बादलीयुद्ध १३

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
6 Oct 2016 - 11:08 pm

"तुझ्या कॉलेजवर कँपुस येत न्हाय का रं?" असे म्हणणारे एक सदगृहस्थ गावाकडे भेटले होते. येणेप्रमाणे पुढच्याच महिन्यात कँपुस आले पण. शुद्ध भाषेत आम्ही त्याला कँपस म्हणतो. 'INFOSYS' नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी कँपस इंटरव्हीव्यू घ्यायला कॉलेजवर दाखल झाली. आजूबाजूचे जवळपास तीन-चार कॉलेजेस त्यात सामील होते. ' software की manufacturing?' यावर उच्च वर्तुळात बरीच चर्चा चालत असे. शेवटी manufacturing इज बेस्ट हा आम्ही स्वत:साठी निकाल लावून घेतला. बऱ्याच जणांच मत होतं की software मध्ये 'पर्सनल आयुष्य' नावाची गोष्ट नसते. एका विशिष्ट कंपूचं असं मत होतं की " software वाल्यांची सेक्स लाईफ पण ढेपाळलेली असते". चोवीस तास डोक्यामध्ये ऑफीस घोळत असेल तर जगण्याला काही अर्थ नाही. साहजिकच आमचा ओढा manufacturing कडे अधिक होता.

पुण्याच्या कुठल्याश्या software कंपनीत सिव्हीलचा एकमेव नग 5.2 lakhs/annum इतके पॅकेज घेऊन बोर्डावर फोटोसकट मिरवत होता. आमच्या मेकॅनिकलचे जवळपास 52 विद्यार्थी पेठेतल्या MIDC तल्या कुठल्याश्या कंपनीत 0.36lakhs/annum इतके भव्य (!) पॅकेज घेऊन बोर्डाची पार आय माय करत होते. त्यांची नावं लिहायला बोर्डाची जागा पुरी पडत नव्हती. शेवटी आम्ही हिशोब केल्यावर 4 हजार प्रतिमहिना असल्या दणदणीत पगारावर ते खपणार होते. इंजिनियर्सची पार वाट लागलीय असं एक दोघांच मत पडलं. परंतु कॉलेजने आमच्यावेळी त्या पेठेतल्या कंपनीची एंट्रीच बंद करायचा निर्णय घेतला. त्यावर्षीपासून ती कंपनी आलीच नाही. आणि अशाप्रकारे आमच्या शेवटच्या एकमेव आशास्थानावर गदा आणली गेली.

बेंगलोरस्थित कुठल्याश्या कंपनीच्या कँपसला आम्ही apti क्लियर करुन गेलो. त्यांनी GD ला corruption हा विषय दिला. खरं सांगायचं तर corruption म्हणजे काय हे मला अजिबात माहीती नव्हतं. हे कुठल्यातरी प्रकारचे pollution असावे असाच आमचा ग्रह होता. पण नक्की कुठल्या प्रकारचे हे काही कळेना. "let's give chance to other" म्हणून काही जणांनी माझ्याकडे बोट दाखवले. ""i agree with you" एवढेच बोलून मी त्यांची बोळवण केली. बहुतेक तेवढेच दोन शब्द मी त्या GD मध्ये बोललो असणार.

मला वाटलं होतं शेवटच्या वर्षी कँपस येतील. पण इथे तर थर्ड इयर पासूनच त्यांची भरमार सुरु होती. जवळपास सगळ्याच कंपन्या software फिल्ड मधल्या. त्यांच्या criteria त एक अडचण होती. ती म्हणजे through out semester एकही विषय drop नको. साहजिकच आम्हांस कुठल्याच apti ला बसता आले नाही. या कंपन्या 70-80 मुलांचे इंटरव्हू घ्यायच्या आणि एखाद दुसरा जिवावर उदार होऊन सिलेक्ट करायच्या. हा म्हणजे मोठाच छळ होता.

रात्री दहा अकरा पर्यंत इंटरव्हीव चालायचे. अगदी थोडक्यात चुकलं म्हणत पोर्चमध्ये बसलेले रडवेले चेहरे आम्ही कित्येकदा पाहीले आहेत. अगदीच गबाळा शर्ट घालून apti दिलेला वासुदेव GD क्लियर करुन शेवटच्या राऊंडला गेला. इंटरव्हूच्या अर्धा तास अगोदर तो आमच्या होस्टेलवर येऊन एकाचा शर्ट, दुसऱ्याची पँट, बूट तिसऱ्याचे, सॉक्स चौथ्याचे, बेल्ट अजून भलत्याच कुणाचातरी असा जबरी युनिफॉर्म करुन इंटरव्हूला दाखल झाला. वासुदेव आता इतिहास रचणार. मल्टिनॅशनल कंपन्या फक्त हाय प्रोफाईल लोकांचीच मक्तेदारी नाही. वासुदेव सारखे भाबडे लोकपण हुशारीच्या जिवावर आता कुठेही घुसू शकतात. त्यादिवशी आम्ही जेवण करुन आल्यावर भारावून जाऊन इंटरव्हू रुमच्या बाहेर गर्दी केली. रात्री दहा वाजता फायनल लिस्ट लागली. एक वासुदेव सोडला तर बाकीचे सगळे अकराजण सिलेक्ट झाले होते. गलेगठ्ठ पगार. ऊटीला ट्रेनिंग.
नंतर मात्र वासुदेवची सगळ्यांनी खेचली. तहान लागल्यावर विहीर खोदणारा माणूस MNC मध्ये जाऊन करणार तरी काय?

जयदीप नावाच्या टॉपरचं नाव इथे घेतलंच पाहीचे. हे खरे हुशार लोक. याला पाहून कळून चुकलं लोकं किती डीप विचार करुन इंटरव्हूची तयारी करतात. याला पहिल्यांदा रिक्रुटवाल्याने इंट्रोडक्शन विचारले. यानं नाव गाव वगैरे सांगितलं. पण त्याचा उत्तरात हॉबीज शेवटी होतं. आणि शेवटचं वाक्य होतं. "मला उलटं लिहायलं आवडतं".
झालं पुढचा प्रश्न अगदी त्याला पाहीजे होता तसाच आला. "उलटं म्हणजे नक्की कसं? काढून दाखव. कधीपासून छंद आहे वगैरे वगैरे."
जयदीप प्रत्येक उत्तर असं द्यायचा की पुढचा
प्रश्न त्याला पाहिजे तसाच येईल. याचा अर्थ त्याने बरीच तयारी करुन बऱ्याच प्रश्नांची उत्तरे बऱ्याच अगोदरं ठरवली होती. साला चश्मिश!

काही अतिहुशार लोकांच मत होतं की असा सहजासहजी जॉब मिळाल्यावर स्ट्रगलचा अनुभव मिळणार नाही. आयुष्यात स्ट्रगल हा हवाच. जगण्याची खरी किंमत तिथेच कळून चुकते. अर्थात हे अतिहुशार लोक म्हणजे महिंद्रात R&D ला सिलेक्ट झालेले आमचे सिनियर भुषण काळे होत. ते असेच कधीही आम्हा चारचौघांना तावडीत पकडून तत्वज्ञान पाजळायचे. त्यांच्या म्हणण्यानुसार "R&D ला काय काम नसतं रे. बॉसनं कामाचं काय विचारलं की सांगायचं, research चालू आहे. बस. दिवसाकाठी एखाद्या प्यूनला कपाट उचलू लागायचं की झालं".

या वर्षी आमच्या कॉलेजचे जवळपास तीस टक्के विद्यार्थी सिलेक्ट झाले. याचा अर्थ सत्तर टक्के लोक अजूनही उघड्यावर होते. आम्हीही त्यातलेच. आपण त्या तीस टक्क्यात का नाही हा प्रश्न फार छळत होता. तो रौप्यमहोत्सवी क्षण गाठण्याची आम्हाला फार घाई झाली होती. पण शेवटी हातात फुफाटणेच होते.

"Job की business?" या विषयावर नंतर नंतर आमची चर्चा सरकू लागली. 'business is the best' हा निकाल लावून आम्ही लगेच मोकळे झाले. नोकरी करणे म्हणजे दुसऱ्याची गुलामगिरी करणे यावर आता आम्हांस दु:मत नाही.

थर्ड इयरची परिक्षा झाल्यावर आम्ही काहिजण सालाबादप्रमाणे होस्टेलवरंच थांबलो होतो. मुंबईची कुठलीशी 'TIAR' नावाची कंपनी कँपससाठी येणार होती. हे तर रोजचंच मरण होतं. हातात पॅड, वही, पेन, स्वच्छ पांढरा सदरा घालून आम्ही apti ला गेलो. इनशर्टसारखा बावळट प्रकार आम्ही पहिल्या दोन तीन कँपसनंतर बंद केला होता. दुपारी apti क्लियर झालेल्यांची लिस्ट लागली आणि त्यात आमचेही नाव आम्हांस दिसले. झालं, वासुदेवसारखी आम्हीही आमची विहीर ऐनवेळी खोदायला सुरु केली. रुमवर येऊन aptitude चं भलंमोठं पुस्तक बारकाईनं वाचायला सुरु केलं. आता काहीही झालं तरी सिलेक्ट व्हायचंच. करो अथवा मरो.

इंटरव्हू रुमच्या बाहेर आम्ही सगळे बसलो आहोत. धडधड वगैरे जबरदस्त. अचानक माझ्या नावाचा पुकारा झाला आणि आत गेलो.
"तुझी resume कुठाय?" म्हणून रिक्रुटवाला सरळ मराठीतच सुरु झाला ही एक विशेष आनंदाची बाब.
त्यानं resume बघितली. म्हणाला, "त्या तिथं जरावेळ उभा राहा".
मी उठलो आणि कोपऱ्यात जाऊन उभारलो.
तो म्हणाला, "फायनल इयरला सगळे विषय सुटतील ना तुझे?"
"येस सर. नक्कीच". मी उभ्या उभ्याच बोललो.
मग त्यानं मुंडी हलवून "ठिक आहे" म्हणून मला जायला सांगितलं.

जीवन अगदी होपलेस झाल्यासारखं वाटून गेलं.

रुमवर येऊन जरावेळ पडलो. बऱ्याच जणांनी त्यांनाही एवढंच विचारलं हेही सांगितलं. हा काय प्रकार चाललाय कळेना.

तीन चार वाजता फायनल सिलेक्शन लिस्ट लागली. एकूण 27 जण सिलेक्ट झाले होते. त्यात चक्क माझंही नाव होतं. च्यामारी.

मुंबईला ऑफीस. गोव्याला ट्रेनिंग. चंगळंच हाय आमची. काही दु:खात्मे म्हणले, "तुम्हाला बॉड्या बघून सिलेक्ट केलंय त्यांनी. पायपा उचलाय लावणार तुमास्नी".

-----------------------
क्रमशः

बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच , सहा , सात , आठ , नऊ , दहा , अकरा , बारा
------------------------

कथा

प्रतिक्रिया

बादलीयुद्ध लय दिसांनी आलं बुवा!

रातराणी's picture

6 Oct 2016 - 11:25 pm | रातराणी

डिटो! शब्दाशब्दाशी सहमत :)

अभिजीत अवलिया's picture

6 Oct 2016 - 11:45 pm | अभिजीत अवलिया

5.2 lakhs/annum इतके पॅकेज
--- कुठली कंपनी फ्रेशरला इतके पॅकेज देतेय :):):)

जव्हेरगंज's picture

7 Oct 2016 - 12:07 am | जव्हेरगंज

ओह! घोळ झाला वाटतं.

ते ' 2.5 lakhs/annum' असं पाहिजे.

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2016 - 1:30 am | बोका-ए-आझम

म्यू सिग्मा, फ्रॅक्टल वगैरे. या वर्षीची म्यू सिग्माची आॅफर ७.५ लाखांची आहे - SPIT मध्ये.

अमु१२३'s picture

7 Oct 2016 - 10:15 am | अमु१२३

Qualcomm देते फ्रेशरला

सतिश म्हेत्रे's picture

21 Sep 2018 - 10:56 pm | सतिश म्हेत्रे

.

हा भाग जास्तच वास्तवाच्या जवळ जाणारा वाटला.

येउद्या

जव्हेर भाऊ कशाला कॅम्पस च्या गोष्टी काढताय राव... IT आणि manufacturing मध्ये manufacturing घेऊन आम्ही अजून पस्तावतोय, IT वाले मस्त 2 BHK, 3 BHK चे update थोबाडपुस्तकावर
(आमच्या थोबाडावर) मारतायत... पण हा भाग अगदी मनाला भिडला.....

नाखु's picture

7 Oct 2016 - 9:24 am | नाखु

योगायोग सम्जावा काय? बादली आणि मोसाद घट (नवरात्राचे) बसल्यावरच आले, अंबाबाईची कृपा अशीच राहू दे मिपा भक्तांवर !!

मिपा प्रसिद्ध कट्टर नास्तीकांनी माफ करणे, लगेच मोर्चा काढू नये.
जे प्रश्न चर्चेने सुटतात ते मोर्चाने सुटतीलच असे नाही

राजाभाउ's picture

7 Oct 2016 - 5:38 pm | राजाभाउ

+१
हेच म्हणायला आलो होतो.

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2016 - 12:21 pm | बोका-ए-आझम

निरीक्षण अफाट! बादली चांगलीच भरत चाललेली आहे! पुभाप्र!

सिरुसेरि's picture

7 Oct 2016 - 12:40 pm | सिरुसेरि

छान लिहिलय . ३ इडियटस मधला कँपस इंटरव्हीव्यू आठवला .

--रुमवर येऊन aptitude चं भलंमोठं पुस्तक बारकाईनं वाचायला सुरु केलं-- पण तुमची apti आधीच क्लिअर झाली होती ना ?

जव्हेरगंज's picture

7 Oct 2016 - 1:44 pm | जव्हेरगंज

interview ला पण apti चे प्रश्न विचारले जाऊ शकतात.

सगळ्यात आधी, पुढचा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद.... आता वाचतो..

टर्मीनेटर's picture

7 Oct 2016 - 2:27 pm | टर्मीनेटर

हा भाग सुद्धा आवडला.

वरुण मोहिते's picture

7 Oct 2016 - 2:37 pm | वरुण मोहिते

हा भाग मस्त जमलाय एकदम !!

राजाभाउ's picture

7 Oct 2016 - 5:41 pm | राजाभाउ

नेहमी प्रमाणे मस्तच. आता पुढचे भाग सुद्धा लवकर लवकर येवो हि अंबाबाई चरणी प्रार्थना

प्रचेतस's picture

7 Oct 2016 - 7:21 pm | प्रचेतस

लै भारी

अजया's picture

7 Oct 2016 - 7:32 pm | अजया

:)
मस्त!

पिलीयन रायडर's picture

7 Oct 2016 - 8:09 pm | पिलीयन रायडर

अगदी हळवा विषय काढलात हो!

मेकॅनिकलवाल्यांची साली हीच गोची होते. एकदा भारती विद्यापीठात कुठलीशी (बहुदा ग्रीव्हज) आली होती. ५-७ कॉलेजचे मिळुन २००+ विद्यार्थी होते. त्यांनी "२" निवडले. पॅकेज १.८ लाख का असलंच काही तरी भंगार. त्यात दोघांपैकी एकाला नंतर मेडिकल मध्ये "रंगांधळा" आहे असा शोध लावुन काही दिवसांनी रिजेक्ट केलं =))

तिकडे सॉफ़्तवेअरवाल्यांना मात्र ट्रकने भरुन भरुन नेत होते. आली कंपनी की ६० जण प्लेस्ड!!

मेकॅनिकलवाले मात्र आले की एकतर ५-६ कॉलेजना क्लब करणार. मग त्यात सगळे रांऊंड्स घेणार. मग महिन्याभराने निकाल लावणार आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतकी पोरं घेणार.

एकदा जी.डीला आम्हाला विचारलं की "युद्ध व्हावं की नको" १० पैकी ९ लोकांनी अर्थात "नको" असा पवित्रा घेतला. म्हणून मग मी "हवं" असा पवित्रा घेतला. संपुर्ण जी.डी मी विरुद्ध बाकी असं झालं. अर्थात मी सिलेक्ट. पण नंतर कुठलाच राऊंड कधीच क्रॅक केला नाही =))

दरवेळेस माझी गाडी फायनल ला अडकायची. आता २०० मधुन २ घेणार असतील तर तेवढी दिव्य प्रतिभा माझ्याकडे नव्हती!!

म्हणून मग मी पोस्ट ग्रॅड केलं आणि तिथे पहिल्याच इंटरव्ह्युला नोकरी मिळाली. त्या नोकरीसाठी माझा रिझ्युम आत जाणं आणि तातडीने इंटरव्ह्युचा कॉल येणं ही सुद्धा मिपाचीच कृपा! खवत माझ्या पोस्ट ग्रॅड्चे विषय पिवडीला सांगत असताना एका मिपाकरांनी ते योगायोगानी वाचले. आणि आमच्याकडे जागा आहे तर रिझ्युम पाठवता का? असं विचारलं. गम्मत अशी की मी त्याच ओपनिंगसाठी मरमर करत होते आणि कुणी त्या कंपनीत ओळखीच सापडतंय का ते शोधत होते!! म्हणलं अहो नेकी और पुछ पुछ?! बाहेरुन अप्लाय केलं की रिझ्युमला कुत्र विचारत नाही. पण कुणी रेफर केलं की लग्गेच कॉल येतो. नशिबाने तो आला. आणि जॉब मिळाला. नाही तर ह्या कॅम्पस नावाच्या छळछावणीने माझा कॉन्फिडन्स संपवला होता.

तुमच्या लेखाने फार मस्त मस्त आठवणी जाग्या होत आहेत!

हा हिरा पारच निसटलेला की नजरेतनं!!!

खव तल्या मजकुरातनं तुम्हाला नोकरी मिळाली???
कहर!!
अभिनंदन!!

सुखीमाणूस's picture

8 Oct 2016 - 5:45 am | सुखीमाणूस

पटपट टाका ओ पुढचे भाग

संजय पाटिल's picture

8 Oct 2016 - 1:28 pm | संजय पाटिल

पर-

"तुम्हाला बॉड्या बघून सिलेक्ट केलंय त्यांनी. पायपा उचलाय लावणार तुमास्नी"

.
हे वाचून लय हासलो...

महासंग्राम's picture

8 Oct 2016 - 2:02 pm | महासंग्राम

जव्हेरअण्णा लैच जबरा झालाय अंबाबाई अशीच प्रसन्न राहू दे तुमच्या लेखनावर !!!

ज्योति अळवणी's picture

8 Oct 2016 - 4:19 pm | ज्योति अळवणी

मधले काही भाग वाचायला जमले नाही. पण हा भाग मात्र फक्कड जमला आहे. मस्त मजा आली.

rahul ghate's picture

9 Oct 2016 - 1:08 pm | rahul ghate

आधीच्या सर्व भाग प्रमाणे हा भाग सुद्दा अतिशय छान लिहिलात , सगळे जुने अनुभव ताजे झालेत , बहुतेक सगळ्या engineer ची हीच अवस्था असेल !

तनिश's picture

10 Oct 2016 - 11:47 am | तनिश

'INFOSYS' मधे आमच पण कॅंपस सेलेक्षन झाले होते लेख वाचून त्याचीच आठवण झाली...