Summer Job-२

स्वाती२'s picture
स्वाती२ in जनातलं, मनातलं
25 Jun 2009 - 1:18 am

माझ्या मुलाने सुरवातीला त्याच्या बाबालाच वेठीला धरले. "Dad तुझ्या office मधल्या janitor कडे .."
पण बाबाने सरळ नकारघंटा वाजवली. "ते लोक आधीच कसेतरी तग धरून आहेत."
"तू विचारलस तर हो म्हणतील" लेकाने घोडं दामटवलं.
"म्हणूनच नाही. शोध जरा इकडे ति़कडे." बाबाने विषय संपवला.
October मधे त्याच्या ओळखीच्या एका मुलाला grocery store मधे काम मिळालं. पण वेळ ४ते ९. ह्याने आधिच दोन high school चे course घेतले होते. त्याचा अभ्यास सांभाळून हे जमणार नव्हते. त्याच्या मित्र मंडळींचीही तिच परिस्थीती होती. असाच शोध चालू होता. लोकल लायब्ररीने बजेट कपात केल्याने तिथेही काही चान्स नव्हता. अशात नोव्हेबरचे
Y-Press चे न्यु़जलेटर आले. त्यात एक job posting होते. ह्याने लगेच फोन करून चवकशी केली. आधीच ३ जणांनी अर्ज केला होता, हा चवथा. पुढील आठवड्यात फोन आला. Dec - Feb अशा ३ महीन्यांसाठी PRX च्या Youth Editorial Board वर त्याची निवड झाली होती. निदान फेब्रुवरी पर्यंत तो कामात राहाणार होता.
डिसेंबर पासून इथली परीस्थिती खुपच बिघडली. सगळी भिस्त वाहन उद्योगावर असलेली सर्वच गावे भरडून निघत होती, त्यातच आमचेही गाव. नेहमी प्रमाणे food pantry त गेलो तर तिथे उभ रहायला जागा नव्ह्ती. त्यांनी आम्ही नेलेले canned goods घेतले. त्यांना गरम कपडे मिळाले तर हवे होते. माझा लेक ते बघून रडायचाच बाकी होता. घरी आल्यावर "Lord have some mercy" म्हणत त्याने स्वेटर, जीन्स गोळा करायला सुरूवात केली. पुन्हा एकदा pantry ची वारी झाली. त्याला यावर्षी ख्रिसमस साठी काहीही नको होते. फेब्रुवरी पर्यंत वाईट economy ची ही सवय झाली. मुलं समर साठी परत job शोधू लागली. एक दिवस त्याच्या मैत्रिणीने बातमी आणली. corn detasseling चा job मिळेल. पहाटे ५ वाजता शाळेत बस येऊन मुलं शेतावर नेइल. चला काहीतरी सोय लागली म्हणून दोघे आनंदले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. लंचला त्याच्या मित्राने सांगितले की मी केलेय हे काम गेल्यावर्षी. खूप कष्टाचे आहे. तुम्हाला झेपणार नाही. मिही या वर्षी करणार नाहीये. झाले पुन्हा गाडी मूळ पदावर. मार्च अर्धा उलटला तरी काही जमत नव्हते. मोठ्यांनाच काम नव्हते तर या मुलांना कुठे मिळणार. त्याने एकिकडे high school credit साठी CORE40 ची तयारी सुरु केली. एप्रिलमधे त्याच्या अजुन एका मैत्रिणीला गावात janitor चे काम मिळाले. लेकाचा ego कुठेतरी डिचवला गेला होता. "mom, her dad used connection. तू सांग ना dad ला. " माझ्या लेकाची भुणभुण सुरु झाली. त्याला dad ची मदत मिळणार नाहीये हे मला माहित होते. मी त्याला समजावून CORE40 वर लक्ष द्यायला सांगितले.
क्रमशः

टीपः
फुड पॅंट्री म्हणजे मोफत अन्न्-धान्य केंद्र म्हणता येइल. गावागावात अशी केंन्द्रे असतात. ती स्थानिक शासन, चर्च , किंवा सेवाभावी संस्थानी चालवलेली असतात. पास्ता, पिनट बटर, केचप, कॅन केलेल्या भाज्या, कढधान्ये, सुप वगैरे गोष्टी इथे फुकट मिळतात. सरकारी मदत आणि स्थानिक लोकांनी केलेली मदत यावर ही केंन्द्रे चालतात. लोक आपापल्या ऐपती प्रमाणे मदत करतात. मी अगदी ४-५ वर्षाची मुले आईबरोबर १ पिनट बटरचा डबा घेऊन आलेली बघितलेयत. काही ठिकाणी साबण, टुथपेस्ट, मुलांसाठी डायपर, कपडे ही ठेवतात.
Y-Press बद्दल अधिक माहिती http://www.ypress.org/ या संकेतस्थळावर
माझ्या मुलाला या संस्थेत जे काही मिळाले त्याची फेड या जन्मी तरी करणे शक्य नाही.
CORE 40 ही Indiana State ची हायस्कुल पास होण्यासाठीची एक परिक्षा. हायस्कुल पास होण्यासाठी algebra -1 आणि english ची core40 exam द्यावी लागते.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

25 Jun 2009 - 2:46 am | भाग्यश्री

ह्म्म .. इंटरेस्टींग आहे हे..
वाचत आहे.. लवकर येऊदेत भाग पुढचे!

http://www.bhagyashree.co.cc/

सहज's picture

25 Jun 2009 - 7:21 am | सहज

हेच.

वाचत आहे.. लवकर येऊदेत भाग पुढचे!

पक्या's picture

25 Jun 2009 - 12:08 pm | पक्या

फारच छान. वेगळ्या विषयावरचे लिखाण वाचायला मजा येतेय.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

ईश्वरी's picture

25 Jun 2009 - 12:55 pm | ईश्वरी

छान लेख...आवडला.
वेगळा विषय , सोपी मांडणी.
पुढचा भाग ही लकवर येऊ द्यात.
ईश्वरी

दिपाली पाटिल's picture

25 Jun 2009 - 1:32 pm | दिपाली पाटिल

आज माझ्या अपार्टमेंट मध्ये Summer Party होती Swimming Pool जवळ , त्यात १४-१५ वयाची तीन मुलं लाईव बँड वाजवत होती. सगळ्यांना इतकं कौतुक वाटत होतं त्यांचं.. एक मुलगा ड्रम्स वाजवत होता, दुसरा आणि तिसरा गिटार वाजवता वाजवता गाणं ही म्हणत होते, खुपच छान वाटत होतं. संपुर्ण २ तास बँड चालु होता. तेव्हा मला तुमच्या या लेखा ची आठवण झाली होती.

दिपाली :)

विंजिनेर's picture

25 Jun 2009 - 1:34 pm | विंजिनेर

निम्म्या शब्दांचे संदर्भ/अर्थ कळत नाहियेत
फूड पँट्री म्हणजे काय?
वाय्-प्रेस म्हणजे काय?
CORE40 म्हणजे काय?

कृ, जरा विस्ताराने समजावा म्हणजे मुळ लेखाचा अर्थ चांगला कळेल.

(अडाणी आणि साता समुद्रापार न राहणारा) विंजिनेर

स्वाती२'s picture

25 Jun 2009 - 4:29 pm | स्वाती२

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
दिपाली, माझ्या मुलाच्या मित्राचाही बँड आहे पण माझा मुलगा फ्रेंच हार्न वाजवत असल्याने तिथे चान्स नव्हता.
विंजिनेर, सुचनेबद्द्ल आभार. मी टीप जोडलेय खुलाशाची.

विनायक प्रभू's picture

25 Jun 2009 - 4:43 pm | विनायक प्रभू

तै.
चांगलीच सुधारणा झाली आहे.

सूहास's picture

25 Jun 2009 - 5:53 pm | सूहास (not verified)

सगळीकडे परिस्थिती बेकार आहे तर...

लेख छान...

सुहास

चतुरंग's picture

25 Jun 2009 - 8:21 pm | चतुरंग

तुमच्या मुलाचं आणि तुमचं अभिनंदन!
स्वतःच्या पायावर कसं उभं रहायचं ह्याचं हे मूलभूत शिक्षण असतं. पैशाचं महत्त्व आणि त्याच्या मर्यादा, गरजू लोकांना मदत करणे, डोनेशनचं महत्त्व अशा अनेक व्यवहारी गोष्टी शिकण्याची ही संधी असते. हा अमेरिकन समाजाचा एक अतिशय चांगला भाग आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत वीकांताला अगदी ७-८ वर्षांची मुलं-मुली आपल्या घराबाहेर लेमोनेड (आपले लिंबाचे सरबत) घेऊन विकायला बसतात. पळायला जाणारे, सायकलिंग करणारे लोक उत्साहाने तिथे थांबून त्यांची तहान भागवतात. मुलांनाही थोडे पैसे मिळतात त्यातून ते खाऊ, खेळणी घेतात. ह्यात त्यांना पैसे घरुन मिळत नाहीत किंवा ते गरीब असतात असे नाहीये तर स्वावलंबन म्हणजे काय ह्याचा तो वस्तुपाठ असतो आणि काम करण्यात कमीपणा नाहीये हाही धडा मिळतो. शालेय शिक्षणाबरोबर हेही शिक्षण महत्त्वाचे.

चतुरंग