मी हा लेख वर्षभरापूर्वी आंतरजालावर बघीतला होता. त्यात लेखिकेचे नाव सौ. निर्मला आपटे असे दिले आहे! नक्की कुठून मी ऊतरवला होता ते लक्षात नाहीये, पण दुवा शोधून ठेवतॉ.
त्या विद्यार्थिनीने सरळ-सरळ सगळेच मूळ लिखाण उचलले आहे - एका अर्थी हे बरोबर नाही कारण हे तिचे स्वतःचे विचार नाहीत.
पण असो, असे चांगले विचार उचलण्याची बुध्दी झाली हे ही नसे थोडके!
मूळ लेख छानच आहे.
खरंच पाणी आलं डोळ्यांत. माझ्या लग्नाचे वेळी बाबांनी डोळ्यातून अजिबात पाणी नाही काढले पण नंतर आई आणि भावाकडून समजले की कितीतरी वेळ बाबा माझ्या खोलीत जाऊन एकांतात माझ्या आठवणीनी रडले...
माझ्या पहिल्या नोकरीच्यावेळी.. मला तेव्हा मिळणार्या पगाराइतकीच रक्कम दर महिन्याला माझ्या हातावर ठेवताना त्यांचा अभिमानाने फुललेला चेहरा मला अजून आठवतो. .... माझे बाबा.... बास..!
ब्-याच महिन्यापुर्वी विरोपात वाचला होता. मला वाटते 'फादर्स डे' च्या दिवशी. असो निबंध जसाच्या तसा परीक्षेत लिहिणे हेहि नसे थोडके. स्वतःचे लिहिणारे फार थोडे असतात. त्यात ती फारशी (नव्हे जरादेखील) भर टाकू शकली नाही. तिची शैली त्यात जाणवली नाही. भावनिक आवाहनाचा जमाना आहे बाबांनो. ही व्यवहारचतुर मुलगी आयुष्यात यशस्वी होईल.
प्रतिक्रिया
20 Feb 2008 - 2:14 pm | राजमुद्रा
खरंच अप्रतिम!
खरंच मी आजपर्यंत येवढा विचारच केला नव्हता कधी :)
राजमुद्रा
20 Feb 2008 - 2:19 pm | प्रभाकर पेठकर
स्वामी तिन्ही जगाचा बापाविना उदास......
हल्ली शाळेत निबंधासाठी 'बाप' असा विषय देतात? आमच्या वेळी 'माझे वडील' असा विषय असायचा.
20 Feb 2008 - 2:34 pm | राजमुद्रा
हल्ली शाळेत निबंधासाठी 'बाप' असा विषय देतात? आमच्या वेळी 'माझे वडील' असा विषय असायचा.
पेठकरांशी सहमत!
("आमच्यावेळी" हा शब्द वाचून आमच्या वयाबद्दल गैरसमज करून घेवू नये)
राजमुद्रा:)
20 Feb 2008 - 3:02 pm | मोहन
डोळे भरून आणणारा निबंध! नवी पिढी फारच हुशार होत चालली आहे. आमचे शाळेतले निबंध आठवले !?
मोहन
20 Feb 2008 - 3:50 pm | धमाल मुलगा
काय बोलू?
निब॑धातल्या त्या दिवट्या॑च्यात आणि आमच्यात काही प्रमाणात का होइना पण साम्य सापडल॑.
त्या वेळी नाही पण आता कळत॑य, आबा असे का वागायचे.
असो, देर आये..दुरुस्त आये. धन्यवाद दुनियाजी.
20 Feb 2008 - 4:16 pm | बिपिन कार्यकर्ते
अचानक... स्क्रीन वरचे दिसेनासे झाले आहे... प्रतिक्रिया लिहायची आहे पण नंतर लिहिन....
बिपिन.
20 Feb 2008 - 7:15 pm | चंबा मुतनाळ
मी हा लेख वर्षभरापूर्वी आंतरजालावर बघीतला होता. त्यात लेखिकेचे नाव सौ. निर्मला आपटे असे दिले आहे! नक्की कुठून मी ऊतरवला होता ते लक्षात नाहीये, पण दुवा शोधून ठेवतॉ.
20 Feb 2008 - 7:34 pm | डॉ.प्रसाद दाढे
आपल्या वडिला॑विषयी कॉलेजमधील मुलीला असा विचार करावासा वाटतो आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
21 Feb 2008 - 12:26 am | चतुरंग
त्या विद्यार्थिनीने सरळ-सरळ सगळेच मूळ लिखाण उचलले आहे - एका अर्थी हे बरोबर नाही कारण हे तिचे स्वतःचे विचार नाहीत.
पण असो, असे चांगले विचार उचलण्याची बुध्दी झाली हे ही नसे थोडके!
मूळ लेख छानच आहे.
चतुरंग
21 Feb 2008 - 12:38 am | स्वाती दिनेश
मलाही हा लेख ढकललेल्या विरोपातून फार पूर्वी मिळाला होता,तसेच तो मनोगतावरही कोणीतरी ढकललेले विरोप अशा शीर्षकाखाली प्रकाशित केला होता.
स्वाती
21 Feb 2008 - 7:06 am | प्राजु
खरंच पाणी आलं डोळ्यांत. माझ्या लग्नाचे वेळी बाबांनी डोळ्यातून अजिबात पाणी नाही काढले पण नंतर आई आणि भावाकडून समजले की कितीतरी वेळ बाबा माझ्या खोलीत जाऊन एकांतात माझ्या आठवणीनी रडले...
माझ्या पहिल्या नोकरीच्यावेळी.. मला तेव्हा मिळणार्या पगाराइतकीच रक्कम दर महिन्याला माझ्या हातावर ठेवताना त्यांचा अभिमानाने फुललेला चेहरा मला अजून आठवतो. .... माझे बाबा.... बास..!
- (बाबांची अतिशय लाडकी)प्राजु
21 Feb 2008 - 7:56 am | विकास
कोणी का लिहीलेला असोत लेख/निबंध नक्कीच चांगला आहे.
वरील प्रतिक्रीया पाहून जालावर शोधल्यावर अजून काही दुवे मिळाले:
या दुव्याप्रमाणे हा लेख सायली दिवेकर यांचा !
या दुव्याप्रमाणे देव जगताप हे लेखक आहेत.
विभास नावाच्या ब्लॉगस्पॉट प्रमाणे हा निनावी लेख आहे.
थोडक्यात एक कोणीतरी निनावी लेखक/लेखिका आहे बाकी सगळी "बाप" माणसे आहेत!
21 Feb 2008 - 12:21 pm | मनिष
पण खरच छान आहे....आणि महत्वाचे म्हणजे कधी नव्हे ते पुरुषांबद्दल, पुरुषांच्या संवेदनशीलतेबद्दल जाणईव ठेवून लिहिले आहे, त्यामुळे मनाला फारच भावले! त्यावरून माझी एक जुनी कविता आठवली, तिचा दुवा इथे देत आहे.
http://ramblings2reflections.wordpress.com/2006/11/24/papa-wont-preach/
मुळ कविता इंग्रजीत असल्यामुळे ती इथे दिली नाही.
- मनिष
21 Feb 2008 - 10:17 pm | सर्वसाक्षी
कुणी का लिहिला असेना, निबंध वाचनिय आहे. मुख्य म्हणजे भाषा अकृत्रिम आहे.
22 Feb 2008 - 9:36 am | विसोबा खेचर
मला हा निबंध ठीक वाटला! वरच्या मंडळींप्रमाणे इतका काही खास वगैरे वाटला नाही!
असो..
आपला,
(मातृभक्त!) तात्या.
24 Feb 2008 - 1:49 pm | सुधीर कांदळकर