एक रात्र..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
22 Sep 2007 - 10:19 pm

मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे.

एक धुंद रात्र सख्या
मी होते बावरी
सय तुझी ही दाटलेली
या माझ्या अंतरी

मूक भावनांचा खेळ
किती खेळावा परी
काळजातली हुरहूर तुझ्या
दाटली माझिया उरी

आतुरलेले क्षण सारे
साद घालिती तुझे नेत्र
प्रणयातूर जाहले मी
सर्वत्र तुझेच गात्र

धुंद जाहले गीत माझे
चुंबुन घे तू अधरी
एक रात्र सख्या आपुली
घे लपेटून तनूवरी...

- प्राजु.

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Sep 2007 - 12:01 am | विसोबा खेचर

मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे.

मनोगतासारख्या बलाढ्य संकेतस्थळावर ही कविता आधी प्रकाशित झाली असूनदेखील आपल्याला ती इथे प्रकाशित कराविशी वाटली ही आनंदाचीच गोष्ट आहे. कधितरी आपलं एखादं साहित्य आमच्या मिसळपाववर देखील प्रथम प्रकाशित करा हीच विनंती! अन्यथा, मनोगतावर प्रकाशित केलेलं साहित्य इथे प्रकाशित करत राहण्यास काहीच हरकत नाही. मिसळपावचा तोही सन्मानच असेल!

धुंद जाहले गीत माझे
चुंबुन घे तू अधरी
एक रात्र सख्या आपुली
घे लपेटून तनूवरी...

कविता छान आहे हो. पुढील लेखनाकरता अनेकोत्तम शुभेच्छा! :)

तात्या.

प्राजु's picture

23 Sep 2007 - 2:13 am | प्राजु

धन्यवाद तात्या..
पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज.
- प्राजु.

विसोबा खेचर's picture

23 Sep 2007 - 7:09 am | विसोबा खेचर

पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज.

हो नक्की करतो, पण सध्या जरा रौशनीत अडकलो आहे. ती पूर्ण करतो मग शिंत्रेगुरुजींकडे पाहू..:)

अहो प्राजु काय सांगू तुम्हाला आता? फक्त शिंत्रेगुरुजीच नाही, मनोगतावर माझं खूप काही राहून गेलं आहे!

तात्या.

रंजन's picture

25 Sep 2007 - 1:13 am | रंजन

प्रेमगीत आवडले.

प्राजु's picture

25 Sep 2007 - 7:56 am | प्राजु

रंजन आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

- प्राजु.

विनायक प्रभू's picture

13 Dec 2008 - 6:01 pm | विनायक प्रभू

सहमत

सिद्धू's picture

12 Dec 2008 - 3:22 pm | सिद्धू

प्राजु,
मी येत्या २ दिवसातच मिसळपाव वर आलो आहे. आणि लगेचच १ उत्तम कविता वाचायला मिळाली. अतिसुंदर...

शाल्मली's picture

12 Dec 2008 - 4:03 pm | शाल्मली

प्राजु,
कविता मस्तच झाली आहे. आवडली.

--शाल्मली.

शितल's picture

12 Dec 2008 - 8:40 pm | शितल

प्राजु,
कविता आवडली..:)

आपला अभिजित's picture

12 Dec 2008 - 11:27 pm | आपला अभिजित

`श्रुंगारा'च्या नावाखाली अतिशय अश्लील कविता लिहून आमच्यासारख्या निरागस, निष्पाप, कोवळ्या वयातील पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या तथाकथित कवयित्रींचा धिक्कार असो!

(अवांतर : कवितेतील भावना या शिंडी क्रॉफर्डने तात्यांबद्दल व्यक्त केलेल्या असतील, तर तात्यांना शुभेच्छा आणि कवितेवरील भोचक अभिप्राय सपशेल मागे!)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Dec 2008 - 11:47 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर.

बिपिन कार्यकर्ते

आजानुकर्ण's picture

13 Dec 2008 - 12:19 am | आजानुकर्ण

कवितेत नेत्र प्रणयातूर गात्र अधरी तनू हे फार अवघड शब्द आहेत. शृंगारिक कवितांसाठी शा. प्रभाकर यांच्या कवितांचा अभ्यास करा असे मी सुचवतो.

आपला,
(गंगू हैबती) आजानुकर्ण

आपला अभिजित's picture

13 Dec 2008 - 12:35 am | आपला अभिजित

(कवितेची प्रशंसा करणे बापजन्मी शक्य नसल्याने, कवितेची सहज सुचलेल्या शब्दांत वाट लावत आहे. हीच प्रतिक्रिया समजून घ्यावी!)

एक "धुंद' रात्र सख्या
मी होते बावरी
बाराची वेळही उलटलेली
घड्याळातल्या काट्यावरी

भूकभावनेशी खेळ
किती खेळावा तरी,
काळजाला घोर माझ्या
"बाटली' तुझ्या उरी

भेदरलेले क्षण सारे
ना थाऱ्यावर तुझे नेत्र
"गटारा'तूर अंग जाहले,
रस्त्यावर असे ना कुत्रं

रस्त्यावरची धूळ सारी
चुंबून घे अंगावरी
एक रात्र सख्या तूही
घे लपेटून "कोठडी'!

खरा डॉन's picture

13 Dec 2008 - 5:06 am | खरा डॉन

अभिजीत मस्त विडंबन रे! स्वतंत्र धाग्यावर टाक.
खरा डॉन

प्यार इश्क मौहब्बत's picture

13 Dec 2008 - 8:29 am | प्यार इश्क मौहब्बत

सय तुझी ही दाटलेली

ह्यापेक्षा साय तुझी ही दाटलेली कसे वाटते?

प्यार इश्क मौहब्बत

सखाराम_गटणे™'s picture

13 Dec 2008 - 8:44 am | सखाराम_गटणे™

धुंद जाहले गीत माझे
चुंबुन घे तू अधरी

सुंदर

----
सखाराम गटणे

सोनम's picture

13 Dec 2008 - 5:41 pm | सोनम

कविता सु॑दर आहे. आवडली चा॑गली आहे

मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.

दत्ता काळे's picture

13 Dec 2008 - 5:47 pm | दत्ता काळे

प्राजुताई

कविता आवडली.

वारकरि रशियात's picture

13 Dec 2008 - 6:00 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
प्राजुतै,
कविता आवडली. तरल अभिव्यक्ति!
पुलेशु.

विनायक प्रभू's picture

13 Dec 2008 - 6:23 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो

स्वाती राजेश's picture

13 Dec 2008 - 11:32 pm | स्वाती राजेश

कविता मस्तच!
छान वाटले, खूप दिवसानी छान कविता वाचायला मिळाली..:)
अवांतरः तू गाणे खूप छान म्हणतेस...:) ऐकले मी यु ट्युब वर...:)