( भाग दोन मध्ये थोडा बदल. म्हणजे टि. व्ही. वर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा, किंवा जाहिरातीचा संबध, खाली सरपटणाऱ्या बातम्यांशी लावला तर काय धमाल येईल...)
•ग्रामीण भागात दोन मामे बहिणी विवाह करणार - अब्बास टायरवाला ची तीन तास कसून चौकशी.
•आज राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता - उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य!
•अमेरिका इराक युद्ध भडकले - इंग्लंड चार धावांनी पराभूत. तेंडुलकर सामनावीर!
•"काय? तु काल रात्री कसलीच खबरदारी घेतली नाही? " - डेंगूची साथ. योग्य ती खवरदारी घ्या!
•शेअर बाजाराची उसळी! - "अशा प्रकारच्या उसळींचा आपण आहारात नेहेमी सामावेश करावा! "
•राज्यभर दुष्काळी परिस्थिती - "मला माझ्या मुलीला वाचवायला हवं. मी साबणाचं नाव सांगायला विसरले! "
•-च्या निधनाने एक उमदा खेळाडू हरपला - " उंची सहा फुट, रंग गोरा - सापडल्यास या क्रमांकाअर संपर्क साधा! "
•इंग्लंडमध्ये मॅडम टुसाडस मध्ये शहारुखचा पुतळा बसवला - सलमान घोड्यावरून पडला.
प्रतिक्रिया
14 Jul 2009 - 12:21 pm | mamuvinod
इंग्लंडमध्ये मॅडम टुसाडस मध्ये शहारुखचा पुतळा बसवला - सलमान घोड्यावरून पडला.
लय भारी
14 Jul 2009 - 2:21 pm | घाशीराम कोतवाल १.२
"काय? तु काल रात्री कसलीच खबरदारी घेतली नाही? " - डेंगूची साथ. योग्य ती खवरदारी घ्या!
हे लयच भारी राव =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) **************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
14 Jul 2009 - 3:43 pm | मसक्कली
•-च्या निधनाने एक उमदा खेळाडू हरपला - " उंची सहा फुट, रंग गोरा - सापडल्यास या क्रमांकाअर संपर्क साधा! " :? आपन नम्बर कुठे दिलाय..........???आणी खेळाडु कोन???????????
:W
बाकि विनोद जमलेत थोडे फार...... ;)
14 Jul 2009 - 10:53 pm | प्राजु
इंग्लंडमध्ये मॅडम टुसाडस मध्ये शहारुखचा पुतळा बसवला - सलमान घोड्यावरून पडला.
=)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jul 2009 - 12:01 am | चिखलू
अश्याच काही गमती TV channels झटपट बदलतांनाही होतात.
सुरुवातीला जेव्हा Zee & DD हेच channels होते तेव्हा......
दुशा:सन, तुम्हे द्रौपदी का वस्रहरन करना ही होगा....
आज शाम को 5:00 बजे भारत में और 6:30 बजे U.A.E. में..........
15 Jul 2009 - 10:32 am | आशिष सुर्वे
* ओबामांची 'घाणा' देशाला धावती भेट ... सतत पडणार्या पावसाने सखल प्रदेशात घाणीचे साम्राज्य
* शाहरुख खानचा सलमानबरोबर एकत्र काम करण्यास नकार ... न्यायालयाची 'कलम-३७७' ला संमती
* राहुल द्रविड ची एकदिवसीय सामन्यांकरता फेरनिवड ... विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांत बेबनावाच्या अफवा
*कोरियाच्या एकामागून एक 'अणु-शेपणास्त्र' चाचण्या, अमेरिका हतबल ... अपचन आणि 'अॅसिडीटी' वर रामबाण उपाय- रामसे बंधूंचा 'आम्लपित्तनाशक' काडा
## आता हापिसात थोडे काम करतो..
(हा ईनोद नाही... पोटापाण्याकरिता काहीतरी करायला हवेच ना!)
-
कोकणी फणस
15 Jul 2009 - 10:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =))
(कालच आणखी काही पाहिले)
नवी मुंबईत मुलीची आत्महत्या - सचिन आणि विनोदमधे फूट
पोलिसांची अक्षम्य दिरंगाई - विनोदने केला बातमीचा इन्कार