विचार करा तडीपार

अजय's picture
अजय in जनातलं, मनातलं
19 Jun 2009 - 6:37 pm

माय मराठीची आय-माय कुण्या युपी बिहाऱ्याने काढली तर त्याची पार आपन वाट लावून टाकू बर्का.
आता आपल्याच मान्साकडून बोल्लं जातं काईबाई....
काल आमच्या उदव सायेबाचं लेकरू (म्हंजे आदित्य ठाकरे सायेब) म्हने की राजकारनात येयाचं नाई.
त्यांनी तर द ड्रीम वुई शेअर अशी शेअर बाजाराला जोडनारी नवी संगटनापन सुरू केली हाये. तीचे मराठीत नाव तुमीच सोदून मिपावर लिवा. त्यांनी आनकी काही तरी सांगीतलं. रोकठोक आनी खनखनीत-
"जो विचार करशील, तो तडीपार ने, अशी शिकवण आई-बाबा देतात" (प्रसिद्धी - सकाळ, मुंबई, टुडे पान २)
आता बगा आमंचा नवा नेताच ईचार तडीपार करायला सांगतो . मग आमी तरी काय करावे?
तुमीच सांगा...
आता हा आमच्या युवराजांच्या युवराजाचा आदेश आमी तर सायबांच्या काळापासून शिरसावंद्य मानलाये......
येकच इचारायंचं हाये की खरंच आमचं धाकलं सायेब म्हनाले की पेपरवाल्यानंच उलटसुलट लिवलयं बघाया पायजे....

या पेपरवाल्यानं तस लिवलं आसल तर मराठीचा आपमान आमी कद्यापी सहन करनार नाई.....

भाषाविचार

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

19 Jun 2009 - 7:01 pm | चिरोटा

ह्या पेपरवाल्यानाच तडीपार करायला पाहिजे. पुण्यतिथीची जयंती करतात लेकाचे. युवराजांचे चिरंजीव लहान आहेत. बाँबे स्कॉटिशमध्ये शिकले ना ते? माय मराठी बोलताना थोड्याफार चुका व्हायच्याच.जरा सांभाळून घ्या की.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अभिरत भिरभि-या's picture

19 Jun 2009 - 7:21 pm | अभिरत भिरभि-या

बाळराजे चुकले असे कोण म्हणते ?? .. त्ये अजाबात चुकले नाहीत ..
विचार तडीपार करणे आणि मुद्यांचे उत्तर गुद्यांनी देणे ही सेनेची जुनी परंपरा त्यांच्या उत्तम ध्यानात हाये.
ह्यो फक्त पुनरुच्चार आहे; समजून घ्यावा ;)