तुझी माझी प्रित

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
22 May 2009 - 12:55 pm

तुझी माझी प्रित
राधा कृष्णाची रास व्हावी
वेणू च्या नादी तुझ्या
माझ्या पैंजणांची छूमछूम झंकारावी.

तुझी माझी प्रित
राम सितेचा आदर्श व्हावी
वनवासातील पर्णकूटीलाही
तृप्ततेची झालर झळकावी.

तुझी माझी प्रित
गौरी-शंकरासम पुण्य व्हावी
हिमालयाच्या शिखरावरही
तुझी माझी प्रित नांदावी.

तुझी माझी प्रित
विठोबा-रखूमाई भोळी
वसून स्वतंत्र मंदीरी
जय जय विठोबा-रखुमाई गर्जावी.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

काजुकतली's picture

22 May 2009 - 1:40 pm | काजुकतली

मस्त आहे कविता...खुप आवडली.

मराठमोळा's picture

22 May 2009 - 2:18 pm | मराठमोळा

तुझी माझी प्रित
राम सितेचा आदर्श व्हावी
वनवासातील पर्णकूटीलाही
तृप्ततेची झालर झळकावी.

ह्या ओळी विषेश आवडल्या.. :)

पती पत्नी चा एकमेकावर विश्वास आणी प्रेम असेल तर कोणतेही संकट त्यांच्यासमोर टिकु शकत नाही. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

क्रान्ति's picture

22 May 2009 - 3:48 pm | क्रान्ति

सगळीच कविता आवडली. या ओळी जास्त आवडल्या.
तुझी माझी प्रित
गौरी-शंकरासम पुण्य व्हावी
हिमालयाच्या शिखरावरही
तुझी माझी प्रित नांदावी.
खरंच इतकं अद्वैत असावं पतिपत्नीच्या नात्यात!

क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

जागु's picture

22 May 2009 - 11:13 pm | जागु

काजुकतली, मराठमोळा, क्रांती धन्यवाद.

सँडी's picture

23 May 2009 - 7:34 am | सँडी

तुझी माझी प्रित
राधा कृष्णाची रास व्हावी
वेणू च्या नादी तुझ्या
माझ्या पैंजणांची छूमछूम झंकारावी.

छान!

विसोबा खेचर's picture

23 May 2009 - 9:06 am | विसोबा खेचर

तुझी माझी प्रित
राम सितेचा आदर्श व्हावी

हे पटले नाही. एका धोब्याच्या सांगण्यावरून आपल्या गरोदर पत्नीला घराबाहेर काढणारा राम काय कामाचा? हे कृत्य तर रावणाने केलेल्या सीताहरण कृत्यापेक्षा भयंकर आहे..!

तात्या.

मसक्कली's picture

23 Jun 2009 - 3:21 pm | मसक्कली

छान आहे कविता........ :)

प्रीत कोनचिका आसेना...........विश्वास महत्वाचा...

नाहि का......!!

ते म्हण्तात ना......

१ आग का दर्या है डुब के जाना है....!! ;)

जे त्या आगित जळाले आसतिल त्याना बरोबर कळाले आसेल नाहि का :))

आसो...पण १ दा तरी प्रेम कराव्...नाहि का :\ ;;)

मसक्कली's picture

23 Jun 2009 - 3:22 pm | मसक्कली

छान आहे कविता........ :)

प्रीत कोनचिका आसेना...........विश्वास महत्वाचा...

नाहि का......!!

ते म्हण्तात ना......

१ आग का दर्या है डुब के जाना है....!! ;)

जे त्या आगित जळाले आसतिल त्याना बरोबर कळाले आसेल नाहि का :))

आसो...पण १ दा तरी प्रेम कराव्...नाहि का :\ ;;)

मसक्कली's picture

23 Jun 2009 - 3:22 pm | मसक्कली

छान आहे कविता........ :)

प्रीत कोनचिका आसेना...........विश्वास महत्वाचा...

नाहि का......!!

ते म्हण्तात ना......

१ आग का दर्या है डुब के जाना है....!! ;)

जे त्या आगित जळाले आसतिल त्याना बरोबर कळाले आसेल नाहि का :))

आसो...पण १ दा तरी प्रेम कराव्...नाहि का :\ ;;)