Dec 2018 - 1:26 pm | srahul
धन्यवाद ...
21 Dec 2018 - 10:53 am | स्पार्टाकस
कामिनि कौशल
शहीद (१९४८) - कामिनी कौशल, दिलीप कुमार
शहीद (१९६५) - कामिनी कौशल, मनोज कुमार, प्रेम चोपडा
21 Dec 2018 - 1:22 pm | srahul
धन्यवाद
21 Dec 2018 - 11:51 am | दुश्यन्त
यात अंदाज'चा उल्लेख कसा नाही ?
बॉलीवूडमध्ये एकाच नावाचे अनेक चित्रपट यात 'अंदाज' चा रेकॉर्ड असावा. राज कपूर, राजेश खन्ना, अनिल कपूर , अक्षय कुमार यांचे वेगवगळ्या काळात या एकाच नावाचे एकूण ४ चित्रपट येऊन गेले आहेत.
21 Dec 2018 - 1:25 pm | srahul
एकाच अभिनेत्याने काम केलेले एकाच नावाचे सिनेमे असा विषय आहे. अंदाज चा योगायोग म्हणजे या नावाच्या सिनेमात कपूर कुटुंबा मधील कुणी ना कुणी आहे. १९४९ साली राज कपूर , १९७१ साली शम्मी कपूर ,, १९९४ साली करिश्मा कपूर ..........
21 Dec 2018 - 1:47 pm | mrcoolguynice
" हमराज "
21 Dec 2018 - 5:20 pm | समीरसूर
तलाश - करिना कपूर - एक अक्षय कुमारसोबत आणि एक आमिर खानसोबत...
मला वाटते 'लोहा'देखील - धर्मेंन्द्र - एक जुना करन कपूरसोबत आणि नवीन मोहन जोशीसोबत...नक्की माहित नाही. चूभूदेघे.
22 Dec 2018 - 1:21 pm | srahul
बरोबर आहे....
25 Dec 2018 - 3:58 pm | एकुलता एक डॉन
barsaat
bobby deol don wela
talaash
kareena kapur
maa kasama
mithun