( अजून एक विडंबन केलं आहे)

बामनाचं पोर's picture
बामनाचं पोर in जे न देखे रवी...
29 Jul 2009 - 6:13 am

.. सर्वत्र दरवळणारा हा मस्त सुगंध...
कोणी हाकलले तरी मी जाणार नाही...

खारावलेल्या बर्फातले थंडगार शरीर तुझे..
बघताच मन पाघळुन गेले माझे...

'तीच्या' प्रसन्न हास्यानेच दिला होता इशारा
तुझ्या अस्तित्वाचा..

पण 'ती' नेहमीच तुझ्यावर बारीक लक्ष ठेवते ...
आणि मला झुरवते

झालय आता नेहमीचच मला
पण मी देखिल दबा धरुन बसलोय...

कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला ?
.. तु ताजा पापलेट टोपलीतला
.. अन मी बोका टपलेला

-----------
'ती' हे कोळीणीला उद्देशून आहे..

हास्यविनोदविडंबन