मायेसाठी काहीही!

वेदश्री's picture
वेदश्री in जनातलं, मनातलं
13 Oct 2009 - 1:46 am

अगदी आईबाबांसारखीच माया करणार्‍या मॅथ्यूंच्या घरात घुसले की माझी अखंड टकळी सुरू होऊन जाते आजकाल. रोज धावतपळत का होईना पण किमान एक चक्कर तरी मारायचीच ५-१० मिनिटाचीतरी असा अलिखित नियमच झालाय माझा. माझी त्यांना आणि त्यांची मला खूपच सवय झाली आहे आता. त्यांना त्यांच्या तब्ब्येतीच्या असंख्य प्रश्नांमुळे घराबाहेर पडता येत नाही आणि मला कामानिमित्त हापिसात जावे लागत असल्याने घरात रहायला वेळ मिळत नाही. असे असल्यानेच की काय.. त्यांची बाहेरची कामे मी करायची आणि माझी घरातली काही कामे करण्यात त्यांनी मला मदत करायची, हे अगदी न सांगता आपोआपच जमून आले आहे. अशीच एकदा गावाहून परत आल्यावर त्यांच्या घरी गेले तेव्हा..
"काका, काकू कुठेय? हे बघा.. मी काय आणलेय? रव्याच्या वड्या, भडंग.." मी माझ्याच बोलण्यात गुंग होते आणि नजरेने काकूंना शोधत होते. बाहेरच्या खोलीत दिसल्या नाही तर स्वैपाकखोलीत पाहिले. तिथे त्या खुर्ची घेऊन बसल्या होत्या आणि ओट्यावर मान टाकून निपचित पडल्या होत्या. मी हादरलेच एकदम.
"आंटी, क्या हुआ? अंकल, आंटी देखो.. अंकल.." मी बोलावले तर काका आले. ते म्हणाले की तिला बरे वाटत नाहीये. अचानक पाऊस पडून बरीच थंडी पडल्याने तिला खूप त्रास होतोय.
काकांना स्वयंपाकातल्या जुजबी गोष्टी जरी काकूंनी आता शिकवल्या असल्या तरी एखादा जिन्नस बनवणे त्यांना जमणे शक्य नव्हते.
"आंटी, आपकी तबियत इतनी खराब है तो आप यहा किचनमे क्या कर रही हो? जाओ, आराम करो आप. मैं बनाती हूं आप दोनोंके लिये खाना.."
"नो माय चाईल्ड, रहने दो. तुम्हे नहीं आएगा."
"त्यात काय आहे न येण्यासारखं? साखर अजिबात वापरायची नाही. मसाला, तिखट, मीठ वगैरे सगळं अगदी हात राखून टाकायचं.. बस्स. एवढं येईल की मलाही जमवता.. जा तुम्ही.. मी करते."
काकांच्या मदतीनी काकूंना उठवून दिवाणावर झोपवून किचनमध्ये आले परत. पोळीभाजी बनवायची असा डोक्यात विचार काहिसा पक्का होत होता तेवढ्यात काकूंनी करून ठेवलेली थोडीशी तयारी पाहिली आणि लक्षात आले की मला त्यातले काहीच येत नाही.. कारण तयारी सगळी अंड्याच्या कुठल्याशा पदार्थाची होती! आता आली का पंचाईत.. माझ्याबरोबर परत किचनमध्ये आलेल्या काकांना माझ्या चेहर्‍यावरचे सटास्सट बदललेले भाव काही न बोलताच कळले."
"आंटीने बोला था ना.. तुम्हे नहीं जमेगा!"
माझ्या मनातला कल्लोळ काहीच न बोलता समोरच्याला कळला की मला भारी राग येतो माझ्या अपरोक्ष माझ्याच चेहर्‍यावर प्रदर्शन मांडणार्‍या माझ्या भावनांचा.. पण ते असो. काका म्हणत होते ते खरंच होतं. आता काय करायचं?
"मुझे आता नहीं तो क्या बात है? कुछ प्रॉब्लेम नहीं.. मैं आंटीको पुछके सीख लुंगी तो बना सकुंगी. सीखनेका मैने अगर एकबार ठान लिया ना तो बस्स.. "
"लेकीन तुमको तो चलता नहीं ना.. फिर तुम कैसे बनाओगी?"
"अरे अंकल, मुझे ये अंडावंडा पसंद नहीं, लेकीन वो बुरी चीज थोडी ना है| और वैसेभी.. मुझे सिर्फ पकाना तो है.. खाना थोडी है!"
काकूंना विचारुन मी भुर्जी बनवली.. कशी झाली ते सांगता येणार नाही कारण चव बघता आली नाही मला! त्या दोघांनीही चांगली झाली असल्याची पावती मात्र दिली.

मग किमान सकाळचा स्वयंपाक मी त्यांना करून द्यायला लागले.. संध्याकाळी करायची इच्छा असली तरी ऑफिस असल्याने काही जमत नव्हते. दोनेक दिवसात हवेतला गारवा कमी झाला तर काकूंची तब्येत सुधारली आणि त्या परत नव्या दमाने रोजच्या कामाला लागल्या.

रविवारी दुपारी काकूंकडे गप्पा मारायला गेले होते तेव्हा गप्पा मारतामारता त्यांच्या डोक्याला तेलमालिश करून देत होते. त्या नकोनको म्हणत असतानाही मला हौस असल्याने मी करते म्हणून हट्ट केल्याने त्या तयार झाल्या होत्या. काय माहिती काय झाले.. त्यांना एकदम गहिवरूनच आले.
"तुम इतना क्यौं जान लगाता है हमको?" म्हणाल्या.
"मैने कहां लगाई जान? वो तो आपहीने लगाई है| याद है? मुझे जबरदस्त अ‍ॅसिडीटी हुई थी तो मैं आपके घरमे आके सोफेपे सो गई थी. तब मुझे वोमिटींग हुआ तो आपने मेरे पीठपर प्यारसे हाथ फेरा था.. ऐसा प्यारा हाथ आजतक मेरी जिंदगीमे सिर्फ मेरी आईने फेरा है| आपनेभी इतना प्यारा हाथ पीठपर रख्खा, तो फिर आप मेरी कौन हुई? मेरे अम्माअप्पा के लिये कुछ किया तो उसमे क्या खास बात है?"

औषधोपचारराहणीअनुभव

प्रतिक्रिया

प्रभो's picture

13 Oct 2009 - 1:54 am | प्रभो

खरंय... मायेसाठी काहीही!
सुंदर लिहिलयस...

(सध्या घराबाहेर राहत असल्याने खाण्यासाठी काहीही) प्रभो खादाडकर

लवंगी's picture

13 Oct 2009 - 1:56 am | लवंगी

रक्ताच्या नात्यांपेक्षा जवळची असतात. छान मनापासून लिहिलय.

श्रावण मोडक's picture

13 Oct 2009 - 1:58 am | श्रावण मोडक

छान लिहिलं आहेच, त्यापेक्षा जे केलं ते अधिक कौतुकास्पद!!! हा निर्णय अवघड असतो. सांस्कृतीक संकल्पनांशी संबंधित. तो घेतला हे महत्त्वाचं.

नंदन's picture

13 Oct 2009 - 2:07 am | नंदन

आवडला. श्रावण म्हणतात तसे कृतीचा अवघड निर्णयही कौतुकास्पद. बायबलमधले एक सॉम आठवले -

Thou preparest a table before me...Thou annointest my head with oil; My cup runneth over.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शाहरुख's picture

13 Oct 2009 - 3:54 am | शाहरुख

परमेश्वर तुमचं भलं करो !!

प्रेम द्या, प्रेम घ्या! :)

चतुरंग

मिसळभोक्ता's picture

13 Oct 2009 - 9:24 am | मिसळभोक्ता

प्रेम द्या, प्रेम घ्या!

एक तो कम जिंदगानी
उससे भी कम है जवानी...
जब तक होश मे जवानी
जब तक खून मे रवानी
मुझे, होश में आने ना दो...

प्यार लो, प्यार दो..

असे गाणे (चित्रपट: जांबाज) उगाच आठवले.

(सामंत आजोबा, होऊन जाऊद्या ३०५ !!!!)

क्षमस्व..

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

शैलेन्द्र's picture

13 Oct 2009 - 11:41 am | शैलेन्द्र

अतिशय सुंदर अनुभव व प्रकटन, काही बारीक-सारीक गोष्टी केल्यावर इतरांना काय वाटते ते अलहीदा, पण आपल्यालाच फार बरे वाटते, आपण कुणी फार चांगले आहोत असे वाटते. स्व:ताचा चांगुलपणा जोपासण्याचा हा एक छान मार्ग आहे(पॉझीटीव्ह सेल्फ इमेज बिल्डींग की कायसे).

यशोधरा's picture

13 Oct 2009 - 11:59 am | यशोधरा

सुरेख लिहिलं आहेस. त्याहीपेक्षा तुझी वृत्ती आवडली.

दशानन's picture

13 Oct 2009 - 12:08 pm | दशानन

+ १

असे म्हणतो....

वृती आवडली !