कोडे

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
20 Jun 2009 - 12:10 pm

आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे
उभ्या - आडव्या मार्गाचे
काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे
आडव्या मार्गाने पुढे जायचे तर
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे
काळे चौकोन मात्र वगळायचे
कोडे आपणच सोडवत रहायचे
यशासाठी प्रयत्नांत झुरायचे
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे.

कविताप्रतिभा