पहिला पाउस

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
23 Jun 2009 - 11:45 am

पहिला पाउस बालमनाचा
कागदी होडया वल्हवण्याचा
बेडका मागे धावण्याचा
डबक्यामध्ये डुंबण्याचा
आईच्या कोरड्या पदराचा
ओला स्पर्श ममतेचा.

पहिला पाउस तरुण मनाचा
मस्ती - मौजेच्या झर्‍याचा
स्वप्नाच्या कोवळ्या पालवीचा
प्रेम धाराना अंगावर झेलण्याचा
प्रितीमध्ये न्हाउन निघण्याचा

पहिला पाउस वृद्ध मनाचा
ब्लॅकेटमध्ये लपेटण्याचा
कांदा भजी अन गरम चहाचा
वाकड्या दांड्याच्या घत्रीचा
आठवणींच्या पागोळ्यांचा

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

अनंता's picture

23 Jun 2009 - 12:33 pm | अनंता

वा जागु, एकदम लहानपणाची आठवण करुन दिलीत. आपल्या पिढीच्या मनातला पाऊस असाच काहीसा होता. एकदम शालेय जिवनाची आठवण झाली.

एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

मसक्कली's picture

23 Jun 2009 - 1:26 pm | मसक्कली

लइ झक्कास यार...........!!

आत्ता पावसात भिजल्या सरख वट्तय बग..........!! :)

पावसाळा माझा आवड्ता ॠतु आहे.......!!

मस्त वाट्त बग वातावरन ते............!! ;;)

धरति मता हिरवा शालु नेसते जशि काय...........!! :)

सगळे वतवरण कसे मनमोहक वाटते.....!!

मुळात मी निसर्ग प्रेमी आहे.....!!

आणी आश्या वातावरनात

गरम गरम भजी,वडापाव्,कनिस...........!! =P~

दिल खुश कर दिया यार तुने..........!! ;) :)

जागु's picture

23 Jun 2009 - 1:30 pm | जागु

मसक्कलीतिन वेळा आवडली का कविता ? धन्यवाद.
अनंता तुम्हालाही धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

23 Jun 2009 - 5:34 pm | विसोबा खेचर

पहिला पाउस वृद्ध मनाचा
ब्लॅकेटमध्ये लपेटण्याचा
कांदा भजी अन गरम चहाचा
वाकड्या दांड्याच्या घत्रीचा
आठवणींच्या पागोळ्यांचा

सु रे ख..!

तात्या.