अमेरिकन काटकसरी झाला.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
26 Sep 2009 - 6:43 am

आता पर्यंत अमेरिकेत सोन्याचा धूर जळत होता.साधारण २००७ पासून सर्व धूर जळून गेला.अमेरिकन कफल्लक झाला.आणि त्याला तोच जबाबदार आहे. त्याची हांव,ग्रीड,नडली. आहे त्यापेक्षा अधिक हवं,दोन माणसांना पाच बेडरूमचं घर हवंच.मॉलमधे जायचं, दिसेल ते खरेदी करायचं, आणि घरी आणायचं. कालांतराने ते अर्धवट वापरून किंवा न वापरून घरात झालेल्या वेअरहाऊसमधे दामटून टाकायचं.कां तर अमेरिकन एकॉनॉमी "अर्न ऍन्ड स्पेन्ड" वर चालते.क्रेडीट कार्डावर दहा दहा हजार, डॉलर्स कर्ज काढा. विनासायास ते मिळतं.मिनीमम पेमेंट दिलं तरी चालेल.व्याज मात्र वसूल होत रहातं.असे हे विचार सर्वसाधारण अमेरिकन करायचा.जी गोष्ट सर्व साधारण अमेरिकनची तिच विचारसरणी निरनीराळ्या सांपत्तिक स्थरातल्या अमेरिकनची.म्हणजे मग घरात सुधारणा करण्यात कर्ज काढा,जरूरी पेक्षा आणखी एखादी गाडी घेऊन घरा समोर पार्क करा.एक गाडी ऑफिसला जायला एक देशभर फिरायला,प्रवासाला जायला,एखादी पिक-अप चालू कामाला किंवा समुद्रात सहलीसाठी खरेदी केलेली याट (मेकनाइझ्ड होडी) ओढून न्यायला. कधी कधी मोठी याट समुद्रावर किनार्‍यावरच पार्क करून ठेवायची सोय असल्याने महिना शेकडो डॉलर्स देऊन पार्क करून ठेवली जायची.अश्या आणि अनेक तर्‍हेच्या चैन आणि मौज-मजा मारण्याच्या लाईफ-स्टाईला चाटावलेला अमेरिकन एकाएकी कफल्लक झाला.बरेच वेळा ही सर्व मजा पैसे कर्ज काढून व्हायची.

नाईन इलेव्हन झाल्यावर बूशने फतवा काढला होता.घरी बसूं नका प्रवास करा,खर्च करा.तरच आपली एकॉनॉमी टिकणार.
काही प्रमाणात हे खरंही होतं.पण कुठच्याही गोष्टीचा अतिरेक झाला की भोवल्या शिवाय रहात नाही.
हे असंच चालायचं असं अंकल सॅमला वाटत राहिलं.वॉलस्ट्रीटवर कसलाच कंट्रोल नव्हता.कंट्रोल हा शब्द म्हणजे शीवी होती.
"आम्ही हवे तसे करणार!
आम्हाला कोण तुम्ही पुसणार?"असं होतं.

घरांच्या किंमती वाढतच होत्या.घरांच्या किंमती वाढतच रहाणार.तीन लाखांचं घरं हां हां म्हणता दहालाखावर खपायला लागली.ती सुद्धा पाच सात वर्षात.
"घर मिळेल का हो घर?"
हे बिलवलकरांचं नटसम्राट नाटकातलं वाक्य आठवलं.
"एक काय? हवी तेव्हडी घरं आहेत.तुमच्या जवळ पैसे नसले तरी चालेल.दर महिन्याला हाप्ता परवडतो तो अम्ही भरणार म्हणून खोटं खोटं लिहून द्या.एक दोन महिने हाप्ते भरल्यानंतर भरता नाही आले तर तुमचं घर बॅन्क ताब्यात घेईल आणखी काय होणार?.बर्‍याच लोकानी एक घर असताना दोन तीन घरात इनव्हेसमेन्ट केली.दोन चार महिने कसंतरी हाप्ते भरूं.चार महिन्यात घराची किंमत वाढणारच मग वाढलेली किंमत घेऊन घर बॅन्केला देऊन टाकूं.बॅन्क म्हणायची दुसरं गिर्‍हाईक मिळेपर्यंत आणखी घराची किंमत वाढणारच.तिसरं गिर्‍हाईक गाठून चढत्या भावात विकू. मधल्या लोकाना म्हणजे बॅन्क आणि गिर्‍हाईक या मधल्या लोकाना, उदा.घर विकण्याचे व्यवहार करणारे लोक,वकील लोक,ऍग्रिमेन्ट करून देणारे लोक,घर रहाण्यालायक आहे म्हणून तपासणी करून दाखला देणारे लोक इत्यादी , इत्यादी एक घर विकण्याच्या व्यवहारात येणारे जेव्हडे म्हणून अंतर्भूत होतात ते सर्व लोक आपली आपली फी घेऊन आपली तुंभडी भरून बाजूला व्हायचे.

बुश एकदा म्हणाल्याचं आठवतं,
"लाखोनी घरं विकली जात आहेत.अमेरिकन एकॉनामी आता मागे वळून पहाणार नाही.डावजोन्सच आंकडा तेरा हजार पर्यंत गेला.जगातल्या बॅन्का अमेरिकेत येऊन घरात पैसे इनव्हेस्ट करायला पुढे सरसावल्या. एखाद्याने घर घेतलं आणि पुढे त्याला परवडलं नाही आणि नुकसानी झालीच घरावर तर लोन देणार्‍या- इनव्हेस्टमेन्ट करणार्‍याना- नुकसानी होवू नये म्हणून इंश्युरन्स घ्या.कारण अशी घरं विकणं रिस्की आहे मग खात्री नाहीतर इनश्युरन्स मिळत होता.

आणि एक दिवस उजाडला.घराच्या किंमती वर जाईनात.अश्यक्य,अश्यक्य.घराच्या किंमती वर गेल्याच पाहिजेत.गेल्या वीस वर्षात असं कधीच झालं नाही.आज कसं होणार?
पण झालं.डाऊ खाली घसरायला लागला.पत नसताना विकलेली घरं हाप्त्याच्या आभावी लिलावात काढण्याशिवाय उपाय नव्हता.बॅन्कांच रिस्क त्यांच्या आंगलट आलं.सगळीकडे तारांबळ उडाली. लाख्खोंनी घरं लिलावात जायला लागली.इन्श्युरन्स देणार्‍या बॅन्का आणि कंपन्या इन्श्युरन्सचे पैसे देऊन देऊन थकल्या. तोंडघशी पडल्या.बॅन्करप्ट झाल्या.

"दोन चार झाडं एव्हडी मोठ्ठी आहेत की ती पडून चालणार नाही."बुशचे एकॉनामी पंडीत त्याला सांगायला लागले.
काय करणार कसं तरी करून ही झाडं-म्हणजेच मोठ मोठ्या बॅन्का दिवाळ खोरीत गेल्या तर संपलं. म्हणून त्यांना वाचवा.
कर्ज काढा,नांतवंडाना-पणतवंडाना कर्ज फेडीची जबाबदारी घ्यावी लागली तरी चालेल.चीन कडून हवं तर लोन घ्या पण ह्या बॅन्काना वाचवा-बेल आऊट- करा.
700 ते 800 बिलीयन डॉलर्स-म्हणजे सातलक्ष ते आठलक्ष कोटी डॉ्लर्स- कांग्रेस कडून पास करून घेतले. बुशचा फायन्यान्स सेक्रेटरी-अर्थमंत्री-प्रेस कॉनफरन्स मधे फक्त धाय धाय रडायचा तेव्ह्डा राहिला होता.

आणि ही सर्व रिपब्लिकन पार्टीची आणि बुशची कर्म कथा ओबामाच्या बोडक्यावर टाकली गेली.हवं ते करा रीस्क घ्या पैसे गुंतवा तरच भांडलवदारी-कॅपिट्यालिस्ट-पद्धती चालते.रीस्क घेऊन पैसे गुंतवणार्‍या वरच्या थराच्या लोकाना बोनस आणि काही इन्सेंटीव्ह देण्याचे करार झाले होते.त्यामुळे रीस्क घेऊन आता सर्व भांडवल बुडालं तरी त्यांना कायद्यानुसार बोनस आणि इन्सेंटीव्ह देणं क्रमपात्र झालं होतं. कारण नाही दिलं तर ते कोर्टात केस घालतील.मग जरी करदात्याचे उसने पैसे त्यांना द्यावे लागले तरी नाईलाज आहे.पैसा घेताना लाजलज्जा बाळगून चालत नाही.एक टक्का लोक गबर श्रीमंत झाले.99 टक्के लोक भिकारी झाले तर काय झालं?रीस्क घेऊन पैसा कमवला तर रीस्क घेणार्‍याला इन्सेंटीव्ह देणं क्रमपात्र आहे पण रीस्क घेऊन पैसे बुडवणार्‍याला सुद्धा पैसे देणं क्रमप्राप्त कसं आहे?.पैसे दिले नाहीत तर ते बॅन्का सोडून जातील ना? मग कसं व्हायचं? ह्या साठी त्यांना पैसे बोनस दिलेच पाहिजेत.राजकीय पार्ट्यांना इलेक्शनमधे हेच लोक पैसे
देतात ना?

असं हे त्रांगडं घडत असताना गरीब आणि मध्यम वर्गीय अमेरिकन माणूस रसातळाला मात्र गेला.नोकर्‍या गेल्या घरं गेली लोक रस्त्यावर आले.पेन्शन फंड होते ते नव्हते झाले.रिटायर्डला आलेले लोक भिकारी झाले.कुणाकडे राहाणार?
सरकारकडून अनएम्प्लॉयमेन्ट बोनस घेऊन दिवस ढकलायला लागले.जेम तेम गुजराण करायला लागले. सेव्हिंग केलं असतं तर आता लोकांकडे आणि सरकारकडे भीक मागायची पाळी आली नसती. आता घरी बसा,घरी जेवण करा.रेस्टॉरंटचे भाव परवडण्याच्या सीमे पलिकडे गेले.पाच डॉलरची डीश आता दहा डॉलरला मिळते.चार लोकांच्या कुटूंबाला रोजचे चाळीस डॉलर्स कसे परवडणार.त्यात चार दिवसाची ग्रोसरी येईल.घरी जेवण तयार केल्याशीवाय उपाय नाही.गॅस-पेट्रोल-एक डॉलर गॅलन वरून पाच डॉलर्स वर गेलं. गाड्या आता घरात राहिल्या.गाड्यांचा हाप्ता,घराचा हाप्ता,गाड्यांचा इन्श्युरन्स, मुलांचा शाळेचा खर्च माती धोंडे आता कसं परवडणार.जॉब मिळत नाही.दर महिना चार पाच लाख लोकाना कंपन्या जॉबवरून काढून टाकायला लागल्या.कारण कंपन्याना ऑर्डर्स कमी यायाला लागल्या, धंदे चालेनात.

इकडची भारतीय जनता त्यामानाने ह्या चटक्यापासून थोडी दूर होती.नव्वद टक्के लोक आपला जॉब सांभाळून होते.बरचसे इंजीनियर होते.त्यातल्या त्यात मराठी माणूस काटकसरी राहून पैसा करून होता. घरच्या बायकांवर संस्कार होते ना.
"अंथरूण बघून पाय पसरावेत"आई वडील आजोबा आजीची सततची बोलणी,साधी राहणी उच्च विचारसरणी, उगाच शो नको.असे शब्द कानात घुमायला लागले असावेत.असले संस्कार ह्यावेळीच उपयोगी पडायचे. एखाद्या कॉलनीत मिक्स वस्ती असते तिथे त्याही दिवसात लॉनमोव करण्यासाठी ठेवलेला माळी मराठी माणसाच्या घरी अद्यापही यायचा.इतरानी काटकसरी साठी खर्चात काटछाट करण्याच्या उद्देशाने माळी काढल्याचं चटकन लक्षात यायचं.कारण लॉनमोवरचे आवाज कमी येऊ लागले. मराठी माणूस अजूनही महिन्यातून एक दोनदा इंडियन रेस्टॉरन्टना कुटूंबासकट भेट द्यायचा. गुजराथी लोकही असेच काटकसरी आहेत.ते ही अंथरूण बघून पाय पसरणारे.पण काही अपवाद असायचेच म्हणा.

आणि आता ओबामाच्या कारभारात नऊ एक महिन्यानी परिस्थिती थोडी फार सुधारायची चिन्ह दिसायला लागली आहेत.
हळू हळू लोकं खरेदी करायला लागले आहेत.सरकारी मदतही कमी घ्यायला लागले आहेत.तरी अजूनही साठ लाख लोक बेकार आहेत.काही ना जॉब मिळायला लागले आहेत.दर महिन्याला जॉबवरून काढून टाकण्याच्या संख्येत घट यायला लागली आहे.ओबामाचं स्टिम्युलस पॅकेज थोडं थोडं काम करायला लागलं आहे अशी चिन्ह दिसत आहेत.जॉबवर असलेला अमेरिकन आता सेव्हिंग करायला लागला आहे.ज्यांच्या बॅन्कच्या खात्यावर शुन्य टक्के सेव्हिंग असायचं त्यांच्या जवळ आता पाच टक्के सेव्हिंग दिसत आहे.क्रेडीट मिळायचं बंद झाल्याने पैशाची चणचण भासायला लागली आहे.परत काही तरी असं झालं तर? अशी भिती मनात बाळगून अमेरिकन काटकसरीत रहायला शिकला आहे.लॉन्ग विकेंडला घरात बसून रहायला लागला आहे.कारण प्रवास परवडत नाही.अवांतर खाऊन जाड झालेले लोक घरी बसून मिळालेल्या वेळात व्यायाम करायला लागले आहेत.त्यामुळे शरिराचे "हाबू " झडायला लागले आहेत.नोकरी गेल्याने हेल्थ इन्श्युरन्स गेला.आता पुढे कसं व्हायचं.लोकांचे डोळे उघडायला लागले.ओबामाने युनिव्हर्सल हेल्थ स्किमवर बिल आणायचं ठरवलं आहे.आमचा डॉक्टर आम्ही ठरवणार सरकार काय म्हणून आम्हाला जबरी करणार? रिपब्लिकन पार्टीने लोकाना चिथवायला सुरवात केली आहे.कारण बिल पास झालं तर त्यांना इलेक्शनमधे पैसे पुरवणार्‍या खासगी हेल्थ इन्श्युरन्स कंपन्याना लोकांची लूटमार करण्याची संधी हुकणार आहेत.

डेमोक्रेटीक पार्टीची वरचढ असल्याने ओबामा हेल्थ स्किमचं बिल पासकरून घ्यायला पुढे आला आहे.
भारतात नेहमीचीच वीस ते पंचवीस टक्के बेकारी असतेच.इकडे काही काळा पुर्वी अगदी शुन्य टक्के बेकारी असायची ती आता जवळ जवळ दहा टक्के झाली आहे.अमेरिकेत असं कधीच होत नव्हतं.उलट कामाला लोक मिळणं अवघड व्ह्यायचं.
आता दहा नोकर्‍यासाठी हजार लोक लाईनीत उभे असतात.मेकडॉनॉल्डचा खप मात्र वाढत चालला आहे. कारण जंक-फुड सगळ्यात स्वस्तात मिळतं.एक डॉलरला बिगमॅक खाऊन दिवसभर पोट भरलेलं रहातं.

हे सगळं होण्याचं मुख्य कारण बॅन्कावर किंवा पैशाचा व्यवहार करणार्‍या कंपन्यावर कसलंच बंधन नव्हतं. भारतात ह्या बाबतीत पहिल्यापासून शिस्त होती.रिझर्व्ह बॅन्काचा धाक होता.इथे कुणाचाच धाक नसल्याने रीस्क घेतल्या शिवाय धंदा वाढत नाही म्हणून कसलंही रीस्क घ्यायला मुभा होती.त्याचा गैरफायदा घेतला गेला.अती तिथे माती झाली.आता ओबामाने फायन्यान्स रेग्युलेशन म्हणून बिल आणलं आहे.करदात्याचा पैसा भांडवल म्हणून सरकारने बॅन्काना दिला तरी बॅन्का क्रेडीट द्यायला काचकूच करीत आहेत.दुधाने ओठ भाजल्याने ताक फुंकून प्यायला लागले आहेत.पण त्यामुळे लहान लहान धंदे वर यायला कठीण होऊ लागलं आहे.

हे ही दिवस जातील.अमेरिका परत वर आल्याशिवाय राहणार नाही अशी प्रत्येक अमेरिकनाची धारणा आहे. इतिहासपण तेच सांगतो.1930 च्या डिप्रेशनमधे,अशीच तंगी आली होती.त्यातून अमेरिका वर आली.विंड एनर्जी,सोलर एनर्जी,हायब्रिड गाड्या अशा धंद्यात पैसे गुंगवणूक चालू झाली आहे. कॅलिफोरनीयात प्रत्येक नव्या बांधलेल्या घरावर सोलर एनर्जीची पॅनल्स बसवून सोय करून द्यायला आर्थीक उत्तेजन देण्यात येत आहे.ह्या नव्या क्षेत्रात लोकाना जॉब मिळायला लागले आहेत.जुने रस्ते, जुने पूल, जुन्या शाळा दुरुस्त करायला पैसे गुंतवले जात आहेत.त्यामुळे लोकाना कामं मिळण्याचे संभव वाढीला लागले आहेत.
"अमिरका देश" पुन्हा अमिरका होईल यात शंका नाही.

अमेरिकन श्रीकृष्ण

कथालेख

प्रतिक्रिया

खुपच माहितीपुर्ण लेख.सहज,सोपा व खुशखुशीत लेख.

वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

26 Sep 2009 - 1:09 pm | पर्नल नेने मराठे

होय ..हेच म्हणतेय.
चुचु

टारझन's picture

26 Sep 2009 - 1:13 pm | टारझन

वा ... क्या कमाल लिखा हय !! अगदी माहितीपुर्ण लेख :)
धन्यवाद अंकल अमेरिका :)

- अफ्रिकन टारझन

मिसळभोक्ता's picture

26 Sep 2009 - 1:20 pm | मिसळभोक्ता

३०१वा लेख माहितीपूर्ण हवा होता. ३०० वा लेख तात्याला अर्पण, तर ३०१वा लेख प्राध्यापकांना, ज्यांच्यामुळे आज माझे आंतर जालीय वास्तव्य आहे,.. वगैरे वगैरे...

हे उगाच काहीतरी ठाण्याने फाट्यावर मारलेल्या देशांविषयी, म्हणजे कैच्याकैच !

-- मिसळभोक्ता

पिवळा डांबिस's picture

27 Sep 2009 - 10:40 am | पिवळा डांबिस

ओबामाने युनिव्हर्सल हेल्थ स्किमवर बिल आणायचं ठरवलं आहे.आमचा डॉक्टर आम्ही ठरवणार सरकार काय म्हणून आम्हाला जबरी करणार? रिपब्लिकन पार्टीने लोकाना चिथवायला सुरवात केली आहे.कारण बिल पास झालं तर त्यांना इलेक्शनमधे पैसे पुरवणार्‍या खासगी हेल्थ इन्श्युरन्स कंपन्याना लोकांची लूटमार करण्याची संधी हुकणार आहेत.
सामंतकाका, तुमच्याविषयी आदर आहे...
पण लेख लिहितांना बेछूट आरोप करण्याऐवजी दोन्ही बाजू मांडत चला...
युनिव्हर्सल हेल्थ केयरला येणारा जो जास्त खर्च आहे तो ओबामा कसा काय भरून काढणार आहेत?
आज अमेरिकेत १८ ते २५ या वयोगटात १५ मिलियन लोक असे आहेत जे हेल्थ इन्शुरन्स काढणं गरजेचं समजत नाहीत (कारण एकतर त्यांचं उत्पन्न मर्यादित आहे आणि ते धडधाकट आहेत!!) त्यांना हा युनिव्हर्सल इन्शुरन्स सक्तीचा करणं कितपत यशस्वी ठरणार आहे? आणि इलेक्शनमध्ये डेमोक्रॅट्सनी इन्शुरन्स कंपन्यांकडून देणग्या घेतलेल्या नाहीत याची तुम्हाला नक्की खात्री आहे?
प्रत्येक गोष्टीला टॅक्स वाढवणं हा मार्ग ठरू शकत नाही सामंतसाहेब!
मग तो टॅक्स न भराव्या लागणार्‍या लोकांना कितीही आकर्षक मार्ग वाटला तरीही...
आपलोच रिपब्लिकन
पिवळो डांबिस

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Sep 2009 - 10:30 am | श्रीकृष्ण सामंत

डांबीसानु माझा ऐका.

"आज अमेरिकेत १८ ते २५ या वयोगटात १५ मिलियन लोक असे आहेत जे हेल्थ इन्शुरन्स काढणं गरजेचं समजत नाहीत (कारण एकतर त्यांचं उत्पन्न मर्यादित आहे आणि ते धडधाकट आहेत!!) त्यांना हा युनिव्हर्सल इन्शुरन्स सक्तीचा करणं कितपत यशस्वी ठरणार आहे?"

हे तुमचं म्हणणं पूर्ण विचारांती झालेलं नाही. आणि असं कनफ्युजन करणं हेच सध्या रिपब्लिकन पार्टीचं ध्येय आहे. कसं ते पहा.
अहो,हे १८ ते २५ या वयोगटात १५ मिलियन लोक अमर पट्टा घेऊन आले आहेत काय.ज्यावेळी हे आजारी पडतात किंवा हे जेव्हा अपघातात जखमी होतात तेव्हा एमर्जन्सी म्हणून हॉस्पिटलात फुकट उपाय करून घेण्यसाठी जातात.त्यांचा खर्च कोण करतं.?माणसी एक हजार डॉलर्स दरवर्षी ह्या तरूण लोकाना "जे हेल्थ इन्शुरन्स काढणं गरजेचं समजत नाहीत" त्यांच्यासाठी खर्च कोण करतो? टॅक्स पेयरच ना? "उत्पन्न मर्यादित आहे" ना मग तेच ओबामा सांगतो "जमत नाही इन्श्युरन्स तर तुम्हाला आम्ही स्वस्तात इन्श्युरन्स देतो.तो घ्या" फुकटात जगणार काय?
प्राईव्हेट इन्श्युरन्सवाले ह्यांना जवळ तरी करतील काय?

"पण लेख लिहितांना बेछूट आरोप करण्याऐवजी दोन्ही बाजू मांडत चला..."
ड्यांबीसानू,ह्याच तर माझा म्हणणां.
ह्या विषयावर रिप.पार्टीला बाजूच नाही. मांडणार कठून?.सध्या ती "नो पार्टी " झाली आहे.कुठूनही ओबामाला यशस्वी होऊं द्यायचं नाही.देश सध्या झक मारला.१९६० पासून हेल्थ इन्श्युरन्स म्हणूनच सुधारीत होत नाही.
देणग्या सगळेच घेतात हो.पण गरिबाचा विचार रिप.पा.ला नाही.
"Read my lips " म्हणणार्‍यांनीच टॅक्स वाढवला ना? का विसरलांत?
अहो निवडून येई पर्यंत टॅकसीची भलावण.नंतर फक्त श्रीमंताना सूट कोण हो ते देणारे?
ह्याच्यांत काय बेछूट आरोप केलो नाय मा?

कोणत्याच पार्टीचो नसलेलो इंडीपेन्डंट कोकणी
अमेरिकन श्रीकृष्ण

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पिवळा डांबिस's picture

29 Sep 2009 - 2:00 am | पिवळा डांबिस

मग तेच ओबामा सांगतो "जमत नाही इन्श्युरन्स तर तुम्हाला आम्ही स्वस्तात इन्श्युरन्स देतो.तो घ्या" फुकटात जगणार काय?
अहो होय! मान्य आहे!!
पण आज त्यांचं काहीही पैसे न भरता कधी लागलंच तर सरळ इमर्जन्सी रूमला जाऊन काम भागतंय! त्यांना हा स्वस्तातला इन्शुरन्स घेण्यासाठी मोटिव्हेशन काय? श्री. ओबामा देशातल्या प्रत्येक नागरिकाला इन्शुरन्स असणं सक्तीचं करण्यात यशस्वी होतील का?
या स्वस्तातल्या इन्शुरन्समध्ये ते सगळ्या (सिरियस/ महागड्या)प्रोसीजर्स उपलब्ध करून देणार आहेत का? आणि जर आहेत तर मग आजसुद्धा मेडिकेर घेणार्‍या लोकांना सप्लीमेंटल इन्शुरन्स घ्यायची गरज का भासते?
आणि हा जो जास्तीचा खर्च आहे तो कसा भागवायचा? हां, पेट्रोलसारख्या वस्तूवर सरसकट टॅक्स लावणे हा एक मार्ग आहे पण श्री. ओबामा ते करणार आहेत का?
श्री. ओबामांचे गोल्स लॉफ्टी आहेत यात शंका नाही. माझं म्हणणं इतकंच की हे सर्व पार पाडायला जो जास्तीचा खर्च आहे ती रक्कम ते कुठून उभी करणार आहेत? कुठली नवीन गोष्ट आणायच्या, सुरु करायच्या आधी आपण त्यासाठी होणारा खर्च कसा भागवणार आहोत याचा तपशील लोकांपुढे ठेवणं योग्य नाही का?
अहो देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुलभ, परवडणारी आणि उत्तम वैद्यकीय सेवा मिळाली तर ते कुणाला नकोय? पण त्यासाठी एका ठराविक वर्गावरच भुर्दंड बसवायचा (कारण ते त्यांचे मतदार नाहीत!!) आणि इन प्रोसेस एक नवीन प्रचंड नोकरशाही उभी करून ठेवायची हे काही जणांना नाही पटत!!!

सध्या ती "नो पार्टी " झाली आहे.कुठूनही ओबामाला यशस्वी होऊं द्यायचं नाही.
विधान १: अहो हे चालायचंच!! कार्टर पडून रेगन आला होता तेंव्हा डेमोक्रॅटसची पण तीच अवस्था होती....
आणि बिल क्लिंटनची ओव्हल ऑफिसमधली रासलीला उघडकीला आली तेंव्हा डेमोक्रॅटसची तीच दशा होती...
राजकारणात हार-जीत चालायचीच...
विधान २: विरोधी पार्टी म्हणून त्यांचं ते कामच नाही का? :)
आणि या विधेयकाला फक्त रिपब्लिकन्सच विरोध करतायत असं कुणी सांगितलं? काही डेमोक्रॅट्सही विरोध करताहेत. म्हणून तर इतकी प्रचंड मेजॉरिटी असूनदेखील श्री. ओबामांना हे विधेयक कॉन्ग्रेसच्या गेल्या सेशनमध्ये पास करून घेता आलं नाही....

गरिबाचा विचार रिप.पा.ला नाही.
असं कसं म्हणता? रिप. पा. चा अमेरिकन माणसाच्या उद्योजकतेवर विश्वास आहे. म्हणून त्यांचं म्हणणं हे की सरकारने फक्त आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवावं, उद्योगांना (मोठ्या आणि छोट्या) प्रोत्साहन ध्यावं आणि मग त्यांच्या मार्गातून बाजूला रहावं. मग ते उद्योगधंदे नोकर्‍या निर्माण करतील, वेल्थ जनरेट करतील. एकदा एम्प्लॉयमेंट असल्यावर मग लोकांना मान ताठ ठेवून हे सगळे इन्शुरन्स वगैरे विकत घेता येतील. मायबाप सरकारच्या मेहेरबानीवर जगायला लागणार नाही....
अहो जगातलं कुठलं सरकार आपल्या लोकांचं भलं करण्यात यशस्वी ठरलंय? :) सरकार म्हटलं की नोकरशाही आली, वेस्टेज ऑफ रिसोर्सेस आलं, दिरंगाई आली. हे नाकारता येईल का?

माझ्या म्हणण्यात काय चूक आसां काय? आसलां तर कान पकडा...
वयान तुमचो अधिकार आसां तो....
आपलो,
पिवळो डांबिस

डांबिसानु,
दोन कोकणी कधी स्वस्थ बसलेत? माका तुका केल्याशिवाय र्‍हवलेत?
आता तुमच्या म्हण्यावर माझे काय ते पाइंट वाचा.
पहिलो पाइंट....
"पण आज त्यांचं काहीही पैसे न भरता कधी लागलंच तर सरळ इमर्जन्सी रूमला जाऊन काम भागतंय! त्यांना हा स्वस्तातला इन्शुरन्स घेण्यासाठी मोटिव्हेशन काय?"
"काम भागतंय म्हणजे काय हो डांबिसानु?महागाईतला इंश्युरस्न परवडत नाही.स्वस्तातला दिला तर मोटिव्हेशन.आणि काही पैसे न देता एमर्जन्सी हवी.कारण ती फुकट मिळते.म्हणजे,
"खिशात फक्त पाच रुपये आणि श्रीखंडय होयां आणि बासुंदी पण होयी" ह्या कसा जमताला?
काम भागतंय म्हणजे कोणी ते काम भागवायचं? शेवटी टॅक्सपेअरनेच ना?
खयसून पैसे आणुचे?
पाइंट नंबर दोन,
"या स्वस्तातल्या इन्शुरन्समध्ये ते सगळ्या (सिरियस/ महागड्या)प्रोसीजर्स उपलब्ध करून देणार आहेत का? आणि जर आहेत तर मग आजसुद्धा मेडिकेर घेणार्‍या लोकांना सप्लीमेंटल इन्शुरन्स घ्यायची गरज का भासते?"

ह्यातलं पहिलं वाक्य हा रीप.पार्टीचा बिनबुडाचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्यक्ष बिलात काय आहे हे कुणालाही
माहित नसताना गैरसमज फैलावयचा प्रयत्न आहे .एक म्हणजे जर परवडत नाही तर स्वस्त घेणं भाग आहे आणि स्वस्त
मिळाल्यावर "मी म्हणान तसा देशीत तरच स्वस्तात घेतलंय" हा त्यावर अडेलतट्टुपणा आहे.
ह्यालाच म्हणतात "माझा तां माझां आणि तुझा तां पण माझां"

पाइंट तिन....
"मेडिकेअर लोकांना सप्लीमेंटल इन्शूरन्स घ्यावा लागतो."
कारण "मला जे मेडिकेअर मधे मिळतं त्याच्यापेक्षा मला जास्त हवंय-म्हणजे मनमानी हवीय ".असं म्हटलं जातंय.
"हो ना मग घ्या खिशातले पैसे देऊन सप्लीमेंटल इन्शूरन्स" असं गव्हरमेंटने म्हणणं चुकीचं आहे काय?

पाइंट चार....
"तपशील लोकांपुढे ठेवणं योग्य नाही का?"त्यासाठी एका ठराविक वर्गावरच भुर्दंड बसवायचा (कारण ते त्यांचे मतदार
नाहीत!!)
माका सांगा,
इराकवर हल्ला करताना कुणा लोकांसमोर तपशील ठेवला होता?बुशने. आणि एक ट्रिलीयन डॉ.चा खड्डा खणला त्याने.
एक टक्का श्रीमंत लोकांना टॅकस कट देताना कुठल्या लोकां समोर तपशील ठवला होता? बुशने.आणि तो पण इराक युद्ध
चालू असताना. असे तसे ८० बिलयन डॉ.वाटले ना?.हा कोणावर भुर्दंड?
"I am the decider" कोण म्हणाला होता.बुशच नां?मग गरिबांसाठी आणि मध्यम वर्गासाठी काय केलं त्याने आठ वर्षात?
"इसरल्यांत मां"?
"आपलो तो बाबो दुसर्‍याचो मातर कार्टो" रीप.पार्टीचा हे म्हणणं काय बरोबर नाही?.
शेवटी कांग्रेसकडूनच सर्व होतं ना?तेच ओबामा करतोय.

पाइंट पाच.....
"राजकारणात हार-जीत चालायचीच."
असा मां? मग रीप.पार्टी म्हणजे देशाचं भलं पहाणारी पार्टी तेच फक्त खरे देशभक्त आणि इतर कोण तर सूर्याजी पिसाळ.
ह्या गमज्या कशाला? लोकानी निवडून दिल्यावर तो निर्णय मानायला नको का?
विरोधी पार्टी झाली तर सगळ्याच बाबतीत "नो " म्हणून कसं चालेल.देशभक्ताना देशाचं कसं व्हायचं?ह्याचा विचार नको
का?

पाइंट सहा....
"फक्त आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवावं, उद्योगांना (मोठ्या आणि छोट्या) प्रोत्साहन ध्यावं आणि मग त्यांच्या मार्गातून
बाजूला रहावं."

हे फक्त रीप.पार्टीच्या आयडियालॉजी पुरतं ठीक आहे.असं आहे तर,
मग गेली आठ वर्ष बुशने -म्हणजेच रीप.पार्टीनें-काय केलं?
क्लींटन कडून एक ट्रिलियन सरप्लस घेऊन दीड ट्रिलियन डेफिसीट कुणी आणलं.? रिप.पार्टीनेच ना?
आता त्याची कारणं द्याल.९/११, कॅट्रीना वादळ,एकॉनॉमी वगैरे वगैरे.

"अहो जगातलं कुठलं सरकार आपल्या लोकांचं भलं करण्यात यशस्वी ठरलंय? सरकार म्हटलं की नोकरशाही आली,
वेस्टेज ऑफ रिसोर्सेस आलं, दिरंगाई आली. हे नाकारता येईल का?"

डांबीसानु,अगदी सहमत तुमच्याशी.पण काय करणार लोकशाहीच्या वृक्षाचं ते कडू फळ आहे.
आम्ही कुठच्याही पार्टीचे नाही.आमच्या दृष्टीने योग्य तेच आम्हाला सांगावसं वाटतं.उद्या डेमो.पार्टीचं चुकलं तर आम्ही
अशीच टिका करणार.अर्थात सगळ्यांनी आमच्यासारखं करावं असं आमचं म्हणणं नाही.आमचं म्हणणं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला एव्हडंच.

डांबीसानु,
प्रत्येक वादाला दोन बाजू असतात.पण पार्ट्रीसन वृत्ती घेऊन कसं चालायचं.ओबामाने हात उघडा केला आहे पण रीप.पार्टी
मुठ उघडी करायलाच तयार नाही.मग "शेख हॅन्ड" कसा होणार?
जाता जाता,
खरोखरच "निमीत्त मात्र" लिहितात ते खरं आहे.काही म्हणा सध्यां रिप.पार्टी सैरभैर झाली आहे हे नक्कीच.

अमेरिकन श्रीकृष्ण

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 11:05 pm | मिसळभोक्ता

सामंतकाका,

ओबामाला काल मी तुमचा प्रतिसाद वाचून दाखवला. तो खूश झाला. तुम्हाला व्हाईट हाऊस, अप्पर अँड लोवर कोकणी डिव्हिजन चा स्पोक्समन करतो, म्हणाला.

अभिनंदन. व्हाईट हाऊस मध्ये गेल्यावर गरीबाची आठवण ठेवा, म्हणजे झालं.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पिवळा डांबिस's picture

30 Sep 2009 - 12:46 am | पिवळा डांबिस

दोन कोकणी कधी स्वस्थ बसलेत? माका तुका केल्याशिवाय र्‍हवलेत?
क्या बात है!!! अगदी खरां!!!:)
ह्या वाक्य वाचून बरां वाटलां!!!!:)
आता तुमच्या पाईंटांक माझी उत्तरां.....

काम भागतंय म्हणजे कोणी ते काम भागवायचं? शेवटी टॅक्सपेअरनेच ना? खयसून पैसे आणुचे?
एक्झॅक्टली!!! हाच खरा मोलाचा प्रश्न आहे!!!
आज ज्या लोकांकडे इन्शुरन्स नाही ते लोकं तसंच इमर्जन्सी रूममध्ये जाऊन उपचार मिळवतात. बाकीच्या सर्व समाजाला/ सर्व टॅक्सपेयर्सना तो भुर्दंड सोसावा लागतो.
श्री. ओबामांच्या प्लाननुसार सर्व टॅक्सपेयर्सच्या ऐवजी काही विशिष्ट लोकांनाच तो सोसावा लागणार, हो की नाही?
आणि पुन्हा त्यांना सर्व सोई मिळणार नाहीत हे तुम्हीही कबूल करतांय. म्हणजे ज्याला गॉल ब्लॅडर रिमूव्ह करायची आवश्यकता आहे त्याला तुम्ही सांगणार की तुझा प्लान फक्त सर्दी-ताप कव्हर करतो, या साठी तुला जास्त पैसे भरावे लागतील. आता ज्याच्यकडे चांगऊल्या प्लानचा प्रिमियम भरायचेही पैसे नाहीत तो हा अधिकचा खर्च कुठून करणार? म्हणजे सरकारी प्लान असूनही त्याचा तसा काहीच उपयोग नाही...

"मला जे मेडिकेअर मधे मिळतं त्याच्यापेक्षा मला जास्त हवंय-म्हणजे मनमानी हवीय ".असं म्हटलं जातंय.
मनमानी नाही म्हणू शकत तुम्ही.
मला जो आजार आहे तो कव्हर केला जाणं माझ्या दृष्टीने आवश्यक असतं. त्यावेळेस तो सोडून इतर सर्व रोग कव्हर केले जातात या म्हणण्याला काहीही अर्थ नसतो. मेडिकेर फुल कव्हरेज देत नाही ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारू शकत नाही...

प्रत्येक वादाला दोन बाजू असतात.पण पार्ट्रीसन वृत्ती घेऊन कसं चालायचं.
कबूल आहे की. म्हणूनच माझ्या पहिल्या अभिप्रायात मी लिहिलंय की जर सर्व नागरिकांना उत्तम, परवडणारा आणि सर्वत्र उपलब्ध असा प्लान मिळत असेल तर ते कुणाला नकोय?
पण सध्यातरी उपलब्ध माहितीवरून असं दिसतंय की श्री. ओबामा युनिव्हर्सल प्लान आणू इच्छिताहेत आणि त्याला येणारा खर्च मात्र ठराविक वर्गांवरच लादू इच्छिताहेत. जर हे असं नसेल तर त्यांनी, डेपाने आणि तुम्ही आमच्यासारख्या जनतेपुढं हे मांडायला हवं...

बाकी तुम्ही श्री. बुश आणि बाकी सूर्याजी पिसाळ वगैरे बरंच काही लिहिलयंत. त्याला मी इतकंच उत्तर देईन की प्रत्येक पार्टीत भडकू, पिसाळ, आगलावे लोकं असतात. रिपाचं फॉक्स नूज आहे तसं डेपाचं एमेसेन्बीसी आहे. श्री. बुश म्हणजे सगळी रिपा नाही. म्हणून तर गेल्या इलेक्शनमध्ये बुशना रिपाने महत्व दिलं नव्हतं....
आणि देशभक्तीचा ठेका जसा रिपाचा नाही तसाच डेपाचा पण नाही. श्री. बुश पहिल्यांदा कायदेशीर विजयी घोषित करण्यात आल्यावर गोर आणि डेपाने माजवलेला कल्लोळ अजून स्मरणात आहे.....
असो. मला तुमच्याशी जनरल रिपा व्हर्सेस डेपा यावर चर्चा करायची नाही. कारण विचारस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य, आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे मी देवापेक्षा पवित्र मानतो. तेंव्हा तुमच्या अ‍ॅफिलियेशन (वा नॉन-अ‍ॅफिलियेशन) बद्द्ल मला अत्यंत आदर आहे. मी फक्त या हेल्थ्केयर बिलावरच चर्चा करू इच्छितो. ..
तेंव्हा माझे प्रश्न असे:
श्री. ओबामांचा हेल्थकेयर प्लान हा आज ज्यांना मेडिकल इन्शुरन्स परवडात नाही त्यांना एक चांगला, सर्व काही कव्हर करणार इन्शुरन्स मिळवून देणार आहे का?
आज अमेरिकेत जे इल्लीगल लोकं आहेत त्यांचं काय करणार? त्यांनाही हा प्लान देणार की त्यांना मेडिकल सेवा नाकारणार?
कारण जर त्यांना हा प्लान दिला तर ते आयडेंटिफाय होतात म्हणजे कायद्यानुसार त्यांना डीपोर्ट करायला हवं. आणि प्लान दिला नाही तर मग ते परत इमर्जन्सीमध्ये येणारच! आणि मग त्याना सेवा नाकारणं ह्युमॅनिटी ग्राऊंड्सवर योग्य ठरेल का?
श्री. ओबामांच्या प्लानला जो अधिक खर्च येणार आहे तो सर्व टॅक्स्पेयर्स उचलणार आहेत की फक्त काही ठराविक लोकांवरच तो लादला जाणार आहे?
तुम्ही उत्तरां द्या, आपण चर्चा जारी राखू....
माझी मतपरिवर्तन करून घ्यायची तयारी आहे पण अजून समर्पक आर्ग्युमेंट नजरेला आलेलं नाही....
आपलो,
पिवळो डांबिस

निमीत्त मात्र's picture

29 Sep 2009 - 7:07 am | निमीत्त मात्र

आपलोच रिपब्लिकन
?
:O

एएम रेडियो ऐकायचे कमी करा जरा डांबीस काका! :)
रश लिंबा, शॉन हॅनीटी, बिल ओ रायली, ग्लेन बेक, हेराल्डो रिव्हीएरा ह्या रिपब्लिकनांच्या वक्त्यांविषयी तुम्हाला काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.

राजू's picture

26 Sep 2009 - 1:27 pm | राजू

आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.
असच झालय त्यांच्या बाबतीत.

मदनबाण's picture

26 Sep 2009 - 9:28 pm | मदनबाण

छान लेख...
इतके झाले तरी अमेरिकेचे पाकड्यांविषयी प्रेम कमी न होता ते वाढतच चालले आहे...पाकड्यांना द्यायला यांच्याकडे पैसा कुठुन येतो? तेव्ह्या यांना मंदी-फंदी दिसत नाही ते ???

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
‘US funds diverted for defence against India’ ‘
http://www.expressbuzz.com/edition/story.aspx?Title=%E2%80%98US+funds+di...

चिरोटा's picture

27 Sep 2009 - 7:29 am | चिरोटा

अडचणीचे प्रश्न विचारायचे नाहीत. सध्या अमेरिकेत मंदी आहे म्हणजे मंदी आहे. :D
अवांतर-शस्त्रे विकुन मंदी दूर होवू शकते असे काही अमेरिकन मुत्सद्दी लोकांना वाटते.त्यांचे पुर्वीचे राजकारण बघितले तर ते खरेही आहे.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

हर्षद आनंदी's picture

27 Sep 2009 - 6:49 am | हर्षद आनंदी

असेच म्हणतो...

भोगवादी अमेरीकेच्या डोळ्यात अंजन (!)पडले खरे, पण हरीदासाची कथा मुळपदी येणार.. यात आम्हास शंका नाही

अविनाशकुलकर्णी's picture

26 Sep 2009 - 9:53 pm | अविनाशकुलकर्णी

खुप माहिति पुर्ण लेख आहे..उठ सुट अमेरिकन जिवन शैलिचे गोडवे गाणा~यांच्या डोळात हे अंजन आहे..लेख भावला.. दादा जय हो

चिरोटा's picture

26 Sep 2009 - 9:59 pm | चिरोटा

लेख आवडला.

"अमिरका देश" पुन्हा अमिरका होईल यात शंका नाही.

नक्कीच्.तब्बल चाळीस वर्षांपुर्वी स्वतःच्या बळावर चंद्रावर माणूस पाठवलात्यावेळी हे लोक काहीही करु शकतात हे सिद्ध झाले होते. चिकाटी, सगळ्या बाजुनी विचार करण्याची अंगभूत क्षमता,कल्पनाशक्तीच्या जोरावर अमेरिकन लोक नक्कीच मात करतील.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

हरकाम्या's picture

30 Sep 2009 - 1:54 am | हरकाम्या

महाराज आप्ल्या प्रतिक्रियेत थोडी सुधारणा करायला पाहिजे.
" आपल्या अंगभुत अरेरावीने, सर्व जगाला लुटुन खाण्याची क्षमता असलेला,आणि त्यासाठी नवनवीन कल्पना शोधुन काढण्याच्या जोरावर हे स्वत्व नसलेले अमेरिकन नक्की मात करतील.आणि सर्व जगाचे एका मोठ्या थडग्यात कसे रुपांतर करता येइल याही स्वप्ने रंगवतील.

चिरोटा's picture

1 Oct 2009 - 11:51 am | चिरोटा

बरोबर.अनेक पैलू आहेत.अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय राजकारण बघितले तर अमेरिका खलनायक आहेच. मी तंत्रज्ञान्,अभियांत्रिकी संबंधीत म्हणत होतो.उ.दा. इंटरनेट्चे श्रेय cold war ला द्यावे लागेल.DARPA च्या अधिपत्याखाली हा इंटरनेटचा प्रयोग बर्‍याच वर्षापुर्वी चालु झाला होता.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

लोकांनाही नीट समजेल असा सर्वसामान्यांच्या भाषेत चांगला आढावा घेतला आहे श्रीकृष्णकाका.

(चड्डीत रहाणारा)चतुरंग

संदीप चित्रे's picture

27 Sep 2009 - 4:51 am | संदीप चित्रे

अगदी सोप्या भाषेत छान आढावा घेतला आहे.
बघू, लवकरच सुगीचे दिवसही येतील अशी आशा आहे.

अजिंक्य पोतदार's picture

27 Sep 2009 - 5:46 am | अजिंक्य पोतदार

छान लेख..
अजिंक्य पोतदार

मी-सौरभ's picture

27 Sep 2009 - 11:17 pm | मी-सौरभ

सौरभ

छोटा डॉन's picture

29 Sep 2009 - 11:14 pm | छोटा डॉन

आयला असं आहे काय समदं ?
सखोल "उहापोह" करणारा लेख आणि त्यावरचे प्रतिसाद आवडले.

------
(मंदीमुळे ऑनसाईट बोंबलल्याने श्या देणारा ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

आम्हाला आमच्या मुलांजवळ अमेरिकेत रहायचे आहे पण मेडिकल खर्च कसा झेपणार? म्हणजे आयुष्याची कमाई मुलांना न देता कुठल्या तरी डॉक्टरलाच द्यावी लागेल.
एरवीसुद्धा ओबामांची स्कीम मला तरी चांगली वाटते कारण त्यांने सांगितलेले जर खरे असेल तर अमेरिकन अर्थसंकल्पातील तुटीत या स्कीममुळे एका "पेनी"चीही भर पडणार नाहीं असे त्याने अमेरिकन काँग्रेसला ठासून सांगितले. मग कशाला विरोध?
म्हणूनच ओबामांच्या स्कीमला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ही स्कीम आली तर आम्ही उर्वरित आयुष्य मुलांची पंचाईत होऊ न देता किंवा सर्वांना अवाच्या-सवा खर्चात न टाकता अमेरिकेत काढून तिथेच देह ठेवू शकतो!
ही गोष्ट आता नजीकच्या दृष्टिपथातली आहे (लागले नेत्र रे पैलतिरी) व म्हणूनच असा विचार करण्याची आमच्यासारख्यांना खास गरज आहे.
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!

विजुभाऊ's picture

1 Oct 2009 - 11:42 am | विजुभाऊ

बर्‍याचशा देशांची परकीय गंगाजळी अमेरीका भोगवादी आहे म्हणूनच तरत असते.
अमेरीकेने साधेपणाने रहायचे ठरवले तर अमेरीकेसकट बरेच देश देशोधडीला लागतील जागतीक व्यापार थंडावेल. आपल्याकडचे बरेच लोक बेकार होऊन भारतात परततील

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2009 - 11:53 am | मिसळभोक्ता

आपल्याकडचे बरेच लोक बेकार होऊन भारतात परततील

मग मिसळपावावर आपले फुल्टू मनोरंजन कसे होणार ?

(निवासी युयुत्सुंचे लिखाण वाचत बसावे लागेल !)

(ता. क. येथे, युयुत्सु हे विशेषनाम नसून सामान्य नाम, एका प्रवृत्तीसाठी, म्हणून वापरले आहे.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवलिया's picture

1 Oct 2009 - 11:56 am | अवलिया

(ता. क. येथे, युयुत्सु हे विशेषनाम नसून सामान्य नाम, एका प्रवृत्तीसाठी, म्हणून वापरले आहे.)

या सामान्यनामाच्या विशेष प्रवृत्ती काय काय असतात हो.. ???

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2009 - 11:58 am | मिसळभोक्ता

एकदा नाम सामान्य म्हटले, तर प्रवृत्तीदेखील सामान्य, त्यात विशेष काय ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

टारझन's picture

1 Oct 2009 - 1:55 pm | टारझन

ते म्हणे कुठल्यातरी ब्लॉगवर मिसळपाव चा उल्लेख रिकाम्या माकडांची साईट असा करात =)) आणि इकडेच येतात नवनवे प्रस्ताव घेऊन

-(भरलेला माकडमॅन) टारझन

संजय अभ्यंकर's picture

2 Oct 2009 - 4:24 pm | संजय अभ्यंकर

सामंतकाका व डांबिसरावांची जुगलबंदी रंगली.
ज्ञान व करमणूक दोन्ही साध्य झाले.

अगदि कोकणातल्या एखाद्या घराच्या ओसरीवर बसुन ऐकल्या सारखी मजा आली. डांबिसराव, सामंतकाकांसाठी पान लावता लावता वाद घालतायत असा भास कित्येकदा झाला.

(फक्त "कोकणी संस्कृत" लेखी जुगलबंदी मुळे असल्यामुळे टाळले असे दिसते).

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

3 Oct 2009 - 1:13 am | पिवळा डांबिस

(फक्त "कोकणी संस्कृत" लेखी जुगलबंदी मुळे असल्यामुळे टाळले असे दिसते).
कितीही मतभेद असले तरी सामंतकाका आमकां जेष्ठ आसंत. तेंव्हा त्यांच्या बाबतीत आम्ही "कोकणी संस्कृत" वापरूचों नाय....
आणि अधिकार असून त्यांनी आमच्या बाबतीत "कोकणी संस्कृत" वापरलां नाय हो त्यांच्या मनाचो मोठेपणा...
आपलो,
पिवळो डांबिस