दिवाळी अंक २०१८

जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are

मीअपर्णा's picture
मीअपर्णा in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are

"यंदाचं आपल्या स्कूल डिस्ट्रिक्टचं OBOB बहुतेक रद्द होईल..." जेनी, माझ्या मुलाच्या मित्राची आई शाळांना सुट्ट्या लागताना भेटली तेव्हा सांगत होती. "तुला त्या वादग्रस्त पुस्तकाबद्दल माहीत असेलच." "नाही अजून" मी पुटपुटले. हे एक मॉरमॉन कुटुंब असल्याने काय वादग्रस्त असू शकेल याचा मला साधारण अंदाज आलाच.

डियर ममा..

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

डियर ममा..

डियर ममा,

आज बर्‍याच दिवसांनी मी तुला हे पत्र लिहीत आहे. जरासं खुट्ट वाजलं की फोन करणार्‍या आपल्या लेकीकडून चक्क पत्र आलंय, हे पाहून तुझ्या वर जाणार्‍या भुवया आताच मला दिसल्या आणि त्यांच्या खालच्या डोळ्यांत एक काळजीची लहरसुद्धा तरळताना दिसली मला! आहेच मुळी माझी मम्मी अशी... कशी? ते नाही नक्की सांगता येणार, पण नक्कीच 'वर्ल्ड्स बेस्ट'! ही ही ही!

गुळपापडीच्या वड्या

पद्मावति's picture
पद्मावति in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

गुळपापडीच्या वड्या

नमस्कार मिपाकर मंडळी,
बघता बघता दिवाळी आलीसुद्धा! घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळत असेल ना! गोड-तिखट फराळाच्या यादीत मी आज आणखी एका गोडाची भर टाकतेय. म्हटली तर सोपी, म्हटली तर कठीण अशी एक पाककृती आपण बघणार आहोत. सोपी यासाठी की घरात हमखास असलेल्या पदार्थांमधून ही पाककृती बनवता येते. कठीण यासाठी की ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.