या कथेतील पत्रांचा परीचयः
मोहनराव आणि विणाताई : मध्यमवयीन .४७ ते ५० दरम्यानचं वय.
संजय आणि निलू : मुलगा आणि सून
जनरल :पैचान कौन?
तशी घराघरात घडणारी कथा .पण निसर्गाला थोडसं गृहीत धरण्याची चूक कोण करत नाही ?
वयाचा आडपडदा निसर्ग ठेवत नाही हे खरं एक छोटीशी चूक किती मोठं रूप धारण करते हे सांगणारी कथा.
या कथेतील डी&सी चा अर्थ गूगलवर बघावा.-----------------------------------------
मोहनराव : हे आक्रीतच. नाहीतर काय.
मी गेलो होतो सकाळी त्या दिवशी बॅटरीवाल्याकडे.
संजय आणि निलू गाडी घेऊन जाणार म्हणून म्हटलं काही वाटेत अडचण व्हायला नको.
बॅटरीवाला कामटे म्हणजे माझा क्लासमेट .
मला म्हणाला सेल विक झालेत मोहन .बॅटरी बदल की आता.
मी म्हटलं बाबा रे कंपनीची गाडी .
आता मी कुठे नविन बॅटरी टाकू.
आता गाडी बदलायची हिंमत नाही रे बाबा आपली.
मला टाळी देऊन म्हणाला.
यार आपलं आता लफडं आहे.
गाडी बदलायची डेरींग नाही आणि सेल विक झाले म्हणून चार्जींग होत नाही.
तेव्हढ्यात आठवलं संजय आणि निलू गेलेत दिवाळी पाडवा पहाटच्या प्रोग्रॅमला.
मग घरी आलो.
मनात सारखं येत होतं आताशी चार्जींग होत नाही खरं .
दोन वर्षापूर्वी संजय गेला होता हनीमूनला तेव्हा दोन दिवस जर्रा बरे गेले होते.
ही आयएससोची जबाबदारी बेकार.गेली बारा वर्षं नुसता फिरतोय. टोटल क्वालीटी मॅनेजमेंट करता करता बॅटरीचे सेल विक झाले.
त्यानंतर त्या दोन दिवसाचा एव्हढा मोठा घोटाळा.
सालं क्युरेटीन करायला लागलं .
ही तरी सांगणार कुणाला मुलगा हनीमूनला आणि घरात आई..
नव्या सुनेला काही सांगायचं नाही.
तरी टीव्हीवर सांगतात सूनेला मैत्रीण समजा.
पण नाही .
आताशीच आलेय ती .मैत्री कुठे व्हायला.
मग शेणॉयचे पाय धरले.
बदलापूरला प्रोसीजर केली .फार त्रास झाला.
घरी आल्यावर निलूनी विचारलं तर सांगते काय बारवीचं धरण बघायला गेलो होतो.
यावेळी चेन्नईला गेलो होतो .
दोन साड्या आणल्या .
एक हिच्यासाठी एक निलूसाठी.
चॉईस आधी तिला विचारला म्हणून रुसवे फुगवे.
नंतर हिला म्हटलं
अगं , तुझ्या रंगाला कुठलाही रंग खुलतो .
मग समाधान झालं .घरी जाऊन बघतो तर काय बाईसाहेबांनी तीच साडी..
आपला पण तोल जातो कधीतरी.मग काय...
आमचा दिवाळी पाडवा घरीच.
खरं सागतो राव तीस वर्षं झाली लग्नाला पण आजही..
कोण म्हणतो सेल विक झालेत...
विणाताई:
मला ना काय झालं आहे ते कळतच नाही.
मोहनला वेळ नाही.घरात बायको आहे आणि नाही .कंपनीच्या नावावर महीन्यातले विस दिवस बाहेरच असतो.
घरी आल्यावर दमलेला असतो. मनात काहीवेळा येतं
हा विमानानी जातो -येतो मग दमतो कशानी ?
याचं बाहेर काही लफडं तर नाही ना ?
माझ्याकडून त्याचं काही होत नाही हे पण खरंच आहे.
मला आताशा दमायला फार होतं.चिडचिड फार वाढली आहे.सगळ सायकल पण आता अनियमीत झालंय.
असं होतंच म्हणे .टीव्हीवर त्या डॉक्टरणीनी सांगीतलं तसंच होतंय आजकाल. आता ह्याला दोष द्या कशाला ?
पाडव्या दिवशी मात्र आम्हाला दोघांनाही रहावलं नाही.
निलूची काहीतरी गडबड वाटतेय मला. काल चक्कर आली म्हणून ऑफीसला गेली नव्हती. आजकालच्या मुली काही सांगत नाहीत.
पण कचर्यात बरेच दिवस गोळ्यांची रिकामी फोतरं दिसली नाहीत खरी.
संजयला विचारलं तर तो म्हणतो ते बायका बायका तुम्ही जाऊन या डॉक्टरकडे.
एकदाची निलू तयार झालीय डॉ.पंड्यांकडे यायला.
हा डॉक्टर काही आमच्या ओळखीचा नाहीय्ये. निलूच्या एका मैत्रीणीचा चुलत भाऊ इथे काम करतो म्हणे.हॉस्पीटल चांगलं मोठं आहे. तरतरीत नर्स आहेत. डॉक्टर सगळेच तरुण आहेत. गर्दी बरीच होती.
निलूनी जाऊन फक्त विचारलं जनरल कुठे आहे ?
मी म्हटलं जनरल नको गं आपण स्पेशलमध्ये जाऊ.
नंतर मला कळलं की तिथे चारी बाजूनी धावपळ करणारा एक उंच किडकिडीत मुलगा म्हणजे जनरल.
डॉक्टर येण्याआधी पेशंटला विचारून चौकशी करणारा.
थोड्या वेळानी दोन डॉक्टर आले.
जनरलशी ओळख असल्यामुळे नंबर ताबडतोब लागला.
डॉक्टर बराच बोलका होता पण लुब्रा वाटला नाही. निलूला सांगत होता .यु आर लकी. बघ सासू किती चांगली अहे तुझी .अशी सासू मिळाली तर आईची आठवण येणार नाही वगैरे...
मग निलूला घेऊन आत गेला. माझ्या छातीत उगाच धडधड.
हसत हसत दोघंही बाहेर आली तेव्हा तेव्हा जीव भांड्यात पडला.
मला म्हणाला नो प्रॉब्लेम .बट धिस इज नॉट गूड.
नेक्स्ट टाईम हे चालणार नाही . प्रॉब्लेम झालाच पायजे आता. लग्नाला दोन वर्षं झाली ना ?
मला कसं मोकळं मोकळं वाटत होतं.
मग निलूच म्हणाली आई आपण आलोच आहे तर डॉक्टरांना तुम्हीही दाखवून घ्या ना.
खरं सांगू ? माझ्याही मनात तसंच होतं .
आधी नाही म्हणले मी पण डॉक्टरही म्हणाले अहो आलाच आहात तर एकदा तर तपासू या.
तुम्ही आता फीट्ट असायला पाहीजे ही मुलं कधीही तुमची जबाबदारी वाढवणार आहेत.
मग गेले बाई मी आत.
डॉ. अविनाश : आमचा पंड्या सांगतो ते खरंच आहे. प्रत्येक पेशंट वेगळाच अनुभव देऊन जातो.सगळं काही एक असलं तरी काहीतरी वेगळ निघतंच.
आता या मॅडम. मॅनॉपॉजच्या जवळ आल्या म्हणून अगदी बिनधास्त.
हिस्ट्री काढताना पंधरा विस मिनीटं गेली.
आमचं तसं काही नाही आता. दहावेळा सांगत होत्या.
निसर्ग आपली कामं बिनबोभाट करत असतो.
माझ्या अंदाजानी मॅडम प्रेग्नंट आहेत.
अंदाज कसला .खात्री आहे. क्लीअरकट मिनीमम टेन विक्स ऑफ प्रेग्नन्सी.
आता ह्या पुढचं काम जनरलला देतो. ही ब्रेकींग नुय्ज म्हणजे ह्यांच्या घरात खळबळ-खळबळ.
यु नेव्हर नो. टू अर्ली टू कमेंट. सगळ्या टेस्ट लिहून दिल्या . पण आधी जनरल कडे पाठवतो.असली किचाट काम तोच करू जाणे.
जनरल : पंड्यांच्या सगळ्या ज्युनीअरना फटके मारली पायजेत. नसती खेंगट पाठवतो माझ्याकडे.
या बाईला आताच सांगू की नंतर हाच प्रश्न मोठा आहे.
लाख छुपाओ छुप न सकेगा राज इतना गहेरा.
एक शहाणपणाचं काम केलं .पोटात काहीतरी गोळा आहे असं वाटतं म्हणून सांगीतलं .
उद्या ह्यांच्या सुनेला बोलावून घेतो .तिलाच सांगू दे काय ते.
बाकी या ज्युनीअरची मला कमाल वाटते. याचा अंदाज कधी चुकलेला बघीतलेला नाही.
हा दहा म्हणत असेल दहाच आठवडे झाले असतील .
पंड्या सर एकेक हिरे शोधून आणतात.
आता मलाच आणलं नाही का ?
इथे नसतो आलो तर कुठेतरी उदबत्त्या विकायची वेळ आली होती.
म्हणजे अगदी असंच नाही पण मेडीकल रेप होऊन वेगळं काय केलं असतं?
उद्या सर आल्यावर बघू या काय म्हणतात.
निलू :मला बाई बरं वाटलं .
काहीच नाही.
तशी आमचीही आत्त्ता काही मनाची तयारी नाहीय्ये.
पण दोन महीन्यापूर्वी एकदा दोनदा काहीतरी विसरल्यासारखं वाटलं होतं .
आता गोळ्या दिल्यात म्हणजे सगळं काही नॉर्मल होईलच. काळजी घ्यायला हवी हे खरं.
जाता जाता जनरल मागे मागे आला .
सासूबाईंना उद्या सोनोग्रफीसाठी घेऊन ये म्हणाला .
कशाला ? तर म्हणे घरी गेल्यावर फोन कर.त्यांचं डायग्नोसीस ऐकून मी तर हबकलेच. आईंना दिवस गेलेत म्हणे.अरे देवा !!!!
कोणाला मदतीला घ्यायचं काही कळत नाही.
अंगावर आलेलं झटकूनही टाकता येणार नाही.
संजयच्या घरात सगळेच भारी रसीक आहेत हे खरंच पण दहा आठवडे म्हणजे ?
अय्या ....आठवलं .आमचा कांजीवरम डे.
ह्यांचा ही तोच दिसतोय्.
मोहनराव : कालच रात्री आलो. आज ही डॉक्टरकडे गेली होती म्हणे.
माझ्या अंगावर धावूनच आली.
हे तुमचे लाड अंगाशी आलेत असं म्हणत रडायला लागली.
मी विचारण्यात काही अर्थ नव्हता.
आता शेणॉय पण बदलापूरला नाही.
उद्याच करायचं म्हणतायेत.
तरीच माझ्या नजरेला कुणी नजर देत नव्हतं.तरी बरं संजयला कुणी काहीच बोललं नाही ते.
आपलं पण नशीब आख्खी रात्र खराब झाली.
जनरल : आज आली मंडळी सकाळी सकाळी.
पंड्या सरांनी विशीला आणि अविनाशला आत बोलावून घेतलं .
सर आजकाल डी &सी मध्ये काही बघत नाहीत.
ज्युनीअरना इतकं तयार केलं आहे की ही दोन्ही पोरं दिवसातून पंचवीस तीस सक्शन करतात.
दिवसभर सक्शन आणि डी&सी म्हणजे माणूस म्याड होईल.
तरी या बाई थोड्या सीनीअर आहेत म्हणून एक नजर तरी टाकली.
मी नेहेनीप्रमाणे हिस्ट्री वगैरे चोख तयार ठेवली होती.
बाईंचं हिमोग्लोबीन वगैरे एकदम नॉर्मल.
फॅमीली आणि प्रीव्हीयस काही नाही.
शुक्रवारची तारीख घेऊन मंडळी गेल्यावर मनात विचार आला आपण या वयात काही करू का असं ?
तीन युनीट ब्लड सांगून क्रॉस मॅच करायला सांगीतलं आहे.
खरं म्हणजे या प्रोसीजरला कशाला येव्हढी तयारी. बहुतेक मॅडमच्या वयाकडे बघून सांगीतलं असेल.
--------------------------------------------------------------------
शुक्रवार .सकाळी साडेदहा:
जनरल
मॅडम आणि त्याचा नवरा सकाळी साडेनऊपासून येऊन बसलेत.
ह्यांची सून आली साडेदहा वाजता.
ती आल्यावर हा बाप्या उठून बाहेर फेर्या मारायला लागला.
साडे अकरा :
जनरल : अॅनास्थेटीस्ट बीपी वगैरे बघून गेला.लोकल करताना जास्त टेन्शन नसतं.
अविनाश आला तो सरळ आत.दोन नबरला टाकली आहे केस.
सव्वा बारा : अविनाश ओटीतून धावत का येतोय. ?
आयला याला तर घाम आलाय.
काय झालं बाबा.
जनरल सरांना फोन लाव.
मी त्याच्याकडे बघीतलं तर ओरडलाच.
अबे परफोरेशन हो गया है.
मी धावत बाहेर.
या टेलीफोन ऑपरेटरच्या आयला..
सकाळी सकाळी नवर्याला फोन लावते.
सरांना फोन लावला तर नोकरानी घेतला.
सर बाहेर गेलेत सांगून फोन ठेवून दिला.
मागे वळून बघतो तर अॅनास्थेटीस्ट थरथरत उभा.
अरे ब्लड आहे ना ?
तीन युनीट आणली होती .
अरे ,मी काय करू ?
आता मी काय सांगू .
त्यानी त्याच्या सीनीअरला फोन लावला.
तो त्याच एरीआत एक हर्नीया संपवण्याच्या तयारीत होता .
अरे यार पंड्या सर कुठे आहेत.
मॅडमची पल्स अजून तरी ठिक आहे.पण ओटीत दुसरा गाऊन मागवला म्हणजे विशीच्या अंगावर.
हे भगवान ..
पंड्या सरांना शोधू कुठे सर जात नाहीत कुठेच.
बाजूच्या मशीदीतून अल्ला हो अकबर चा आवाज आला आणि ट्यूब पेटली.
शुक्रवार म्हणजे सर रीगलल किंवा इरॉसला पहील्या शो ला बसले असणार.
धावत काउंटरवर गेलो.डिरेक्टरी काढली.
इरॉस आणि रीगल दोन्ही कडे फोन लावला.
दोन्हीकडे पारशी मॅनेजर आहेत.
सिनेमाच्या मध्येच डॉक्टर पंड्याच्या नावानी स्लाईड टाकायला सांगीतली.
मोहन राव :
हे काय झालं ?
हा डॉक्टर का बोलावतोय मला.
आणि पांढरा फटफटीत का पडलाय हा ?
आधीची हिस्ट्री काय म्हणून विचारतोय.
मी बदलापूरचं सांगीतलं .त्यानी शेणोयला शिव्या घातल्या .आधीचं क्युरेटीन करताना युटेरसच्या वॉलला धक्का लागून एक टवका निघाला होता म्हणे. त्यातून हे काँप्लिकेशन.
निलूसमोर शिव्या घातल्या त्यानी मला .
आता मला काय माहीती हिनी लपवाछपवी केली आहे ते.
अॅढेशन का काय ते होतं म्हणे .
सक्शन करायला गेले तर कॅनुला का काय ते आतड्यापर्यंत पार झाला म्हणे.
सर नाही आले तर के ईएमची तयारी ठेवा म्हणे..
देवा ,एका दिवसाच्या मोहाची किती मोठी सजा ...
जनरल : दहा मिनीटं सगळ्या लायनी मोकळ्या ठेवायला सांगीतल्या.
पंड्या सरांचा फोन पंधराव्या मिनीटाला आला.
जनरल काय झालं ?
मी परफोरेशनच सांगीतलं .
अविनाश लाईन घेईपर्यंत माझ्या इंस्ट्रक्शन पूर्ण झाल्या होत्या.
तीसरे ड्रॉवर मे रख्खा है वो सब इंस्ट्रुमेंट ऑटॉक्लेव कर जनरल.
मै १५ मिनिट मे पहुंचता हुं.
अनेस्थेटीस्ट मै मेरा लेके आ रहा हुं.
तुम चिंता मत कर. परफोरेशन से हुवा इंटेस्टीनल इंजुरी नया नही मेरे लिये.
क्या उमर है पेशंट की? पचास ? हे राम? ठीक है.
पेशंट को स्टेबल रखनेका इंतजाम करनेको बोलो अविनाश को.
उसका पहीला विकेट है ना. उसको चाय पिला. दिमाग थंडा रखनेको बोल.
बाय द वे साले तेरे को मै रीगल मे है ये कैसे मालुम पडा.
अंदाज किया क्या?
पिक्चर रोकके स्लाईड लगानेका आइडीया सॉलीड.
दुपारी चार वाजता
जनरलः दुसरा कोणीही असता तर म्हातारी वाचली नसती. २७ मिनिटात रीगल वरुन हजर. त्याला बघीतल्यावर जिवात जीव आला.
३ युनीट आणि दिड तासात केस थ्रु.
जाताना केस विसकटुन म्हणतो कसा?
" साले हलकट है तु"
हा बाबा हलकट म्हणणं म्हणजे राष्ट्रपतीच्या सहीचं प्रशस्तीपत्रक समजायचं
मी नही पहुंचता तो ये केस गयी थी.
मला अजून एक कळलं नाही ह्या म्हातारीनी आधीच्या डी&सी ची हिस्ट्री दिली असती तर ?
पण बायका नाही सुधारणार आणि पुरुषही .
थोडक्यात काय आपली नोकरी चालू रहाणारच.
प्रतिक्रिया
3 Aug 2009 - 11:58 am | सहज
मास्तर भारी व आता मास्तरचे लेखन देखील लै भारी!!
जियो!!!
3 Aug 2009 - 6:17 pm | अवलिया
+१ सहमत
3 Aug 2009 - 12:02 pm | सुनील
जबरा पर्भूमास्तूर!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Aug 2009 - 1:23 pm | पक्या
अहो पण लोक बर्थ कंट्रोल पिल्स का घेत नाहीत?
आणि क्युरेटिंग की अबॉरशन पिल्स असा पण ऑप्शन असतो. पण वरील केस मध्ये १० आठवडे झाल्याने बहुधा सर्जिकल अबॉर्शन केले असावे पण त्या आधी (बदलापूरच्या वेळेस) क्युरेटिंग ची अशी रिस्क घेण्यापेक्षा पिल्स घेता आल्या असत्या ना.
3 Aug 2009 - 5:22 pm | स्वाती२
>>अहो पण लोक बर्थ कंट्रोल पिल्स का घेत नाहीत?
बाईंच्या वयोगटासाठी आजही बर्थ कंट्रोल पिल्स योग्य नाहीत.
3 Aug 2009 - 3:59 pm | विनायक प्रभू
१९७५ म्धे अबोर्श्न पिल्स नव्हत्या भौ.
3 Aug 2009 - 4:05 pm | पक्या
ओक्के , पण लेखात कथेचा काळ कुठे सांगितलाय तुम्ही?
3 Aug 2009 - 5:18 pm | बिपिन कार्यकर्ते
मास्तर, लगे रहो. होतं असं कधी कधी.
खुद के साथ बातां: टुरिंग कमी करावं म्हणतोय.
बिपिन कार्यकर्ते
3 Aug 2009 - 5:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मॉरल ऑफ द स्टोरी: डॉक्टर (आणि वकिलापासून) काहीही लपवू नये.
अदिती
3 Aug 2009 - 6:27 pm | सुनील
मॉरल ऑफ द स्टोरी: डॉक्टर (आणि वकिलापासून) काहीही लपवू नये.
डॉक्टरला खोटे आणि पत्नीला (पतीला) खरे कधीही सांगू नये!
सुनील खरे/खोटे
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Aug 2009 - 5:40 pm | स्वाती२
सर, लेख आवडला. बाईंनी निट हिस्टरी सांगायला हवी होती. नाही त्या बाबतीत बायका संकोच बाळगतात आणि असे जिवावर बेतायची वेळ येते.
3 Aug 2009 - 9:41 pm | रामदास
कथा आवडली .क्रिप्टीक लिहीत जा .
सगळं काही सजावून सांगीतलं की तुमच्या कथेतली गंमत निघून जाते बॉ.
3 Aug 2009 - 9:42 pm | रामदास
कथा आवडली .क्रिप्टीक लिहीत जा .
सगळं काही सजावून सांगीतलं की तुमच्या कथेतली गंमत निघून जाते बॉ.
3 Aug 2009 - 10:25 pm | टारझन
कमाल आहे !! पण काल सांगितलेली "पाच वर्षे चुकीच्या भुमीवर युद्ध" ह्या कथेनंतर तुमच्या इतर कुठच्याही कथेचं "अ रे बा प रे !!!" असं होणार नाही !!
त्यामुळे .. लेखन उत्तम केलंय !! आहो रामदास काका .. तुम्ही कल्हई समुपदेशन सुरू करा हो !!
-टारझन
4 Aug 2009 - 10:03 am | निखिल देशपांडे
पण काल सांगितलेली "पाच वर्षे चुकीच्या भुमीवर युद्ध" ह्या कथेनंतर तुमच्या इतर कुठच्याही कथेचं "अ रे बा प रे !!!" असं होणार नाही !!
असेच म्हणतो हो मास्तर..
बाकी हे ही मस्तच लिहिले आहे
निखिल
================================
4 Aug 2009 - 12:14 am | विजुभाऊ
सून घरात आली असताना सासू ला दिवस गेले यात काही बिघडले आहे असे माझ्या आजीच्या पिढीला काही गैर संकोच वाटणार नाही
त्या काळात पहिले मूलच चौदा/पंध्राव्या वर्षी व्हायचे. आणि अष्टपुत्रा सौभाग्यवतीचा अशिर्वाद त्यामुळे बरेचदा पहिला नात/नातू हा एखाद्या आत्या काकापेक्षा मोठा असायचा.
( आदर्शवत रामाने हम दो हमारे दो चा आदर्श केंव्हाच घालून दिला होता. लोक तो सोयीस्कर विसरतात)
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
5 Aug 2009 - 1:47 am | सुहास
छानच लेख..! छोटी मेडीकल थ्रिलर..!
जनरल ची आयडीया आवडली..
..सुहास
5 Aug 2009 - 2:04 am | भडकमकर मास्तर
मस्त .. प्रभू मास्तर ..
रामदास स्टाईल सिनेमासारखी गोष्ट वाटली... फार छान कथा...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
5 Aug 2009 - 4:25 am | पाषाणभेद
जनरल म्हणजे तुम्ही आहेत काय सर?
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
5 Aug 2009 - 9:22 am | झकासराव
जनरल एकदम पेशल लिवलत. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao