वलय - प्रकरण ३४ ते ५२ (समाप्त)
प्रकरण २९ ते ३३ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42181
प्रकरण 34
शेवटी राजेश मोहिनीला सोबत स्वतःच्या गाडीत घेऊन निघाला. ती अर्धवट धुंदीत राजेशच्या बाजूला बसली होती. मोहिनीने "यंग गर्ल" हा परफ्यूम लावला होता. त्याचा सुवास अगदी छान, मस्त आणि मादक होता. अगदी फक्त लेडीजला शोभेल असा!
थोडी कमी शुद्धीत असल्याने ती त्याला जास्त चिकटून बसली होती आणि त्यामुळे तिच्या शरीराचा गंध राजेशच्या शरिराला हळूहळू लागत होता. घरी जायला आधीच उशीर झाला होता त्यात अजून आता मोहिनीला सोडून आल्यानंतर आणखी वेळ होणार होता.