✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

देवस्थाने आणि भटजी....

म
मुक्त विहारि यांनी
Fri, 01/23/2015 - 01:15  ·  लेख
लेख
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव. आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत. आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.) आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते. लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्‍यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्‍यांसाठी टांकसाळ?" असो, पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली. भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर." मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही." गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे." जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती. एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला. गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्‍यात गेलो. जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली. दक्षिणा विचारली. भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?" मी,"हो." भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील." योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे. डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
44950 वाचन

💬 प्रतिसाद (204)

प्रतिक्रिया

बहुतेक सर्व देवस्थाने धर्मिक

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/23/2015 - 17:39 नवीन
बहुतेक देवस्थाने धर्मिक स्थाने न राहता "पैसा कमावणार्‍या धंद्याची स्थाने" झाल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे, देवस्थानांना भेट देणार्‍या गिर्‍हाईकांनी (श्रद्धाळू / पर्यटक) अस्वच्छता पाहून येणे बंद करायला लागल्याशिवाय स्वच्छतेवरचा खर्च हा "अनुत्पादक आणि पर्यायाने अनावश्यक खर्च" समजला जाईल. : हुकुमावरून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अगदी पटला आवडला प्रतिसाद

अजया
Fri, 01/23/2015 - 13:24 नवीन
अगदी पटला आवडला प्रतिसाद पेठकर काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

@ स्रुजा ताई....

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 03:53 नवीन
बिना गूरुजी सत्यनारायण कसा करायचा? सत्य नारायणावर आधी पण विचार मांडले आहेत.त्याची लिंक मिळाली तर देतो. आमच्या सत्यनारायाणाला मेहूण, ब्राह्मण किंवा कथा असे काही नसते. अत्यंत खेळीमेळीच्या आणि घरच्या ग्रुहिणीला आराम देत शिवाय थोडे-फार व्यावहारिक शिक्षण घेत आमचा सत्य-नारायण होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

सत्य नारायणावर मी आधी पण विचार मांडले आहेत.

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 04:27 नवीन
http://www.misalpav.com/comment/reply/29413/630672
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सीडी

मधुरा देशपांडे
Fri, 01/23/2015 - 03:55 नवीन
सत्यनारायण पुजेची सीडी मिळते. ती आणु शकतेस. पुढच्या भारतभेटीत घेऊन ये किंवा कुणी येणारे असेल तिकडे तर त्यांना सांग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

+१

जुइ
Fri, 01/23/2015 - 04:51 नवीन
कोल्हापुर हे आवड्ते देवस्थान आहे. त्याउलट अनुभव पंढरपुरात येतो ते तेथील पुजार्‍यांनमुळे. बाकी पुजा कशी करावी याची छोटी पुस्तके भारतात मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अगं जर शोधाशोध करून app पण

स्रुजा
Fri, 01/23/2015 - 04:56 नवीन
अगं जर शोधाशोध करून app पण मिळालंय पण त्याचे पैसे दिल्याशिवाय ते कामाचं आहे की नाही कळणार नाही . गणपती बसवतो आम्ही दर वर्षी इथे तो अशाच एका app ची पूजा ऐकून च करतो , छान आहे ते app . हे पण तसं असलं तर बरं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

२००? असता कोठे तुम्ही?

अनन्त अवधुत
Fri, 01/23/2015 - 05:16 नवीन
$२००? मला द्या, मी इकडेच असतो तुमचा तिकिटाचा पण खर्च वाचेल, शिवाय २०० मध्ये प्रसाद आणि पूजेचे सामान पण आणीन. पूजा online पण सांगू शकतो . सत्य नारायणाच्या पूजेला कशाला भटजी पाहिजे. आंतरजालावर शोधा समग्र पूजा कळेल. मी येथे सांगितलेली पूजा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

सृजा, अग सीडी मिळते

स्पंदना
Fri, 01/23/2015 - 05:46 नवीन
सृजा, अग सीडी मिळते सत्यनारायण कथेची. नाहीतर मी सांगू का? अगदी व्यवस्थीत पूजा मांड आणि घरच्याच भटजीला बसव कथा वाचायला. पूजीसाठी भटजीच पाहिजे हे भटजींनी काढलेल्म पिल्लू आहे. खेड्यापाड्यातुन कुठे असतात भटजी? आमच सगळ बिन भटजीच चालत, आणि आमच्या देवाला चालत पण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अगं मला पण भटजी पाहिजेच असं

स्रुजा
Fri, 01/23/2015 - 05:54 नवीन
अगं मला पण भटजी पाहिजेच असं नाही पण माझ्या नवऱ्याचा आनंद आहे एक नंबर या भानगडीत . मी नैवेद्याचा स्वैपाक करू का याला सांगू का आलेल्या मैत्रिणीला अटेंड करू असं होणार. गणपती बसवताना आम्ही ते app लावतो , तयारी असतेच, नवरा पूजा करतो , माझा स्वैपाक होतो एकिकडे . तसं मिळायला हवं गं . तुम्ही सीडी म्हणताय ती मी बघते बर्न करून मिळते आहे का , नाही तर i पूजा म्हणून app मिळालंय ते घेणार. आणि मला ना खरं तर , ते मंत्र वगैरे छान घरात घुमायला हवे आहेत , डिजिटल पण चालतील . @ अनंत अवधूत , मी तुमची साईट बघितली आत्ता तरी डावून आहे , थोड्या वेळाने पुन्हा बघते . धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

पण मुळात सत्यनारायण करायचाच

पिलीयन रायडर
Fri, 01/23/2015 - 11:03 नवीन
पण मुळात सत्यनारायण करायचाच कशाला आहे तुला? तुझा देवावर विश्वास आहे तर मन लावुन पुजा कर, छान नैवेद्य बनव, सत्यनारायणाचा शिरा बनव, इच्छा असल्यास लोकांना घरी खायला बोलाव म्हणजे त्या निमित्त्ताने लोक येतात. पण २००$ खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाच काहीतरी विधायक कर की.. तू म्हणुन बिन्धास्त सांगतेय.. तू आणि तुझा नवरा वेगळा विचार करु शकणार्‍यातले आहात.. बाकी अनेक हिंदु सण साज्रे करण्याच कारण मी समजु शकते.. पण "सत्यनारायण" मला तरी थोतांडच वाटतं.. (अवांतर - काल वॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज वाचला.. गाडगेबाबांचे सत्यनारायणाविषयीचे प्रवचन.. सुरेख आहे.. म्हणे पहिला सत्यनारायण केला त्या बायकांनी (पोथीतल्या गोष्टीतल्या ) त्यांनी कुठली पोथी वाचली मग?! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

"सत्यनारायण" मला तरी थोतांडच वाटतं.....

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 11:31 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

विषय निघालाच आहे म्हणून

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 11:44 नवीन
विषय निघालाच आहे म्हणून सांगायला हरकत नाही. सत्यनारायणाचा उगम बंगालमधील 'सत्यपीर' नामक कन्सेप्टमध्ये आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

नाहीतर काय?

स्पंदना
Fri, 01/23/2015 - 17:04 नवीन
नाहीतर काय? त्यात आणी भर म्हणजे त्यात भटजी किंवा ब्राह्मण बोलावल्याचे किंवा मेहूण जेवल्याचेपण वाचल्याचे आठवत नाही. उलट प्रसाद खावा असा माझ्या आवडीचा भाग आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अगं २०० $ खर्च नाहीच करणार ,

स्रुजा
Fri, 01/23/2015 - 23:33 नवीन
अगं २०० $ खर्च नाहीच करणार , भटजी नको च असं ते २०० $ ऐकून च ठरवलं . मला सत्यनारायण पूजे वर अति विश्वास नाहीये आणि मला ते थोतांड पण वाटत नाही . नवरा त्याला थोतांड म्हणतो आणि तावातावाने कथेच्या डीटेल्स वर वाद घालतो. मी त्या कथेकडे , खास करून सगळ्या वादग्रस्त मुद्द्यांकडे लक्ष देत नाही म्हणजे साधू वाण्याची कशी पंचाईत केली आणि कसं त्याला लायनीवर आणलं वगैरे. मला वाटतं की थोतांड हे बऱ्याचदा माणसांमुळे होतं म्हणजे त्या मंदिरातले गुरुजी आम्हाला म्हणे तुम्हाला काय त्रास आहे सांगा आम्ही यज्ञ सांगतो उपाय करतो . म्हणजे सत्यनारायण कदाचित एकदम स्वस्त पूजा असणार , म्हणून हे सगळं . आता या अशा वागण्यामुळे त्या पुजेचे वलय एकदम मानवी पातळीवर येतं . मला हे थोतांड वाटतं . बाकी असं पाहायला गेलं तर मला पूजा का करायची आहे तर घरात ते प्रसन्न वातावरण हवंय . त्यात संकल्प , उपासना आणि अगदी अथर्वशीर्ष म्हणलं तरी मला चालणार आहे . पण हे सगळं वर्षातून झालं की मला बरं वाटतं , का ते मला पण माहिती नाही. मला काही त्रास , संकटं आहेत का? तर नाही . मी उपास तापास करत नाही , नवरात्री ची सवाष्ण म्हणून पण त्या ९ दिवसांमध्ये जो रविवार असेल तेंवा मैत्रिणी ला बोलावते आणि तिच्या आवडीचा स्वैपाक करते, खास कुळधर्म म्हणून काही नाही . जिथे करायचे तिथे आपण बदल करतोच कालानुरूप पण मला ही नाळ तोडता येत नाहीये आणि मला त्यात जो पर्यंत मी त्याच्या आहारी जात नाही तो पर्यंत त्याच्यात काही चूक वाटत नाही . खरं सांगायचं तर ज्यांचा पर्ण विश्वास असतो आणि कधीच विश्वास नसतो अशांबद्दल मला आदर वाटतो जाम . कारण या एका विषयावर मला अजून माझा ठाम मत बनवता आलेलं नाहीये . मी माझ्यापुरतं एक धोरण ठेवलंय आणि तेवढं मी पाळते , आता काय करणार ? बाकी तू, आणि पेठकर का म्हन्तायेत तसा माझा नवरा आहे , नास्तिक . कर्मावर , माणसांवर विश्वास ठेवणारा . तो पूजा करणार आहे कारण त्याला तो स्वैपाक येत नाही . इतकं सरळ डिव्हिजन ऑफ लेबर आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हापिसातून छोट्या विंडो मधून

स्रुजा
Fri, 01/23/2015 - 23:41 नवीन
हापिसातून छोट्या विंडो मधून लिहिलाय प्रतिसाद त्यामुळे जरा टायपो आलेत , थोडे सांभाळून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

मला पूजा का करायची आहे तर घरात ते प्रसन्न वातावरण हवंय ....

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 23:41 नवीन
आमच्या बायकोचे पण हेच म्हणणे होते. साधा उपाय केला. गणपतीच्या दिवसात, १०-१२ मुलांना बोलावले आणि मस्त उदबत्ती लावून, अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केली.समारोपाला इडली-चटणी.मुलांना थोडी दक्षिणा पण दिली. बायको पण खूष, अनावश्यक अवडंबर नसल्याने आम्ही पण खूष आणि अन्न्दान झाल्याने सासू पण खूष आणि दक्षिणेसकट खायला मिळाल्याने ती मुले पण खूष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

ह्म्म

इरसाल
Sat, 01/24/2015 - 11:35 नवीन
बघा त्याच अस झालं की साधुवाणी जहाज घेवुन किनार्‍याकडे येत असताना त्याला असे दिसले की पाकिस्तान वाले अमेरिकावाल्यांच्या मदतीने त्याच जहाज(ती पाणबुडी होती ;) ) अपहरण करायला येत आहेत. त्याने मारली पाण्यात बुडी, नेमकी त्याची बायको घाईघाईने त्याला पहायला धावतपळत आली प्रसाद न खाता बघते तर काय जहाज गायब. लोकांना संधी मिळाली बघ बघ प्रसाद नाही खाल्लास ना म्हणुन हे झाले, तिथे बसुन काय करणार म्हणुन गेली परत थोडा नाश्ता करुन येवु या विचारने खाल्ला थोडा शिरा. इकडे भारतीय हद्दीत जास्त वेळ काढु न शकल्याने गेले अमे-पाकी परत मग काय आली पाणबुडी (ते जहाज होते ;) ) वर. जहाज( ती पाणबुडी होती ;) ) वर साधु वाणी खुश, साधुवाणी परत आला म्हणुन त्याची बायको खुश, शिरा खाल्ला प्रसाद म्हणुन भटजी खुश. *** मी इतकेच पाहिले होते आगचे-मागचे मला नाय माहित, उगा आचरट प्रश्न विचारु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

धन्य! स्पार्टसालबुवा!

एस
Sat, 01/24/2015 - 13:14 नवीन
धन्य! स्पार्टसालबुवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

हलकं

इरसाल
Sat, 01/24/2015 - 15:17 नवीन
घेतल्याबद्द्ल धन्यवाद स्पार्टाशेट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा)

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 16:54 नवीन
आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा) कॅसेट लावायची.. अधिक माहितीसाठी त्यांनाच संपर्क करा.. (बुवांचा सत्यनारायण पर्त्येक्ष ऐकण्याचे भाग्य लाभलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/23/2015 - 18:20 नवीन
ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!
(कथा"पुनर्रचनाकथन-कार:- आत्मूबाबा'सुधारणावाले! ;) ) हि घ्या... मराठी/हिंदी कथा. - डाऊनलोडवा...आणि हवी तेंव्हा ऐका. नायतर एका चौरंगावर नुसता सत्यनारायणाचा फोटू ठिवा,त्येला गंध/अक्षता/हळद/कुकू/गुलाल्/बुक्का..फुलं/हार/तुळस वहा.. उदबत्ती/निरांजन ओवाळा..नंतर आपला शिर्‍याचा निवद दाखवा..आनी मंग ह्यी कथा ऐकून ,आरती करा... मंजी पंचोपचारी पूजा,कथा,आरती...असा सुटसुटीत खेळ व्हईल... :HAPPY: णाय का? :) १) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व! http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3 २) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकायला सुरसही वाटेल..) http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg ===================================== कथा बदलली वग्रे का? अन कशासाटी ? ..अशे प्रश्न कुनाला पडत असतील.. तर शंका णिर्सनासाटी इकडे या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

तुमच्या वरच्या लेखाकडे शीर्षक

कंजूस
Fri, 01/23/2015 - 22:43 नवीन
तुमच्या वरच्या लेखाकडे शीर्षक वाचून उघडला नव्हता पण आता तो लेख वाचला कथा फार मोठी आहे आणि मोबल्यात फ्लैश प्लेअर नाही तेव्हा एक विनंती तुमच्या आवडीचे कोणतेही (सत्यनारायणचेच हवेत असे नाही)पाच दहा श्लोक दोन तीन मिनीटे कालावधिचे साउंड रेकॉर्डीँग करून vocaroo dot com वर अपलोड करा अन लिंक द्या जे ऐकता येतील.एक झलक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ओके मुवी काका

स्पा
Fri, 01/23/2015 - 03:30 नवीन
ओके मुवी काका
  • Log in or register to post comments

@ मूवी तुम्हाला अभिषेक कसा

देशपांडे विनायक
Fri, 01/23/2015 - 06:09 नवीन
@ मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे ? म्हणजे कुठली करण्याची पद्धत धार्मिक द्रिष्ट्या योग्य इत्यादि धार्मिक मध्येही अनेक प्रकार असणार गोत्राप्रमाणे इत्यादि असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत ? हळू घ्या अशी विनंती
  • Log in or register to post comments

प्रतिसाद हलकाच न घेता, माझी भुमिका मांडत आहे...

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 07:20 नवीन
"मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे?" अजिबात नाही.भटजी सांगतात त्याप्रमाणे करतो. =============== "असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत?" मला बर्‍याच वेळा मंदिरात गेल्या नंतर कधी उत्तम मानसिक समाधान वाटते. विशेषतः गुहागर, वेळणेश्र्वर किंवा विंध्यवासिनी (चिपळूण) एक तर तिथे प्रगाढ शांतता असते आणि कुठलाही भटजी पैसे लुबाडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुहागरला थेट गाभार्‍यात जावून अभिषेक करता येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्या मंदिरात गेल्या नंतर कुणाला समाधान वाटेल किंवा कुणाला नाही वाटणार.प्रत्येकाचे अनुभव वेगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे विनायक

कस्तूरी कुन्डल बसे, मृग ढूढै

मदनबाण
Fri, 01/23/2015 - 07:04 नवीन
कस्तूरी कुन्डल बसे, मृग ढूढै बन माहि । ऐसे घट-घट राम हैं, दुनिया देखे नाहि ॥ इति:- संत कबिर

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
  • Log in or register to post comments

देवस्थानाचे संस्थान झालेले

अजया
Fri, 01/23/2015 - 07:25 नवीन
देवस्थानाचे संस्थान झालेले असलेल्या ठिकाणी फक्त बाहेरुन स्थापत्य,मूर्तीकला बघुन अामची पूजा होते!त्यासाठी पूजारी लागत नाही!गर्दी गजबज बकाली झालेल्या तीर्थक्षेत्रात देव स्वतःच राहात नसणार!मग जाऊन आपला वेळ आणि ऊर्जा फुकट का घालवावी,भटजींची धन करायला!
  • Log in or register to post comments

पैसे कमावण्यातही एकेका

कंजूस
Fri, 01/23/2015 - 09:08 नवीन
पैसे कमावण्यातही एकेका देवस्थानाचे {आणि वहिवाटदार पुजाऱ्यांचेही}भाग्य असते. बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते. (मारवाड्यांचा पंधरा दिवस अगोदर सुरू होतो ) .ट्रेकरांना या भोलेनाथाचा फार आधार आहे .एरवी इतक्या रानात कोण सोयी करेल ?
  • Log in or register to post comments

बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक

सतिश गावडे
Fri, 01/23/2015 - 09:48 नवीन
बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते.
याचा अनुभव आमच्या एका छुप्या सनातनी मित्राने घेतला आहे. भटकंतीनिमित्त भिमाशंकरला गेलो असता मंदिरातील पुजार्यांनी गाभार्यात शंकराच्या पिंडीच्या जवळ जाण्यास मनाई केली. ती सुविधा फक्त पावती फाडून अभिषेक घालणार्यांसाठीच होती. आमचा हा मित्र एरव्ही वाद-विवादात कोणालाही सहसा हार न जाणारा. मात्र त्या दिवशी त्याचे काही चालले नाही. देवाच्या दरबारात कोणाचेच काही चालत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ब्राह्मण नसाल तर बहुतेक

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 16:56 नवीन
ब्राह्मण नसाल तर बहुतेक ठिकाणी (सगळीकडेच नव्हे तरीपण) हा अनुभव लाभतोच. तुमच्या छुप्या सनातनी मित्रास याचा तितकासा अनुभव नसावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तोच तर मुद्दा आहे !!

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 19:09 नवीन
तोच तर मुद्दा आहे !! ब्राह्मण असुनही मंदीरातल्या पुजार्यांनी त्या छुपा सनातनी मित्राला तशी ट्र्रीटमेन्ट दिली , अर्थात त्यांना ब्राह्मण्याशी काही घेणे देणे नाहीये . त्यांचा संबंध फक्त पैशाशी आहे ... पैसा टाकेल तो देव आहे त्यांच्यासाठी अन पैसा टाकेल तो ब्राह्मण ! लाखभर रुपये देणगी टाकतो तेही विदाउट पावती असे म्हणाल तर पिंडी भोवती मिठी मारुन सेल्फीही काढुन देतील ते तुम्हाला यो मॅन पोझ मधे ! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

तुमचा मित्र ब्राह्मण आहे हे

स्वामी संकेतानंद
Fri, 01/23/2015 - 19:12 नवीन
तुमचा मित्र ब्राह्मण आहे हे त्या पुजार्‍याला कसे कळले? कुतूहल आहे म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 19:13 नवीन
हेच कुतूहल मलाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

सत्यनारायणाची पूजा घालताना

सतिश गावडे
Fri, 01/23/2015 - 09:40 नवीन
सत्यनारायणाची पूजा घालताना झालेल्या खर्चाबाबत अशी नापसंती व्यक्त केल्यास त्याचा फलप्राप्तीवर परिणाम होत नाही का?
  • Log in or register to post comments

त्यातला नारायण सत्य असेल तर

अजया
Fri, 01/23/2015 - 09:47 नवीन
त्यातला नारायण सत्य असेल तर होतो म्हणे परिणाम ^_~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सत्य कंडिशनल असते तर.

सतिश गावडे
Fri, 01/23/2015 - 09:56 नवीन
सत्य कंडिशनल असते तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

देव, पूजा याबाबतीत सत्य

अजया
Fri, 01/23/2015 - 10:08 नवीन
देव, पूजा याबाबतीत सत्य नक्कीच कंडिशनल असते!!शुध्द व्यवहार आहे तो!तुम्ही अशी पूजा करा हे फळ मिळेल!५०$मध्ये जरा कमी ,२००$मध्ये जास्त मिळेल ^_~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ताई...

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 10:40 नवीन
आमच्या सत्यनारायणाला तुम्ही पण आला होतातच की... पैशांनी देव विकत घेता येत नाही आणि देव जर पैशांमुळे आणि रोज दर्शनाला गेल्यामुळे प्रसन्न होत असेल, तर तो देव नाही, असे माझे मत आहे. नाही वेचली कवडी-दमडी नाही वेचीला दाम बाई, मी विकत घेतला श्याम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सहमत

सस्नेह
Fri, 01/23/2015 - 11:22 नवीन
भाव तिथे देव. सू. : 'भाव' याचा अनर्थ घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुवि,तुमच्यासारखेच सत्यनारायण

अजया
Fri, 01/23/2015 - 13:26 नवीन
मुवि,तुमच्यासारखेच सत्यनारायण मलाही आवडतात घालायला!तेच खरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गुहागरला आमची कुलदेवी आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/23/2015 - 09:42 नवीन
गुहागरला आमची कुलदेवी आहे दुर्गा व्याडेशवरी. मंदिरात गेल्यावर छान प्रसन्न वाटतं. ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. :)
  • Log in or register to post comments

माझ्या धाग्याची जाहिरात करुन

मदनबाण
Fri, 01/23/2015 - 09:59 नवीन
माझ्या धाग्याची जाहिरात करुन घेतो... फ्लेक्स चे पैसे वाचवण्याची संधी दिल्या बद्धल धन्यवाद ! ;) चित्रमय कोकण दर्शन (भाग २) श्री व्याडेश्वर मंदिर चित्रमय कोकण दर्शन (भाग ३) श्री दुर्गा देवी जाता जाता :- तुळजाभवानी मंदिराची 'लूट'!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

जाता जाता :- तुळजाभवानी

सतिश गावडे
Fri, 01/23/2015 - 10:18 नवीन
जाता जाता :- तुळजाभवानी मंदिराची 'लूट'!
खुप वाईट वाटलं ही बातमी वाचली तेव्हा. मंदिरांकडे जमा होणारी संपत्ती ही भाविकांनी श्रद्धेपोटी "देवाने आपल्याला भरभरुन दिलं. तेव्हा आपणही फुल ना फुलाची पाकळी देवाला द्यायला हवी" या भावनेने दानपेटीत टाकलेले पैसे, सोने वगैरे असते. या पैशाचे पुढे काय होते याच्याशी दान पेटीत पैसा टाकणार्यांना भाविकांना काही घेणे देणे नसते त्यामुळे अशा घटना घडतात. देवस्थाने जमा होणार्या संपत्तीच्या पाच दहा टक्के संपत्ती समोर दाखवण्यापुरती "समाजोपयोगी" कार्यात वापरतात. उरलेल्या संपत्तीचे काय होते हे कोणालाच माहिती नसते. पैशाचा पूर वाहणारे एक देवस्थान मंदिरात जाण्यापूर्वी मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्याचे पाच दहा रुपये घेण्याची चिंधीगिरी करते. देशातील बहुतांश जनता देवभोळी असल्यामुळे देवस्थाने सॉरी "मंदिर संस्थाने" हा अतिशय कमी भांडवलात प्रचंड परतावा देणारा व्यवसाय बनला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

"मंदिर संस्थाने" हा अतिशय कमी

मदनबाण
Fri, 01/23/2015 - 10:46 नवीन
"मंदिर संस्थाने" हा अतिशय कमी भांडवलात प्रचंड परतावा देणारा व्यवसाय बनला आहे. सहमत ! तरी काही अपवाद अजुन शिलक्क आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

वरचा दुर्गादेवी लेख वाचला.

कंजूस
Fri, 01/23/2015 - 10:35 नवीन
वरचा दुर्गादेवी लेख वाचला. उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ?व्याडेश्वर ,उफराट्यापेक्षा हेच आवडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

उफराट्या गणपतीपुढे थोड्या

मदनबाण
Fri, 01/23/2015 - 10:46 नवीन
उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ? ज्या देवळात मी गेलो तेच दुर्गा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे, अजुन दुसरे कुठले असल्यास ठावूक नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हो तेचं मंदिर हे. बागेतली

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/23/2015 - 11:27 नवीन
हो तेचं मंदिर हे. बागेतली देवी म्हणतात स्थानिक लोकं तिला,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

उफराट्या गणपतीपुढे थोड्या

के.पी.
Fri, 01/23/2015 - 19:04 नवीन
उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ?
नाही. ते मंदिर गुहागरचे ग्रामदैवत श्री व्याघ्राम्बरी देवीचे आहे. :) आणि दुर्गादेवीचे मंदिर खूप लांब आहे. कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सांगितले ते बरोबर आहे दुर्गादेवी म्हणजेच बागेतली देवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

गुहागर एसटी स्टँडकडुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/23/2015 - 23:08 नवीन
गुहागर एसटी स्टँडकडुन दुर्गादेवीच्या देवळाकडे येताना मधे एक शाळा लागते त्याच्या जवळचं मंदिर का? कारण दुर्गा व्याडेश्वरी माझं कुलदैवत असल्यानी दरवर्षी एकदा नं चुकता जाणं होतं. माझ्या माहितीप्रमाणे कोरीव खांब असलेलं मंदिर ते हेचं. व्याघ्रांबरी देवीच्या खांबाचा फोटो असेल तर टाकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: के.पी.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा