एक अनुभव

विमुक्त's picture
विमुक्त in जनातलं, मनातलं
22 Jul 2009 - 4:15 pm

काल मी PMT नं डेक्कनला चाल्लो होतो.. मी पुरुषांच्याच seat वर बसलो होतो... बस एकदम full भरली होती... महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बरेच पुरुष बसले होते... एका स्टाँपवर आजीबाई चढल्या... माझ्या seat जवळ येऊन उभ्या राहील्या... मला वाटलं की त्या कोणाला तरी उठवतील (राखीव seats वर बसलेल्यांपैक्की )... पण नाही.... त्या तश्याच उभ्या राहील्या... मग मीच उठून आजीबाईंना बसायला दीलं (एकतर....महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बसलेल्या एकातरी पुरुषानं आजीबाईंना बसायला द्यासला हवं होतं.. किंव्वा आजीबाईंनी कोणालातरी उठवायला हवं होतं...किंव्वा मास्तरनं कोणाला तरी उठऊन आजीबाईंना बसवायला हवं होतं, पण त्याच कोण ऐंकणार म्हणा... ).... काही स्टाँपस् नंतर आजीबाईंना उतरायच होतं... तर आजीबाईंनी काय करावं?....मागे उभ्या असलेल्या एका महिलेला बोलावलं (ही महिला हट्टीकट्टी होती..म्हणजे म्हातारी नव्हती..), त्या seat वर बसवलं आणि मग त्या उतरल्या... (मी उठून त्यांना बसायला दील्यावर किंव्वा त्या उतरत असताना...एकदापण आजीबाईंनी माझ्या कडं पाहीलं नाही..किंव्वा हसल्या नाही..)....

मी मात्र आजीबाई बसल्या होत्या तीथंच उभा होतो.....त्या बरोबर की चुक वागल्या हे मला महीत नाही, पण मनातल्या-मनात मला फार हसु आलं......

कथाअनुभव

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Jul 2009 - 4:25 pm | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ

अवलिया's picture

22 Jul 2009 - 4:40 pm | अवलिया

हॅ हॅ हॅ

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2009 - 4:42 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅ हॅ हॅ

बिपिन कार्यकर्ते

पर्नल नेने मराठे's picture

22 Jul 2009 - 7:03 pm | पर्नल नेने मराठे

:D

चुचु

चिरोटा's picture

22 Jul 2009 - 4:33 pm | चिरोटा

आजीबाई स्त्री विरुध्ध पुरुष गेम खेळत होत्या.त्यात तुमचा 'बळी' गेला.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

महेश हतोळकर's picture

22 Jul 2009 - 4:38 pm | महेश हतोळकर

बहुगुणींच्या शब्दात
"इट वॉज अनइंटेश्नल कॅज्युअल्टी अ‍ॅण्ड यु वेअर अ‍ॅट रिसीव्हिंग एण्ड"
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

धमाल मुलगा's picture

22 Jul 2009 - 4:59 pm | धमाल मुलगा

कस्सला जबरा टाकलात सरकार :)

बा विमुक्ता,
हे आहे हे असं आहे. नेकी कर और दरिया में डाल!
आता मला एक सांग, इथं त्या आजी आणि दुसर्‍या बाईंऐवजी जर आपण पुरुषमंडळी असतो तर??????????? ह-ल्ल-क-ल्लो-ळ!
चालायचंच..आपण नीट वागायला जातो ही चूक आपली :(
इथुनपुढं, "माझ्याआधी उतरणार असाल तर बसायची जागा परत मलाच देणार असाल तर तुम्हाला आत्ता जागा देतो" असं कबूल करवून घ्यावं लागतं की काय?

(बोंबला, बोलता बोलता काडी तर टाकून बसलोय, आता पळतो ;) )

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2009 - 5:01 pm | बिपिन कार्यकर्ते

इथुनपुढं, "माझ्याआधी उतरणार असाल तर बसायची जागा परत मलाच देणार असाल तर तुम्हाला आत्ता जागा देतो" असं कबूल करवून घ्यावं लागतं की काय?

मूळ प्रसंग पुण्यात घडलेला असल्यामुळे असे सांगत बसायच्या ऐवजी सरळ एक पाटी बनवून ती गळ्यात घालूनच बसले तर? काय बोल्तो?

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

22 Jul 2009 - 5:04 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))
आणि नेमकं त्याच बसमध्ये विजुभाऊ असले म्हंजे झालं का? कच्चकन फोटो काढतील आणि टाकतील इथं मिपावर :D

बाकी, हम कुऽऽश नै बोलेगा...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हय :P

-(बहादूर) धमाल थापा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2009 - 5:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कल्जि घेने.

पुन्हा एक पुणेकर - पुण्याबाहेरचे वाद झडणार दिसत आहे, आता काय बरं काडी टाकावी?

आज्जीबाई मिपाकर नाहीत ना??

अदिती

श्रावण मोडक's picture

22 Jul 2009 - 6:29 pm | श्रावण मोडक

त्यावेळी तू तर इथंच होतीस. मिपावर. :)

विमुक्त's picture

22 Jul 2009 - 6:17 pm | विमुक्त

परत बसायच जावुदे रे.... पण एखदा जरा हसल्या असत्या तरी बरं वाटलं असतं....

रेवती's picture

22 Jul 2009 - 6:21 pm | रेवती

आता आजीबाई हसून काय उपयोग?
काहीतरीच बोलता बुवा तुम्हीपण!;)

रेवती

विमुक्त's picture

22 Jul 2009 - 6:25 pm | विमुक्त

म्हणजे... acknowledge तरी केल्या सारखं वाटलं असतं....

रेवती's picture

22 Jul 2009 - 6:20 pm | रेवती

अगदी हेच मनात आले.
रेवती

दत्ता काळे's picture

22 Jul 2009 - 5:50 pm | दत्ता काळे

तुम्ही दाखवलेल्या 'स्रीदाक्षिण्याला' मिळालेला प्रतिसादच समजावा, कि जो तुमच्या मनातून कुणीही उडवू शकणार नाही =))

बेचवसुमार's picture

22 Jul 2009 - 7:01 pm | बेचवसुमार

आता पुढील वेळी काय करणार?

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jul 2009 - 7:22 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्ही त्यांना जागा देउन त्या म्हातार्‍या असल्याची जाणीव करुन दिल्यामुळे चिडल्या असतील हो ;)

वरती हॅ हॅ हॅ करुन हिन आणी हिणकस प्रतिसाद देणारे सदस्य म्हणजे मिपाला लागलेली किड आहे.

©º°¨¨°º© पराकिडा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

ऋषिकेश's picture

22 Jul 2009 - 8:53 pm | ऋषिकेश

हॅ हॅ हॅ!!!

(किडका) ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

क्रान्ति's picture

23 Jul 2009 - 9:39 pm | क्रान्ति

त्यांच्या घरात त्या आजीबाई अस्तील, म्हणून बाहेर पडल्यावरही तुम्ही त्यांच्या आजीबाईपणाची जाहीर जाणीव करून दिल्यावर त्या रागावतील नाही तर काय्? तुम्ही नुसती बसायला जागा दिली तर त्या इतक्या रागावल्या, आजीबाई म्हटलं असतं तर?

[आज्जीबाई ;) ] क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी