काटकोन

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
23 Jun 2009 - 9:29 am

Sir, I think your data is irrelevent in Indian weather conditions. मी
What is your degree and experience and degree in the field sir?हॉलंडवरुन आलेला तज्ञ.
Experience 1 year and degree 90 degrees
१९९८ साली एका पंचतारांकित हॉटेल मधील एका कॉनफरन्स मधील प्रसंग.
--------------------------------------------------------------------------------------------------------
१९९२ सालानंतर जागतिकरणाचे वार भारतात वाहु लागले. भारतिय कुक्कुट पालनामधे सुद्धा आधुनिकरण आले. ऑटोमेशन मुळे एका स्क्वेअर फुटात एकाच्या एवजी ३ कोंबड्या ठेवण्याइतकी प्रगती झाली. त्याला नाव पडले 'एअरकंडीशन पोल्ट्री'.
कामशेत पासुन सुमारे २० किलोमिटर आत टाटा धरणाच्या जवळ माझ्या एका मित्राने असाच एक फार्म उघडला होता. शनिवार रविवार सुट्टीसाठी एकदा या फार्म वर गेलो होतो.ते दोन दिवस संपुर्ण आयुष्याला कलाटणी देउन गेले. थंडीचे दिवस होते. रात्रीचे तपमान ४ डीग्री इतके खाली आले होते. ऑपरेटींग मॅन्युअल मधे ह्या परिस्थितीवर काय करायचे ह्याची माहीती नव्हती. ब्रुडर्स ची उष्णता कमी पडत होती. सुमारे २२००० ४ दिवसाची पिल्ले उब मीळण्याकरता गर्दी होउन मरण्याची शक्यता निर्माण झाली होती. मित्र पण गोंधळलेला होता. फोन करुन कुणाला विचारावे तर फोन बंद.
माझा पोल्ट्री सायन्स शी अजिबात काही ही संबंध नव्हता. ओ का ठो माहीती नव्हती. हिमत करुन शेड मधे गेलो. आणि मग जवळ जवळ आठ वर्षे बाहेर च आलो नाही. ह्या निमित्ताने नाबार्ड, बॅ़कांचे अधिकारी ह्यांच्याशी चांगले संबंध आले. शेतकर्‍यांच्या पुरक व्यवसाया बद्दलची राज्य सरकारची भुमिका लक्षात आली. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील कुक्कुट पालनात गुंतलेल्या शेतकर्‍यांची दुरावस्था बघितली. त्याच्या करता सर्वांकडे भांडलो. पुण्यामधील अमृत फीड च्या डॉक्टर वैद्यांनी 'टेररीस्ट' हे नामकरण केले. आजही कंट्रोल्ड फार्मिंगवर मी केलेला रिसर्च कुणीही फारसा पुढे नेलेला नाही.
____________________________________________________________
२००६साल
'सुकड्या' संपर्क सुटुन जवळ जवळ ४ वर्ष झाली होती. त्याने मी दिलेला सल्ला पाळला होता. घेतलेले कर्ज मेहनत करुन वेळे आधी फेडले होते.
त्या मुळे परत कधी धंद्याच्या वाढीसाठी पतपुरवठा सुकड्याला कमी पडला नाही. मी पाठवलेली ४ मुले त्याने कामावर ठेवली होती. आ.टी.आय मधे जाउन तिथल्या मुलांना नोकरी देण्याचा नियम तो आजही पाळतो.
बैठ्या घरातुन प्रशस्त फ्लॅट मधे पोचलेल्या सुकड्याची प्रगती खरेच वाखाणण्यासारखी होती.
अचानक एकदा फोन आला. भेटायला यायचे होते त्याला.
भेटल्यावर पहीले वाक्य, "सर, भिकारी झालो." चेहृयावर खंत नव्हती ह्याचे मला बरे वातले.
एकंदरीत झालेली परिस्थिती त्याने मला सांगितली. चला म्हटले २००४ सालनंतर उतरवलेला 'झगा' परत चढवुया.
मी सुकड्याला पुर्ण कागदपत्र घेउन यायला सांगितली. बरोबर कंपनी च्या सिनियर मॅनेजर ला पण घेउन यायला सागितले.
मी कागदपत्र पुर्ण तपासली.
१९९४ साली सुकड्याला त्याच्या गावाकडच्या एम्.आय्.डी.सी मधे एक बंद पडलेली मोठी कंपनी चालवायची ऑफर आली. ही ऑफर बॅकेनेच दीली होती. ह्या कंपनीत बँकेचे पैसे अडकलेले होते. १९% व्याजाने बँकेने कर्ज मंजुरी देउन ह्या कंपनीचे मालकी हक्क सुकड्याला हस्तांतरीत केले होते.(रिस्क फॅक्टर चे २% जास्त). खरे म्हटले तर आधीच्या मालकाने हात वर केले होते. बँकेने जागेसकट लिलाव पुकारला होता. २५% रिकवरी एवढी सुद्धा बोली आली नव्हती. अर्थात हे सर्व सुकड्याला नंतर कळले.
सुकड्या फक्त 'ज्या गावातुन अन्नान होउन मुंबईला आलो, त्याच गावात आज मानाने परतलो' ह्या भावनेत अडकला होता.
पण ह्या ही परिस्थितीत सुकड्याने धंदा वाढवला. बॅ़केने वाढीकरता अगदी 'आमंत्रण' पाठवुन पतपुरवठा केला. शेवटी त्यांना सुद्धा 'कोटा' पुर्ण करायचा होता ना.
२००३ साली एक्स्पोर्ट ओरियंटेड युनीट नावाच्या खुळात सुकड्या अडकला. रातोरात एक लिमिटेड कंपनी एकदम बंद कशी पडते हे सुकड्याला कधीच समजले नाही. सुकड्याचे (आणि त्या बरोबर आणखी कितितरी)सुमारे २५ लाख बुडवुन हा एक्स्पोर्ट युनीट चा मालक कंपनी बंद करुन चालता झाला. आज राजकारणात आहे.
सुकड्याने तरी सुद्धा धीर सोडला नाही. बॅ़केला विश्वासात घेउन धंदा चालु ठेवला. हप्ते भरत राहीला. २००४ साली एका नैसर्गिक आपत्तीत कंपनीचे नुकसान झाले. विमा होता. पण पॉलीसीच्या किरट्या अक्षरातील एका वाक्याने सुक्ड्याचा घात झाला. दात कोरण्या इतपत विम्याची रक्कम सुकड्याला मिळाली. गंमत म्हणजे ही पॉलीसी बॅ़केनेच काढून दीली होती.
आता सुकड्याची सुटका नव्हती हप्ते थकत चालले. व्याज, पेनल्टी वाढत होते. एन्.पी.ए. झाल्यावर बॅकेच्या नोटीसा सुरु झाल्या.
सर्व परित्थिती लक्षात आल्यावर मॅनेजर ला मी एक पत्र डीक्टेट केले. सुकड्याच्या मॅनेजर ला त्या पत्राचा प्रयोजन व अर्थ दोन्ही ही कळाले नाही.
त्याने तसा प्रश्न उपस्थित केल्यावर सुकड्याने माझ्या समोरच त्याला झापला. मी सुकड्याला धीर दीला. त्याला म्हटले तुझे नशिब चांगले असेल तर बॅ़क ह्याला उत्तर देईल. उत्तर आले तर तु सुटलास. नाही तर काय करायचे ते नंतर बघु.
सुकड्याने बॅकेला पत्र पाठवले. सुमारे पंधरा दिवसाने त्याचे उत्तर आले. सविस्तर उत्तर होते. माझ्या प्रत्येक मुद्द्याला नंबर घालुन उत्तर दिले होते.
सुकड्याचे दैव बलवत्तर नाहीतर we deny the contents हे एका वाक्याचे उत्तर आले असते. आणि पुढची कोर्ट कचेरी बोडक्यावर बसली असती.
पत्र वाचल्यावर मी हसलो.
सुकड्याला आणखी एक पत्र लिहुन दीले.
गेल्या वर्षी बुकात लिहीलेल्या (नोशनल) रकमेच्या ३०% रकमेत बॅकेने सुकड्याला कर्जमुक्त केले. आता रंक झालेला सुकड्या परत राजा होइल. पुन्हा काही ढेकळांना अन्नाला लावेल.
जाता जाता: बर्ड फ्लू बद्दलच्या गैरसमजाला सरकार आळा न घालु शकल्याने हजारो मराठी शेतकरी भिकारी झाले. त्यात माझा मित्र सुद्धा होता.
सुमारे दहा लाखाच्या पुरस्कारापासुन मी वंचीत झालो. फक्त एकच उन्हाळा हवा होता मला माझा रिसर्च पुर्ण करायला. ना खंत ना खेद
ता.क. : ते पत्र लय भारी क्रिप्टीक

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

टारझन's picture

23 Jun 2009 - 9:42 am | टारझन

हाहाहा !!@!
काय मास्तर .. रोज सकाळी एक ऑम्लेट (पक्षी : लेख ) टाकताय नाष्ट्याला (पक्षी : वाचायला )

मजा आली !!! होप क्वालिटी ठेवाल लेखाची !!
कारण बोर व्हायला लागलं की आम्ही आहोतच हो :)

(मास्तरचा अजुन एक विद्यार्थी) टारझन

दशानन's picture

23 Jun 2009 - 9:46 am | दशानन

हेच म्हणतो.

थोडेसं नवीन !

निखिल देशपांडे's picture

23 Jun 2009 - 10:33 am | निखिल देशपांडे

काय मास्तर .. रोज सकाळी एक ऑम्लेट (पक्षी : लेख ) टाकताय नाष्ट्याला (पक्षी : वाचायला )

चांगल आहे मास्तर.... सकाळी आल्यावर तुमचा लेख वाचायला आवडते...
बाकी बर्ड फ्लु सरकारी भुमिके बद्दल लिहाच.

==निखिल

सहज's picture

23 Jun 2009 - 10:02 am | सहज

रंजक आहे. अर्थात काही निर्णय पथ्यावर न पडणे, काही मोठे धोके /रिस्क स्वीकारणे याचा (पक्षी : स्व:ता सुकड्या यांच्या निर्णयाचा)देखील मोठा हात आहे. लवकरात लवकर सुकड्या यांचा प्रवास पुन्हा राजा बनण्याकडे होवो ही सदिच्छा!

>>बर्ड फ्लू बद्दलच्या गैरसमजाला सरकार आळा न घालु शकल्याने हजारो मराठी शेतकरी भिकारी झाले.

म्हणजे नक्की काय झाले? परदेशात सर्रास कत्तली केल्या जातात. शेतकर्‍याला भरपाई मिळते (अर्थात भरपाईबद्दल कधीच कोणी खुश नसते) मराठी शेतकरी भिकारी झाले म्हणजे नक्की काय झाले?

बाकी काटकोन, पत्र काय क्रिप्टीक म्हणे?

विनायक प्रभू's picture

23 Jun 2009 - 10:16 am | विनायक प्रभू

इथे भरपाई वगैरे फक्त कागदावरच.
काटकोन=??
क्रिप्टीक= नरो वा कुंजरोवा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jun 2009 - 10:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काटकोनाचा अर्थ, कम्युनिकेशन ब्रेकडाऊन. एकाचं बोलणं दुसर्‍याला बिल्कुल समजत नाही. मास्तर लिहितात तेव्हा बर्‍याचदा हेच होतं ना? ;-)

विनायक प्रभू's picture

23 Jun 2009 - 11:58 am | विनायक प्रभू

= इमोशनल इंटेंसिटी

पाषाणभेद's picture

23 Jun 2009 - 8:09 pm | पाषाणभेद

इमोशनल इंटेंसिटी की मोशनल इंटेंसिटी ?

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

अवलिया's picture

23 Jun 2009 - 10:40 am | अवलिया

उत्तम.
हेच आणि असेच अपेक्षित.
अपेक्षेवर विरजण न पडावे.

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

जागु's picture

23 Jun 2009 - 12:07 pm | जागु

हम.. ही बर्ड फ्लू ची समस्या कुकुटपालन वाल्यावंर वर्षातुन एकदा येतेच.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jun 2009 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार

गुर्जी काटकोन त्रिकोण भारीच.

तुम्ही नक्की कुठली कुठली क्षेत्रे प्रादाकांत केली आहेत त्यावरही एक लेख लिहाच आता.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

रेवती's picture

23 Jun 2009 - 8:06 pm | रेवती

आजही कंट्रोल्ड फार्मिंगवर मी केलेला रिसर्च कुणीही फारसा पुढे नेलेला नाही
अरेरे!

सुमारे २५ लाख बुडवुन हा एक्स्पोर्ट युनीट चा मालक कंपनी बंद करुन चालता झाला. आज राजकारणात आहे.
अर्रे वा! सर, आजकाल राजकारण हाच एक धंदा तेजीत असताना ते एक्सपोर्ट युनिट कोण चालवत बसणार. दहा वर्षं आधी भेटायचा योग असता तर आमचंही युनिट बंद पडलं नसतं.

बर्ड फ्लू बद्दलच्या गैरसमजाला सरकार आळा न घालु शकल्याने हजारो मराठी शेतकरी भिकारी झाले.
ह्याचं कारण काय? सरकारनं पुरेशी माहीती पुरवली नव्हती? मराठी लोक धंदा करू शकत नसल्याबद्दल जी ओरड चालते ती निष्कारण आहे काय? का त्यांना माहिती मिळू न देण्यातच काही फायदा आहे, अर्थात राजकारण्यांचा? जर आपल्याच पायाशी इतकं जळत असताना बाकीच्या देशांमधे काय चालतं यावरून दुसर्‍यांना नावं ठेवण्यापेक्षा आधी स्वत:कडं डोळे उघडे ठेवून न बघण्याची वृत्ती या सगळ्याला काही अंशी तरी कारणीभूत आहे काय?

सुमारे दहा लाखाच्या पुरस्कारापासुन मी वंचीत झालो. फक्त एकच उन्हाळा हवा होता मला माझा रिसर्च पुर्ण करायला.
हे वाक्य वाचून भयंकर वाईट वाटलय. आधी केलेले कष्ट कधी वाया जात नाहीत हे माहितीये पण त्यावेळेस यातना देऊन जातात अश्या गोष्टी. तुम्हाला त्याचं दु:ख नाही म्हणता........तुम्ही ग्रेट आहात.

रेवती

संदीप चित्रे's picture

23 Jun 2009 - 9:32 pm | संदीप चित्रे

अजून काही लिहायला शब्द नाहीत !!

चतुरंग's picture

23 Jun 2009 - 9:58 pm | चतुरंग

आजही कंट्रोल्ड फार्मिंगवर मी केलेला रिसर्च कुणीही फारसा पुढे नेलेला नाही.

संशोधनाची अशी परवड बघून मन उद्विग्न होतं ~X( (अब्दुल कलाम ह्यांच्या 'अग्निपंख' मधे त्यांच्या रॉकेटच्या पहिल्या संशोधनाचे मॉडेल असेच लालफितीत धूळ खात टाकल्याच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्याची आठवण झाली :S )
सुकड्याला २५ लाखाच्या कर्जातून बाहेर काढण्याची तुमची करामत थक्क करणारी आहे. मनाचा कणखरपणा आणि कठिण अवस्थेतही वाट काढण्याचं संतुलन वाखाणण्याजोगं. अशा किती बेरजा करुन ठेवल्या आहेत मास्तर? चोपडीत आता टोटल मांडायला सुद्धा जागा नसेल!!

(+)चतुरंग

पिवळा डांबिस's picture

23 Jun 2009 - 10:14 pm | पिवळा डांबिस

मास्तर, तुमच्या या काटकोनी लेखातलं काय *टसुद्धा कळलं नाही....
तुम्ही कायतरी क्रिप्टीक पत्र लिहून कुणा एकाला बरबाद होण्यापासून वाचवलंत इतकंच समजल!!!!
आणि आमच्यासाठी तेव्हढंसुद्धा पुरेसं आहे!!
अभिनंदन!!!!!

मराठमोळा's picture

23 Jun 2009 - 10:21 pm | मराठमोळा

मास्तर, तुमच्या या काटकोनी लेखातलं काय *टसुद्धा कळलं नाही....
तुम्ही कायतरी क्रिप्टीक पत्र लिहून कुणा एकाला बरबाद होण्यापासून वाचवलंत इतकंच समजल!!!!

हेच म्हणतो.
अभिनंदन मास्तरांचे आणी सुकड्याचे.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

विजुभाऊ's picture

24 Jun 2009 - 2:46 pm | विजुभाऊ

शेती हा तसाही एक विचित्र उद्योग आहे.
उत्तम उत्पन्न काढायचे आणि उत्पन्न चांगले झाले म्हणून भाव पडणारा एकमेव उद्योग
केलेली मेहनत आणि गुंतवणूक जर औद्योगीक दराने मोजली तर उसवाला शेतकरी हाही तोट्यातच असतो.
बर्डफ्लु मुळे जेंव्हा कोंबड्यांची पिले रोडरोलरखाली चिरडून मारावी लागली तेंव्हा ते दु:ख पैशात मोजणे शक्य नव्हते.
संपूर्ण गावातील पोल्ट्र्या एकाएकी दूषीत होतात आणि अचानक सगळ्या भागातल्या मेलेल्या कोंबड्या जाळून पोल्ट्र्या सहासहा महिने बन्द पडीक ठेवाव्या लागतात तो हिशेब कोणीच गृहीत नाही
अंडी नेणारा आणि खाद्य देणारा एजन्ट जो हिशेब करतो तो सरळ समजणारा जागतीक बॅन्केचा अध्यक्षच होउ शकतो