सामना चालकांच्या डोळ्यांत अंजन

घोडीवाले वैद्य's picture
घोडीवाले वैद्य in जनातलं, मनातलं
21 May 2009 - 9:55 pm

मुंबईत मनसेने शिवसेनेला भुईसपाट केल्यानंतर शिवसेना नेत्यांचा तीळपापड झाला. त्यात सामना चालकही (?) मागे नव्हते. राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी या महाशयांनी इ-सकाळचा आधार घेतला. त्यावरील केवळ राज यांच्याविरोधातील प्रतिक्रिया सामनात छापल्या. मात्र उद्धव यांना त्यांची ला..की दाखविणारी एकही प्रतिक्रिया त्यात नव्हती. आता इ-सकाळवरच मराठी मतविभाजनासंबंधी एक सुंदर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील प्रतिक्रियांची दखल सामना घेणार आहे का?
http://beta.esakal.com/2009/05/19163101/features-current-affairs-about.html

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 11:42 pm | विसोबा खेचर

सुंदर व सडेतोड लेख आहे..

उद्धव केवळ बाळासाहेबांचा मुलगा म्हणूनच शिवसेनेची सूत्र त्याच्याकडे आहेत. वास्तविक बाळासाहेबांनी ही सूत्र राजकडे द्यायला हवी होती. राजने पुन्हा नव्या जोमाने शिवसेनेला भक्कम बनवले असते. तो वकूब केवळ राजचाच आहे. उद्धव जरी बाळासाहेबांचा कौटुंबिक वारस असला तरी राज हाच त्यांचा खरा राजकीय वारसदार आहे आणि होता.

परंतु बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे घात झाला आणि शिवसेनेची साक्षात राजधानी असलेल्या मुंबईत शिवसेना गर्दीस मिळाली!

आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संबंधित पक्षांनी (भाजप आणि शिवसेना) राज फॅक्टर ध्यानी न घेतल्यास पुन्हा त्यांच्यावर आत्ता ओढवला तसा नामुष्कीचा प्रसंग ओढवेल हे नक्की!

तात्या.

सुहास's picture

22 May 2009 - 3:42 am | सुहास

आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संबंधित पक्षांनी (भाजप आणि शिवसेना) राज फॅक्टर ध्यानी न घेतल्यास पुन्हा त्यांच्यावर आत्ता ओढवला तसा नामुष्कीचा प्रसंग ओढवेल हे नक्की!

सहमत!

--सुहास

अवांतरः बारामतीकर काका-पुतण्यांच्या डोळ्यात असे अंजन "सकाळ"वाले घालतील काय? की "आपलं ठेवावं झाकून..." हा प्रकार नेहमीप्रमाणे चालू राहील...?

पिवळा डांबिस's picture

22 May 2009 - 4:37 am | पिवळा डांबिस

दोघांना एकत्र आणायचं राहिलं बाजूला,
बाळासाहेबांनी म्हणे आता राजबरोबरचे सर्व संबंध तोडले.....
विनाशकाले विपरीत बुद्धी!!!

चामट्या's picture

22 May 2009 - 1:52 pm | चामट्या

बाळासाहेबांनी म्हणे आता राजबरोबरचे सर्व संबंध तोडले.....
पुत्रप्रेमामुळे आंधळा झालेला अजुन एक ध्रुतराष्ट्र अजुन काय म्हणु शकतो
अहो फक्त बाळासाहेबांचा मुलगा हे एकच कॉलिफिकेशन आहे ह्यांच
बाकि काहि नाहि

क्लिंटन's picture

22 May 2009 - 9:18 pm | क्लिंटन

राजने पुन्हा नव्या जोमाने शिवसेनेला भक्कम बनवले असते. तो वकूब केवळ राजचाच आहे. उद्धव जरी बाळासाहेबांचा कौटुंबिक वारस असला तरी राज हाच त्यांचा खरा राजकीय वारसदार आहे आणि होता.

राज ठाकरेंच्या धोरणांविषयी आणि पक्षाविषयी माझी अनुकूल मते नाहीत पण हे मात्र १००% मान्य. उद्धव ठाकरे हा बाळासाहेबांचा मुलगा म्हणूनच पुढे आणला गेला आहे.राजकारणाऐवजी फोटोग्राफीत उध्दवने जास्त चांगले काम केले असते असे वाटते.शिवसेनेत पहिल्या दिवसापासून काम केलेले ठाण्याचे सतीश प्रधान आणि पार्ल्याचे डॉ.रमेश प्रभू यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना शिवसेना सोडाविशी का वाटली याचा विचार केला गेला पाहिजे पण तो तसा होतो आहे असे दिसत नाही.दादरचे आमदार सदा सरवणकर एका गिरणी कामगाराच्या साध्या घरी जन्माला आले.पण बाळासाहेंबांमुळे त्यांना आमदार होता आले. अशी अनेक मंडळी बाळासाहेबांविषयीच्या कृतज्ञतेतून शिवसेनेत अजूनही असतील.आणि त्यांच्यासाठी ते आज उध्दवच्या हाताखाली काम करायला तयार होत असतील.पण बाळासाहेबांच्या पश्चात अशी अनेक मंडळी मनसेमध्ये जातील आणि शिवसेनेचे अधिकाधिक नुकसान होईल असे मला वाटते.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

अन्वय's picture

22 May 2009 - 12:28 am | अन्वय

मुंबईत मराठी मतांचे ध्रुवीकरण झाले आहे. मराठी माणूस शिवसेनेकडून मनसेकडे जात आहे. त्याचा वेग वाढतो आहे. शिवसेना मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शिवसेनेला आता केवळ सत्ता हवी आहे. त्यासाठी उत्तर भारतीयांचे लांगूलचालनही या पक्षाला वर्ज्य नाही. मुँह मे मराठी माणूस, बगल में उत्तर भारतीय अशी शिवसेनेची स्थिती आहे. हे काही मराठी माणसांना कळत नाही का? चांगलेच कळते. परंतु आपला दुटप्पीपणा लोकांना कळतो, हे शिवसेना भवनात बसून राजकीय धोरणे आखणाऱ्या नेत्यांना आणि उद्धव ठाकरेंना कळत नाही, हे वाईट आहे. परवाही उद्धव यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. त्या वेळी मराठी माणूस शिवसेनेपासून तुटत चाललाय हे मान्य करायला ते तयार नव्हते. यावेळी शिवसेनेला केवळ एक जागा गमवावी लागली, याचाच त्यांना आनंद झाल्याचे दिसत होते. पण मनसेचे केवळ 12 ठिकाणी उमेदवार होते. आणखी 36 ठिकाणी ते असते तर?... पण शिवसेनेच्या सुदैवाने तसे झाले नाही आणि शिवसेनेला किमान 11 जागा तरी मिळाल्या. याबद्दल त्यांनी खरे तर राज यांना धन्यवाद द्यायला हवेत. पण काहीही झाले तरी मी राजला मोठा म्हणणार नाही, अशी भूमिका गर्विष्ठ उद्धव ठाकरे यांची दिसते. पण गर्वाचे घर नेहमी खाली असते...

एकलव्य's picture

22 May 2009 - 5:11 am | एकलव्य

वाघाचा बच्चा

ढकलपत्रातून मिळालेले व्यंगचित्र चिकटवितो आहे... चित्रकाराचा पत्ता नाही!

अमोल केळकर's picture

22 May 2009 - 9:27 am | अमोल केळकर

सुंदर
सगळ्यात दुर्देव म्हणजे अजुनही उध्दव साहेब मनसे फॅक्टर मानायला तयार नाहीत.
ठिक आहे राज साहेब अगामी विधानसभा निवडणुकीत परत एकदा आपला करिश्मा दाखवून देतील यात शंका नाही.
मनसे २०-२५ जागा अगामी निवडणूहीत नक्की मिळवेल.

--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

श्रीकृष्ण सामंत's picture

25 May 2009 - 10:34 am | श्रीकृष्ण सामंत

व्यंग चित्रात बाबा म्हणत आहेत,
"ताप देला आहे ह्या दोघांनी माझ्या डोक्याला बुवा!
एक "उद्धट" तर दुसरा " नाराज" काय करायचं ह्या पोरांचं."
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

ऍडीजोशी's picture

22 May 2009 - 12:06 pm | ऍडीजोशी (not verified)

शिवसेनेची मुंबईत अशी परिस्थीती व्हावी ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पण ह्याला पूर्णपणे शिवसेनाच जबाबदार आहे. बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार राज ठाकरे हेच आहेत. हे कळूनही न कळल्यासारखे दाखवल्याने ही वाट लागली आहे. मतांच्या राजकारणासाठी मराठी माणसाचा मुद्दा बाजूला सारून भैयांचे लांगूलचालन ज्यावेळी शिवसेना करायला लागली त्याचवेळी शिवसेनेने मराठी माणासाच्या मनातला आदर गमावला. सत्तेसाठी सेना असे वागेल हे मराठी माणसाच्या मनातही नव्हते. अरे जे भैय्ये मुंबईची वाट लावतात त्यांच्या मागे आमची शिवसेना उभी रहावी? छठपूजेसाठी त्यांना मदत करावी? भैयांना उमेदवारी द्यावी? मग काय करावे मराठी माणसाने? कुणाकडे जावे?

राज ठाकरेंनी मराठी माणसाला निराधार झाल्याची जी भीती वाटात होती ती नाहिशी करण्याचे प्रयत्न केले. का नाही उभा रहाणार मराठी माणूस त्यांच्या मागे? निवडणूक झाल्यावर मराठी माणसानी मत दिलं नाही असे म्हणण्याचा आता शिवसेनेला काय अधिकार आहे?

त्यामुळे आता शिवसेनेने मराठी माणसाची मते ही त्यांची खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागणे आणि वक्तव्ये करणे बंद करून आत्मनिरीक्षण करावे. निवडणूकीत म. न. से. मुळे पानिपत होऊनही जर शिवसेनेने ह्या पासून धडा घेतला नाही तर विधानसभा निवडणूकीत तर चारीमुंड्या चीत होण्याची नामुष्की ओढावेल.

राज ठाकरे मराठी माणसासोबत असल्याने मराठी माणूस त्यांच्या सोबतच असणार.

टायगर's picture

22 May 2009 - 8:54 pm | टायगर

शिवसेना ही ठाकरे यांची प्रायव्हेट कंपनी आहे. तिची वाट कशी लावायची, ते त्यांना ठरवू देत. मराठी माणूस मराठी माणूस करायचे; आणि उत्तर भारतीयांना खासदार, आमदार करून मोठे करायचे! शिवसेनेची ही जुनी चालबाजी आहे. आता पराभवाची माती खायला लागली म्हणून राज ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि त्यांच्या कंपूचे नेते उद्धव ठाकरे करीत आहेत. मराठी माणसाला आता राज ठाकरे यांच्यासारखा भक्कम पर्याय लाभला आहे. त्यामुळे शिवसेनेने आता फक्त मराठी, मराठी शब्दाचा जप करावा. मराठी माणसाचे भले करण्यासाठी राज आणि त्यांचा पक्ष मनसे समर्थ आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत ते आपला करिश्‍मा नक्की दाखवतील. मराठी माणूस त्यांच्याच पाठिशी उभा राहील. उद्धव यांनी फक्त पाहात राहावे. उद्या दिवस राज यांचाच आहे. केवळ बदनाम करून राज यांना नामोहरम करता येणार नाही.

एक जण चुकीचा म्हणजे दुसरा बरोबर हे कुठल्या तर्कशास्त्रात बसते ?
बाळासाहेबांची मते वा वर्तन तरी पूर्णपणे बरोबर होते का ? मराठी माणसाला त्याच्या राज्यात मान मिळायला पाहिजे हे गृहित योग्य. पण तो मिळवण्यासाठी ठोकशाहीचा अवलंब वा पुरस्कार करणे हे कितपत योग्य? त्यामुळे मराठी माणसाची दादागिरी करणारा अशी प्रतिमा होणे हे कसे योग्य? हां, आता राज देखील त्यांचाच कित्ता गिरवत आहे त्यामुळे त्या अर्थाने तोच त्यांचा वारसदार शोभतो. पण मुळात हा आततायी मार्ग लोकशाहीत कसा बसतो?
एवढे करुन स्वतः हे धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ राहिले का ? ठाकरे परिवाराने जी संपत्ती मिळवली आहे त्याचा हिशोब मागण्याची एका तरी व्यक्तिची हिंमत होईल का ?
मला कल्पना आहे की असे लिहिल्यामुळे सगळे रागावतील, पण संपूर्ण सत्य बोलणे हा गुन्हा आहे का ?
(सत्याग्रही) तिरशिंगराव

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

चिरोटा's picture

25 May 2009 - 10:02 am | चिरोटा

पण तो मिळवण्यासाठी ठोकशाहीचा अवलंब वा पुरस्कार करणे हे कितपत योग्य

महाराष्ट्राच्या बाहेर भारतात शिवसेनेची प्रतिमा म्हणजे 'गुंड लोक' अशी आहे.दुर्दैवाने मनसेची प्रतिमा पण आता तशीच होत आहे. ह्याचमुळे कमालीचे जातियवादी मुलायम्/अमर सेक्युलर ठरले आणि योग्य मुद्दे मांडणारे(पण ठोकशाहीचा अवलंब करणारे) राज ठाकरे जातियवादी झाले.

एवढे करुन स्वतः हे धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ राहिले का ? ठाकरे परिवाराने जी संपत्ती मिळवली आहे त्याचा हिशोब मागण्याची एका तरी व्यक्तिची हिंमत होईल का ?

सहमत. ह्या बाबतीत सर्वपक्षीय राजकारणी(कम्युनिस्ट पकडुन) 'तेरी भी चुप मेरी भी चुप 'असतात.म्हणूनच सर्वपक्षीय राजकारण्यांचे राजकारण थोतांड वाटते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विशाल कुलकर्णी's picture

25 May 2009 - 10:30 am | विशाल कुलकर्णी

विनाशकाले विपरीत बुद्धी!!!>>> सहमत.

<<मराठी माणसाला त्याच्या राज्यात मान मिळायला पाहिजे हे गृहित योग्य. पण तो मिळवण्यासाठी ठोकशाहीचा अवलंब वा पुरस्कार करणे हे कितपत योग्य? त्यामुळे मराठी माणसाची दादागिरी करणारा अशी प्रतिमा होणे हे कसे योग्य? हां, आता राज देखील त्यांचाच कित्ता गिरवत आहे त्यामुळे त्या अर्थाने तोच त्यांचा वारसदार शोभतो.>>>

कुठल्याही घटनेवरची कोणतीही प्रतिक्रिया ही कालसापेक्ष असते. जिथे सामोपचाराने काम होते तिथे राज सामोपचाराने वागताहेतच की!
पण जिथे चौदावे रत्न दाखवण्याची आवश्यकता आहे तिथे तेच असरदार ठरते.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)