'अग तारा गाव झोपलाय सारा'

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
31 Oct 2009 - 9:11 am

'अग तारा गाव झोपलाय सारा'

हे गीत श्री. प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात गायलेले आहे.
गीतकार आपल्या ताराला 'आता रात्रीचे बारा वाजलेत व सारा गाव झोपलाय' असे सुचवतो.

हे गाणे ऐकून काही मंडळी आपली नाके मुरडतील पण जनसामान्यांना असलीच गाणी आवडतात व जनसामान्यांचीच संख्या जास्त आहे. दुर्बोध, र ला र ट ला ट टाईप कवितांपेक्षा त्यांना असलीच डोक्याला ताप न देणारी गाणी आवडतात. आपल्यापैकी कुणाला अशी आवड असेल व हे गीत त्यांच्या संग्रही असेल तर ते आपण येथे द्यावे जेणेकरून 'सर्वसामान्यांच्या' गाण्याच्या खजीन्यात एक भर पडेल.

तसेच या गीताचे गीतकार कोण आहेत ते पण येथे समजले व आपल्या गीताबाबत मिपावर चर्चा चालू आहे हे त्या गीतकाराला समजले तर त्या गीतकारास आनंद होईल.

प्रेमकाव्यमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

shweta's picture

31 Oct 2009 - 10:30 am | shweta

हे गाणं खरच फार सुन्दर आहे.
मला तर वाटतं कुठल्या तरी शास्त्रीय रागात पण आहे. ताल आणि सुर अगदि बरोबर जमलेत. सा पासुन नी पर्यंत सगळे सुर अगदि बरोबर लागले आहेत.
क्या कहने !

बाकरवडी's picture

31 Oct 2009 - 4:36 pm | बाकरवडी

एकदा जोरदार टाळ्या होउन जाउद्यात.....
=D> =D> =D> =D> =D> =D>

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

विनायक प्रभू's picture

31 Oct 2009 - 4:38 pm | विनायक प्रभू

तुमचे म्हणणे दगड्फोडे राव

परिकथेतील राजकुमार's picture

31 Oct 2009 - 5:24 pm | परिकथेतील राजकुमार

खीक खीक गुर्जी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

गणपा's picture

31 Oct 2009 - 5:02 pm | गणपा

खरय रे पाषाणभेदा, मलाही प्रल्हाद शिंद्यांची बरीच गाणी आवडतात.
माझ्या संग्रही त्यांची खालील गाणी आहे.(कुणाला हवी आसल्यास व्यनी करा.)

बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीतो माथा..
नाम तुझे घेता देवा होई समाधान...
दर्शन दे रे, दे रे भगवंता...
जैसे ज्याचे कर्म तैसे...
आता तरी देवा मला पावशील का...
करुया उदो उदो अंबाबाईचा...
चल ग सखे चल ग सखे पंढरीला...
ऐक सत्यनारायणाची कथा...
पाउले चालती पंढरीची वाट....
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत...
चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी तो पहा वीटे वरी...
देवा श्री गजानाना किती वर्णावे गुणा...
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान...
जणु देहही पंढरी आत्मा पांडुरंग...

आपण सांगत आसलेले गाणं नाही ऐकल कधी.

पिवळा डांबिस's picture

1 Nov 2009 - 8:04 am | पिवळा डांबिस

मलाही प्रल्हाद शिंदे यांची गाणी आवडतात.....
साधी, सोपी आणि मनाला साद घालतात....

दर्शन दे रे, दे रे भगवंता....
क्लासच!!!!

पाषाणभेद's picture

1 Nov 2009 - 12:36 pm | पाषाणभेद

थंडीचा महीना झोपच येईना...
थंडीचा महीना झोपच येईना
झोंबतोय अंगाला वारा....वारा...
अग तारा...
गाव झोपलाय सारा
वाजलेत बारा

असले ते गीत आहे. दणदणीत ट्र्याक आहे त्याचा.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

यन्ना _रास्कला's picture

2 Nov 2009 - 3:46 pm | यन्ना _रास्कला

ह्ये माहाराश्ट्र गीत त्याचंच ना.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

पाषाणभेद's picture

2 Nov 2009 - 7:58 pm | पाषाणभेद

न्हाई दाजीबा, त्ये तर आनंद शिंद्यांचं हाये.
लई उठलं बगा ह्ये गानं, तुमी तर त्ये म्हाराष्ट्र्गीतच करुं टाक्ल त्याचं.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

यन्ना _रास्कला's picture

2 Nov 2009 - 8:34 pm | यन्ना _रास्कला

तुमी तर त्ये म्हाराष्ट्र्गीतच करुं टाक्ल त्याचं.

ह्ये मराठी गीत आस लिव्हाय्च होत.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

चित्रा's picture

3 Nov 2009 - 3:52 am | चित्रा

लहानपणी लाऊडस्पीकरवर गाणी लागली तरी आवडत असत ती हीच बरीचशी गाणी होती. ती एरवी रेडिओवर लागलेली नाही ऐकलेली..

"चल ग सखे चल ग सखे पंढरीला...जय हरि विठ्ठल"
आवडायचे!
ही गाणी कुठच्या संग्रहात आहेत? ती तेव्हा सतत लागायची म्हटल्यावर मुद्दाम विकत घेतली नव्हती. आता ही गाणी आठवली की चुटपूट लागून राहते ती जवळ नसल्यामुळे.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Nov 2009 - 6:17 pm | बिपिन कार्यकर्ते

तुम्ही विचारताय ती लावणी माहित नाही. पण बाराची अजून एक लावणी. लै आवडणारी..

बिपिन कार्यकर्ते

पाषाणभेद's picture

1 Nov 2009 - 9:55 pm | पाषाणभेद

आवो आमदार, येवू द्याना आनखी लावन्या. लई भारी हायेती त्या.
बाकी म्या त्ये गान बी शोधू र्‍ह्यायलोय. गावलं तर टाकतोच, पन कमीतकमी शब्द तर गावतीलच.

तरी पन कुनाकडं एम्पी ३ मधी आसल तर टाका आन ऐकवा समद्यास्नी.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

sujay's picture

2 Nov 2009 - 12:34 am | sujay

पासानभेदवा , ई लो तोहार गाना-

http://www.dhingana.com/play/aag-tara-gaon-zoplay-sara-songs-aag-tara-ga...

सुजय

मला खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?

shweta's picture

2 Nov 2009 - 2:43 am | shweta

राग कुठला आहे हा ?
मध्य रात्री चा राग असावा.
शुर आम्हि सरदार ह्याच रागात आहे का कुठल्या दुसरया?
जाणकारांनी कृपया समजावुन सांगावे.

यन्ना _रास्कला's picture

2 Nov 2009 - 3:50 pm | यन्ना _रास्कला

राग कुठला आहे हा ?

खुल्ला विचारु नका. ज्याना शास्त्रिय सन्गितात्ल कळ्त नाय त्याना मिस्ळ्पावावरन गुप्चुप काढुन टाक्तात आस अय्कुन आहे. खर काय ते माहित नाय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

पाषाणभेद's picture

2 Nov 2009 - 8:04 pm | पाषाणभेद

स्वेताजी आपन ह्या गान्याची चेश्टा करूं र्‍ह्यायल्यात आशे वाटू लागले हाये.

आओ ह्ये गानं जर का आपल्या दादा कोंडक्यांच्या पिच्चरमंदी आसतं ना तर लई उठलं आसतं.

तुमी सुजय नी वर दिल्येली लिंकमधलं गानं ऐकलं न्हाई का? ऐका जरा. तुमचं मन सदगदीत व्हईल त्ये गानं ऐकून.

आवो, तारा रातीचे बारा वाजाया आल्ये तरी बी त्याच्या जवळ न्हाई. त्याला लई काळजी वाटती. तवा तो तीला बोलवतू आन तीला लई कायकाय सांगतो. त्याची व्याकूळता या गान्यात दावलेल्यी हाये.

आगदी 'वर ढगाला लागली कळं' सारखं गानं हाये ह्ये.

लई भारी गान हाय. लई दनक्यात वाजतं त्ये. तुमी आईकलं तर लगेच ठेका धरूं नाचू लागाल पगा.

ह्ये गानं आईका आन त्याचं ईश्लेशन करून टाका. पिएच्डी च्या लायक हाय ह्ये गानं.
-------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

पाषाणभेद's picture

2 Nov 2009 - 2:50 pm | पाषाणभेद

जैसन आपकी मरजी मालीक. गाने के बोल मिलत रही तो हमार ढूंढनेकी तकलीफ बच जाती मालीक.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

Nile's picture

3 Nov 2009 - 5:57 am | Nile

वरील लिंक वरुन गाणं ऐकायचा प्रयत्न केला, अत्यंत भिकार गाण आहे असं माझ मत झालं आहे. बाकी तुमचे बारा वाजुद्यात.

-एक घाव दोन तुकडे.

पाषाणभेद's picture

3 Nov 2009 - 6:32 am | पाषाणभेद

>>> "वरील लिंक वरुन गाणं ऐकायचा प्रयत्न केला, अत्यंत भिकार गाण आहे असं माझ मत झालं आहे. बाकी तुमचे बारा वाजुद्यात. "

तेच तर वर म्हटलेय मी. तेच परत लिहीतो.

"हे गाणे ऐकून काही मंडळी आपली नाके मुरडतील पण जनसामान्यांना असलीच गाणी आवडतात व जनसामान्यांचीच संख्या जास्त आहे. दुर्बोध, र ला र ट ला ट टाईप कवितांपेक्षा त्यांना असलीच डोक्याला ताप न देणारी गाणी आवडतात. आपल्यापैकी कुणाला अशी आवड असेल व हे गीत त्यांच्या संग्रही असेल तर ते आपण येथे द्यावे जेणेकरून 'सर्वसामान्यांच्या' गाण्याच्या खजीन्यात एक भर पडेल."

असामान्यांना दुर्बोध, अर्थ न लागणार्‍याच कविता आवडतात हे सत्य आहे हे समजले. बाकी गाणे ऐकता ऐकता आमचे बारा वाजले तरी हरकत नाही.

>>>"वरील लिंक वरुन गाणं ऐकायचा प्रयत्न केला"
तुम्ही प्रयत्न करत रहा. ज्याला समजायचे त्याला समजेल.

बाकी तुम्ही तुमच्याविषयी येथे लिहीलेले खरंच आहे. याची सत्यता पटली. त्यामुळेच तुम्हाला हे गाणे भिकार वाटलेले आहे.
--------------------
पाषाणभेद
तुकड्यातूकड्यांमधला सुद्धा आनंद घेणारा