✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/15/2015 - 03:24  ·  लेख
लेख
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)

प्रतिक्रिया

हा लेख येण्यापूर्वी स्पा च्या

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/15/2015 - 03:44 नवीन
हा लेख येण्यापूर्वी स्पा च्या धाग्यावर हेच मत मांडले आहे. मुलींच्या अपेक्षांनी बेजार माझे काही मित्र व भविष्यातील विवाह उत्सुक माझा धाकटा भाऊ मेटाकुटीस आले आहे , माझ्या धाकट्या भावाच्या लग्नाची काळजी दरवेळी आई फोन केला की सांगते , मग मुलींच्या अपेक्षा कश्या अव्वा च्या सव्वा आहेत. वर हा कार्टा तुझ्या सारखे स्वतःचे स्वतः लग्नाचे जुळवत सुद्धा नाही हे सुद्धा ऐकवले आहे. मग पंचक्रोशीतील व नातेवाईकांच्या संदर्भातील एकेक किस्से उदाहरणे सांगायला लागते , मुलांच्या आई वडिलांना भारी टेन्शन मारवाडी समाजात पूर्वी मुलीकडून भरमसाठ हुंडा यायचा , आता त्यांच्यात मुली कमी असल्याने मुले हुंडा देऊन लग्न करतात , हरयाणा मध्ये परिस्थिती भीषण आहे , बोनी कपूर चा ट्युलिप जोशी नायिका असलेला हा सिनेमा वास्तवदर्शी असून पाहतांना मस्तक सुन्न झाले. लग्नाची बोलणी वैगरे सगळा गमतीचा
  • Log in or register to post comments

मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत हे खरेच आहे

सामान्यनागरिक
Mon, 01/19/2015 - 16:55 नवीन
मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत हे खरेच आहे. पण यालापापणच जबाबदार नाही का? आपण जर आठवड्यातुन एकदा मुलीला पिझा देत असू, एकदा बाहेर जेवायला नेत असू तर तहीपण हीच अपेक्ष नवर्याकडुन करणार नाही का? म्हणजे तसा पैसा कमावणारा नवरा तिला हवा असेल. आपण कधी तिला अडचणीतअरहायची सवय केली का ? जर आपण मुलीला सर्व सुखे देत असू तर तिला त्यापेक्षा जास्तत सासूरवाडी कडुन हवे असणार. असो. मी एका मुलगी पहाण्याच्या समारंभाला गेले होतो. नंतर मुलगा मुलगी मिळुन फिरायला गेले होते एखाद तासा साठी. त्यांना एक मेकांच्या अपेक्षा नीट कळाव्यात म्हणुन आम्हीच ही सूचना केली होती. तेथे मुलीने विचारलेल्या प्रश्नांत आणी घातलेल्या अटीत एक होती ' तुमच्या घरात डस्ट्बीन्स किती आहेत ( हा तिचाच शब्द- डस्ट्बीन्स म्हणजे म्हातारी माणसं !) तिला घरात आजी आजोबा वगैरे नको होते म्हणजे त्यांच काहे करायला नको !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

हा डस्टबिनवाला अनुभव लोकांनी

बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 16:59 नवीन
हा डस्टबिनवाला अनुभव लोकांनी कायम सेकंडहँड सांगितलाय. फर्स्टहँड सांगणारे तुम्हीच पहिले. या निमित्ताने असे बोलणार्‍या व्यक्ती खरेच अस्तित्वात आहेत हे कळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

यालापापणच =>

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 17:01 नवीन
यालापापणच => =)) बाकी
' तुमच्या घरात डस्ट्बीन्स किती आहेत ( हा तिचाच शब्द- डस्ट्बीन्स म्हणजे म्हातारी माणसं !) तिला घरात आजी आजोबा वगैरे नको होते म्हणजे त्यांच काहे करायला नको
याबाबत तिचा "पुणेरी आजोबा स्टाईल जाहिर सत्कार" करायला पाहीजे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

ही डस्टबिनची गोष्ट आणि त्या

हाडक्या
Mon, 01/19/2015 - 19:35 नवीन
ही डस्टबिनची गोष्ट आणि त्या अनुशंगाने चर्चापण झालीये राव. आशे नाय कराचे. आदीच इथे अडीचशे पर्तिसाद सांडलेत, त्यात तुम्ही आधीच दळलेलं आणून ओतू नका ना हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 20:09 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

जर आपण मुलीला सर्व सुखे देत

अनन्त अवधुत
Tue, 01/20/2015 - 03:39 नवीन
जर आपण मुलीला सर्व सुखे देत असू तर तिला त्यापेक्षा जास्तत सासूरवाडी कडुन हवे असणार.
काहीच्या काहीच लॉजिक. अहो , म्हणजे सासरी काहीच मिळणार नाही असे सांगून पोरीला छळायचे का? मुलांना काय हवे नको ते बघणे , त्यांचे लाड करणे आणि त्यांना जबाबदारी शिकवणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

असहमत

मराठी कथालेखक
Mon, 06/13/2016 - 13:32 नवीन
माझ्या पाहण्यातली काही उदाहरणे : १) स्वतःच्या लग्नानंतरही कित्येक वर्षे माहेरी भाड्याचे दोन खोल्यांचे घर (अजूनही तेच घर, फक्त आता ते विकत घेतले आहे), मात्र लग्नानंतर लवकरात लवकर स्वतःचे घर व्हावे यासाठी आग्रही मग आधी तीन खोल्या , नंतर सहा खोल्या पण त्या फारशा नीट सजवलेल्या नाहीत ही तक्रार आहेच (लग्न : १९७५ च्या आसपास) २) श्रीमंत कुटुंबातली, मोठ्या बंगल्यात राहणारी मुलगी, लग्न करुन मध्यमवर्गीय घरात पण घराच्या साधेपणाबद्दल तक्रार नाही (लग्न : २००० च्या आसपास) ३) क्र १ मधील महिलेच्या भावाची पत्नी : लग्नाआधी चाळितल्या घरात , लग्न होवून वर उल्लेखलेल्या दोन खोल्याच्या घरात, सोबत सासू-सासरे (सासरे पुढे वारलेत , सासू अद्याप आहे) , पाहूण्यांची नियमित वर्दळ, दोन मुले. माहेरी मात्र मधल्या काळात चाळ पडून बिल्डरनकडुन १ बीएचके फ्लॅट मिळाला. सासरी अद्याप तेच छोटेखानी घर. महिलेची तक्रार नाही (लग्न : १९९५ च्या आसपास)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

स्वतःच्या लग्नानंतरही कित्येक

अत्रे
Wed, 06/15/2016 - 08:10 नवीन
स्वतःच्या लग्नानंतरही कित्येक वर्षे माहेरी भाड्याचे दोन खोल्यांचे घर (अजूनही तेच घर, फक्त आता ते विकत घेतले आहे), मात्र लग्नानंतर लवकरात लवकर स्वतःचे घर व्हावे यासाठी आग्रही मग आधी तीन खोल्या , नंतर सहा खोल्या पण त्या फारशा नीट सजवलेल्या नाहीत ही तक्रार आहेच
ही तक्रार बायकोची आहे असे वाटते. खोल्या नीट सजवलेल्या म्हणजे नेमके काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

ही तक्रार बायकोची आहे असे

मराठी कथालेखक
Wed, 06/15/2016 - 12:09 नवीन
ही तक्रार बायकोची आहे असे वाटते
नाही हो.. मी इतका वयस्कर नाही :)
खोल्या नीट सजवलेल्या म्हणजे नेमके काय?
म्हणजे घर 'पॉश' , अद्ययावत नसणे. रंग उडालेल्या भिंती , जुन्या पद्धतीचे फर्निचर ई बद्दलची तक्रार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

सिनेमाचे नाव देण्यास

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/15/2015 - 03:51 नवीन
सिनेमाचे नाव देण्यास विसरलो मातृभूमी
  • Log in or register to post comments

पुर्वी एका धाग्यावर दीलेलं मत

खटपट्या
गुरुवार, 01/15/2015 - 03:58 नवीन
पुर्वी एका धाग्यावर दीलेलं मत इथेही देतो. जसे सुस्थापीत मुले (नोकरी आणि फ्लॅट असलेले)नोकरी नसलेल्या मुलीशी लग्न करतात. त्याप्रमाणे नोकरी असलेली मुलगी एखाद्या नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न का करत नाही. स्त्रीमुक्तीवाल्या अगदी ओरडून सांगत असतात की मुली कुठेच कमी नाहीत मुलांपेक्षा. मग इथेच कमी पणा का घेतात. मुलाचा पगार मुलीपेक्षा जास्तच पाहीजे.असे का? दुसरे असे की एकाच घरात दोन गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या गेल्यामुळे एखाद्या बेकाराचे घर सुस्थापीत होण्यापासून मुकते. जर एखाद्या मुलीला १ लाख पगाराची नोकरी असेल तर तीला परत दीड लाख पगारवालाच नवरा का हवा असतो? एखाद्या सुशीक्षीत, नीर्व्यसनी मुलाशी लग्न का करु शकत नाही?
  • Log in or register to post comments

सहमत!! दोन दोन नोकर्‍यांनी

स्पंदना
गुरुवार, 01/15/2015 - 04:22 नवीन
सहमत!! दोन दोन नोकर्‍यांनी एकच घर समृद्ध होण्याऐवजी, आणखी एक घर जगू शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

.

hitesh
गुरुवार, 01/15/2015 - 07:57 नवीन
अजिबात सहमत नाही.. मिळवणारे चोर्‍या करुन मिळवत नसतील तर त्यानी दोन का चार पगार घरात आणावेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

तुमच्या सारख्या लिब्बरल

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/15/2015 - 08:47 नवीन
तुमच्या सारख्या लिब्बरल लोकांशी वाद घालायची इच्छा नाही पण जमल्यास एलिझाबेथ वॉरन यांचे "टू इनकम ट्रॅप" हे पुस्तक वाचून बघावे हे सुचवतो. http://www.amazon.com/gp/aw/d/0465090907/ref=redir_mdp_mobile/191-8068222-3664543
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

.

hitesh
गुरुवार, 01/15/2015 - 09:25 नवीन
कुणीतरी पुस्तक लिहिले म्हणजे ते खरेच आहे असे होत नाही. वन इन्कम ट्रॅप .. असे पुस्तक मीही लिहू शकेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

म्हणूनच म्हटले मला (निओ)

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/15/2015 - 09:53 नवीन
म्हणूनच म्हटले मला (निओ) लिब्बरलांशी वाद घालायची इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

.

hitesh
गुरुवार, 01/15/2015 - 09:53 नवीन
http://m.motherjones.com/politics/2004/11/two-income-trap
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

दोन मुद्दे वेगळे आहेत हो

असंका
गुरुवार, 01/15/2015 - 12:24 नवीन
दोन मुद्दे वेगळे आहेत हो नगरीनिरंजन साहेब. इथे वर म्हणत आहेत की दोघांनी नोकरी केली म्हणून तिसर्‍या एकाला ती नोकरी मिळत नाहीत. आपला याला पाठिंबा आहे का? दुसरे घर चालावे म्हणून कुणी आपल्या नोकरीचा त्याग करावा का? आपले स्वतःचे घर नीट चालावे म्ह्णून एकाने घर सांभाळणे योग्य असा या पुस्तकातला मुद्दा असावा असं मला सकृद्दर्शनी दिसतंय.. ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या असून, वेगळया भावना/हिशेब त्यांच्यामागे कार्यरत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

पुस्तकातला मुद्दा असा आहे:

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/15/2015 - 12:36 नवीन
पुस्तकातला मुद्दा असा आहे: १. दोघांनी नोकरी केल्यास भविष्य सुरक्षित होईल असे लोकांना वाटते. २. दोघे कमवायला लागल्यावर उत्पन्न वाढले म्हणून मोठे घर, मुलांसाठी सर्वोत्तम शाळा, मोठी गाडी (किंवा दोन गाड्या) वगैरे मिळवण्याचा कल असतो. ३. त्यासाठीचा जो खर्च असतो त्याचे प्रमाण पाहिल्यास शेवटी दुहेरी उत्पन्न असूनही बेसिक गोष्टींवर जास्त प्रमाणात खर्च झाल्याने भविष्य सुरक्षित तर होत नाहीच शिवाय लोक कर्जबाजारीही होऊ लागतात. ४. महत्त्वाचे म्हणजे बेसिक गोष्टींवर खर्च वाढल्याने या गोष्टी महाग होतात (जे एकल उत्पन्न गटाला हानिकारक असते) व लेबर सप्लाय वाढल्याने वेतन व जॉब्जची उपलब्धता कमी होते. आता तुम्ही ठरवा हे लॉजिकल आहे की बकवास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

पुस्तक हा मुद्दाच नव्हता.

असंका
गुरुवार, 01/15/2015 - 13:06 नवीन
पुस्तक हा मुद्दाच नव्हता. मुद्दा हा आहे की दुसरे एखाद घर चालावे म्हणून एका घरातील दोघांपैकी एकानेच नोकरी करावी का... वर आपण मांडलेल्या मुद्द्यांपैकी चौथा मुद्दा याला जवळ जाणारा असला तरी पटण्यासारखा नाही. १. लेबर सप्लाय या पद्धतीने कमी करणे हे अजिबातच सोल्युशन होऊ शकत नाही. २. खर्च वाढला म्हणून गोष्टी महाग होतात हे आपण काय म्हणत आहात हे कळत नाही. मागणी वाढली म्हणून गोष्टी महाग होतात हे मी समजू शकतो. थोडक्यात पुस्तकात सामाजिक क्रांतीची आवश्यकता सांगितलेली दिसतीये की - 'एक कुटुंब एक उत्पन्न!' अजिबातच पटत नाही. आपल्याला जर इतरांपेक्षा जास्त हवे तर इतरांपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात. माझी जर इतरांपेक्षा जास्त कष्ट घ्यायची तयारी असेल, तर मी इतरांपेक्षा जास्त मागणी करणार. ज्यांना कष्ट घ्यायचे नसतील, त्यांनी आम्हाला कष्ट कमी करा असं सांगण्यात काय अर्थ आहे? कदाचित पुढे एखादी दुर्घटना घडेल जिला तोंड देण्याची एकल उत्पन्न गटाची क्षमता लेखिका-द्वयीला जास्त चांगली वाटते आहे, म्हणून उत्पन्नाचा त्याग करणे कसं योग्य आहे? त्यापेक्षा दुसर्‍या काही मार्गांनी दुर्घटनेला तोंड देण्याची क्षमता वाढवणेही शक्य होइल... पण हे सगळं पुस्तकावरचं झालं. मुद्दा तो नव्हताच. मुद्दा हा आहे, दुसर्‍या एकाचे घर चालावे म्हणून आपल्या घरातील एकाने असलेल्या नोकरीचा त्याग करावा का... हा कार्यकारणभाव वर स्पष्ट मांडलेला होता. ह्या पद्धतीच्या त्यागाला आक्षेप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+१००

सुबोध खरे
गुरुवार, 01/15/2015 - 13:16 नवीन
+१०० याचा पुढचा भाग म्हणजे मुलीना शिकवूच नका कारण मुलीला शिकवले कि तिला सुद्धा काही तरी करावेसे वाटेल. आता काहीतरी करायचे म्हणजे नोकरी किंवा धंदा. नोकरी केली तर दुसर्या (पुरुषाच्या) पोटावर पाय येतो . धंदा केला तर त्या धंद्यात स्पर्धा निर्माण होते . मग काय करायचे चूल आणि मूल. किंवा मग धर्मादाय काम करायचे. माझ्या बायकोने ( एम बी बी एस च्या यादीत महाराष्ट्रात क्रमांक १३ बारावीला गुण ९७ %) नौदलाच्या दवाखान्यात रुपये २५००/- महिना या मानधनावर ४ वर्षे काम केले रोज ७० ते ८० रुग्ण पाहण्यासाठी. म्हणजे एका रुग्ण साठी १ रुपया. तिला हे मानधन द्यायला येणाऱ्या कारकुनाला तिप्पट पगार होता.(सरकारी नोकर असल्यामुळे). या कारणास्तव मी नौदलाच्या नोकरीवर लाथ मारली १८. ५ वर्षाला. (नौदल प्रमुखांच्या मुलाखतीत त्यांनी तुमच्या बायकोची करियर हा तुमचा प्रश्न आहे असे सांगितले) असे आयुष्यभर करणे किती मुलींना जमेल? आणि त्यांनी का करावे ? डॉक्टरची गोष्ट वेगळी असे बर्याच लोकांनी मला सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

पटत नसेल तर सोडून द्या. वाद

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/15/2015 - 13:35 नवीन
पटत नसेल तर सोडून द्या. वाद घालण्याची इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चिमणराव यांचा प्रतिसाद पटला

सस्नेह
गुरुवार, 01/15/2015 - 14:56 नवीन
चिमणराव यांचा प्रतिसाद पटला आणि आवडला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

मुलींच्या अपेक्षांच समर्थन

पिलीयन रायडर
गुरुवार, 01/15/2015 - 10:16 नवीन
मुलींच्या अपेक्षांच समर्थन करायचं नाहीये.. कारण आई वडीलांची जबाबदारी नको.. भरभक्कम पगार हवा, माहेर जवळ हवं.. किंवा मग डायरेक्ट परदेश हवा, घर हवंच..ते ही २ बीएच्के च.. गाडी नसली तरी एखादी कुल बाईक हवीच वगैरे अपेक्षा असणार्‍या मुली पाहिल्या आहेत. (गोरीच हवी, पाय सपाट नको, जाड नको, चष्मा नको, एकुलती एक किंवा भाऊ नसलेली नको, सुशिक्षित हवी पण नोकरी सोड म्हणलं तर ऐकणारी हवी, वगैरे ह्याही पेक्षा फालतु अपेक्षा असणारी पोरं पण पाहिली आहेत..) पण मुली नोकरी करुन , नोकरी नसणार्‍या नवर्‍याशी लग्न का करत नाहीत ह्याच एक कारण माझ्यामते असं असु शकतं की संपुर्णपणे घराची जबाबदारी (स्वयंपाक ते पोरांची शी-शु ते अभ्यास ते वाळवणं इ करणे...) घेण्याची भारतीय पुरुषांची मानसिकता असते का? अनेक भारतीय स्त्रिया हे वर लिहीलेलं सगळं करुन नोकरी करतात (अनेकींचे नवरे त्यात प्रचंड मदतही करतात.. काहींचे काडीही उचलत नाहीत..).. असे किती पुरुष असतील जे बायको नोकरीवरुन आली की तिला ग्लासभर पाणी आणुन देतील आणि लगेच ताट वाढुन तिला गरम पोळ्या करुन देतील (बायका आहेत हे करणार्‍या..).. घरात तिचाच शब्द असेल.. तिला कुटुंबप्रमुखाचा मान असेल (कमावतो म्हणून मेजोरिटी घरात पुरुषालाच हा मान असतो..) मला अनेक अशा धुणी-भांडेवाल्या माहित आहेत ज्या काम करुन पैसे कमावतात आणि त्यांचे नवरे दारुत ते उडवतात.. म्हणजे समाजात अशा स्त्रिया आहेत ज्या नवर्‍याला पोसतात. त्यांना नवर्‍याकडुन घर सांभाळण्यात मदत सुद्धा अपेक्षित नसते.. एक तर अगदी आपल्यासारखी मध्यमवर्गीय मुलगी माहित आहे जी नोकर करुन पैसा घरात आणतेय, घरही बघतेय आणि नवरा सगळं सोडुन घरात बसलाय... शक्यतो स्त्रिया ही रिस्क घेत नाहित कारण मग घर आणि नोकरी ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याच मानगुटीवर बसतील.. नवरा जर १००% घर सांभाळणार असेल तर माझ्यामते अनेक स्त्रिया १००% पैसा कमावण्याची जबाबदारी घेतील.. पण आपल्या समाजाची रचना त्याला पोषक आहे का? ह्यात अजुन मुलांचा जन्म, त्यासाठी आईची गरज जिथे बाईला किमान काही महिने घरी थांबावं लागतं (बाळाकडे वडीलही बघतील हो.. अगदी आईच्या दुधालाही पर्याय तयार झालेत (ह्यावर खुप काथ्याकुटही झालाय) आईची माया.. आई-मुलाला एकमेकांची गरज वगैरे मुद्दे सुद्धा सोडुन देऊ....) पण स्त्रिला स्वतःला विश्रांती म्हणुन का होईना घरी रहावं लागेल.. तेव्हा घर कसं चालणार? (चालणारच नाही असं नाही.. पण कमावते दोघंही घरात असले तर ओढाताण तर नक्की होईल..) त्यामुळे अगदी सरसकट मुलींना जबाबदार धरता येईल असं वाटत नाही..
एकाच घरात दोन गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या गेल्यामुळे एखाद्या बेकाराचे घर सुस्थापीत होण्यापासून मुकते.
ह्याबद्दलही किंचित असहमती आहे.. पण तो ह्या धाग्याचा विषयच नाही.. त्यामुळे पुन्हा केव्हातरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पण मुली नोकरी करुन , नोकरी

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/15/2015 - 12:16 नवीन
पण मुली नोकरी करुन , नोकरी नसणार्‍या नवर्‍याशी लग्न का करत नाहीत ह्याच एक कारण माझ्यामते असं असु शकतं की संपुर्णपणे घराची जबाबदारी (स्वयंपाक ते पोरांची शी-शु ते अभ्यास ते वाळवणं इ करणे...) घेण्याची भारतीय पुरुषांची मानसिकता असते का? अनेक भारतीय स्त्रिया हे वर लिहीलेलं सगळं करुन नोकरी करतात (अनेकींचे नवरे त्यात प्रचंड मदतही करतात.. काहींचे काडीही उचलत नाहीत..).. असे किती पुरुष असतील जे बायको नोकरीवरुन आली की तिला ग्लासभर पाणी आणुन देतील आणि लगेच ताट वाढुन तिला गरम पोळ्या करुन देतील (बायका आहेत हे करणार्‍या..).. घरात तिचाच शब्द असेल.. तिला कुटुंबप्रमुखाचा मान असेल (कमावतो म्हणून मेजोरिटी घरात पुरुषालाच हा मान असतो..)
लग्नाआधीच बेकार असलेल्या पुरुषांशी लग्न करायची तयारी दाखवली आणि अशी इच्छा बोलून दाखवली तर काही प्रमाणात तरी पुरुष यासाठी तयार होऊ लागतील असे वाटते. अर्थात बाकीचे लोक टोचायला असतातच; त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तेच तर मी म्हणतेय.. समाज तयार

पिलीयन रायडर
गुरुवार, 01/15/2015 - 13:25 नवीन
तेच तर मी म्हणतेय.. समाज तयार आहे का? बेकार असलेल्या मुलाशी लग्न लावुन देणे.. त्याची घरकाम करायची तयारी असणे.. ह्याला त्याच्या आईचा सपोर्ट असणे..किंवा किमान हरकत नसणे... सगळच अवघड आहे.. याक्षणी तरी.. मग हे सगळं बदलण्याची जबाब्दारी फक्त कमावत्या मुलींची आहे का? त्यात्वर दोघांनी नोकरी करु नये असा प्रवाद चालु आहे.. नवर्‍याला म्हणावं तू सोड तर वर सांगितलेले सगळे मुद्दे येतील.. आणि मग शिकलेल्या, कमावत्या बाईलाही तोच इगो असतो जो कमावत्या पुरुषाला असतो.. तिने का म्हणुन नोकरी सोडावी? हा एक मुद्दा येईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

पुरुषांनी घरकाम करण्यात

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/15/2015 - 14:01 नवीन
पुरुषांनी घरकाम करण्यात काहीही चुकीचे नाही. असेच मत असलेल्या लोकांनी ते हळूहळू अंमलात आणल्यास बदल होईल. मुद्दे येतील म्हणून काहीच केलं नाही तर कधीच बदल होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अशावेळेस, घटस्फोटाच्या वेळी

हाडक्या
गुरुवार, 01/15/2015 - 20:49 नवीन
अशावेळेस, घटस्फोटाच्या वेळी अशा पुरुषांना पोटगी मिळू शकेल काय हो ? नाई म्हंजे एक शंका उगीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सहमत..:)

स्मिता चौगुले
गुरुवार, 01/15/2015 - 12:45 नवीन
सहमत..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१११११

मधुरा देशपांडे
गुरुवार, 01/15/2015 - 13:39 नवीन
पिराला अनुमोदन. खटपट्या म्हणतात तसे मुलाचा पगार जास्तच पाहिजे, शिवाय त्याने घरातील कामेही करावीत, त्याचा फ्लॅट पाहिजेच पाहिजे अशा अपेक्षा असणार्‍या मुलींची कीव येते. मी जेव्हा दोन मैत्रिणिंशी असे बोलताना 'माझी हरकत नाही मुलाचा फ्लॅट नसेल तरिही. आम्ही दोघे मिळुन घेऊ की' तेव्हा त्या दोघींनिही मला वेड्यात काढलं होतं. पण अरेंज मॅरेज मध्ये अजुन नसेल, तरिही लव्ह मॅरेज मध्ये अनेक केसेस अशा डोळ्यांसमोर आहेत ज्यात लग्न झाले तेव्हा, त्यानंतरही काही वर्षे मुलाला नोकरी नाही. त्याचे शिक्षण सुरु आहे. आणि हे मुलींनी आणि त्यांच्या पालकांनीही सहज स्विकारले आहे. यातलीच मी देखील एक. लग्न ठरले तेव्हाच नवर्‍याने पहिली नोकरी वर्षभर करुन सोडली होती आणि उच्च शिक्षणासाठी तयारी करत होता. नंतर अडीच वर्षे शिक्षण आणि मग त्याची नोकरी सुरु झाली. दरम्यान लग्न झाले आणि माझी नोकरी सुरुच होती. जेव्हा माझ्या मैत्रिणी नवर्‍याची गिफ्ट्स मिरवायच्या तेव्हा मी माझ्या नवर्‍याचे शिक्षण (शैक्षणिक कर्ज असले तरिही) आणि घरातील इतर जबाबदार्‍यांमध्ये होते. हां पण त्याच वेळी जेव्हा तो भारतात असायचा तेव्हा याच सगळ्यांसमोर मी नवर्‍याने रेडी करुन दिलेला डबा मिरवु शकत होते. जेव्हा मला माझ्या कंपनीकडुन परदेशातली उत्तम संधी चालुन आली होती, तेव्हा त्याने मला हे समजावण्याचा खूप प्रयत्न केला की तु हे स्वीकार आणि मी तिथे नोकरी शोधतो. तु इथे येऊन शोधलीस काय आणि मी केले काय ते सारखेच. पण शेवटी मी इकडे आले. सगळी जवळजवळ शुन्यातुन सुरुवात होती. शिवाय एजुकेशन लोन डोक्यावर होते. पण आता दोन अडीच वर्षात परिस्थिती बदलते आहे. अपर्णाताई म्हणाली तसे जे आहे ते आमचे दोघांचे आहे आणि यासारखे समाधान नाही. पण एक महत्वाचे, या मधल्या काळात आजुबाजुच्यांनी मात्र काय बायकोच्या जीवावर खातोस, कधी नोकरी सुरु होणार, नाही मिळाली तर काय, हिचा नवरा अजुनही शिकतोय आणि हिला चालतं अशा नि अजुन कित्येक प्रश्नांनी डोके उठवले होते. कितिही दुर्लक्ष करायचे म्हटले तरिही वीट यायचा. आता आम्ही बधत नाही पण ते अनुभवातुन आले. पण आई बाबा खंबीर उभे होते ही सगळ्यात मोठी बाब होती. त्यांची मुलगी नोकरी करतेय आणि जावई शिक्षण घेतोय यात ना त्यांना कमीपणा वाटला ना माज. म्हणजेच जर असे करणारे कुणी असतील, निदान सुरुवातीला तर किती जण ते हाणुन पाडायचा प्रयत्न करतात. त्या लोकांचे प्रश्न अजुन वाढवण्यात फक्त मदत करतात बाकी काहीच नाही. माझ्या इतर काही मित्र मैत्रिणिंची पण अशी उदाहरणे आहेत ज्यात सेटल होण्यात इतर लोकांपेक्षा त्यांना वेळ लागला पण त्यांची त्याला हरकत नाही. अमुकचा फ्लॅट झाला, त्याला मुलं झाली, त्याने युरोप टुर केली या कुठ्ल्याही तुलनेत न अडकता जर आपले आपण काय करायचे ते ठरवले तर आपोआप काही बदल घडतात. एकुण मुलिंनी जशा या अवास्तव मागण्या करणे चुकीचे आहे हे मान्य. पण तेवढेच मुलांनिही इतर जबाबदार्‍या घेण्यात बायकोच्या सोबत आहोत अशी उदाहरणे दिसु लागली तर कदाचित काही प्रमाणात (खूपच कमी असेल) तरी हे घडु शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१०००

सविता००१
गुरुवार, 01/15/2015 - 13:48 नवीन
मधुरा,मी पण तुझ्यातलीच गं! आमचीही सेम केस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

एक लिहायचे राहिले. नेहमीसाठी

मधुरा देशपांडे
गुरुवार, 01/15/2015 - 14:13 नवीन
एक लिहायचे राहिले. नेहमीसाठी मी नोकरी करावी आणि त्याने घरी बसावे असे नाही. आता आम्ही दोघेही नोकरी करतो. हा मुळ धाग्याचा विषय नाही तरिही, केवळ कुणा बेकाराचे घर सावरले जावे म्हणून एकाने घरी बसावे हे काही पटत नाही. हा त्या दोन व्यक्तींचा प्रश्न आहे, त्यांची आवड आणि गरज काय आहे त्याप्रमाणे. मुद्दा हा की सुरुवातीला सगळे असेलच असे नाही, पण म्हणुन भविष्यात मिळवता येते यावर विश्वास हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

अगदी..

पिलीयन रायडर
गुरुवार, 01/15/2015 - 14:15 नवीन
अगदी.. लव्ह मॅरेज मध्ये हे अनेकदा घडताना दिसतं.. मी स्वतः माझ्या नवर्‍याच्या प्रेमात पडले तेव्हा दोघंही शिकत होतो.. नवर्‍यावर संपुर्ण कुटूंबाची, भावाच्या शिक्षणाची, स्वतःच्या लग्नाची, आईच्या ऑपरेशनची जबाब्दारी होती.. लग्न केलं तेव्हा मला जॉब नव्हता, ६ महिन्यानी मिळाला.. घरसुद्धा दोघांनी पैसे जमवुन घेतलं.. ह्यात माझं शिक्षण नवर्‍यापेक्षा थोडं जास्त आहे.. ना मी कधी अवास्तव अपेक्षा ठेवल्या... ना नवर्‍यानी कधी कामात मदत करताना कमीपणा मानला, ना आमच्या आई वडीलांनी कधी हस्तक्षेप केला.. माझा मुद्दा हाच आहे की जबाबदारी सगळ्यांचीच आहे, फक्त मुलींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं का करावं? शिवाय, अरेंज मॅरेज हा जर "बाजार"च असेल तर बाजारातुन मनुष्य सर्वात "किफायतशीर" गोष्ट्च पसंत करतो.. तिथे फक्त व्यवहारच होत असतात.. स्वभाव २ भेटीत ओळखता येत नाही, पगार लगेच विचारता येतो, मग जर घरकाम परंपरेनी आपल्यावर पडणार असेल तर किमान जास्त पगाराचा मुलगा का पाहु नये मुलींनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

मी स्वतः माझ्या नवर्‍याच्या

काळा पहाड
Fri, 01/16/2015 - 00:11 नवीन
मी स्वतः माझ्या नवर्‍याच्या प्रेमात पडले तेव्हा दोघंही शिकत होतो
बघा ना, बाकीच्यांच्या कडे नोकर असतात ही कामं करायला.. (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आमचे तर लिव्हिंग रिलेशन शिप

निनाद मुक्काम …
Fri, 01/16/2015 - 05:24 नवीन
आमचे तर लिव्हिंग रिलेशन शिप अडीच वर्ष मग लग्न केले भिन्न संस्कृती मात्र सारखी विचारसरणी कोणीतरी कोणापेक्षा जास्त कमावणार आता ते मिअसो कि बायको ह्यात विचार करण्याचा मुद्दा नव्हता मात्र माझे आई वडील देश कुटुंब ह्यांची काहीही माहिती नसतांना व तिच्या माणसांची व देशाची जुजबी माहिती असतांना आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवून लग्न केले , लग्नाच्या दिवशी आपल्या सासू सासऱ्यांना भेटणारी माझी बायको आणि मुलाच्या लग्नाच्या दिवशी आपली सून पाहणारे माझे आई वडील ह्यामुळे माझे लग्न हा एक मजेदार किस्सा झाला होता , त्याबद्दल परत कधीतरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुमचा प्रतीसाद खूप आवडला.

खटपट्या
गुरुवार, 01/15/2015 - 23:34 नवीन
तुमचा प्रतीसाद खूप आवडला. स्वानुभव असल्यामुळे जास्तच भावला. माझं जेव्हा लग्न ठरत होते तेव्हा बायकोकडचे लोक्स माझा पगार एकून (आकडा इथे देण्यासारखा नाहीये ईतका कमी) माझी टर उडवत होते. पण बायकोच्या हट्टापुढे त्यांचे काहीएक चालले नाही. तीला माझ्याशीच लग्न करायचे होते. लग्न झाले. परीस्थीती बदलत गेली. थोड्यादीवसांनी परदेशी जाण्याची संधी आली. सगळे सुरळीत सुरु झाले. याला माझ्या बायकोने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि घरातील लोकांनी दीलेली साथ कारणीभूत होते. तेव्हा टर उडवणारे लोक्स आता कधी कधी माझ्याकडे पैश्यांची मदत मागतात बरे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

तात्पर्य काय की

पिवळा डांबिस
Fri, 01/16/2015 - 00:30 नवीन
तात्पर्य काय की अरेंज्ड मॅरेजच्या वाटेसही जाऊ नये. सरळ लव्हमॅरेज करावे! -लव्हस्ट्रक पिडांकाका मुवि, निकालो और एक धागा!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

हाहा

मधुरा देशपांडे
Fri, 01/16/2015 - 02:58 नवीन
हाहा. परफेक्ट. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पि डां साहेब

सुबोध खरे
Fri, 01/16/2015 - 11:00 नवीन
पि डां साहेब सर्व जण तुमच्या सारखे नशीबवान नसतात. आमची ( माझी आणि बायको ) फार इच्छा होती कि प्रेम विवाह व्हावा. पण म्हणून कोणाशीही करावा असेही नव्हे. आमच्या आई बापानी "फुल परमिशन" दिलेली होती हो पण कोणी मनासारखी मिळालीच नाही. आमच्या मुलानाही(मुलगी आणि मुलगा) तशीच परमिशन आहे. फक्त कोणत्याही टिनपाट मुला/मुलीशी "करायचा" म्हणून प्रेम विवाह करू नका एवढेच त्यांना सांगणे आहे. तीच एक इच्छा आयुष्यात राहून गेली. बाकी सर्व गोष्टी आयुष्यात मनासारख्या झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मी नशीबवान तर खराच!

पिवळा डांबिस
Sun, 01/18/2015 - 10:52 नवीन
सर्व जण तुमच्या सारखे नशीबवान नसतात.
हां, "मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे!!!" :) गंमत अशी आहे डॉक्टर साहेब की प्रेम करतांना कुणावर प्रेम होईल आणि कुणावर नाही हे सांगता येत नाही. तस्मात "
कोणाशीही करावा असेही नव्हे
" हे आधी ठरवता येत नाही. आपल्याला हवं ते माणूस भेटलं की पुरुषाच्या हृदयात काहितरी वाजतं (स्त्रियांच्या हृदयात कदाचित ढोल वाजत असेल, कल्पना नाही, हिंदी सिनेमात ढोऽऽल बाजे म्हणून सांगतोय!). त्या क्षणी जर धाडस करून अ‍ॅप्रोच झालं तर पेम जुळतं... मी कोणाशी प्रेम करीन आणि कोणाशी नाही असा विचार करत राहिलं तर मग "प्रेम होईना तुझ्याने, प्रेम माझे राहिले" असं होण्याचीच शक्यता अधिक. प्रेम हे जात, धर्म, वय, शिक्षण, घराणं, सांपत्तिक स्थिती वा इतर कोणतेही फॅक्टर पाहून होत नाही हो! ते फक्त दोन हृदयांचं मीलन असतं. मग बाकी आईबाप, भाऊबहीण, मित्रमंडळी इत्यादि दुनियादारी नगण्य ठरते. म्हणजे त्यांना मान्य असेल तर उत्तम पण जर मान्य नसेल तर गेले झक मारत... अहो सतीचं वाण आहे हे!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

क्या बात

यशोधरा
Sun, 01/18/2015 - 13:11 नवीन
क्या बात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

प्रेम हे जात, धर्म, वय,

खटपट्या
Sun, 01/18/2015 - 13:16 नवीन
प्रेम हे जात, धर्म, वय, शिक्षण, घराणं, सांपत्तिक स्थिती वा इतर कोणतेही फॅक्टर पाहून होत नाही हो!
१००% सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पि डां साहेब

सुबोध खरे
Sun, 01/18/2015 - 21:02 नवीन
पि डां साहेब अहो अशी मुलगी कुठे भेटली नाही कि जिच्यामुळे हृदयात कुठेतरी घंटी वाजली पाहिजे. नाही तर आमच्या घरून कोणतीही आडकाठी नव्हती. तशा दोन तीन मुलीनी रस ही दाखविला होता पण पुढे जावे असे फारसे वाटले नाही. दोन तर सुंदरही होत्या( बरेच लोक त्यांच्यावर डोळा ठेवून होते) पण "वो बात जमी नही". उगाचच स्टाईल मारायला गर्लफ्रेंड असावी या मताचा मी नाही.( खरं तर मुलींच्या भावनांशी खेळावे हा माझा पिंड नाही). त्यामुळे पुढे काही झाले नाही. इतकेच. पण अशी कोणी तरी भेटायला हवी होती हे मात्र वाटत राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

प्रारब्ध

पिवळा डांबिस
Mon, 01/19/2015 - 03:53 नवीन
उगाचच स्टाईल मारायला गर्लफ्रेंड असावी या मताचा मी नाही.
मीही नाही. त्यात काही अर्थ नाही...
( खरं तर मुलींच्या भावनांशी खेळावे हा माझा पिंड नाही)
सहमत. त्याबद्दल हॅटस ऑफ टू यू डॉक्टरसाहेब! फार मोलाचं बोललांत!! हल्लीच्या नव्या मुलांनी या धाग्यातून बाकी काही घेतलं नाही तरी हे वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे!!! +१०० आता थोडं गंमतीत माडगूळकरांच्या शब्दांत फेरफार करून म्हणतो, कृपया ह. घ्या... "नको खंत पाळू आता, पूस लोचनांस, तुझा आणि माझा घडला वेगळा प्रवास... स्वलक्ष्मीचा तू राजा, मी दास प्रेयसीचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पिडा काका सहमत.

विजुभाऊ
Tue, 01/20/2015 - 17:18 नवीन
पिडा काका सहमत. माझे अ‍ॅरेन्ज मॅरेज. मात्र आम्ही दोघेही भिन्न संस्कृतीत वाढलेलो. मी पूर्ण मराठी वातावरणात वाढलेलो आणि नास्तीक.आणि पत्नी कट्टर वैष्णव कुटुंबातील. लग्न ठरण्यापूर्वी झालेल्य भेटीत जे काही थोडेफार बोललो तीच आमची ओळख. मात्र एका खूप समन्जस मॅच्यूअर व्यक्तीशी आपले लग्न ठरत आहे याची कुठेतरी जाणीव त्या बोलण्यात झाली होती. कोणी घेतलेले निर्णय कधी चूक असले तरी मुद्दाम त्यावरून एकमेकाना हिणवणे टोमणे मारणे वगैरे गोष्टी कधी घडल्या नाहीत. चुका होतात त्या मुद्दाम होऊन कोणी करत नाही यावर दोघांचाही ठाम विश्वास आहे. आपण दोघेही भिन्न व्यक्ती आहोत याची दोघानाही जाणीव आहे. केवळ लग्न झाले म्हणून दुसर्‍या व्यक्तीला (जोडीदाराला) गृहीत धरून चालले तर अनर्थच होतात याची जाणीव ठेवून सुदैवाने हा मॅच्युअर पण दोघानीही नेहमीच दाखवला आहे. काय पिडांकाका सहमत आहात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पण सगळ्यांचे "नशीब" सारखे

टवाळ कार्टा
Tue, 01/20/2015 - 17:22 नवीन
पण सगळ्यांचे "नशीब" सारखे नस्ते ना...त्यासाठीच तर धागा आहे हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नक्कीच

पिवळा डांबिस
Tue, 01/20/2015 - 23:00 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हा प्रतिसाद सगळ्यात जास्त

रायनची आई
गुरुवार, 01/15/2015 - 16:59 नवीन
हा प्रतिसाद सगळ्यात जास्त आवडलाय..+१११११.. विचारान्ची खूप clarity आहे पि.रा.तुझ्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हा माझा रिप्लाय पि.रा.च्या

रायनची आई
गुरुवार, 01/15/2015 - 17:09 नवीन
हा माझा रिप्लाय पि.रा.च्या सगळ्यात पहिल्या प्रतिसादसाठी होता..चुकून येथे पोस्ट झाला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रायनची आई
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा