निदान त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
13 May 2009 - 8:26 am

आज प्रो.देसाई हंसत हंसत येताना पाहून मला खात्री झाली की काही तरी ते मला आनंदाची बातमी सांगणार आहेत.वाटेत ओळखीचा असो नसो ते सर्वांशी हंसत होते.हे जरा मला निराळंच वाटलं.एका लहान मुलाने त्यांना,
"हाय ग्रॅन्डपा!"
असं म्हटल्यावर थांबून त्याच्या पाठीवर थोपटून हंसत होते.
जवळ आल्यावर मी त्याना विचारलं,
"काय भाऊसाहेब,आज बरेच आनंदी दिसता.मघापासून मी बघतोय तुम्हाला तुमचा चेहरा हंसरा दिसतो.म्हणजे तो एरव्ही नसतो अशातला भाग नाही,पण आज जरा विशेष,काय गौडबंगाल आहे.?"
"कर्माचं गौडबंगाल,अहो मला तुम्हाला माझी जुनी एक आठवण न विसरता सांगायची होती.म्हणून निघतानाच त्याची पूर्व तयारी करीत आलो आहे."
हे त्यांच्याकडून ऐकल्यावर माझं कुतूहल वाढणं स्वाभाविक होतं.
"सांगा तर तुमची जूनी आठवण."
असं मी म्हणाल्यावर,जरा खाकरून भाऊसाहेब सांगू लागले,
"साधारण तिस वर्षापूर्वी म्हणजे मी जेव्हा पन्नाशित गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे सहकारी, कॉलेजातले विद्यार्थी ज्यांना मी शिकवत असायचो, आणि माझे मित्र हे सगळेच मला विचारायचे,
"तुम्ही थकला का?
तुम्हाला बरं नाही काय?
काही विषेश झालं नाही ना?"
अर्थात माझं प्रत्येक प्रश्नांना उत्तर
"नाही " हेच होतं.
परंतु,माझ्या त्या वयाच्या जवळपास,चेहर्‍यावरची उत्सुकता जाऊन गांभिर्य आलं होतं.
खरं पाहिलं तर,मी ज्यावेळी विसावलेला आणि शांत असायचो,त्यावेळी मी जरा गंभीर आणि थकलेला दिसायचो.तो दिसू नये म्हणून मी चेहरा हंसरा ठेवायला लागलो."
"मग हेच तुम्ही आता पुन्हा चालू केलं की काय.?"
असं मी म्हणाल्यावर भाऊसाहेब म्हणाले,
"ऐकातर खरं,ज्याच्या त्याच्याशी मी त्यावेळी हंसून पाहू लागलो.तसं काही कारण नसतानाही केवळ दिखावा म्हणून सहज हंसायचो.कुठे रस्त्यात,दुकानात गेलो तर,माझ्या कॉलेजमधे,कॉलेजच्या लॉबीमधे कुणी दिसल्यास.
आता हंसायची मला एक संवयच झाली.आणि ते लोकांच्या लक्षात यायला लागलं.कॉलेजच्या हॉलमधे एकदा एक अनोळखी व्यक्ति मला म्हणाली,
"तुम्ही खूप खुशीत दिसतां"
मी माझा चेहरा जास्त हंसरा करून, मान हलवली आणि चालू पडलो.
मला वाटतं की आपण जसा अविर्भाव करतो तसेच आपण दिसतो."
मी म्हणालो,
"मला आठवतं त्याप्रमाणे- अर्थात तुम्हीच सांगितलं होतं- की त्यावेळी तुम्ही कॉलेजात शिकवत होता."
"हो मी कॉलेजात शिकवत होतोच पण बरोबरीने नाटकातही काम करीत होतो ते दिवस मला आता आठवतात.तो काळ माझ्या तिशीच्या शेवट शेवटचा होता.नाटकात भुमिका करायचो,करून घ्यायचो,शिकवायचो, लिहायचो, आणि त्याबद्दल विचारही करायचो.जवळ जवळ आणखी वीस वर्षं असं करत होतो.कॉलेजात शिकवणं हा माझा दुसरा व्यवसाय होता.एक वर्षी एक दिवस असा आला की मला खरंच वाटू लागलं की मी जात्याच कलाकार आहे.
जसं एखादा एकाएकी भक्तिभावात आपलं मन रमवून घेतो अगदी तसं.जे काही मी करायचो ते माझ्या कलेच्या भिंगातून पाहायचो."
असं म्हणून भाऊसाहेबानी जरा उसंत घेतली.
मग म्हणाले,
"हे जर खरं असेल तर--जे एखादा करतो तसा तो होतो-तर मग मला वाटलं हंसतमुख असणं म्हणजेच आनंदी असणं. खोटं हंसू आणि खरं हसूं ह्यातला फरक आपल्या सर्वांना माहित असतो.आपण कॅमेर्‍या समोर उभे राहून,
"आता प्लिझ हंसा"
असं म्हटल्यावर हंसतो ते खोटं हंसू.
ज्या लोकांचा व्यवसायात चेहर्‍यावरचे हावभाव पाहून निर्णय द्यायचा असतो,किंवा ज्यांना कोर्टातले ज्युरी निवडण्याचं काम असतं,किंवा ज्यांचा वकिली व्यवसाय असतो की ज्यांना गुन्हेगाराकडे बघून प्रश्न विचारायचे असतात त्या सर्वांना हे हंसू माहित असतं.चेहर्‍यावरचे स्नायु पाहून जे स्नायु खरा आनंद प्रकट करतात ते स्नायु ते बरोबर ओळखून काढतात."
"चेहर्‍यावरून असं ओळखून काढण्यासारखं असं खास काय आहे.? माणूस हंसायला लागला की त्याचा चेहराच ते प्रदर्शित करतो."
असं मी म्हणाल्यावर मला ह्या बाबतीत,अज्ञान आहे असं प्रोफेसरांच्या लक्षात बहुदा आलं असावं. माझ्याकडे बघून हंसत हंसत -पण हे त्यांच हंसणं जरा निराळं होतं- मला म्हणाले,

"तुम्ही अपेक्षा कराल तसे हे स्नायु चेहर्‍याभोवती नसतात.हे स्नायु गालांच्या वरच्या भागात,नाकाच्या आणि डोळ्याच्या अवती-भोवती असतात.हे स्नायु जेव्हा आकुंचन पावतात,तेव्हा मेंदू चारही प्रकारचे आनंद पावण्याचे रस सोडतो आणि तुम्ही आनंदी होता. तेव्हा आनंदी होण्यासाठी आपले हे "हंसमुख" करणारे स्नायु क्रियाशील केले म्हणजे झालं.मला वाटतं हे मी म्हणतो ते खरं आहे."
असं सांगून झाल्यावर आपल्या खिशातलं एक पेन काढीत मला म्हणाले,

"तुम्हाला फक्त एव्हडंच करावं लागेल.हा आवाज काढा,
"ईईईईईईई. प्रयत्न करा ईईईईईई."
वाटलं तर जरा शांत राहून पहा.एखादी पेन्सिल दातांच्यामधे आडवी ठेवून पण पहा तोच परिणाम दिसेल.मी एक निर्दिष्ट केलेलं हे पेन माझ्या जवळ ठेवतो.आणि आठवण होईल तसा त्याचा वापर करतो.कधी एखादवेळी हंसण संभवनीय नसेलं तरी-एखाद्या संकट काळीही- हे हंसमुख करणारे रस मेंदू कडून सोडण्याच्या प्रयत्नात रहा,आणि आनंदी नसला तरी ज्ञात व्हा.
माझं स्वतःचं हंसू तसं शक्तिशाली आहे.मला त्यानं जास्त आनंदी केलं आहे.आणि ते "संसर्गजन्य" आहे हे मात्र नक्कीच.
प्रयत्न करा निदान त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.
मी म्हणालो,
"भाऊसाहेब,ह्यालाच मी मघाशी सांगा तुमचं गौडबंगाल असं तुम्हाला म्हणालो होतो."

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

13 May 2009 - 9:00 am | क्रान्ति

कधी एखादवेळी हंसण संभवनीय नसेलं तरी-एखाद्या संकट काळीही- हे हंसमुख करणारे रस मेंदू कडून सोडण्याच्या प्रयत्नात रहा,आणि आनंदी नसला तरी ज्ञात व्हा.
माझं स्वतःचं हंसू तसं शक्तिशाली आहे.मला त्यानं जास्त आनंदी केलं आहे.आणि ते "संसर्गजन्य" आहे हे मात्र नक्कीच.
प्रयत्न करा निदान त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.

सामंतकाका, हा संसर्ग खूपच आवडला.
:) क्रान्ति
सखी शेजारिणी तू हसत रहा!

सुमीत's picture

15 May 2009 - 10:16 am | सुमीत

शेवटी वाचताना नकळत हसू आले :) नेहमी आनंदी राहाण्याचा प्रयत्न असा सोपा असतो हे नव्हते माहित.