बुमरँग१

राधा१'s picture
राधा१ in जनातलं, मनातलं
14 Aug 2009 - 11:37 am

आज डिलींगरुम मधला माझा १ला दिवस होता. फायनान्स मध्ये पिजी केल्यावर एका चांगल्याश्या खरं तर उत्तम अश्या कॉमोडिटी ट्रेडरच्या हाताखाली ट्रेनिंग मिळणार म्हणुन मी जाम खुश होते. लहानपणी बाबाबरोबर मी नेहमीच शेअरब्रोकरकडे जात होते....माझ्या बाबांचे ते मित्र होते...म्हणुन पुतणी या नात्याने कायमच मी त्यांच्याकडे जायचे. त्यांच्याकडे ते फटाफट सौदे करणारे.. मशिन सारखे पंच करणारे हात बघितले आणि वाटल की आपण पण असे करोडोंचे सौदे टाकावेत जोरात म्हणावे...ओये फटाफट माल लेवोने...माल सस्ता होय से पछी फटाफट लेवो रखो ने....!! असच काहीस अगम्य सुर असायचे त्यांच्या बोलण्यात मला फारस कधी कळल नाही पण मजा वाटायची. काहीजण मालाची डिलिवरी घेणारे पण होते त्यामुळे त्यांचे वेगळे सौदे चालायचे. ह्याला कस पाडल..कोण काय घेत आहे...खरेदी -विक्री...शेअर्रस हे नेहमी सुरु असायच..त्यातुनच मला पण अस वाटल की आपण ही हाच धंदा करावा. लहानपणीच स्वप्न ते...नंतर विसरुन पण गेले..फायनान्समध्ये पीजी झाल्यावर काय करायचे ते ठरत नव्हतं. अचानक एका कंपनीची साइट चेक करता करता..सहज बी.ओ.डी मेंबर बघितले..त्यात एक नाव होत आणि अचानक सकाळी वाचलेल्यान अ‍ॅड ची आठवण झाली..पेपर मध्ये त्याच माणसाने नोकरीसाठी अ‍ॅड दिली होती. सहज करता करता मला नोकरी मिळली ती पण माझ्या आवडीच्या क्षेत्रात. माझ्या होवु घेतलेल्या बॉसला भेटल्यावर अस वाटल की हाच माणुस मला "कॉमोडिटी" क्षेत्रात निपुण करु शकेल.

तर आज माझा १ला दिवस होता.सकाळी सकाळी आई बाबांचा आशिर्वाद, भावाच्या शुभेच्छा घेउन माझ्या स्वप्नपुर्ती साठी मी निघाले होते.
मनात एकाप्रकारची भिती होती ....डोळ्यात स्वप्न होते...आणि उत्सुअकता ही होती...
अखेर ऑफीस मध्ये आले...सर्व फॉरम्यालिटीज पुर्ण केल्या...आणि डिलींगरुममध्ये मला जाउन बसायला सांगीतल...माझा बॉस ला यायला अजुन बराच वेळ होता....

क्रमशः
नमस्कार. प्रथमच मी कथा लिहीण्याचा प्रयत्न करत आहे..पहिला भाग आवडला तरच पुढील भाग लिहिणार आहे.

कथा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

14 Aug 2009 - 11:39 am | अवलिया

सौदेबाजीतले सौदे वाचण्यास उत्सुक...

मोठे भाग येवु द्या ...

--अवलिया

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Aug 2009 - 11:44 am | ब्रिटिश टिंग्या

पुढच्या भागाची लांबी वाढवता आली तर उत्तम :)

स्वाती दिनेश's picture

14 Aug 2009 - 11:48 am | स्वाती दिनेश

टिंगोबासारखेच म्हणते,
स्वाती

सुबक ठेंगणी's picture

14 Aug 2009 - 11:51 am | सुबक ठेंगणी

खरं सांगायचं तर आधी अनुभवच आहे असं समजून वाचली...मग कथा आहे असं कळलं...
टिंग्या म्हणतोय तसं अजून थोडे details देऊन लांबी वाढवता आली असती.
(शेअर्स नाही पण शेअरिंगची आवड असलेली) सुबक

मस्त कलंदर's picture

14 Aug 2009 - 2:20 pm | मस्त कलंदर

सुबक आणि टिंग्या दोघांशी सहमत...

[डी-मॅट अकाउंट उघडूनही न वापरणारी--- नि शेअर बाजारातले ओ की ठो न कळणारी] मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2009 - 4:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राधाताई, पुढचे भागही येऊ द्यात ...

अदिती

अनामिक's picture

14 Aug 2009 - 4:57 pm | अनामिक

पुढचे भागही येऊ द्यात ...

-अनामिक

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Aug 2009 - 11:50 am | बिपिन कार्यकर्ते

भाग आवडला.... आता लिहा पुढे. हा भाग फारच छोटा झालाय हो.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

14 Aug 2009 - 11:59 am | सहज

यापेक्षा मोठा लिहलात व साधारण अंदाज दिलात की किती भाग असणार आहेत तर(च) आवडेल.

छान आहे/असेल, येउ द्या :-)

निखिल देशपांडे's picture

14 Aug 2009 - 1:02 pm | निखिल देशपांडे

पुढचा भाग लवकरच लिहा आणी मोठा टाका
असेच म्हणतो

निखिल
================================

दशानन's picture

14 Aug 2009 - 5:02 pm | दशानन

असेच म्हणतो.

मार्केट म्हणजे काय ओ ? ;)

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

हर्षद आनंदी's picture

14 Aug 2009 - 11:57 am | हर्षद आनंदी

पहिल्या जॉबचा अनुभव फार मजेदार असतो, नंतर आपलेच आपल्याला जाम हसु येते.

लवकर टाका, पुढचा भाग

मदनबाण's picture

14 Aug 2009 - 3:29 pm | मदनबाण

पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

क्रान्ति's picture

14 Aug 2009 - 6:38 pm | क्रान्ति

येऊ दे अजून असेच अनुभव.

[पहिल्याच दगडात सरकारी नोकरी पदरात पडलेली] क्रान्ति
अग्निसखा
रूह की शायरी

प्रसन्न केसकर's picture

14 Aug 2009 - 4:02 pm | प्रसन्न केसकर

पण भाग जरा मोठे द्या. मजा येईल वाचायला हे.

---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

स्वाती२'s picture

14 Aug 2009 - 7:08 pm | स्वाती२

पुढील भाग येऊदे.

विजुभाऊ's picture

15 Aug 2009 - 6:07 am | विजुभाऊ

क्रमशः मंडळीत प्रवेशाबद्दल अभिनन्दन

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

टुकुल's picture

15 Aug 2009 - 6:16 am | टुकुल

<<नमस्कार. प्रथमच मी कथा लिहीण्याचा प्रयत्न करत आहे..पहिला भाग आवडला तरच पुढील भाग लिहिणार आहे. >>...
जाम हसु आले वाचुन...
अहो आम्ही मिपावरील १-२ लाइनिच्या धाग्याला पण वाचतो.. त्या पेक्षा तुमच लिखाण बरच चांगल आहे... अजुन येवुद्यात... पण वरती सर्वांनी लिहिल्याप्रमाणे जरा मोठे भाग टाका..

स्वगतः काय रे तु स्वतः असे किती लिहिले आहेस...

--टुकुल