इट्स मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
16 Jun 2009 - 9:29 am

कालचा दिवस फारच धांदलीचा गेला. सुमारे १५० फोन आले. ३ सोडता बाकी सर्व 'आता आमच्या मुलांच्या भविष्याचे काय होणार' अशा प्रकारचे.
जर 'पुण्य' नावाच्या गोष्टीवर विश्वास असेल तर आजुबाजुला असलेल्या १० वीच्या किंवा १२ वी च्या पालकांना लेखातील माहीती जरुर पोचवा.
जर पोचवु शकाल तर तुम्हाला ह्या वर्षी आणखी काही 'पुण्य' करायची गरज नाही.
१० वी मधॅ जर १०० मुलांना ९०% मार्क मिळाले तर तर त्या पैकी ५जण हेच यश १२ वी सायन्स मधे कायम ठेवु शकतात. आणि ह्या ५ पैकी फक्त २ जण सीईटी मधे १८०+ ला पोचतात.
ह्या वर्षी सीइटी मधे फिजिक्स मधे मुलांची कत्तल झाली. काल दिवसभर मी जे अनॅलिसिस केले त्या वरुन मुंबईमधे शासकीय रुग्णालयात (एमबीबीएस वा डेंटल )सीट मिळायला १७० मार्क पण पुरतील असे वाटते. मागच्या वर्षी हाच आकडा १८० होता. म्हणजे सुमारे दहा मार्कांची उतरण.
इंजीनीयरिंग करता ज्याना अगदी ४५% मार्क म्हणजे ९०/२०० मिळाले असतील तरी महाराष्ट्रात कुठे ना कुठे सीट मिळेल हे नक्की. ज्यांनी एआयइइइ ची परिक्षा दिली असेल त्यांना अगदी २०/४६० मिळाले असतील तरी सुद्धा त्यांची इंजीनियर्रींगची सीट नक्की. अर्थात ह्या सर्व विद्यार्थ्याना इंजीनियरींगचा अभ्यासक्रम झेपेल का नाही हा विषय अलाहिदा.
ह्या वर्षी अगदी १५०/२०० म्हणजे घवघवीत यश (निदान इंजीनियरींग करता) हा निरोप जेवढ्या पालकाना पोचवता येइल तेवढा पोचला पाहीजे. कारण नसताना अपुर्‍या माहीती मुळे दलालांच्या हाती सापडुन आयुष्य भर कमावलेल्या पुंजीचे वाटोळे करुन घेण्यात काय हंशील.
कुठल्याही वृत्तपत्राने हा जिव्हाळ्याचा प्रश्न आजवर स्पष्ट पणे मांडलेला दिसत नाही.
रिझल्ट कठीण म्हणजे फक्त चौकट बदललेली आहे. जो काही परिणाम आहे तो सर्वांना लागु आहे हे स्पष्ट विधान पेपरात पहिल्या पानावर देउन पालकांना दिलासा देण्यात वृत्तपत्र का कुचराई करत आहेत ते मला माहीत नाही. टाईम्स मधील ह्या विषयावरील लेख जरा जास्तच गोलगोल वाटला. नक्की मार्ग दर्शन करणारे एकही विधान नाही.
कुठे आहेस रे अनामिका? जरा दखल घे ह्या प्रश्नाची. येउ दे अगदी स्पष्ट शब्दात पहिल्या पानावर. कुणा एका अभ्यंकराचे वा गोखल्यांचे दोन चार लाख वाचतील.
जाता जाता: कॅफे मधे बसुन हा विदा गोळा करणे शक्य नव्हते. ऑफिसमधले संगणक आजारी होते. ज्या शिक्षण सम्राटाने हा विदा गोळा करण्यात आपल्या ऑफिसमधला संगणक दिवसभर मला दिला तो मला संध्याकाळी काम संपल्यावर म्हणाला,
Prabhu SIr, no doubt,your efforts are commendeble. It is very difficult to remove mentality of equating 10 th 12 th marks to the success in life . It is like pissing in the wind.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अनंता's picture

16 Jun 2009 - 9:36 am | अनंता

तुमचा निरोप संबंधितांना नक्की कळवतो.
:)
ह्याला म्हणतात समाजसेवा. समाजसेवा समाजसेवा म्हणजे आणखी काही वेगळं असतं का हो?

विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

विनायक प्रभू's picture

16 Jun 2009 - 9:38 am | विनायक प्रभू

जाउन मुलाला सीईटी मधे मीळालेले मार्क आणि प्रेफरन्स कॉलेज ह्या बद्दल पुर्ण मार्ग दर्शन हवे असेल माझा मोबाइल द्या. कुठलेही पैसे न घेता हे काम मी करीन.

शाहरुख's picture

16 Jun 2009 - 9:50 am | शाहरुख

प्रभू सर, अशा परिक्षेंच्या निकालात पर्सेंटाईल स्कोर (डोकं खाजवून देखील मराठी शब्द सुचला नाही) जाहीर करत नाहीत का ??

विनायक प्रभू's picture

16 Jun 2009 - 9:52 am | विनायक प्रभू

बॉ

निखिल देशपांडे's picture

16 Jun 2009 - 9:50 am | निखिल देशपांडे

गुर्जी महत्वपुर्ण माहीती कळवलित....
आता योग्य लोकां पर्यंत पोहचवतो.
==निखिल

सहज's picture

16 Jun 2009 - 9:51 am | सहज

हा सर्व वर्तमानपत्रात छापुन यायला हवा.

आता ओळखीतल्या १२ वाल्या पालकांना दाखवतो.

धन्यवाद मास्तर.

स्वाती दिनेश's picture

16 Jun 2009 - 12:06 pm | स्वाती दिनेश

हा सर्व वर्तमानपत्रात छापुन यायला हवा.
आता ओळखीतल्या १२ वाल्या पालकांना दाखवतो.
असेच म्हणते,
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2009 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार

गुर्जी प्रिंटआउट काढुन लावतो लगेच.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

रेवती's picture

16 Jun 2009 - 6:40 pm | रेवती

उपयुक्त लेख. आपल्या लेखांमधून भरपूर शिकायला मिळतं.
वर्तमानपत्रात छापून आला तर किती लोकांचे पैसे आणि मनस्ताप वाचतील!

रेवती

क्रान्ति's picture

16 Jun 2009 - 7:25 pm | क्रान्ति

महत्वाची माहिती दिलीत सर. जमेल तेवढ्या पालकांना देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. {तेवढाच खारीचा वाटा!}

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

सूहास's picture

16 Jun 2009 - 7:26 pm | सूहास (not verified)

आपला मोबाईल द्यावा... झेरॉक्स काढुन वाटावयास लावतो...लोहगा॑व मध्ये सर्वत्र पोहोचतील..

माहीतीबद्दल शतश : धन्यवाद...

सुहास
ऊपाध्यक्ष,मनसे,लोहगाव...

चित्रा's picture

16 Jun 2009 - 7:43 pm | चित्रा

प्रभु सर म्हणतात तो सीईटीचा प्रकार (उलथापालथ, मार्कांना लागलेली उतरण) नुकताच ऐकला आहे. त्यामुळे पालकांसाठी अगदी योग्य वेळी लिहीलेला लेख.

सर्वसाक्षी's picture

16 Jun 2009 - 9:43 pm | सर्वसाक्षी

बहिणीच्या मैत्रिणीची मुलगी दोन वर्षांपूर्वीची १० वी च्या गुणवत्ता यादीतली. यंदा १२ वी ला ८६% आणि सी ई टी १५१ - फार निराश झाली असावी, बी एस सी ला प्रवेश घेणार असे म्हणत होती.

बहिणीला आपला लेख वाचताच निरोप दिला.

धन्यवाद

विसोबा खेचर's picture

17 Jun 2009 - 12:02 am | विसोबा खेचर

आयला मास्तर, मला वाटतं हल्लीचे पालकच अंमळ शेपूटघालू दिसतात त्यामुळेच लेको तुमच्यासारख्या फुकट फौजदार समुपदेशकाचं फावतं! :)

आमचा बाप आम्हाला म्हणाला असता,

"इंजिनियरींग'च्या प्रवेशाकरता इतकं फालतू टेन्शन घेण्याची गरज नाही. देवानं दोन हात दोन पाय धड दिलेत ना भडव्या? मग काही उप्पाशी मरत नाहीस! कष्ट कर, हमाली कर आणि आपलं आपण कमवून गिळ दोन टाईम भोसडिच्या! जोपर्यंत मी हयात आहे तो पर्यंत अगदीच उपाशी मरायची वेळ आली तर ये माझ्याकडे. माझ्यातला अर्धा घास तुला देईन! मी खपलो की तू आणि तुझं नशीब!"

मला सांगा मास्तर, काय वाईट झालं आमचं?

३ सोडता बाकी सर्व 'आता आमच्या मुलांच्या भविष्याचे काय होणार' अशा प्रकारचे.

त्याना म्हणावं, "भडव्यो पोरं काढतांना मला विचारलं होतंत का?" पोरांच्या शिक्षणाची झेंगटं तुम्हीच सांभाळा म्हणावं आता! :)

छ्या...! तुमचीदेखील कमालच आहे मास्तर! तुम्हाला कुणी सांगितलं ही फुकटची *वती गाढवं अंगावर घ्यायला?!

जर 'पुण्य' नावाच्या गोष्टीवर विश्वास असेल तर आजुबाजुला असलेल्या १० वीच्या किंवा १२ वी च्या पालकांना लेखातील माहीती जरुर पोचवा.

का? त्यांना अकला नाहीत??

कुणा एका अभ्यंकराचे वा गोखल्यांचे दोन चार लाख वाचतील.

हा हा हा! आमचा बापही अभ्यंकरच होता बरं का मास्तर! त्याने असे चुत्त्यासारखे पैसे नक्कीच खर्च केले नसते! :)

It is very difficult to remove mentality of equating 10 th 12 th marks to the success in life .

मास्तर! अरे शिका त्या इसमाकडून! तो अगदी करेक्ट बोलला आहे!

मास्तर, तुम्ही स्वत: समुपदेशक आहात परंतु आता तुमचंच थोडं समुपदेशन घ्यायची माझ्यावर वेळ आली आहे! समोरच्या माणसाला टफ बनवा. त्याला जर चालू सिस्टीमचा त्रास होत असेल किंवा तो आजच्या या स्पर्धेत उभा राहू शकत नसेल तर त्या स्पर्धेला फाट्यावर मारून स्वत:च्या हिंमतीवर उभं कसं रहायचं ते शिकवा! या जगात इंजिनियरींगच्या व्यतिरिक्तही अनेकानेक गोष्टी करण्यासारख्या आहेत हे त्याला शिकवा! ते खरं समुपदेशन!

त्याच्यात अन्य काय गुण आहेत, तो कुठला धंदा-व्यवसाय करू शकतो याची त्याला जाणीव करून द्या! घे उडी म्हणावं! खा जरा दुनियेतले टक्केटोमणे आणि रहा स्वत:च्याच मस्तीत स्वत:च्या पायावर उभा!

मास्तर,तुम्ही सो कॉल्ड समुपदेशक मंडळीच लेको इंजिनियरींगच्या शिक्षणाचं नको तेवढं स्तोम माजवता असं दिसतं!

असो..

आपला,
(शाळेतील, महाविद्यालयातील गुणांना फाट्यावर मारून लाईफच्या या अफाट शाळेमंदी शिकून आपल्याच मस्तीत जगणारा!) तात्या.

तुम्ही जगात टक्के टोणपे खाऊन शिकलात तेव्हा तुम्हाला कोणीच, कधीच मदत केली नाही का हो? ती त्यांनी केली नसती तर? तेही तुमचे 'प्रभू मास्तरच' झाले ना त्यावेळी? त्यांच्या बापाचं काय जात होतं तुम्हाला त्यावेळी मदत नसती केली तर?
बहुसंख्य पालक हे मेंढरं हाकल्यासारखे जात रहातात आणि इंजिनियरिंग आणी मेडिकल शिवाय दुसरा विचार करु शकत नाहीत हे खरे आहे. लोकांनी आपली शक्तिस्थाने आणि कमकुवत दुवे ओळखून मुलांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे हे खरे आहे पण त्यांना ते जमत नसेल तर कोणीतरी मदत करायला हवी.
एकीकडे पैसा आहे पण गुणवत्ता नाही किंवा जिद्द नाही असा वर्ग आहे, त्याचवेळी दुसरीकडे असाही वर्ग आहे जो प्रचंड गुणवत्ता असलेला आहे. पण ज्याच्याकडे साधी दहावी, बारावी नीट पूर्ण करायलाही पैसा नाही. ह्या मुलांना त्यांच्या बुद्धीला नीट वळण मिळालं नाही तर काय होणार? समाजात गुंडांची संख्या कमी नाही अफाट बुद्धी आहे, ऊर्जा आहे पण रस्ता मिळत नाही काय होणार? आज जॉनी नाडर सारखा मुलगा विक्रोळीच्या झोपडीतून यूडीसीटीला नेण्याचे कष्ट मास्तरांनी घेतले आहेत. ते फक्त त्यालाच उपयोगी पडतात का? त्याचे कष्ट, मास्तरांचे कष्ट बघणारे चार आजूबाजूचे लोक त्यांची मुलं ह्यातून काहीतरी शिकत असतात, टिपत असतात. नि:स्वार्थीपणाने आपल्याला माहीत असलेली योग्य गोष्ट गरजूंना देणारे फार कमी आहेत. आणि त्यांच्या कामात मदत होत नसेल तर निदान त्यांचा अवसानघात तरी करु नये. एवढे तारतम्य आपण बाळगायलाच हवे!
तुम्ही स्वतः तुमच्या कमाईतला काही भाग दरवर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला देता असे तुमच्याच कुठल्या लिखाणात मागे वाचले होते. का देता हो? तिथल्या सगळ्या बायकामुलींना तुम्ही ओळखता म्हणून? तुम्ही दिले नाहीत तर त्यांना पैसा कमी पडेल म्हणून? नाही त्यांना दुसरा कोणी तात्या भेटेलच पण त्याची फिकिर तुम्ही करत नाही. तुम्ही तुमचं काम करता. समाजाचं देणं काही अंशी परत करता. ही प्रत्येक माणसाची गरज आहे. अहो साधं एखाद्या गाण्याचं छानसं परीक्षण तरी तुम्ही का करता हो? कुणाचं काय अडलं आहे का ते वाचण्यावाचून? पण तरीही तुम्ही करता कारण मोठ्या लोकांचं मोठं काम आत्ताच्या लोकांना कळावं, बघायला मिळावं, त्याचा आस्वाद घेता यावा हे तुम्हाला तीव्रतेने वाटतं. हे समाजाचं देणंच आहे. तुम्हाला जे येतं ते तुम्ही देत असता. कळत, नकळत. तुमच्या भाषेत हा येडझवेपणा आहे.
मास्तर तसाच काही वेडेपणा करताहेत ते चांगलंच करताहेत. चालू सिस्टिमला आणि स्पर्धेला फाट्यावर मारुन जगणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्यांना जमतं त्यांच्यासाठी मास्तर नाहीच आहेत. पण ज्यांना जमत नाही आणि मग ते इतरांनाच फाट्यावर मारायला लागण्याची शक्यता असते त्यांच्यासाठी मास्तर आहेत! एवढेच बोलतो.
तात्या, आपण सूज्ञ आहात. तुमच्या प्रतिक्रियेमागची तगमग मी समजतो पण त्यातून चुकीचा संदेश जायला नको म्हणून हा प्रतिक्रियेचा प्रपंच!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

17 Jun 2009 - 12:48 am | विसोबा खेचर

चालू सिस्टिमला आणि स्पर्धेला फाट्यावर मारुन जगणं सगळ्यांनाच जमतं असं नाही.

माझ्या मते तसं ते जगायला शिकवणं हेच समुपदेशकाचं काम!

तात्या, आपण सूज्ञ आहात. तुमच्या प्रतिक्रियेमागची तगमग मी समजतो पण त्यातून चुकीचा संदेश जायला नको म्हणून हा प्रतिक्रियेचा प्रपंच!

रंगा, मला उद्देशून चार ओळी तू चांगल्या हेतूने लिहिल्या आहेस हे मी जाणतो! परंतु मास्तरांच्या या लेखामुळे इंजिनियरींगला अवास्तव महत्व दिल्याचा चुकीचा संदेश जातो आहे असं मला व्यक्तिश: वाटतं!

पाप काय! पुण्य काय, पालकांना कळवा काय! उग्गाच कायच्या काय भंकसपपलू तिच्यायला! :)

अर्थात, हे माझं व्यक्तिगत मत! बाकी चालू द्या..

तात्या.

विनायक प्रभू's picture

17 Jun 2009 - 9:24 am | विनायक प्रभू

तुमचा फार मोठा गैरसमज झाला आहे. मी माझ्या पद्धतीने इंजीनियरिंग शिवाय जग आहे हा निरोप सर्वांना देतो.आणि ती नेमकी ह्याच वेळी देता येते.
ज्यांचे कान उघडे असतात त्यांना कळते.
बहिर्‍यांची काळजी मी करत नाही.
फक्त तुमच्या माहीती करता: हा लेख वाचल्यानंतर सुमारे १२ फोन आले. त्या सर्वांनी डोनेशन न देता मिळाली तरच इंजीनियरींग नाही तर इतर रस्ता पकडायचे ठरवले. ते नेमके कुठले ही माहीती पण दीली.
आणि शिक्षणाचा हा खेळ्खंडोबा पालकासमोर उलगडला जातो आहे त्याचे श्रेय मिपाला. मला नाही. खरे तर ही जबाबदारी वृत्तपत्रांची,किंवा सकाळी ४ वाजता लाईन लावुन अ‍ॅडमिशन घेतलेल्या कॉलेजची. पण कुठेही संपुर्ण माहीती मीळत नाही. ही माहीती देत असताना शंभरामधे ५ ते सहा जणाना अक्कल आली तरी ती मला पुरे.
अर्थात तुमचे व्यक्तिगत मत पण'सर आंखोपर'
आपला भंकसपपलू: वि.प्र.

अडाणि's picture

17 Jun 2009 - 10:01 am | अडाणि

लेख , प्रतीक्रिया, प्रती-प्रतीक्रिया... सर्व आवडले....सरांचा मुद्दा पटतो.... आज काल १० / १२ वी चे फारच स्तोम माजले आहे... आणि नेमक्या ह्याच वेळी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे...

सर, माझ्या माहिती मधे एका मुलाला अपेक्शे पेक्शा खुपच कमी मार्क्स मिळाले.. म्हणजे पहिली ते प्रीलिम पर्यंत ९०% पेक्षा जास्त मार्क्स मिळणार्‍या मुलाला ६५% मार्क्स मिळाले आहेत. अश्या वेळी काय समुपदेशन कराल ?
मुलगा (आणि त्याची आइ जास्त) नाराज झालेले आहेत... पण आता काही ईलाज नाही... त्यांना मी बरेच सांगून पाहिले कि मेडीकल हेच सर्वस्व नाही.. पण दुसरा चांगला पर्याय कोणता व कसा पटवून द्यावा ते सांगा...

-
अफाट जगातील एक अडाणि.

विनायक प्रभू's picture

17 Jun 2009 - 11:19 am | विनायक प्रभू

व्य. नी तुन कळवलेले पर्याय वापरा.
मेडीकल म्हणजे सर्व काही नव्हे.
फाट्यावर मारा मेडीकल ला.
सकाळी सकाळी दोन पेग मारले की व्य. नी चे उत्तर लगेच देतो.
खरा आणि फालतु विप्र.

>> चालू सिस्टिमला आणि स्पर्धेला फाट्यावर मारुन जगणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्यांना जमतं त्यांच्यासाठी मास्तर नाहीच आहेत. पण ज्यांना जमत नाही आणि मग ते इतरांनाच फाट्यावर मारायला लागण्याची शक्यता असते त्यांच्यासाठी मास्तर आहेत!

हे अत्यंत योग्य वाटलं मला.

मास्तर तुम्ही जे चांगले काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद.

मुक्तसुनीत's picture

17 Jun 2009 - 5:11 pm | मुक्तसुनीत

विप्रंचा मूळ लेख आणि चतुरंग यांचा , अतिशय समजूतदार प्रतिसाद याच्याशी १००% सहमत आहे.

विप्र यांच्या सारख्यांना मिसळपाव हे व्यासपीठ मिळालेले आहे. त्यांनी कळकळीने चालविलेल्या कामाचा तेजोभंग करणे अयोग्य आहे. "ज्याचे बळ त्यास" हे लहान मुलालाही समजेल असे सूत्र आहे. तात्या अभ्यंकरांना जे जमेल ते विप्रना जमणार नाही. पण त्याच्या उलटही खरे आहे. विप्र जे करतात ते सगळ्याना झेपणार नाही.

आमच्या काळी एक विप्र हवे होते. याचा संबंध बारावीशी नाही , इंजिनियरींगशी नाही. त्या वेळाच्या मनातल्या गोंधळाशी आहे. जगावर रुसण्याच्या वयाशी आहे.

विसोबा खेचर's picture

17 Jun 2009 - 5:27 pm | विसोबा खेचर

विप्र यांच्या सारख्यांना मिसळपाव हे व्यासपीठ मिळालेले आहे.

नक्कीच आहे. मिपा सगळ्यांचंच आहे. विप्रंचंही आहे. अगदी हक्काचं आहे!

त्यांनी कळकळीने चालविलेल्या कामाचा तेजोभंग करणे अयोग्य आहे.

त्यांचा तेजोभंग करावा असा माझा हेतू नाही आणि नव्हता. मी फक्त माझी मतं मांडली आहेत..

"ज्याचे बळ त्यास" हे लहान मुलालाही समजेल असे सूत्र आहे.

हम्म! शक्यता आहे! कदाचित एखाद्या लहान मुलाकडे जी अक्कल/समजशक्ति/आकलनशक्ति असेल ती माझ्याकडे नसेल!

असो..

कदाचित माझंच काही चुकत असेल! तेव्हा आता या थोरा-मोठ्या विचारवंतांच्या चर्चेच्या मांदियाळीत माझ्यासारख्या लहान मुलाचीही अक्कल नसलेल्याने गप्प बसलेले बरे..!

चालू द्या..

आपला,
(बेअक्कल) तात्या.

संजय अभ्यंकर's picture

17 Jun 2009 - 10:22 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

Nile's picture

17 Jun 2009 - 2:28 am | Nile

मदत करुन दुसरा पांगळा होउन जन्मभर दुसर्‍याच्याच मदतीची वाट पहात बसेल असे होउ नये इतकेच मला वाटते, अर्थात गुर्जी हे जाणतच असतील. :)

मिसळभोक्ता's picture

17 Jun 2009 - 11:11 am | मिसळभोक्ता

मी तात्या, मास्तर, आणि रंग्या ह्या तिघांशीही सहमत आहे.

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

संजय अभ्यंकर's picture

17 Jun 2009 - 4:13 pm | संजय अभ्यंकर

मास्तरांचा लेख वाचला! त्या आधी त्यांच्याशी बरीच फोनाफोनी केली.
(थोडक्यात त्यांना बराच पिडला).

गेले तीन दिवस बराच डाटा गोळा केला. चार्ट बनवले.
डी.टी.ई. ची वेबसाईट ढवळली.

माझ्या मुलाला १२वीत चांगले परंतु सीईटीत बरेच कमी मार्क मिळाले.
परंतु , इंजीनीयरिंगला जायचा निर्णय त्याचा स्वतःचा आहे, त्याच्यावर लादलेला नाही.

मास्तरांशी चर्चा केल्यावर लक्षात आले की डोनेशन न देताही इं. ला अ‍ॅडमिशन मिळु शकते. मला जमेल तितक्या पालकांशी ह्यावर चर्चा केली. पाल्याला सि.ई.टी. किंवा ए.आय. इ.इ.इ.च्या मार्कांवर अ‍ॅडमीशन मिळु शकते हे समजावण्याचा प्रयत्न केला.

डोनेशनच्या ऐवजी तो खर्च, दुरच्या संस्थेत प्रवेश घेतल्यावर हॉस्टेल इ. वर केला तरिहि, डोनेशन पेक्षा बराच कमी असतो.

आजमीतीस, इं.शिक्षणाचा खर्च, ४वर्षांसाठी अंदाजे, ३.५ लाख आहे. हा निव्वळ कॉलेज फीचा खर्च आहे. हॉस्टेल, पुस्तके, इ. वेगळी.

लोकांना आपल्या पाल्यासाठी मुंबई, पुणे ह्या शहरातल्या नामांकीत संस्थांत प्रवेश हवा असतो. हि मानसिकता बदलायला हवी.
संस्था कुठलीहि असली तरी, पदवी देणारे विद्यापीठ असते, हे समजून घेतले पाहीजे.

मास्तरांचे भाकीत (९०/२०० किंवा २०/४३२ ला अ‍ॅडमिशन), हे शक्य आहे परंतु, पालकांना संयम हवा. कॅप-२ किंवा कॅप-३ पासून हे चित्र स्पष्ट होईल.

ता.क. : www.dte.org.in नुसार ह्या वर्षी मुंबई विद्यापीठ क्षेत्रात अजून दोन कॉलेजेसची भर पडली असे दिसते (एक बोईसरला व एक पनवेलला).

सि.ई.टी. ला दुसर्‍यांदा, तिसर्‍यांदा बसून १९०/२००, १९५/२०० मार्क मिळवणारे महाभाग आहेत, अश्या बातम्या येत आहेत. हे दुसरे, तिसरे प्रयत्न करणारे महाभाग, आपल्या करीयरची महत्वाची वर्षे वाया का घालवतात?

एक प्रश्न सर्वांना: काँप्युटर, आय.टी., इलेक्ट्रॉनिक्स ला इतक्या सिट्स, सध्या उपलब्ध झाल्या आहेत की, ह्यातुन बाहेर पडणार्‍या इं. ना नोकर्‍या कोण देणार?

ह्याच्या जाणीव करून देऊन, मुलाला ह्या पासुन परावृत्त करण्याचा मी प्रयत्न केला.

शेवटी , मास्तरांचे आभार. मुलांचे करियर हा विषय इतका जगडव्याळ आहे की, एक मास्तर त्याला पुरे पडू शकत नाहित.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

17 Jun 2009 - 4:40 pm | विसोबा खेचर

मुलांचे करियर हा विषय इतका जगडव्याळ आहे की, एक मास्तर त्याला पुरे पडू शकत नाहित.

माझ्या मते ते मुलांवरच सोपवावं! च्यामारी खा म्हणावं टक्केटोमणे, आणि रहा स्वत:च्या पायांवर उभे! आमच्याच्याने सहज होईल ते आम्ही पाहू म्हणावं! साला लाख्खो रुपयांच्या दमड्या आणणार कुठून?

बारावी पास घोड्यांच्या शिक्षणाची फालतू कवतिकं बंद करा..!

साला, आम्ही कधी काळी अडीच रुपायाच्या एक कप चहाकरता मालकाची अर्धा तास बोलणी खाल्ली! काय वाईट झालं आमचं?! आता स्वत:च्या पायावर धंदा खोलून उभे आहोत! ताठ मानेनं जगतो आहोत!

मास्तर, तुमच्या संपर्कात येणार्‍या पालकांना आणि पोरांना अश्या प्रकारचं समुपदेशन करा..!

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jun 2009 - 4:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

साला, आम्ही कधी काळी अडीच रुपायाच्या एक कप चहाकरता मालकाची अर्धा तास बोलणी खाल्ली! काय वाईट झालं आमचं?! आता स्वत:च्या पायावर धंदा खोलून उभे आहोत! ताठ मानेनं जगतो आहोत!

तात्या, मग सांगा किती लोकं तुमच्यासारखी आहेत? किती लोकांची मराठी वेबसाईट यशस्वी झाली?? किती लोकं योग्य वेळी 'माल लेके बैठ जाओ' असं सांगू शकतात?

मी आज यशस्वी आहे का नाही हे माहित नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, काही मित्र भेटले नसते तर मी सुद्धा आज लोकांचे दात कोरत बसले असते नाहीतर डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन्सवरची अक्षरं लावत बसले असते.

विसोबा खेचर's picture

17 Jun 2009 - 5:02 pm | विसोबा खेचर

किती लोकांची मराठी वेबसाईट यशस्वी झाली??

हो, पण त्याकरता मीदेखील टक्केटोमणे खाल्ले आहेत. आंतरजालीय राजकारण, जळफळाट, केवळ मिपाची आणि माझी वाट्टेल तशी बदनामी करणारी संस्थळे आणि ब्लॉग्ज उभे राहिले आहेत!

पण त्या सगळ्यांना पुरून उरणं महत्वाचं!

किती लोकं योग्य वेळी 'माल लेके बैठ जाओ' असं सांगू शकतात?

हो, पण त्याकरता सुरवातीला शेअर बाजाराचं अबकडदेखील माहीत नसतांना मीदेखील काही पैसे गमावले आहेत (अर्थात स्वत:चे! बापाचे नाहीत!), तोंडावर आपटलो आहे, गुडघे फोडून घेतले आहेत! तेव्हा आज चार पैशे कमवू शकतो आणि लोकांना सल्ले देऊ शकतो!

मी आज यशस्वी आहे का नाही हे माहित नाही.

मग प्रश्नच मिटला! प्रथम ते माहीत असणं महत्वाचं!

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jun 2009 - 5:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो, पण त्याकरता सुरवातीला शेअर बाजाराचं अबकडदेखील माहीत नसतांना मीदेखील काही पैसे गमावले आहेत (अर्थात स्वत:चे! बापाचे नाहीत!), तोंडावर आपटलो आहे, गुडघे फोडून घेतले आहेत! तेव्हा आज चार पैशे कमवू शकतो आणि लोकांना सल्ले देऊ शकतो!

हेच विप्रसुद्धा करत आहेत ... तुम्ही शेअर बाजारासंदर्भात करत आहेत, ते शिक्षणक्षेत्रात करत आहेत.

आणि माझ्या व्यक्तीगत उदाहरणाबद्दलच म्हणाल तर मी दात कोरणारी, किंवा औषधं बनवणारी/विकणारी झाले असते तर असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. तिशी यायच्या आधीच 'यशस्वी' असणारी माणसं कमीच असावीत.

शलाका's picture

18 Jun 2009 - 3:26 am | शलाका

साला, आम्ही कधी काळी अडीच रुपायाच्या एक कप चहाकरता मालकाची अर्धा तास बोलणी खाल्ली! काय वाईट झालं आमचं?! आता स्वत:च्या पायावर धंदा खोलून उभे आहोत! ताठ मानेनं जगतो आहोत

तात्या तुमचं म्हणणंही पटतय. पण यशस्वीतेची व्याख्या सगळ्यांची वेगळी असते. तुम्ही व्यवहाराच्या दुनियेत यशस्वी झाले असलात तरी तुमची चाळीशी उलटून गेली तरी अजून लग्न झालेलं नाही. आज चालू आहे तो पर्यंत ठीक आहे, पण उद्या आयुष्याच्या संध्याकाळी कुणी जोडीदार नाही ही खंत सगळ्यांनाच पचवुन नेता येते असे नाही.

तुम्ही निवडलेल्या मार्गातुन वाट्यास आलेले हे एकाकी जीवन बर्याच जणांना अपयशी वाटू शकते. रीतसर कॉलेजात जाऊन शिकुन सवरुन लग्न करुन छानसा संसार थाटणे ही बर्याच जणांची यशस्वीतेची व्याख्या असते आणि त्यासाठी त्यांना असे मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. ज्यात चुकिचे काहीच नाही.

वेश्या व्यसने गुंड मवाली असल्या विळख्यात पडून दुनियादारी शिकणे हा काही प्रेफरेबल मार्ग नक्कीच नाही. असो हे झाले माझे मत

विसोबा खेचर's picture

18 Jun 2009 - 7:51 am | विसोबा खेचर

तुम्ही व्यवहाराच्या दुनियेत यशस्वी झाले असलात तरी तुमची चाळीशी उलटून गेली तरी अजून लग्न झालेलं नाही.

एक सुधारणा. लग्न झालेलं नसून, केलेलं नाही असं म्हणूया! :)
जाणूनबुजून केलेलं नाही!

तुम्ही निवडलेल्या मार्गातुन वाट्यास आलेले हे एकाकी जीवन बर्याच जणांना अपयशी वाटू शकते.

एकाकी? अरे देवा! कुणी सांगितलं मी एकाकी वगैरे आहे म्हणून?! :)

असो, अधिक काही खुलासा करत नाही.. :)

रीतसर कॉलेजात जाऊन शिकुन सवरुन लग्न करुन छानसा संसार थाटणे ही बर्याच जणांची यशस्वीतेची व्याख्या असते आणि त्यासाठी त्यांना असे मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. ज्यात चुकिचे काहीच नाही.

बरं बाबा! कबूल..! मार्गदर्शक प्रभूमास्तराचा विजय असो...! :)

तात्या.

संजय अभ्यंकर's picture

17 Jun 2009 - 4:02 pm | संजय अभ्यंकर

पुण्याच्या प्रा. अभय अभ्यंकरांची हे संस्थळ इंजीनीयरिंग प्रवेशेच्छुकांना मार्गदर्शना साठी उत्तम आहे.

लोकांपर्यंत हे पोहोचावे म्हणून त्याचा येथे उल्लेख केला.

दै. लोकसत्ता मध्येही प्रा. अभ्यंकरांचा या विषयावरील लेख अलीकडे वाचनात आला.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

छोटा डॉन's picture

17 Jun 2009 - 5:29 pm | छोटा डॉन

अतिशय उत्तम आणि सखोल चर्चा ...
खरतर अशा चर्चेची फार आवश्यकता आहे, इतक्या महत्वाच्या विषयाशी आपण अलिप्त राहुच शकत नाही ...

विप्रकाकांचा मुळ लेख, रंगाशेठची प्रतिक्रिया आवडली, काही मुद्दे पटले तर काही नाही.
तात्यांचा प्रतिसादही अर्थातच आवडला, बरेच मुद्दे पटले ...

अनेकविध कारणाने मी ही गेली ४-५ वर्षे "दहावीनंतरची २ वर्षे आणि त्यानंतर इंजिनीयरिंग अ‍ॅडमिशन्स" ह्याच्याशी बराच जवळुन सामिल आहे. बर्‍याच जणांशी चर्चा केल्या आहेत, वाद घातले आहेत, सल्ले दिले आहेत, सत्य सांगितले आहे ...

"सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवतो आहे" ...
बाकीचे सगळे इथेच बोलेन ...

बाकी चर्चा चालु द्यात ...

------
( १२ वीचा अभ्यास आणि इंजिनीयरिंगच्या अ‍ॅडमिशनच्या "रात्र थोडी पण सोंगे फार" ह्याला वैतागलेला )
छोटा डॉन

विसोबा खेचर's picture

17 Jun 2009 - 6:54 pm | विसोबा खेचर

तात्यांचा प्रतिसादही अर्थातच आवडला, बरेच मुद्दे पटले ...

???!

माझ्यासारख्या लहान मुलाचीही समज नसलेल्या इसमाचे मुद्दे पटले??

कमाल आहे बॉस! :)

असो,

आमच्या आयुष्याची तालीम झाली मुंबैच्या फोरासरोडवर! आमच्या लाईफचं शिक्षण आम्ही तिथेच घेतलं! पोटाची खळगी भरण्याकरता गुंड, मवाली, दारुवाले, मटकेवाले, रांडा, दलाल यांच्यात बिनधास्त बेधडक वावरलो. तिथे समुपदेशन करणारं कुणीच नव्हतं परंतु खूप काही शिकायला मिळालं!

परंतु त्यामुळेच कदाचित त्या दुनियेबाहेरच्या पांढरपेशा, सभ्य, सुशिक्षित, सुरक्षित(!) (हो, सुरक्षितच! कारण असुरक्षितता काय असते हे मी पाहिलं आहे!) समाजातील शिक्षणक्षेत्राबद्दल आम्हाला पुरेशी कल्पना नाही!

तात्या.

टारझन's picture

17 Jun 2009 - 8:36 pm | टारझन

माझ्यासारख्या लहान मुलाचीही समज नसलेल्या इसमाचे मुद्दे पटले??

तात्यांला ल्हान मुल्गा क्वोन मठला त्ये सांगा पय्ल्यांदी .. च्यामारी हाडंच मुडून ठिवतो ... कोण मंठला बे ?

आमच्या आयुष्याची तालीम झाली मुंबैच्या फोरासरोडवर!

चलो फोरास रोड !!

पोटाची खळगी भरण्याकरता गुंड, मवाली, दारुवाले, मटकेवाले, रांडा, दलाल यांच्यात बिनधास्त बेधडक वावरलो

तात्या तुमचं म्हणनं असं आहे का ? की अशा वातावरणात राहिलं की स्वबळावर उभाराहिलेला तात्या अभ्यंकर घडतो ?? तुम्ही एकटेच अपवाद असाल असं वाटतं .. बाकी सगळे आजही तिकडेच फुकत-ढोसत-खोचत असतील ... ह्याच (किंवा असल्याच) वळणाने जाऊन प्रत्येकानं जिवणाचा अनुभच घ्यावा काय ?

तिथे समुपदेशन करणारं कुणीच नव्हतं परंतु खूप काही शिकायला मिळालं!

एखाद दुसरा शिकणारा शिकतो तात्या .. बाकी ओघात वाहून जातात !!

अर्थात तात्यांच बोलनं चुकीचं नसलं तरी ते फक्त व्यक्तिगत पातळीवर पटतं .. तात्याला त्या काळी कोणी प्रभु भेटला असता तरीपण तात्या यशस्वीच असता .. ज्याला प्रगती करायची त्याला परिस्थिती आड येत नाय .. पण मार्गदर्शन केल्याने चुकीच्या मार्गाला जाणार्‍याला बेटर ऑप्शन्स देता येऊ शकतात ...

ते सगळं असो .. पण तात्याला ल्हान पॉराची आकलीवाला कोण बॉल्ला त्ये सांगा .. कोपच्यात घ्येतो त्याला

-(विना समुपदेशन स्वतःची पायवाट शोधलेला) टार्‍या भयंकर

विसोबा खेचर's picture

18 Jun 2009 - 1:10 am | विसोबा खेचर

तात्याला त्या काळी कोणी प्रभु भेटला असता तरीपण तात्या यशस्वीच असता ..

टारूशेठ, चुकतोस तू.

"तात्याला त्या काळी कोणी प्रभु भेटला असता तर प्रभू यशस्वी झाला असता, आयुष्यात खूप काही शिकून गेला असता!" असं म्हण!

जगातल्या सर्व प्रभूंची बुद्धी जिथे खुंटते अश्या वातावरणात जगलो आहोत आपण!

साला एकदम बिनधास्त!

आता विषय निघालाच आहे म्हणून लिहितो.. (सत्यघटना. विम्याच्या पावत्यांच्या झेरॉक्स आजही माझ्या दफ्तरी मिळतील कुठेतरी!)

झमझम बार मध्ये नौकरी करत असतांना मी मन्सूरच्या ओळखीने दोन चार रांडांचे विमे उतरवले होते. आयुर्विमा महामंडळाचा दलाल असल्यामु़ळे आपल्याला काय, कुणी साध्वी असो वा रांड, धंद्याशी मतलब! त्या काळी विमा उतरवण्याकरता फोटूआयडी, रेशन कार्ड वगैरे लागत नसे. त्यामुळे मी दोनचार रांडांना न्यू जनरक्षा पॉलिसी दिली होती. फॉर्म भरतांना विमाधारकाच्या प्रकृतीस्वास्थाबद्दल काही प्रश्न असतात. ते भरत असतांना एक रांड (सनम. बांग्लादेशी मुसलमान. सख्ख्या भावाने तिला मुंबैच्या रांडबाजारात विकली होती! करा समुपदेशन! असो.) मला म्हणाली,

क्या करेगा साब? कुछ इलाज है? धंदा तो बंद नही कर सकती नही तो खाएगी क्या??"

मी चुपचाप फोर्म भरला, काय महिन्या-दोनमहिन्याचे हप्त्याचे पैसे होते ते तिच्याकडून घेतले आणि तेथून चालता झालो. जगातले सगळे समुपदेशक जिथे संपतात तिथे आमच्या फोरासरोडवरील जिंदगी सुरू होते, अन्सारीदादा सुरू होतो!

अन्सारीदादा बद्दल एकदा विस्तृत लिहीन केव्हातरी!

असो, पुन्हा एक गोष्ट नमूद करतो की हे माझे व्यक्तिगत मत आणि अनुभव! पण त्यामुळे मला असल्या सर्व चर्चा अत्यंत पोरकट वाटतात!

प्रभूसरांना जी काही क़ळकळ आहे, आणि त्याकरता ते जे काही कष्ट करत आहेत ते मी मुळीच नाकारत नाही! परंतु एकंदरीतच बारावीतल्या घोड्यांच्या शिक्षणाचं पुढे काय होणार, कसं होणार या चर्चा वाचल्या की अंमळ करमणूक होते!

असो..

तात्या.

टारझन's picture

18 Jun 2009 - 2:23 am | टारझन

रंतु एकंदरीतच बारावीतल्या घोड्यांच्या शिक्षणाचं पुढे काय होणार, कसं होणार या चर्चा वाचल्या की अंमळ करमणूक होते!

हे मात्र अगदी खरं ... पालक लोकं ही बाऊ करतात .. आणि मास्तरही ह्या बाऊ ला खाऊ पुरवतो :) फुकट पुरवतो म्हणून आपण शांत ...

बाकी आपण वर सांगितलेल्या प्रसंगात मास्तरांचं काय म्हणनं आहे ते पाहायचंय ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2009 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रभुसर ! तुम्ही जे प्रबोधन करता त्याची गरज आहेच. सीइटीत केवळ दहा जरी मार्क मिळाले तरी खाजगी महाविद्यालयामधे इंजिनिअरींगला जाता येते, पण ते पैसे वाल्यांचे काम. बाकी तुमची माहिती महत्त्वाचीच यात शंकाच नाही. मला जर कोणी विचारले की, सीइटीत इतके मार्क पडलेत आता काय करावे,तर संबधितांना आमच्या 'तुकारामाचा' (प्रभूसरांचा) फोनं नंबर देईन ! :)

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

17 Jun 2009 - 7:39 pm | अवलिया

माझी लायकी नाही या चर्चेत भाग घ्यायची !

--अवलिया

नितिन थत्ते's picture

17 Jun 2009 - 7:55 pm | नितिन थत्ते

हेच म्हणतो. :(

खराटा
(रंग माझा वेगळा)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2009 - 7:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>माझी लायकी नाही या चर्चेत भाग घ्यायची !

एकदा चर्चेत सहभागी तर व्हा..वाचक नंतर आपला अभिप्राय व्यक्त करतील.;)

अवलिया's picture

18 Jun 2009 - 6:47 am | अवलिया

हा हा हा
नको ! जे आहे ते ठिक आहे !!
मास्तर, चालु द्या तुमचे निवांत !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

विसोबा खेचर's picture

18 Jun 2009 - 8:05 am | विसोबा खेचर

नाना,

मास्तर, चालु द्या तुमचे निवांत !!

हेच म्हणतो रे बाबा! :) मायझंव, झक मारली अन् या धाग्यात थोबाड खुपसलं! :)

मास्तुरे, मिपा तुमचंच आहे. अगदी हक्काचं! काय लिवायचंय ते लिवा बिनधास्त. आपण साला एक नंबर कंडम अन् भिकारचोट माणूस! तेव्हा माझ्या प्रतिसादांकडे फारसं लक्ष देऊ नका. आणि मी आपला तेजोभंग करतो असं आमच्या मुक्तरावाचं म्हणणं! तेही फारसं खरं नाही. कुणा ऐर्‍यागैर्‍या तात्यामुळे प्रभूमास्तरासारख्याचं तेजोभंग होऊच शकत नाही/होणार नाही!

सांगायचा मुद्दा इतकाच की मला एकंदरीतच शैक्षणिक समुपदेशन, लहानांची मानसिकता, पालक-पाल्य समुपदेशन, वैवाहिक जीवनातील विविध समस्यांचे समुपदेशन इत्यादी सर्व गोष्टी या कंप्लीट बकवास वाटतात..!

नथिंग बट्, अ बिग बिग बिग बकवास..!

असो...

तात्या.

लिखाळ's picture

17 Jun 2009 - 8:44 pm | लिखाळ

विप्र,
आपला निरोप १२वी झालेल्या ओळखीतल्यांना देण्याचा प्रयत्न करीन.

तात्या, चतुरंग आणि इतर प्रतिसाद वाचले. तात्यांना १०-१२चे अती कौतुक नको असे म्हणायचे आहे ते बरोबरच. पालकांनी जरा सबुरीने घ्यावे असे वाटते. करिअर म्हणजे काय, त्याच्या निराळ्या वाटा यांची माहिती अश्या लेखांतून-चर्चेतून समोर येत राहावी. समुपदेशक अशी माहिती देत असतात असा अनुभव आहे.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

छोटा डॉन's picture

17 Jun 2009 - 10:24 pm | छोटा डॉन

वरच्या चर्चेत बरेच मुद्दे आले आहेत, त्यांचा एक्-एक करुन समाचार घेऊ ...

१. वरच्या चर्चेत बरेच जण १० वी आणि १२ वीचे मार्क आणि "सीईटी स्कोअर" ह्यांची तुलना करताना अथवा संबंध लावताना दिसले. तसा म्हणला तर संबंध लावताही येईल पण मी ते "अयोग्य" म्हणेन.
१० वी च्या परिक्षेचा अभ्यास वेगळ्या तत्वांवर आधारीत आहे, इथे "पाठांतर" पद्धतीचे प्राबल्य बर्‍याच वेळा दिसले आहे. १० वी ला जनरली उत्तम घोकंपट्टी करु शकणारा मुलगा हमखास यश मिळवतो असे माझे गृहीतक आहे आणि मी अशी शेकड्याने उदाहरणे पाहिली आहेत. शिवाय ह्यातल्या बहुसंख्य जणांचे "मराठी माध्यमातले" शिक्षण हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे.
१२ वीत आल्यावर काय होते की सायन्समुळे "इंग्रजी"मधुन शिक्षण सुरु होते, आत्तापर्यंत सर्वच गोष्टी मायभाषेत करण्याच्या सवयीमुळे अर्थात हे अवघड जाते. प्रत्येकालाच असे असते असे नाही मात्र सर्वसाधारण मी असे समजतो. शिवाय ह्या इंग्रजीमधुन "पाठांतर" करणेही इतके सोपे नसते. दुसरा मुद्दा असा की १२ वीच्या अभ्यासक्रमात "केमिस्ट्री" सोडली तर पाठांतरला स्कोप नाही, फिजीक्स आणि मॅथ्सचे गणिते सोडवु शकल्याशिवाय मार्क मिळत नाही, १० वी सारखे प्रेमेये पाठ करुन मार्क मिळत नाहीत. बर्‍याच म्हणजे अक्षरशः बहुसंख्य जणांना हे न झेपल्याने मार्क नक्कीच "कमी होतात", मला वाटते हे सहाजीकच आहे.
आता "सीईटी"बद्दल, इथे तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे असतात व कमी वेळात, इथे "स्टेप्सना मार्क नसतात", फायनल उत्त्र बरोबर असेल तरच गुण मिळतात, शिवाय निगेटिव्ह मार्किंग आहेच.
ह्या सर्व चाळणीतुन पार पडल्यानंतर अर्थातच सीईटीचे गुण हे १० वीच्या मार्कांपेक्षा कमी होणार नाहीत का ?

हे सर्वांनाच लागु आहे का ?
नाही, ह्यालाही अपवाद आहेत, जे काही बॉर्न टॅलेंट असते अथवा कमी बुद्धांक असलेला पण "योग्य पद्धतीने व मार्गदर्शनाखाली" सराव आणि कष्त करत असलेला कोणीही ह्या पायर्‍या यशस्वीरित्या पार पाडु शकतो.
मग इथे १० वीचे मार्क, १० वीचे मार्क ह्याचा काहितरी संबंध आहे का ?
१० वीत भरपुर मार्क पडल्याने कोणी अगर स्वतःला सीईटीच्या लायकीचे समजत असेल तर त्याला खरोखर जागे करन्याची गरज आहे असे मी मानतो. २ अत्यंत वेगळ्या पातळीवरच्या आणि सर्वस्वी भिन्न गोष्टींची तुलना करुन "सीईटीची बागुलबुवा" उभा करण्यात खासगी क्लासचालकांचे उखळ पांढरे होते हे ल्क्षात आले तरी बास झाले, बाकी काही नको.

वरच्या प्रतिसादात लिहल्याप्रमाणे मी गेले ४-५ वर्षे ह्या सिस्टीमशी निगडीत आहे.
१० वीला मात्र ६० % मार्क आणि सीईटीला दणदणीत गुण घेऊन स्वतःच्या ताकदीवर, दलाल आणि समुपदेशकाच्या सल्ल्याशिवाय हव्या त्या कॉलेजात हव्या त्या स्ट्रीमला अ‍ॅडमिशन घेतलेले मुलं जसे मी पाहिले आहेत तसेच १० वी ला बोर्डात येऊन त्याच कैफात राहिल्याने सीईटीत माती करुन घेतलेले व शेवटी बीएस्सी केलेले लोकही पाहिले आहेत.
अर्थात हे जनरलाईझ्ड विधान होऊ शकत नाही मातर १० वी आणि सीईटीचा नव्हे तर १२ वी आणि सीईटीचा काहीही संबंध नाही हे दाखवण्यास हे पुरेसे आहे.

२. कमी मार्क आणि अ‍ॅडमिशन्स :
बराच मोठ्ठा इश्श्यु बनवलेला आणि फुकाची काळजी वाढवणारा विवाद म्हणजे "सौदेबाजीतुन होणारे दलालामार्फतचे अ‍ॅडमिशन" ...
महाराष्ट्रात इंजिनीयरिंगच्या साधारणता ४०००० जागा आहेत, शासकीय सोडल्या तर इतर "प्रायव्हेट कॉलेजेस"मधल्या पण लै भारी समजल्या जाणार्‍या अंदाजे २०००० जागा आहेत, त्यातला शासकीय कोटा निम्मा, म्हणजे राहतात साधारणता १००० जागा ....
सौदेबाजी इथे घडते ....

आता इथे कुणाचा चान्स लागु शकतो ?
तर इथे जे "पेमेंट सीय " असते व ज्याचा कोटा हा एकुण उरलेल्या जागांच्या ७० ते ८० % असतो इथे "मेरिट" असलेली मुले थोडे जास्त पैसे मोजुन थोडेसे कमी मार्क अ‍ॅडजेस्ट करुन आपले सीट मिळवु शकतात. इथे तसा जास्त सौदेबाजीला वाव नाही.
आता उरलेल्या १० ते १५ % जागांचा प्रश्न की ज्याला "मॅनेजमेंट कोटा" असे म्हणतात.
इथे मात्र सरळ सरळ सौदा होतो, जो जास्त देईल त्याला सीट असे गणित असते.
आता हे आवश्यक आहे का ?
हो, आहे. इथे संस्थाचालक जरी भारंभार पैसा घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरत असले तरी त्यातला काही वाटा हा "सोईसुविधांसाअठी" खर्च करावा लागतो, ही अफवा नव्हे तर सत्य आहे.
ज्यांची देण्याची ताकद आहे असेच लोक ह्या लफड्यात पडतात. शिवाय हे लोण फारफार तर १५-२० कॉलेजेसपुरतेच मर्यादीत आहे असे मी ठामपणाने सांगु इच्छितो. बाकीच्या ठिकाणी परिस्थीती एवढी खराब मुळीच नाही. त्यातसुद्धा हा प्रश्न असतो तो १०० मधल्या लैत लै ५-१० जागांचा.

ह्या ठिकाणी जसे ३०-४० लाख रुपये वगैरे डोनेशन देऊन अ‍ॅडमिशन्स घेतले जातात त्याच्या अगदी उलटसुद्धा ह्याच महाराष्ट्रात घडते.
ह्याकडे कोणी पाहिले आहे का ?
आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सारखपट्ट्यातले कॉलेजात या, शासकीय फीच्या "निम्मे पैसे" भरुन व उरलेले माफ करुन इथे लोक अभियंते होतात, अर्थात ही कॉलेजे नॉन्-ग्लॅमरस असतात.
सीट्स न भरल्याने मान्यता "रद्द होऊ नये" म्हणुन संस्थाचालक ही तडजोड करतात.
हे त्यांचे नुकसान आहे का ?
नाही, ह्याची भरपाई ते "ओ एम एस" कोट्यातुन भरलेल्या जागांसाठी धनदांडग्या युपी, बिहारी मुलांकडुन घेतलेल्या पैशातुन करतात.
असा सरळ सरल बिझीनेस आहे हा ....

थोडक्यात अ‍ॅडमिशन्स चे प्रकरण एवढेही अवघड नाही, जेवढी ओरड होते आहे तितके तर जिबातच नाही.
बर्‍यापैकी मार्क असतील तर आरामात सीट मिळेल, हव्या त्या कॉलेजात हवी ती स्ट्रीम मिळेल का हे मात्र सांगता येत नाही.
हवीच असेल तर पैसे मोजा व मॅनेजमेंट कोट्यात घुसा ...

मात्र मला इथे ही "लुबाडणुक " नव्हे तर स्वमर्जीने केलेला सौदा आहे हे आवर्जुन सांगावेसे वाटते.

आता इथेच थांबतो,
हा प्रतिसादाचा भाग-१ समजायला हरकत नाही, बरेच काही लिहायचे असल्याने अजुन काही भाग येतील ...

पुढच्या भागात "समुपदेशनाची गरज, निन्म स्तरातील विद्यार्थी, फॅड " यावर लिहेन ...

तुर्तास क्रमश :

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jun 2009 - 10:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बर्‍यापैकी मार्क असतील तर आरामात सीट मिळेल, हव्या त्या कॉलेजात हवी ती स्ट्रीम मिळेल का हे मात्र सांगता येत नाही.

मी शिकत असताना तरी, मुंबईच्या कॉलेजांमधे पहिल्या वर्षांत खूपच चांगले मार्क मिळवणार्‍या परिक्षार्थ्यांना स्ट्रीम बदलूनही मिळायची! हेही विसरू नका.

थोडं विषयांतरः

आज माझा भाऊ, प्रॅक्टीसींग सिव्हील इंजिनीयर्सची कमतरता असल्यामुळे, समान अनुभव असलेल्या आय.टी.वाल्यांशी तुलना करता येईल एवढे पैसे मिळवतो. कामातलं समाधान आहेच, शिवाय स्पर्धा करायला, त्याला रिप्लेस करायला कोणी नसल्यामुळे, अनेकदा, तो सांगतो आणि नोकरी/पगारवाढ मिळते.
मेकॅनिकलमधेही थोड्याफार फरकाने हीच स्थिती असल्याचं त्याच्या मित्रांकडून कळतं.

छोटा डॉन's picture

17 Jun 2009 - 10:50 pm | छोटा डॉन

तु जे "अवांतर" मध्ये लिहले आहेस ते सुद्धा फार महत्वाचे आहे.
त्यावरही लिहण्यासारखे बरेच आहे, तुर्तास तुझ्याशी सहमत आहे ...

मुड झाला तर "इंजिनीयरिंग" वर एक प्रतिसाद लिहुन टाकेन.
लोकांना फोकलीचा लै गैरसमज झाला आहे इंजिनीयरिंग बद्दल, उठसुठ आयटीमधला पैसा दिसत आहे व तेवढेच इंजिनीयरिंग करण्याचे इतिकर्तव्य आहे असे वाटते आहे

असो.
बाकी सवडीने.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

रेवती's picture

17 Jun 2009 - 11:14 pm | रेवती

मी शिकत असताना तरी, मुंबईच्या कॉलेजांमधे पहिल्या वर्षांत खूपच चांगले मार्क मिळवणार्‍या परिक्षार्थ्यांना स्ट्रीम बदलूनही मिळायची!
माझ्या भावाला इलेक्ट्रीकलकडून मेकॅनिकलकडे बदलून मिळाली होती (प्रायव्हेट कॉलेज, सरकारी सीट). तो त्यावर्षी मार्कांच्या दृष्टीने दुसरा होता. पहिला आलेल्या मुलाला बदलून नको होती म्हणून ह्याला संधी मिळाली.......पण हक्क असूनही बदलून हवीच आहे का? मग २५ हजार भरा नाहीतर जे आहे ते आहे. भरपूर भांडणे वगैरे होऊनही २५ हजार भरावे लागलेच.
रेवती

पिवळा डांबिस's picture

18 Jun 2009 - 10:07 am | पिवळा डांबिस

सर्वप्रथम, तात्याने मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत!
इंजिनियरिंग किंवा मेडिकलची करियर मिळवण्याचे सुलभ मार्ग कुठले हे शिकवण्यापेक्षा मुलांना आयुष्यात समोरून येणारी लाट छातीवर कशी तोलायची हे शिकवणं कितीतरी अधिक महत्वाचं!! मग करियर कोणतीही असली (अगदी तुंग्रुसाचीही!) तरी हरकत नाही!!!
दुसरा मुद्दा असा की १२ वीच्या अभ्यासक्रमात "केमिस्ट्री" सोडली तर पाठांतरला स्कोप नाही,
या विधानाबद्दल प्रस्तुत लेखकाचा जाहीर निषेध!!!
(कोण म्हणतो की आम्ही आपल्या कंपूतल्या लोकांना नेहमीच सांभाळून घेतो म्हणून!!!:))
सिल्याबस देतो, सहा महिने अभ्यास करा....
नंतर पाच प्रश्न देतो, सोडवून दाखवा....:)
पाठांतराने केमिस्ट्री येतं असा गैरसमज होण्याचंम कारण हे की १२ वीला विचारले जाणारे प्रश्न तेचतेच आणि सरळ-सोपे असतात!! आळशी पेपर सेटर्स, दुसरं काय!!!!:)
कोई है माई का लाल अपना चॅलेंज स्वीकारनेको?:)

बाकी आम्हाला शिक्षणातलं काहीच कळत नाही तेंव्हा ते तुमचं गहन डिस्कुस्सन चालू द्या....
:)

जॉर्ज कॉल्डवेलचा चेला,
मेथिल यलो

छोटा डॉन's picture

18 Jun 2009 - 10:20 am | छोटा डॉन

या विधानाबद्दल प्रस्तुत लेखकाचा जाहीर निषेध!!!
(कोण म्हणतो की आम्ही आपल्या कंपूतल्या लोकांना नेहमीच सांभाळून घेतो म्हणून!!!)

हा हा हा, आवड्या, एकदम आवड्या ...
आम्हीही ही निषेध करतो ...
( आम्ही कंपुतल्या लोकांना नेहमीच संभाळुन घेतो ;) )

सिल्याबस देतो, सहा महिने अभ्यास करा.... नंतर पाच प्रश्न देतो, सोडवून दाखवा....

सिल्याबस कोणता ?
१२ वीचा का ? कारण त्यात काही अगम्य, अतर्क्य किंवा अवघड आहे असे वाटत नाही.
अर्थात आम्हाला रुढीनुसार वर्षानुवर्षे विचारल्या जाणार्‍या प्रश्नांचीच सवय, त्याबाहेरचे काही आल्यास आम्ही "सिल्याबसच्या बाहेरचा प्रश्न" म्हणुन बोंबाबोंब करु ... ;)

पाठांतराने केमिस्ट्री येतं असा गैरसमज होण्याचंम कारण हे की १२ वीला विचारले जाणारे प्रश्न तेचतेच आणि सरळ-सोपे असतात!! आळशी पेपर सेटर्स, दुसरं काय!!!!

+++++++++++++१११११११११११११११११
हेच म्हणतो.
च्यामारी गेल्या ४-५ वर्षातले पेपर्स चाळले तर १ सुद्धा प्रश्न वेगळा नाही ?
आयला ही काय पद्धत आहे परिक्षा घेण्याची ?
मग मार्क पडणार नाही तर काय होणार ?

------
( १२ वी केमिस्ट्रीमध्ये १०० पैकी १०० मार्क घेतलेला )
छोटा डॉन

पिवळा डांबिस's picture

18 Jun 2009 - 10:59 am | पिवळा डांबिस

अर्थात आम्हाला रुढीनुसार वर्षानुवर्षे विचारल्या जाणार्‍या प्रश्नांचीच सवय, त्याबाहेरचे काही आल्यास आम्ही "सिल्याबसच्या बाहेरचा प्रश्न" म्हणुन बोंबाबोंब करु ...
हा, हा, हा!!!!:)))

विसोबा खेचर's picture

18 Jun 2009 - 11:10 am | विसोबा खेचर

सर्वप्रथम, तात्याने मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत!

धन्यवाद रे डांबिसा! साला आपण एक नंबरचा भिकारचोट आणि फालतू माणूस. आपल्या बोलण्याला फारशी किंमत नसल्यामुळे आपण काही बोललो की तो तेजोभंग होतो. अरे पण तसा आमचा मुक्तराव कवी मनाचा रे! अगदी साधा आणि भला माणूस. त्यामुळे त्याच्यावर राग नाही! :)

परंतु आता तुझ्यासारख्या चेमिष्ट्री मधल्या दादा इसमाने काही वक्तव्य केल्यामुळे आपली कॉलर अंमळ टाईट झाली बॉस! :)

इंजिनियरिंग किंवा मेडिकलची करियर मिळवण्याचे सुलभ मार्ग कुठले हे शिकवण्यापेक्षा मुलांना आयुष्यात समोरून येणारी लाट छातीवर कशी तोलायची हे शिकवणं कितीतरी अधिक महत्वाचं!!

अरे सायबा, आजपर्यंत नेमकं हेच तर मी मास्तरला वेगवेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करतोय! पण मास्तर त्याच्या त्या समुपदेशनाच्या नादातून बाहेरच पडायला तैय्यार नाय, सुधरायलाच मागत नाय! :)

असो...

बाकी आम्हाला शिक्षणातलं काहीच कळत नाही तेंव्हा ते तुमचं गहन डिस्कुस्सन चालू द्या....

खरं आह रे बाबा! :)

तात्या.

--

"तात्याभाय, अरे अपना सलीम नाई का आंडवा देख सूजेला लगता है! बहुत रंडीबाजी करता है और दिनभर खुजाता बैठता है! तेरे पैचानमे कोई अच्छा डाक्टर है क्या? नै तो सालेको एक दिन केममे (के ई एम)उठाके लेके जाना पडेगा! भडवेके बिबि बेचारी को भी रोग लग गया होगा!"

करा समुपदेशन! :)

पिवळा डांबिस's picture

18 Jun 2009 - 11:26 am | पिवळा डांबिस

तसा आमचा मुक्तराव कवी मनाचा रे! अगदी साधा आणि भला माणूस. त्यामुळे त्याच्यावर राग नाही!
आमचाही विप्रं वर राग नाही, मुसुवर तर नाहीच नाही....:)
चर्चा चाललीय तेंव्हा आम्ही आमच्या मगदुराप्रमाणे दोन पैसे (म्हंजे मराठीत टू सेन्टस की काय म्हणतात ते हो!!) टाकले इतकंच!!!
बाकी शिक्षणक्षेत्रातलं आम्हाला काही कळत नाही हे आम्ही वर मान्य केलेलंच आहे!!!:)

भाग्यश्री's picture

18 Jun 2009 - 2:57 am | भाग्यश्री

चांगला लेख आहे.. १२वीत अपेक्षित मार्क्स न मिळाल्यामुळे निराश झालेल्या मुलांना आणि जास्त करून पालकांना उपयोगी पडेल..
बाकी, प्रत्येकाची स्वतःची करिअर लाईन काय ठरवायची हा वैयक्तिक प्रश्न आहे.. त्याचा किती बाऊ करायचा हे ही वैयक्तिक..

पण लेख आणि काही प्रतिसाद आवडले..
http://www.bhagyashree.co.cc/

सूहास's picture

18 Jun 2009 - 3:37 pm | सूहास (not verified)

<<<इंजिनियरिंग किंवा मेडिकलची करियर मिळवण्याचे सुलभ मार्ग कुठले हे शिकवण्यापेक्षा मुलांना आयुष्यात समोरून येणारी लाट छातीवर कशी तोलायची हे शिकवणं कितीतरी अधिक महत्वाचं!!>>>

१२ वी त जाणारे आणी करियर चा विचार करणारे ९०% तरुण केवळ लवकरात लवकर( आणी शॉर्टकटने) कसा पैसा मिळविता येईल हाच विचार करतात्...पालकही त्यात सामील..मग काय ओता पैसा इंजिनियरिंग किंवा मेडिकलला ....त्या॑नतर त्या॑ना आपण वर लिहीलेले विचार शिकवणारे खरोखर पाहिजे आहेत...मग

सुहास