✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ठाणे खादाडी - क्षणचित्रे..

ग
गवि यांनी
Mon, 04/11/2011 - 14:19  ·  लेख
लेख
आमच्या कट्ट्याचा जीव छोटा आहे हे माहीत असल्याने पुरेपूर कोल्हापूरमधे असलेलं चोवीस जणांची व्यवस्था असलेलं छोटंसंच ए.सी. कंपार्टमेंट आम्ही अडवून ठेवलं होतं. मी आणि स्पावड्या साडेसातालाच तिथे पोचलो. स्पावड्यासोबत सुधांशू आणि वपाडाव आलेले होते. नंतर बराच काळ डोक्यांचा काउंट चारवरच स्थिर होता. सगळेजण जमेपर्यंत म्हणजे साडेआठपर्यंत आम्ही चौघे तिथेच खड्या पारश्यासारखे पण गप्प न राहता गप्पा हाणत उभे राहिलो. आम्ही सर्वच जण (स्पावड्या धरुन) एकमेकांना पहिल्यांदाच बघत होतो. मग "ओळखा पाहू" चा मस्त राउंड झाला. आपापल्या टोपणनावांविषयी प्रत्येकाने (खरे काय त्याचा थांग लागू न देता) डीटेलवार सांगितलं. तेवढ्यात मदनबाण तिथे येऊन रुतला. पुन्हा "ओळखा पाहू"चा मजेदार सोहळा आणि "मदनबाण" या नावाची चिरफाड झाली. विश्वनाथ मेहेंदळे असे नाव सांगत एक तरुण हजर होताच आम्ही सर्व अचंबित झालो. मेहेंदळे यायचे बाकी आहेत हे माहीत असल्याने मलमलीचा सदरा लेंगा घातलेले, हातात भाजीची पिशवी असे एखादे नुकतेच रिटायर्ड गृहस्थ पाहण्याच्या तयारीत आम्ही उभे होतो आणि हे काहीतरी वेगळेच. मग लीमाउजेट आली. तिचे नाव "लीमाउजेट" का आहे? याचा पत्ता मात्र अज्जिबात लागला नाही बॉ. त्याच सुमारास मिसळलेला काव्यप्रेमी हजर झाला. मग मात्र आम्ही आपली रिझर्व केलेली जागा हातची जाऊ नये म्हणून हॉटेलात घुसलो. स्थानापन्न होऊन ऊर्दू वाचनपद्धतीने मेन्यूकार्डावर नजर टाकताक्षणीच उजव्या बाजूचे आकडे वाढलेले आहेत हे लक्षात आलं. धाग्यात आम्ही टाकलेलं मेन्यूकार्ड नोव्हेंबर वीसशेदहातलं होतं. त्यानंतर ही वाढ झालेली दिसून गोंधळाने सुरुवात होण्याची प्राचीन परंपरा आपण पार पाडणार हा समाधानकारक विचार माझ्या आणि स्पावड्याच्या मनात आला. पण उपस्थित मिपामित्रगणांनी त्यावरून मनात आलेले स्वल्पगालिप्रदान मनातच ठेवले आणि चेहर्‍यावर येऊ दिले नाही. उदाहरणार्थ हे पहा: सुधांशू, वपाडाव, लीमाउजेट आणि विश्वनाथ मेहेंदळे यांनी मेन्यू पाहूनही चेहर्‍यावर ठेवलेलं हसू.. तदनंतर हात्तेच्या म्हणायची वेळ मजवर आली. कारण स्पावड्या धरुन पाच सहा जण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत असे म्हणू लागले. रे देवा..आधी माहीत असते तर "पुरेपूर कोल्हापूर" ऐवजी कर्व्यांच्या "स्वाद थाळी"तच गेलो असतो की.. असो.. पण व्हेज थाळीचा मेनू पाहून मजसारखे "पोहणारे, धावणारे आणि सरपटणारे जीव पोटात घालण्यास उत्सुक (आभार: शिरीष कणेकर)" सामिषाहारी मेंबर्सही व्हेज खाण्याचा विचार करु लागले. आम्ही तासभर उभ्याने वाट पाहून अखेरीस लाभलेले विजुभाऊ मात्र "रामदासकाका आल्याशिवाय आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श करणार नाही", असं म्हणू लागले. (त्यामुळे बहुधा समोर बसलेल्या मदनबाण आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींनाही काही मागवता येईना.) शेवटी मदनबाणांनी नुसतीच सोलकढी मागवली. आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींची शाकाहारी थाळी समोर येऊन हजर झाली तरी एकट्यानेच कुठे खायचे म्हणून उगीच पापड कुरडया खाऊन त्यांनी भागवाभागवी करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात अखेर रामदासकाका आले.. त्यांच्या सोबत गुलाबी पानांची डायरी होती. (मी फक्त निरिक्षण नोंदवले..). त्यांनी आल्या आल्याच आपण जेवणार नाही असे जाहीर केले. मी आणि मेहेंदळे हे दोघेच मांसाहारी उरलो होतो. त्यामुळे विजुभाऊंना मांसाहाराच्या गळास लावून आपली संख्या वाढवण्यासाठी तातडीने धनगरी मटणताट मागवून आम्ही दोघे त्यांच्यासमोर चापू लागलो. अखेरीस विजुभाऊ आमच्या क्लबात आले. मधेच जयपालही येऊन थोडावेळ गप्पा मारुन गेले. तेवढ्यातच खादाड अमिता स्वहस्ते घरी बनवलेले चॉकलेट मार्बल केक्स घेऊन घटनास्थळी पोहोचली. (एव्हाना ठ्ठोठ्ठो हसण्याच्या आवाजाने आणि एकूण गप्पागोंधळ घालून मिपाकरांनी त्या लहानशा खोलीचे "घटनास्थळ" बनवले होते..) हे केक जेमतेम फोटो काढेपर्यंत टिकून राहिले. नंतर दहावीस सेकंदात रिकामा डबा उरला. केकची चटणी नावाची उत्स्फूर्त पाकृ समस्त उपस्थितांनी बनवली. मग मात्र गप्पा आणि बडबडीने थकलेले सर्वजण गपागप खाण्यात गुंगले. तेवढावेळ एकदम शांतता झाली. रामदासकाका उपास सोडायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर बाजूला बसलेल्या स्पावड्याने त्यांचा नाद सोडून आपली थाळी रिकामी केली आणि हात वाळवत बसला..मागे खादाडताईही उगीच मला जेवायचं नाही म्हणत पोळीभाजी घ्यावी तशी काहीतरी थोडंसं घेऊन बसली. अशा अल्पाहारी मेंबरांना आधी चोवीस तास उपास ठेवण्याची वेगळी सूचना यापुढे सर्व कट्टा करणार्‍यांनी द्यावी अशी विनंती. शेवटी साग्रसंगीत जेवण झाल्यावर आणि बाहेर वेटिंगलिस्ट वाढतेय असं दिसल्यावर अत्यंत नाईलाजाने कट्टेकरी हात धुवून रस्त्यावर आले. मदनबाण "निघतो" म्हणून गायब झाले. अमिताताईलाही निघावे लागले. सर्वसाक्षी, विजुभाऊ आणि रामदासकाकांनी गप्पांना पुन्हा तोंड फोडले. फोटो काढण्यासाठी अनेकदा सर्वांचे कोंडाळे फोडून चेहरे कॅमेर्‍याकडे वळवावे लागत होते, इतका गप्पांना जोर चढला होता. तुमच्या जीवनातले तुमचे प्रियकर / प्रेयसी यांच्या बाबतीत दोन गोष्टी होतात : "एकतर तुमचं त्यांच्याशी लग्न होतं, किंवा ते तुमचे आयडी, पासवर्ड होतात..", इति विजुभाऊ.. वगैरे अशी उपयुक्त वचने ऐकताना धमाल येत होती. कट्टा सार्थकी लागत होता आणि पाय मात्र दुखायला लागले होते. तरीही दर दहा मिनिटांनी कोणीतरी म्हणायचं, "चला.निघूया आता..मजा आली..वगैरे.." आणि तरीही कोणीच तिथून न हलता परत गप्पा पुढे सुरु व्हायच्या. असाच तास सव्वा तास गेला. मग नाईलाजाने एकेक गडी गळायला लागला. स्पावड्या, वपाडाव, सुधांशू वगैरे सांसारिक वेसणीत न अडकलेली मंडळी मध्यरात्र उलटून गेली तरी कट्ट्यात आणि गप्पांत रंगली होती. (त्यांनी नंतर एकट्याने आइस्क्रीम खाल्ले असे ऐकतो.. नोंद घेतली आहे. योग्य वेळी कारवाई करण्यात येईल.) एकूण कट्टा आनंदात पार पडला. खूप मोठा कट्टा नव्हता, अगदी छोटासाच. पण जवळजवळ सर्वच जण एकमेकांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटत होते. रोजच्या नोकरी आणि घर अशा साच्यात अडकून गेलेल्या लाईफमधे नवीन मित्र मिळणं ही किती गरजेची गोष्ट होती हे या कट्ट्यामुळे जाणवलं. कॉलेज संपल्यापासून अशा मनसोक्त गप्पा कोणाशीच कधी झाल्या नव्हत्या. तात्यांची अगदी निघण्याच्या वेळेपर्यंत वाट पाहूनही ते आलेच नाहीत याचं मात्र खूप वाईट वाटलं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
प्रतिसाद
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
37664 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

चाळीस ओळींची प्रतिक्रीय

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/11/2011 - 15:13 नवीन
चाळीस ओळींची प्रतिक्रीय लिहिली आणि मिपा गंडले :( निषेध ! Warning: Table './misavcom_misalsix/sessions' is marked as crashed and should be repaired query: SELECT u.*, s.* FROM users u INNER JOIN sessions s ON u.uid = s.uid WHERE s.sid = 'ae06d2fd19eddad645123ce2babd9544' in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 136 Warning: session_start() [function.session-start]: Cannot send session cache limiter - headers already sent (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 1162 Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 726 Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 727 Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 728 Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 729
  • Log in or register to post comments

अगीन कोल्हा नाही का वापरत

गणपा
Mon, 04/11/2011 - 16:00 नवीन
अगीन कोल्हा नाही का वापरत तु? (त्यात बॅक बटण दाबलं की झालं. हाकानाका :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे सगळं लै मिस करतोय इथे

विजुभाऊ
गुरुवार, 10/24/2013 - 19:28 नवीन
हे सगळं लै मिस करतोय इथे जोहान्सबर्गात. सोबतचे एकतर गुलटे आहेत. नायतर अफ्रीकन. त्याना काय कळणार कट्ट्याची गम्मत. बघु डिसेंबर /जानेवारीत तिकडे येतोय. तेंव्हा कसर काढतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हे

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/11/2011 - 15:14 नवीन
शाकाहारी थाळी समोर येऊन हजर झाली तरी एकट्यानेच कुठे खायचे म्हणून उगीच पापड कुरडया खाऊन त्यांनी भागवाभागवी करायला सुरुवात केली.
हे खरचं फार फार अवघड असते हो... ;)
खादाड अमिता स्वहस्ते घरी बनवलेले चॉकलेट मार्बल केक्स घेऊन घटनास्थळी पोहोचली.
या बद्दल योग्य ठिकाणी तक्रार नोंदवल्या गेली आहे. मज्जा आली.... पहिलाच कट्टा वेन्जॉय केल्या गेलेला आहे. हा योग जुळवुन आणल्याबद्दल गवि आणि स्पा यांचे मनापासून आभार!! त्यांच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत हीच इ. प्रा.!!
  • Log in or register to post comments

मस्त वृत्तांत गवि

प्रीत-मोहर
Mon, 04/11/2011 - 15:15 नवीन
मस्त वृत्तांत गवि :)
  • Log in or register to post comments

असेच

यशोधरा
Mon, 04/11/2011 - 15:18 नवीन
म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

फोटो आणि सचित्र वर्णन

५० फक्त
Mon, 04/11/2011 - 15:16 नवीन
फोटो आणि सचित्र वर्णन दोन्हीही एकदम मस्तच. विशेषत: स्पा आणि गविंचे या कट्ट्याला पुढाकार घेतल्याबद्दल आभार. आपले असेच कट्टे भविष्यात वारंवार होत राहोत ही सदिच्छा. कार्यालयीन कामांमुळे कट्ट्याला येउ शकलो नाही आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायची संधी निसटुन गेली. असो, पुन्हा जेंव्हा योग येईल तेंव्हा भेटुच.
  • Log in or register to post comments

वा वा... मस्त.. मिपाकरांचे

मराठमोळा
Mon, 04/11/2011 - 15:19 नवीन
वा वा... मस्त.. मिपाकरांचे असे कट्टे वारंवार होत रहावेत आणि आंतरजालीय मराठी परिवार असाच फुलत रहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना!!! पुढच्या कट्ट्याला नक्की हजेरी लावू. :)
  • Log in or register to post comments

शेम टु शेम असच बोल्तो.

गणपा
Mon, 04/11/2011 - 16:01 नवीन
शेम टु शेम असच बोल्तो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

+१

कुंदन
Mon, 04/11/2011 - 16:07 नवीन
पुढच्या कट्ट्याला नक्की हजेरी लावू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

सेम टू सेम बोल्तो....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/11/2011 - 17:48 नवीन
वा वा... मस्त.. मिपाकरांचे असे कट्टे वारंवार होत रहावेत आणि आंतरजालीय मराठी परिवार असाच फुलत रहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना!!! पुढच्या कट्ट्याला नक्की हजेरी लावू. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

+४

नंदन
Tue, 04/12/2011 - 05:00 नवीन
वा वा... मस्त.. मिपाकरांचे असे कट्टे वारंवार होत रहावेत आणि आंतरजालीय मराठी परिवार असाच फुलत रहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना!!! पुढच्या कट्ट्याला नक्की हजेरी लावू.
सहमत आहे! झकास वृत्तांत, गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

अतिशय छान वाटले वाचुन ...

गणेशा
Mon, 04/11/2011 - 15:25 नवीन
अतिशय छान वाटले वाचुन ... फोटो पण मस्त ... असेच भेटत रहा .. कधी तरी त्या कट्ट्यामध्ये आम्ही पण सामिल असु ..
  • Log in or register to post comments

म्हणजे

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/11/2011 - 15:27 नवीन
म्हणजे कांदेपोह्यांचे कार्यक्रम संपल्यावर का?? ह. घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

कट्टा झक्कास जमला ह!

पियुशा
Mon, 04/11/2011 - 15:26 नवीन
कट्टा झक्कास जमला ह! :)
  • Log in or register to post comments

का रे छळतोस

आचारी
Mon, 04/11/2011 - 15:27 नवीन
का रे छळतोस असा....................काय ति ताट ...छायाचित्रे नुसता जळफळाट केलास रे ...........जिव नुसता कासाविस झालाय
  • Log in or register to post comments

क्या बात है..

विशाखा राऊत
Mon, 04/11/2011 - 15:31 नवीन
कट्टाचे वर्णन वाचुन आणि फोटो बघुन खुपच मस्त वाटले.. एकदम फक्कड लिहिले आहे.. सगळ्यां फोटो सारखे.. :)
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

sneharani
Tue, 04/12/2011 - 10:40 नवीन
कट्ट्याचं वर्णन अन फोटो झकास!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

अरे वा ? : मस्त च स्पा

टारझन
Mon, 04/11/2011 - 15:40 नवीन
अरे वा ? : मस्त च :) स्पा काका तर गरिबांचे मोहन आगाशे आहेत :) मोठी प्रतिक्रीया टाकुन सेंड करताना एरर आल्याने एवढंच :)
  • Log in or register to post comments

अगदी !

वाहीदा
Mon, 04/11/2011 - 16:01 नवीन
मी ही हेच म्हणणार होते पण गरिबांचे नाही (चक्क टार्‍याशी सहमत ;-) ) स्पा, तु अगदी मोहन गोखले दिसतोस रे बाकी कट्टा मिस केला याचे दु:ख आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टारु तुम्हाला मोहन गोखले

स्पा
Mon, 04/11/2011 - 15:55 नवीन
टारु तुम्हाला मोहन गोखले म्हणायचय का ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टारुने मोहन आगाशे म्हटल्यावर

गणपा
Mon, 04/11/2011 - 16:05 नवीन
टारुने मोहन आगाशे म्हटल्यावर फोटु २ वेळा निरखुन पाहिला. वाहिदाने त्याला अनुमोदन दिल्यावर अजुन ४ वेळा निरखुन पाहिला. =)) मोहन गोखलेच म्हणायचं असाव त्यांना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

असच म्हणतो :)

आत्मशून्य
Mon, 04/11/2011 - 16:31 नवीन
पण मग थोडा वीचार केला आणी लक्षात आलं ही प्रतीक्रीया जूणे जाणत्या अशा प्रस्थापीत लेखक महाशयांनी दीलेली आहे म्हणजे कदाचीत आपण नाहीका लहानपणी "यमूनाबाइ आगाशे" चीडवायचो ? मग "मोहण अगाशे" पण त्या संदर्भात लेहले असावेत असा साँषय मणात आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

यमूनाबाइ आगाशे हाहाहा.

मृत्युन्जय
Mon, 04/11/2011 - 16:35 नवीन
यमूनाबाइ आगाशे हाहाहा. बर्‍याच दिवसांनी हा शब्द ऐकला. विस्मृतीत गेल्यासारखा झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

हसून हसून मरते आता

वाहीदा
Mon, 04/11/2011 - 16:46 नवीन
यमूनाबाइ आगाशे हा हा हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१११११११११११११

बॅटमॅन
गुरुवार, 10/24/2013 - 20:11 नवीन
यमूनाबाइ आगाशे
ठ्ठो!!!! लै दिवसांनी ऐकला आणि हहपुवा झाली पुनरेकवार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

झ का स !!

सुहास..
Mon, 04/11/2011 - 15:44 नवीन
झ का स !!
  • Log in or register to post comments

छान योग जमवून आणला !!

दीविरा
Mon, 04/11/2011 - 15:45 नवीन
अतिशय छान वाटले वाचुन .. फोटो पण मस्त :)
  • Log in or register to post comments

कट्टा एकदम झकास झाला रामदास

स्पा
Mon, 04/11/2011 - 15:51 नवीन
कट्टा एकदम झकास झाला रामदास काका , विजुभाऊ आणि सर्वसाक्षी आवर्जून उशिरा आले तरी आले त्याबद्दल त्यांचे आभार ;) गाविंनी आल्या आल्या गेम केला " त्यांचा डायलॉग (मला उद्देशून- स्पा मी विचार केलेला त्यापेक्षा तू खूप बारीक आहेस, आणि तू विचार केला असशील त्या पेक्षा मी खूप जाड आहे ) सगळे मजबूत हसत होते बाकी, जेवण तर सुसाटच . धनगरी मटण बघून तर , इनो ची कमतरता जाणवत होती खादाड अमिताने जो केक करून आणलेला ... अहाहा अफाटच होता मदन बाण ने मिपाच्या सुरुवातीच्या काळातले डू आय डी आणि एक्सेल शिट चे तुफान किस्से सांगितले वपा डाव हा नवीन असून सुद्धा पुण्याहून आला होता, त्याचे सुद्धा विशेष आभार विश्वनाथ मेहेंदळे हे सरप्रीझ प्याकेज होत ;) रामदास काकांनी सुद्धा आल्या आल्या धमाल करायला सुरुवात केली विजुभौंनी बरेच किस्से सांगितले, त्याचं मराठी साहित्याच ज्ञान खरच अफाट आहे प्रत्येक लेखकाची लिहिण्याची पद्धत त्यांनी मस्तच उलगडून सांगितली शेवटी सगळ्यांना टाटा बाय बाय केल्यावर आम्ही चालत चालत ठाण्याला आलो मी विमे सूड आणि वपा रात्री ठाणा स्टेशन वर टीपी करत बसलो त्यात परत एक दीड तास गेला एकूण काय अपेक्षेपेक्षा कट्टा जबर्या रंगला
  • Log in or register to post comments

मदन बाण ने मिपाच्या सुरुवातीच्या काळातले डू आय डी आणि एक्सेल शिट

कुंदन
Mon, 04/11/2011 - 16:09 नवीन
>>मदन बाण ने मिपाच्या सुरुवातीच्या काळातले डू आय डी आणि एक्सेल शिट चे तुफान किस्से सांगितले यु टुबच्या लिंका नाही दाखवल्या का? कमाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

स्पावड्या

अन्या दातार
Mon, 04/11/2011 - 16:13 नवीन
गविंचे कट्टानिरुपण आणी त्याला स्पावड्याची चुरचुरीत फोडणी! अप्रतिम कॉम्बिनेशन! पुढच्या कट्ट्याला यायलाच हवे असे वाटत आहे....... (स्पावड्या, गवि: कळवतो मी कधी येत आहे ते. त्याप्रमाणे आपण प्लॅन करुयात!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ज्जेबात. कट्टा जोरात झालेला

मृत्युन्जय
Mon, 04/11/2011 - 15:56 नवीन
ज्जेबात. कट्टा जोरात झालेला दिसतो आहे. अवांतरः स्पाने तिन्ही पोळ्या खाल्ल्या का?
  • Log in or register to post comments

हे छान झालं....

प्रास
Mon, 04/11/2011 - 15:55 नवीन
पहिला कट्टा पार पडला. चांगला पार पडलेला पहिला कट्टा ही पुढल्या कट्ट्यांची नांदी असतेय. स्पा आणि गवि चांगले आयोजन आणि गवि, उत्तम वृत्तांत! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!! या वेळी काही जमलं नाही पण पुढल्यावेळी हजर राहण्याचा नक्की प्रयत्न होईल.
रे देवा..आधी माहीत असते तर "पुरेपूर कोल्हापूर" ऐवजी कर्व्यांच्या "स्वाद थाळी"तच गेलो असतो की..
हेच मी देखिल म्हणालो असतो...... वैष्णवनिरामिषभोजनाभिलाषि -
  • Log in or register to post comments

चला हा धागा म्हणजेच कट्टा..

डावखुरा
Mon, 04/11/2011 - 16:04 नवीन
चला हा धागा म्हणजेच कट्टा.. हा अतिशय महत्वाचा असा आंतर्जालीय दस्तेइवज आहे की अशा काही व्यक्ती डुप्लिकेट आयडी नसुन त्या खरंच अस्तित्वात आहेत.... कधीतरी मी पण प्रयत्न करेल कट्ट्यात हजेरी लावायचा...
  • Log in or register to post comments

नक्की

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/11/2011 - 16:08 नवीन
काही व्यक्ती डुप्लिकेट आयडी नसुन त्या खरंच अस्तित्वात आहेत.
नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

ठाणे खादाडी कट्टा दणक्यात

प्रचेतस
Mon, 04/11/2011 - 16:23 नवीन
ठाणे खादाडी कट्टा दणक्यात साजरा झाल्याचे पाहून आनंद जाहला. आयडींमागच्या व्यक्ती पाहण्यास मिळाल्या. शाकाहारी ताट पाहून तर अगदी तोंडास पाणी सुटले. गविंचा वृत्तांत सुरेखच.
  • Log in or register to post comments

वरून चौथ्या फोटोत

मी ऋचा
Mon, 04/11/2011 - 16:26 नवीन
वरून चौथ्या फोटोत कोपर्‍यातल्या खुर्चीत बसलेला स्मार्ट प्राणी स्पा आहे का? (मोहन आगशे आणि मोहन गोखले या गोंधळात अडकलेली)
  • Log in or register to post comments

वरून चौथ्या फोटोत

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/11/2011 - 16:28 नवीन
वरून चौथ्या फोटोत कोपर्‍यातल्या खुर्चीत बसलेला स्मार्ट प्राणी स्पा आहे का?
तुम्हाला सपाट म्हणायचे आहे का? पसरट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

ए नाही रे मला स्मार्टच

मी ऋचा
Mon, 04/11/2011 - 16:43 नवीन
ए नाही रे मला स्मार्टच म्हणायचे आहे! खालच्या प्रतिसादांवरून लक्षात आलय कोण आहे तो ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अंदाज

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/11/2011 - 16:28 नवीन
अंदाज साफ चुकलेल्या आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

मिका..

गवि
Mon, 04/11/2011 - 16:30 नवीन
क्यों बेटा? मन में लड्डू फूटा? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

नाही नाही

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/11/2011 - 16:36 नवीन
नाही नाही.... सपाट म्हटल्यावर काय लड्डु फुटणार?? भरलं वांगच फुटले की वो :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

"सपाट" परा म्हणाला मी नाही

मी ऋचा
Mon, 04/11/2011 - 17:23 नवीन
"सपाट" परा म्हणाला मी नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

चला

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/11/2011 - 17:27 नवीन
आता जरा हुरुप आला मला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

लव्हलेटर लव्हलेटर

सूड
Tue, 04/12/2011 - 07:53 नवीन
अहो म्हणा की मग, लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर असतं, कुणासाठी सपाट कुणासाठी बेटर असतं, कुणासाठी शालजोडीत ठेऊन मारलेलं खेटर असतं लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर असतं !! जाता जाता: इतिहासाची कधीकधी पुनरावृत्ती होते म्हणतात, त्याची इथे शक्यता नाकारता येत नाहि. तसं कुणीही कसंही वागावं, मी फक्त निरीक्षण नोंदवलं. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

अस्स...

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 04/12/2011 - 09:56 नवीन
अस्स.... नोंद घेतल्या गेली आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओ लव्हलेटरवाले! जरा दमानं

मी ऋचा
Tue, 04/12/2011 - 10:45 नवीन
ओ लव्हलेटरवाले! जरा दमानं घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>जरा दमानं घ्या! जाऊ द्या

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 04/12/2011 - 11:07 नवीन
>>जरा दमानं घ्या! जाऊ द्या हो!! त्याला दम लागणार आहे आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

"सपाट" परा म्हणाला मी

स्पा
Mon, 04/11/2011 - 17:28 नवीन
"सपाट" परा म्हणाला मी नाही मिका होप्स आहेत रे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

"सपाट" परा म्हणाला मी नाही ऑ

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/11/2011 - 18:04 नवीन
"सपाट" परा म्हणाला मी नाही
ऑ ऑ ऑ ?? मी कधी म्हणालो ? मी तुम्हाला 'सपाट' म्हणायचे आहे का असे विचारले फक्त. निरागस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा