कृष्णार्पण

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
2 Jul 2009 - 7:43 am

नामस्मरण, चिंतन, सुख वैकुंठीचे जाण
चित्ती नांदे समाधान, सा-या चिंता कृष्णार्पण

भावभक्ती वाळवंट, मंदिर हे अंतरंग
वृत्ति वाहे चंद्रभागा, तिथे वसे पांडुरंग
जड देहाचे हे भोग केले त्यालाच अर्पण

तूच अनंत ब्रम्हांड, तूच धरा, तू आकाश
दूर सारी जो तमाला, अंतरीचा तू प्रकाश
तूच दाता, तूच त्राता, तूच कार्य, तू कारण

काया, वाचा, मन देवा तुझ्या चरणी लागावे
आधि- व्याधी, व्याप- ताप, माया मोह दूर व्हावे
तुझे दर्शन घडावे, तनू त्यागताना प्राण

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

2 Jul 2009 - 7:45 am | मदनबाण

फारच सुंदर कविता... :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

चन्द्रशेखर गोखले's picture

2 Jul 2009 - 8:13 pm | चन्द्रशेखर गोखले

अतिशय सुंदर !!

सूहास's picture

2 Jul 2009 - 8:39 pm | सूहास (not verified)

<<<काया, वाचा, मन देवा तुझ्या चरणी लागावे
आधि- व्याधी, व्याप- ताप, माया मोह दूर व्हावे>>>

अजुन "प्रार्थना" म्हणजे काय असते....

सुहास

प्रमोद देव's picture

2 Jul 2009 - 8:40 pm | प्रमोद देव

क्रान्ति,तुझ्यावर खरोखरंच सरस्वती प्रसन्न आहे.
अतिशय सुंदर आणि प्रासादिक रचना.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jul 2009 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार

अगदी सहमत आहे.

मुख्य म्हणजे हे मत स्वतः देवबाप्पांनी दिले आहे :)

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मनीषा's picture

4 Jul 2009 - 11:16 am | मनीषा

सुंदर रचना !!!

भावभक्ती वाळवंट, मंदिर हे अंतरंग
वृत्ति वाहे चंद्रभागा, तिथे वसे पांडुरंग
जड देहाचे हे भोग केले त्यालाच अर्पण ...सुरेख

आशिष सुर्वे's picture

4 Jul 2009 - 2:55 pm | आशिष सुर्वे

भावपूर्ण रचना

विसोबा खेचर's picture

5 Jul 2009 - 3:47 pm | विसोबा खेचर

छान भक्तिरचना...

तात्या.

प्राजु's picture

5 Jul 2009 - 7:11 pm | प्राजु

अप्रतिम!!
सरस्वती वसते आहे तुझ्या लेखणीत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/