खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे.
आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी
आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे. एक फरक इतकाच राहील की हे प्रत्येक एपिसोडमधले अभिवाचन येथे लिहिलेल्या भावविश्व मधल्या भाग1,भाग2 नुसार न रहाता.. 15 मिनिटे ते अर्धातास अश्या वेळेच्या हिशेबाने राहील. धन्यवाद.
आपलाच:- अतृप्त
प्रतिक्रिया
18 Jun 2020 - 2:34 pm | कंजूस
वा रे वा!
हे सर्वांना पाठवतो.
------------------
एक प्रयोग -
तुमच्या भावविश्वाची ( भाग पहिला) युट्युब विडिओ फाइल ३१ MB आहे. (09:48)
त्याचा ओडिओ 2.4 MB
19 Jun 2020 - 11:15 am | अत्रुप्त आत्मा
कं काका धन्यवाद. प्रतिसाद व mp3 बद्दलही.
18 Jun 2020 - 2:50 pm | निओ
18 Jun 2020 - 2:59 pm | निओ
आज आपले दर्शन झाले.
तुमची लेखमाला भारीच होती.
अभिवाचन उत्तरोत्तर रंगतच जाणार. खूप शुभेच्छा !!
तंतूंवर देवता जंतुंसारख्या बसलेल्या असतात... भारी पंच :))
19 Jun 2020 - 11:16 am | अत्रुप्त आत्मा
निओ- मन:पूर्वक धन्यवाद.
19 Jun 2020 - 11:26 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त हो आत्मुगुर्जी, दोन्ही भाग छान झाले आहेत. ऐकताना अगदी पुलंची आठवण येत होती.
तो मोबाईल आडवा ठेउन शुटींग करता येईल का? म्हणजे आम्हाला मोठ्ठे गुरुजी दिसतील.
पैजारबुवा,
19 Jun 2020 - 3:07 pm | अत्रुप्त आत्मा
पैजारबुवा - धन्यवाद.
पुढचे भाग तसेच येतील.
19 Jun 2020 - 5:43 pm | जव्हेरगंज
निव्वळ अप्रतिम वाचन आहे!!! क्या बात!!
19 Jun 2020 - 5:49 pm | तुषार काळभोर
डिजिटल आत्मा
डिजिटल गुरुजी
डिजिटल मिपा
19 Jun 2020 - 10:15 pm | मनो
गुर्जी, तुमच्या चष्म्यावर समोरच्या लॅपटॉपचे प्रतिबिंब हलताना दिसतंय त्यामुळे तिकडे लक्ष वेधले जाते. शक्य असेल तर चष्मा काढून किंवा प्रिंट करून कागद समोर ठेऊन करता येईल का? दुसरा उपाय म्हणजे स्क्रीनचा ब्राईटनेस कमीत कमी ठेऊन चेहेऱ्यावर येईल असा अजून एक दिवा लावणे. कॅमेऱ्याबरोबर आय कॉन्टॅक्ट असला की मग व्हिडिओ चांगला विश्वासार्ह वाटतो.
19 Jun 2020 - 10:24 pm | बोलघेवडा
अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सप चे फॉरवर्ड्स इथेही मिळू लागले!?
क्रांतिच झाली म्हणायची!
19 Jun 2020 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा
अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सपच्या सारखे मळमळजन्य प्रतिसाद इथेही मिळू लागले!?
वांतीच झाली म्हणायची!
20 Jun 2020 - 8:58 am | बोलघेवडा
ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती.
हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत.
संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.
19 Jun 2020 - 10:26 pm | सौंदाळा
छानच झालेत व्हिडीओ.
व्हिडिओसाठी लेखात केलेले बदल समयोचित.
आवाजातील चढ उतार सुद्धा मस्त.
एक छोटी विनंती : मोबाईल किंवा संगणक जे काही रेकॉर्डिंगसाठी वापरलं आहे त्याच्या मागे लिखाणाचा कागद ठेवता येईल का? म्हणजे दर्शकांशी थेट संवाद आहे असे वाटेल.
20 Jun 2020 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा
@जव्हेरगंज
निव्वळ अप्रतिम वाचन आहे!!! क्या बात!! >>> मनःपूर्वक धन्यवाद .
@पैलवान
डिजिटल आत्मा >>
डिजिटल गुरुजी
डिजिटल मिपा >>> डिजिटल धन्यवाद .
@ मनो,सौंदाळा >>> मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही सुचवलेले बदल आवश्यक आहेत. ते मी नक्कीच करेन
20 Jun 2020 - 8:59 am | बोलघेवडा
ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती.
हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत.
संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.
20 Jun 2020 - 9:12 am | अभ्या..
एकच लंबर गुरुजी.
तुमचे प्रसन्न आविर्भावात दर्शन झाले. छान वाटले.
20 Jun 2020 - 12:32 pm | अत्रुप्त आत्मा