बुधवारची कविता: (आभाळ)

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
29 Oct 2009 - 11:42 am

आमची प्रेरणा

संस्थळ सुप्रसिद्ध,
ना वैचारिक हव्यास,
दोन बायांच हास्य,
आणि शत्रू मात्र फार

हाणामार्‍या भरपूर,
लोकशाहीचा मात्र भास,
ना अपेक्षा सभ्यपणाची,
बोर्डावर चपलांची रास

इकडून हाकलून सोडून पुन्हा
जुन्याच आयडीचा फार्स
ही एवढीच मांडवली दगडू, आंडू,राव
पुरेशी आहे परतायला

रचना: २९/१०/२००९

रौद्ररसकविताविडंबन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2009 - 11:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचीही थोडी ठिगळ-भर रे!

नवी बाटली जुनी वारूणी
अनेकांचा हाच इतिहास
संशयकल्लोळ 'तिथे'
एक प्रतिसाद ठरे निमित्तास

अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2009 - 11:53 am | llपुण्याचे पेशवेll

+१ अगदी सहमत.

रणधुमाळी जिथे'तिथे'ही
आत्मे जुनेच नव्या जन्मास
तुंबळ युद्ध असे अक्षय
जुनीच कवळी नव्या तोंडास
पुण्याचे पेशवे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2009 - 12:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तिरकी चाल प्रतिसादांची
का याद देई खेकड्यांची
कुठे शेखे कुठे विचारवंत
कंपूला फक्त एवढीच खंत!

अदिती

चेतन's picture

29 Oct 2009 - 12:56 pm | चेतन

पडे विडंबन, आज नवा बुधवार
पेशव्यांच्या वहाणा करकरतात फार
विडंबनामधुन करी अलगद शिकार
कंपुबाज प्रतिसादांची लागते धार

रचना: २९/१०/२००९ , १२:५६

टारझन's picture

29 Oct 2009 - 11:52 am | टारझन

टाळ्या





श्रावण मोडक's picture

29 Oct 2009 - 12:04 pm | श्रावण मोडक

=D>

अवलिया's picture

29 Oct 2009 - 12:23 pm | अवलिया

=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

नेहमी आनंदी's picture

29 Oct 2009 - 12:31 pm | नेहमी आनंदी

:O

Nile's picture

29 Oct 2009 - 12:37 pm | Nile

क्या बात है! वास्तववादी काव्य! जिओ!

-जिओ हा शब्द किबोर्ड काय हे माहीती व्ह्यायच्या आधी शिकलेला.

धमाल मुलगा's picture

29 Oct 2009 - 12:55 pm | धमाल मुलगा

व्वा पेशवे व्वा!
काय कडकडीत कविता आहे.
ते नेहमीचंच ऊन-पाऊस, पानं-फुलं, ती-मी, प्रेम-वेदना असल्या फुलपाखरी गाभुळ रचनांपलिकडल्या आपल्या प्रतिभाभरारीस आमची ही छोटीशी मानवंदना!

आपल्या रचनेतील वास्तवतेच्या दाहक आशयबीजाचे विदारक कोंब मन हेलावुन गेले.

पुढिल बुधवारसाठी...अर्रर्र बुधवारच्या कवितांसाठी शुभेच्छा .

-(गुढरम्यात रममाण गुरुवारचा) ध.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2009 - 1:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कडकडीत कविता
फडफडीत मासा
बुधवारच्या हँगओव्हरचा
मानच खासा
****************
ऊन-पाऊस, पानं-फुलं, ती-मी,
गाभुळलेल्या रचना आणिक काही
विदीर्ण कोंबासहित आशयरहीत रचना
धमु'बाळ' देई पेशव्यांस मानवंदना

अदिती

ता.क. अर्र, स चा र झालाय, 'आशयसहीत'मधे!

नंदन's picture

29 Oct 2009 - 1:00 pm | नंदन

जिथे मंगळवार संपतो तिथे पुपेंचा काव्यफुफाटा सुरू होतो :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

29 Oct 2009 - 6:05 pm | सहज

>जिथे मंगळवार संपतो तिथे पुपेंचा काव्यफुफाटा सुरू होतो

अगदी अगदी!

लै भारी पुपे!!!

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2009 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

बुधवार म्हणले की आमचा आनंद गगनात मावेनासा होतो. (आम्ही दिवसाविषयी बोलत असुन पेठेविषयी बोलत नाही आहोत, गैरसंबंध नसावा)

पुपे आपल्या कविता वाचुन मानसी हर्ष होतो. आपल्या काव्यफुफाट्याने आमचा यौवनफुफाटा फोफावतो.

ह्या टोकाच्या हळव्या नाहीतर त्या टोकाच्या रक्तपाती कवितांमध्ये आपल्याच कवितांचा तो काय आधार आहे वाटते.

पुपेंचा पुंखा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2009 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुपे कविता थोडी समजली असे वाटते. कारण कवीच्या मनात असलेला अर्थ वाचकांना समजेल असे काही नसते, असे कुठेतरी वाचले.
जुन्याच आयडीचा फार्स
ही एवढीच मांडवली.....
पुरेशी आहे परतायला

या ओळी मात्र मनाला भिडल्या...! :)

-दिलीप बिरुटे

गणपा's picture

29 Oct 2009 - 1:19 pm | गणपा

वास्तववादी कविता आवडली :)

मदनबाण's picture

29 Oct 2009 - 1:22 pm | मदनबाण

छान कविता ... ;)

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

मी पाहिलेल्यासाठी
शब्द शोधतोय
त्यांना न पाहिलेल्यासाठी
शब्द दिसतात

किती जागा
शब्दांसाठी?
किती पाहण्यासाठी?

ठरवले की संपले
शब्द मात्र उरतात

रिकामे.

निमीत्त मात्र's picture

29 Oct 2009 - 8:36 pm | निमीत्त मात्र

चतुर्भूज-तृतीयपंथी-द्वयर्थ-एकांड्या नवोळी

हेहेहेहे..जबराच टाकलात की.
पण नवोळी की निळाई? निलाई?

अक्षय पुर्णपात्रे's picture

29 Oct 2009 - 8:40 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मात्र, नवोन्मादशाली नवोळी. चुकीचे कपडे निळीत धुवू नका आणि दगड्या म्हणजे धोंड्या.

निमीत्त मात्र's picture

29 Oct 2009 - 8:42 pm | निमीत्त मात्र

आले लक्षात!! लेझिम पथकही येते आहे म्हणजे...

चतुरंग's picture

29 Oct 2009 - 8:00 pm | चतुरंग

शरदिनीतैंच्या आगीतून पुपेंच्या फुफाट्यात! :D

()चतुरंग

निमीत्त मात्र's picture

29 Oct 2009 - 8:29 pm | निमीत्त मात्र

पुपे, संकेतस्थळावर बुधवार गाजवायचे प्रताधिकार तुमच्याकडे नसले तरी एकंदरीत चांगले चालू आहे ;)

इकडून हाकलून सोडून पुन्हा
जुन्याच आयडीचा फार्स
ही एवढीच मांडवली दगडू, आंडू,राव
पुरेशी आहे परतायला

दगडू कोण? दुधवाला का?
आंडू आणि राव समजले :)