हिमशिखरांतून खळखळ गाते
मनमंदीर तर झगमग झुलते
कुणास कोणी हरवून जेते
तुझी पुलावर आठवण येते.
----
काव्यजालिंदरसार , सर्ग २५, ऋचा ५१
काही घटना अशा असतात की मनावर त्यांचा जो परिणाम होतो तो पुसता येत नाही... कितीही काळ गेला तरी. हिमशिखरे , हिरवळ, खळाळत वाहणारी नदी, डोंगरउतार , नदी पार जाण्यासाठीचा लोखंडी पूल... असं दृश्य समोर आलं की मन आठवणीत हरवून जातं. तिच्या आठवणी, नदीच्या आठवणी ,पुलाच्या आठवणी.. असो... पुलबहार रागाची ही परफ़ेक्ट सिचुएशन.
या पुलबहार रागाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं " तुम याद ना आया करो".. त्याचं हे गाणं लोकांना कमी माहित असलेलं ( विस्मृतीतच गेलेलं म्हणा ना..)
http://www.youtube.com/watch?v=JWHqAFXCqH0
गीतगायनासाठी साक्षात हिंदकेसरी शब्बीरकुमार आणि लता ; म्हणजे पुढे बोलायची गरजच नाही. शब्बीरच्या कठीण गायकीपुढे लता अगदी तोडीस तोड गायली आहे; दादच द्यायला हवी.
लक्ष्मी प्यारेंनी या गाण्यासाठी पुलबहार रागाचा वापर केला आहे. जनमेजयाने लिहिलेल्या "बोलीगीतसार" या ग्रंथात या रागाचा प्रथम उल्लेख सापडतो.
(पुलावरली गाणी , डुंबनदीचे प्राक्तन , हिरवळीवरील हिंमत या नावाने फ़क्त पुलबहार रागातल्या गाण्यांचे काही म्यूझिक विडिओ नुकतेच प्रकाशित झाले. त्यांची ओळख पुन्हा केव्हातरी.)या रागा च्या नावाची गंमत आहे. पूल बहार किंवा पुल् आउट या अर्थाने ही काही गाणी वापरली गेली आहेत. पण याबद्दल तज्ञांमध्ये वाद आहेत, त्यावर पुन्हा केव्हातरी. :)
विशेष उल्लेख या गाण्याच्या कोरिओग्राफीचा... नृत्यदिग्दर्शनात काय असणार आहे असून असून . उगीच कौतुक करायचं झालं; असं वाटेल काहींना. पण या गाण्यातला प्रत्येक पदन्यास अफ़लातून. विशेषत: नृत्य शिकणार्या विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास करावा अशा काही अदा आहेत यात. .राज बब्बर म्हणजे अत्यंत अंडररेटेड अभिनेता. ऎंशीच्या दशकात त्याने जो थोर अभिनय केला तो आता पहायला मिळणं कठीण.आपला राज बब्रू डोळे वटारून उत्तम अभिनय करताना तुम्हाला नेहमी आवडतोच पण यात प्रेमाच्या काही मोहक अदा दाखवल्या आहेत पठ्ठ्याने. की वा रे माझा बब्रू; अशी दादच द्यावी. काय तो सुंदर पोषाख आणि केशरचना , काय त्याचं ते पुलावर त्याच्या स्त्रीची वाट पाहणं, पुलाच्या तारांवर आडवे झोपून प्रेम, नदीकिनारीचे मोहक पदन्यास, आपल्या स्त्रीला पायाने कवेत घ्यायची मोहक कसरत,तिच्या मोकळ्या केसांत त्याने स्वत:ला गुंतवणे, ये हृदयीचे ते हृदयीची ऎक्शन वगैरे वगैरे.... आणि शेवटचं त्याचं ते डोंगरउतारावरून धावत येणं... खल्लास.. शब्द संपले.
जरूर पहा...
पुलबहार रागाच्या प्रेमातच पडाल.
प्रतिक्रिया
=)) जालिंदरबाबा की जय हो.
__/\__
च्या**! =))))))))))))))
गुणी गायकांचं
वाचवा
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग ! डोस्क
मेलो...
=))
नवनवीन रागांची ओळख करून
फर्मास लेख.. >>शब्बीरच्या
आत्ताच व्यनि मध्ये खूप
हहपुवा :)
मौलिक माहिती
अगायायाया!
राज ड्फ्फर हिरवीणला उचलतो आणि
हीहीहीही!
हे प्रतिसाद वाचून आणि फोटु
त्या बिचार्या पुलाची दया
च्ब! पुलकित करणारे गाणे अन
शास्त्रीय संगीत नव्याने
=)) =))
=)) =))