मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
29 Jun 2009 - 10:40 am

"हातात हात घेऊन रस्त्याच्या कडेकडेने बिलगून जाणार्‍या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं."

मी त्यादिवशी अरविंदाला म्हणालो,
"तुझे मी खूप लेख वाचले.मला माहित आहे की लहानपणापासून तुला लेखनाचं वेड होतं.तुझ्या त्या वह्या मी उघडून वाचल्या होत्या.तुझ्या एकदोन कथेवर आपण चर्चा पण केली होती."
मला अरविंद म्हणाला,
"तू ज्याला वेड म्हणतोस त्याला मी प्रेम म्हणतो.वेड तेव्हड्यापुरतंच असतं पण प्रेम मात्र कायमचं असतं.आणि ते प्रेम जर बिनशर्त असेल तर मग प्रश्नच नाही.माझं लेखनावर तसंच बिनशर्त प्रेम आहे.

मी जर म्हणालो की माझ्या सातव्या वर्षीच मी प्रेमात पडलो,तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.कुणी म्हणेल प्रेमात पडायला हे माझं वंय खूपच लहान आहे.पण हे काही खरं नाही.मात्र एक खरं आहे की हातात हात घेऊन रस्त्याच्या कडे कडेने बिलगून जाणार्‍या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं ,किंवा आई आपल्या बाळाकडे बघून मनात आणणार्‍या त्या प्रेमासारखं ते प्रेम नव्हतं,किंवा एखादी मोठी बहिण आपल्या भावाला प्रथमच मांडीवर घेउन बसते तसं ते प्रेम तर मुळीच नव्हतं.
मी सांगतो ते प्रेम म्हणजे,जेव्हा एखादा चित्रकार आपल्या पहिल्याच चित्रीत केलेल्या चित्राकडे बघून त्याला जसं वाटेल तसं ते प्रेम होतं,किंवा एखादा खेळाडू त्याला जिंकू देणार्‍या त्या गोलकडे बघून त्याला जसं वाटेल तसं ते प्रेम होतं,किंवा एखाद्या सुगृहिणीने केलेल्या चटकदार पदार्थाला बक्षीस मिळतं त्यावेळी तिला त्या थाळीकडे बघून जसं वाटतं तसं ते प्रेम होतं.एखाद्या व्यक्तिला त्याच्या कामगीरीबद्दल वाटणारं प्रेम असतं तसं ते प्रेम होतं.माझ्या सातव्या वर्षी मी केलेल्या माझ्या लेखनावर मी प्रेम करू लागलो.
दुसर्‍या वर्गातली ती सुरवात होती.आणि आम्हां उत्सुक्त असलेल्या प्रत्येकाला नवीन वही मिळाली होती.वहीत शंभर नवी कोरी पानं होती.सातव्या वयातल्या मुलाचे विचार खरडून घ्यायला ती वही तयार होती.
माझी वही मला मिळाल्यावर अधीरता हा पहिला विचार माझ्या मनात आला."

"पण अरविंदा, तसं पाहिलंस तर पहिल्या वर्गातपण आम्हाला वह्या मिळाल्या होत्या.आणि खरंच ती वही निरनीराळ्या विचारांनी खरडली गेली होती,आणि अनेकानी सुरवात करून खरडलेल्या काही गोष्टी त्यात होत्या."
असं मी म्हणाल्यावर अरविंद म्हणाला,
"माझ्या बाबतीत तरी त्यातली एखादी गोष्ट मला पूर्ण करायची होती.ह्यावेळी ज्या क्षणी मला पेन्सिल दिली गेली,तेव्हा मी वेड्या सारखा वहित खरडायला लागलो.जे गेल्यावर्षी मला करणं अशक्य झालं होतं ते मी पूर्ण करायचा प्रयत्न केला.मी माझी कथा संपवली. "
मी अरविंदला म्हणलो,
"दुसर्‍या इयत्तेतल्या मुलांना आपल्या रोजच्या जीवनात येणार्‍या घटना लिहून ठेवण्यासाठी बर्‍याच मुलांनी-माझ्या सकट- आपली वही डायरी कशी वापरली. खरं आहे ना?"

होय,तुझं म्हणणं खरं आहे. पण मी माझ्याबाबतीत तुला सांगतो,
"मी मात्र थोडावेळ परिश्रम घेऊन एखाद्या उचीत कथेची संकल्पना शोधीत असताना, शेवटी जी गोष्ट मला जास्त आवडली तीच लिहिण्याचं मला सुचलं.
कथानक अगदी साधं होतं.कथानकाचा नायक एक तरूण मुलगा होता.हा नथुराम एक नाटक रचीत होता.माझ्या कथेचं नांव मी "नटेश्वर नथुराम" द्यायचं ठरवलं होतं.त्यावेळी हे कथेचं नांव ऐकून काही त्यावेळी हंसले होते.मला त्यावेळी कळलं नव्हतं त्यांनी का हंसावं ते.

मागे वळून पाहिल्यावर "नटेश्वर नथुराम" ही एक साधी गोष्ट होती.काहीतरी विस्मयजनक असावं अशी ती सुंदर सुरवात होती. ह्या कथेचा गुंथा करताना मी खरोखर आनंदीत होतो.भाऊबीजेचा दिवस येऊ लागला तशी मी एक मनात कल्पना तयार केली. माझ्या बहिणीला भाऊबीजेदिवशीची भेट म्हणून कुठच्याही भेटी पेक्षा चांगली भेट असावी आणि जी जणू माझा प्राण होती-ती कथा माझा प्राण झाली होती-अशी भेट देण्यापेक्षा कुठची भेट असूं शकेल.
माझ्या बहिणीला माझ्या कथेचीच भेट मी कां देऊ नये?

माझ्या दुसर्‍या इयत्तेत मी लेखनाच्या प्रेमात पडलो.पण खरं सांगायचं तर माझ्या मनातलं काम पुढल्यावर्षीच सफल झालं.
दुसर्‍या वर्षाला जेव्हा मी माझ्या बहिणीला ह्या कथेची भेट दिली आणि माझ्या परिश्रमाचं काय फळ मिळालं ते पाहिलं तेव्हा मी खरोखरंच माझ्या लेखनाच्या प्रेमात पडलो होतो.
आम्हा चार भावात ती माझी एकच बहिण होती.तसंच माझ्या चार चुलत भवाना पण बहिण नव्हती.त्यामुळे सर्व भाऊ ह्या एकट्या बहिणीची भाऊबीज करायला जमायचे.इतर भावानी दिलेल्या चकमकीत कागदाच्या आवरणातल्या भेटींच्या ढिगार्‍यात हातानेच कागदाने लपेटलेली माझ्या कथेची भेट मी ठेवली. सरतेशेवटी माझी ही छोटीशी भेट त्यात गडप झालेली दिसली.पण नीट पाहिल्यावर त्या सर्व भेटीत माझी भेट सोनेरी किरणानी चमकताना मला दिसली.

"नटेश्वर नथुराम" ही माझी पहिलीच कथा आणि तिच्याबद्दल माझ्या हृदयात खास प्रेम होतं.त्यानंतर मी मोठ्या मोठ्या कथा लिहायला लागलो.आणि सात वर्षाचा असताना ज्या प्रेमाने मी लिहायचो त्याच प्रेमाने आतापण मी माझं लेखन करतो.माझ्या कुठच्याही लेखनात सर्वांत माझी प्रिय गोष्ट म्हणजे त्या कथेतल्या प्रत्येक भुमिकेची रचना करणं आणि त्या भुमिकेच्या चारित्र्याचा सांचा बनवणं.प्रत्येक भुमिकेच्या चर्येवरचा आणि चारित्र्यावरचा विस्तार सर्वतोपरीने दाखवणं मला आवडतं.जीवन निर्माण करायला आणि व्यक्ति निर्माण करायला मला आवडतं. एखाद्या माझ्या कथेतली भुमिका प्रत्येकवेळी चांगलं काम प्रदर्शित करत असते त्यावेळी मला व्यक्तिगत अभिमान आणि उपलब्धि झाल्या सारखी वाटतं.

माझं लेखन हे एक चिकित्सा सत्र झालं आहे. दिवसाभर्‍यातले झालेले आघात,पश्चाताप,आणि आनंद मी भुमिकेत आयोजीत करतो.त्या भुमिकेमधून मी प्रतिनिधिक राहिल्याने माझ्याच मला सहायता होते. माझ्या सृजनशिल प्रतिभेला बळ मिळतं.आणि त्यामुळे मी समानुभूति दाखवयाला लायक होतो.लेखकाला समानुभूतिक असायला हवं.त्या भुमिकेच्या जागी जाऊन त्यांच्या नंतरच्या करतूताच्या दिशेची आंखणी करावी लागते.मला अगदी मनापासून वाटतं की ह्या लेखनाने माझं व्यक्तिमत्व सुधारलं आहे."

हे अरविंदाचं सर्व ऐकून मी चकित झालो.मी त्याला म्हणालो,
"अरविंदा,आमचे कॉलेजचे प्रोफेसर म्हणायचे,
"वर्गात नोट्सवर लेक्चर देणे वेगळे, आणि प्रत्यक्षात स्वत:च्या प्रतिभेने लेखन करणे वेगळे.थोडेबहूत लेखन आपल्यालाही करता यावे असे मात्र प्रत्येकाला सतत वाटत असते.प्रतिभावंत असणं ही एक दैवी देणगी असते असे माझे स्वत:चे मत आहे."
तुझ्या बाबतीत आमच्या प्रोफेसरांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे रे!."
"कसच्चं,कसच्चं" म्हणत अरविंदाने विषय बदलला.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2009 - 11:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो.
"व्यॅव.... " यापुढे मी नि:शब्द (खरंतर, निर्विचार) झाले. (म्हणून पुढे वाचलं)

>> मी खरोखरंच माझ्या लेखनाच्या प्रेमात पडलो होतो.
हेच ते ... हेच ते धोकादायक वळण... वेळेत टळलं असतं तर ...! मराठी शब्द पटकन आठवत नाही आहे, इंग्लीशमधे 'कंप्लेसंट' म्हणतात!

प्रतिसादक (सभासद, साप्रमं)

कपिल काळे's picture

29 Jun 2009 - 1:42 pm | कपिल काळे

नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखन. मिपावर प्रेमाचा लोंढा आणण्याचा एक ताकदवान प्रयत्न.

नेहमीच सामंतकाकांच्या लेखनाला प्रतिसाद देणारा ( साप्रमं-सभासद)

सूहास's picture

29 Jun 2009 - 6:58 pm | सूहास (not verified)

सुहास

टारझन's picture

29 Jun 2009 - 7:41 pm | टारझन

च्यामारी !! आरे लेका सही तरी णिट कर की रं !! नाव सूहास .. न सहि सुहास ?

असो ..
सामंत काका , पुन्हा पोपट केला राव .. आता आपल्या तारुण्यातल्या गमती जमती रोमांचक प्रसंग सांगितले असते तर किमान आम्हाला त्या काळात प्रेम कसं होतं त्ये तरी कळालं असतं :)

टोट्टली हलके घ्या हो ;)

- बालकृष्ण आसमंत
खजिनदार, साप्रम