हक्क

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
12 May 2009 - 9:51 am

"मला माझ्या मुलाला साईंटीस्ट करायचे आहे, कृपया मार्गदर्शन कराल काय?"
नेहमीच्या डॉक्टर,इंजीनीयर पेक्षा वेगळी अपेक्षा असलेले पालक पण भेटतात कधी कधी.
" माझे नाव अजिंक्य आपटे. मी आपल्या पालक सभेला दोन वर्षापुर्वी आलो होतो. माझा मुलगा आता दहावीत जाणार आहे"
अहो, पण मी ७ वीच्या मुलांसाठी पालक सभा घेत नाही.- मी
" हो, मला माहीत आहे ते. मी मुख्याध्यापकांना विनंती केली होती. गेली दोन वर्षे तुम्ही शाळेत येत नाही"
" शाळेने दुसरी काही तरी व्यवस्था केली आहे, त्यामुळे निमंत्रण नाही" -मी
"हो आजकाल ट्र्स्टीच्या नातेवाईकांपैकी कोण तरी हा कार्यक्रम करतात. दर विद्यार्थ्यामागे २०० रुपये फी पण आकारली जाते. तुम्हाला काय दीले होते?
"मला गुलाबाचे फुल देउन 'फूल' बनवले होते की. मला त्याचा काही ही त्रास नाही हो. कुणीतरी मार्गदर्शन करते आहे ना. बस्स्."-मी
"अहो एकदम तुम्ही म्हणता तेच. बहुधा टेप केले असणार"
" चालायचेच"-मी
"तुम्ही तुमची पार्श्वभुमी सांगा म्हणजे बरे पडेल"- मी
" फक्त कोरेडे आहेत नियतीने दिलेले पार्श्वभुमीवर, सर"
एकंदर कोरड्यांची कथा अशी.
आपटे साधारण चाळीशीचे. उच्च मध्यम वर्गीय एकेकाळचे. जगभर तेजी असताना ह्यांची कंपनी बंद पडली. पडली पेक्षा मालकाने पाडली. बिल्डरला जागा विकली. प्रकरण कोर्टात. त्यातच बायकोचे आजारपण. फ्लॅट विकुन जगवली बायकोला. आता उच्च वर्गीय
झोपडपट्टीत राहतात्.(वीटांनी बांधलेली) ८० फुट कार्पेट. मुलगा हुशार. ७ वी पर्यंत साधारण ८५%. आता ९३%. घरी टी.वी. आहे. पण फक्त नॅशनल जीओग्रॅफिक चॅनेल मधे रस मुलाला. मी सांगितलेल्या टिप्स मुलाने अक्षरशः शब्दशः पालन केलेले. बापाचे सध्याचे उत्पन्न फक्त ५ हजार महीना. कुठलीही नोकरी नाही. जे मीळेल ते काम करुन संसार चालु आहे.
आता ह्यांच्या मुलाला सायंटीस्ट व्हायचे आहे त्याचा खर्च कसे करणार ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते.
"हे बघा, आपटे साहेब, सद्य परिस्थीतीत उच्च शिक्षणाचा हक्क ३ जणांना. १. तुमची कॅटेगरी असायला पाहीजे. २. तुमच्याकडे भरपुर पैसा असायला पाहीजे. ३. तुमचा पाल्य अगदी उच्च श्रेणी मधे उत्तीर्ण व्ह्यायला हवा.
तो तसा उतीर्ण झाल्यावर तुम्ही आपल्या समाजाच्या विविध स्कॉलरशिप साठी अर्ज करा. म्हणजे तुमचा भार हलका होईल.
तुमच्या पुढे दोन मार्ग आहेत. मुलाने सरळ बी.एस्.सी. एम्.एस.सी चा मार्ग चोखाळावा. खर्च कमी. किंवा आज काल मुंबई विद्यापीठ
व बी.ए.आर्.सी चा संयुक्त प्रोजेक्ट आला आहे. बारावी नंतर प्रवेश दीला जातो. तुमचे सायंटिस्ट व्हायचे स्वप्न पुर्ण होईल. पण स्पर्धा
मात्र पराकोटीची. ११ वी १२ वीला मला हाक मारा. तो तुमचा खर्च ८०% कमी करुन देईन माझी ओळख वापरुन. दहावी मधे सुद्धा ९२% + मार्क मिळवायला जी मदत पाहीजे ती देईन. "
"तुमची फी काय राहील हे सर्व करायला" आपटे
"एक गुलाबाचे फुल" मी
आपटेंच्या म्हणण्यानुसार समाजाच्या विविध संस्था कडुन हुशार विद्यार्थ्याना जी स्कॉलरशिप दीली जाते ती मिळवणे फार जीकीरीचे काम असते.
जाता जाता: दहावीनंतर बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते खुपच सजग असतात. विविच प्रकारच्या मदतीचे बोर्ड कोपर्‍या कोपर्‍यावर लागलेले असतात. खुपच आदर वाटतो मला त्यांचा.
आपले???????????????????

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

12 May 2009 - 9:58 am | अवलिया

च्यायला एका झोडण्यात तुम्ही सुधारले.... पुचाट !!
असो. गुलाब घ्या ...पाकळ्या खा !!!
तुमच्यासाठी काटे काढलेले आहेत आधीच.

(काटेरी) अवलिया

अनंता's picture

12 May 2009 - 9:57 am | अनंता

अशाच प्रकारच्या समुपदेशनाच्या अपेक्षा आहेत, तुमच्याकडनं!!
शुभेच्छा!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2009 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सायंटीष्ट काय उच्च शिक्षण घेणे अवघड होईल त्यांना, आहे त्या पगारात.
स्कॉलरशीपवर संपूर्ण शिक्षण होईलही, पण वाटते तितके ते सोपेही नाही.

मास्तर येऊ दे, अजून !

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

12 May 2009 - 10:26 am | विनायक प्रभू

मै हुं ना.
१००० मधे एक केस अशी मिळते. माझी सर्व ताकद वापरेन ह्या मुलाकरता.

प्रदीप's picture

12 May 2009 - 10:58 am | प्रदीप

आवडला, तसेच हा आपला आवेशही.

नंदन's picture

13 May 2009 - 1:15 am | नंदन
विनायक प्रभू's picture

12 May 2009 - 10:37 am | विनायक प्रभू

तरीसुद्धा न दिसणारे काटे दीलेत की? अवलिया साहेब्ब
असो.
तुम्हीसुद्धा नुसते फुल देणार का?
येता का? २०% मधे.
मी तर आहेच.

अवलिया's picture

12 May 2009 - 12:20 pm | अवलिया

१.तुमचे नशीब
२. तेवढे तरी दिले
३.तेवढे सोडुन बोला.

--अवलिया

विजुभाऊ's picture

12 May 2009 - 10:39 am | विजुभाऊ

"हक्क" वगैरे गोष्टींवर विचार करणे बंद केलय.
आपण आपली झापडे लावुन घेतली की जग कसे स्वच्छ दिसते. वर्तमानपत्र वाचणे बंद करुन टाकलय. त्यामुळे जगात कुठ्येच अन्याय वगैरे घडत नाहीत यावर ठाम विश्वास बसत चाललाय
आपले नाक दाबुन ठेवले की सिंहाच्याच काय आपल्या सुद्धा तोंडाचा वास येत नाही.
कान बंद केले की कशी रम्य शांतता पसरते.
आपले तोंड बंद ठेवले की कसे कोणीच आपण मनातल्या मनात केलेल्या विधानाना आक्षेप घेत नाही.
अश्राप पालक्.....अजाण बालके....कत्ले आम चे कत्ल होणाराना काहीच नाही. मग कत्ले आम ही खास बात न रहाता आम होउन जाते.

अवलिया's picture

12 May 2009 - 12:18 pm | अवलिया

सहमत आहे.मी पण हल्ली असेच करतो.
डोक्याचा त्रास बराच कमी झाला आहे.

(निवांत) अवलिया

विनायक प्रभू's picture

12 May 2009 - 5:10 pm | विनायक प्रभू

लय भारी

विनायक प्रभू's picture

12 May 2009 - 10:41 am | विनायक प्रभू

बोललात विजुभौ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2009 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, विचारल्याबद्दल आभारी !

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 May 2009 - 10:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिक्षण, नोकरी इत्यादींसंदर्भात जात आड येऊ नये असं माझं मत आहे. शिक्षणासाठी मदत करताना जातीचा विचार होऊ नये, त्यामुळे लेखाचा शेवट खटकला!

इंटीग्रेटेड एम.एस्सी.साठी प्रा. चित्रे यांनी मुंबई विद्यापीठात सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायन्सेस सुरू केलं आहे. शिवाय आयसर (पुणे, कोलकाता, मोहाली) आहेत, जिथूनही इंटीग्रेटेड एम.एस्सी. करता येतं. या कोर्सेसना बारावीनंतर प्रवेश परिक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
www.iiserpune.ac.in/ आयसर-पुणे
http://www.iiserkol.ac.in/ आयसर -कोलकाता
http://www.iisermohali.ac.in/ आयसर - मोहाली

विनायक प्रभू's picture

12 May 2009 - 10:55 am | विनायक प्रभू

बै दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद.
लक्षात ठेवीन.

सहज's picture

12 May 2009 - 10:55 am | सहज

सर्वप्रथम आता यात "हक्क" काय?

व यावर उपाय काय?

:?

विनायक प्रभू's picture

12 May 2009 - 11:01 am | विनायक प्रभू

तेवढी मदत करणे मेल ओपन वाल्याना हा एकच उपाय.
आणि ती फक्त आर्थिक असावी असे नाही.

स्वाती दिनेश's picture

12 May 2009 - 11:11 am | स्वाती दिनेश

जमेल तेवढी मदत करणे मेल ओपन वाल्याना हा एकच उपाय.
आणि ती फक्त आर्थिक असावी असे नाही.
सहमत आहे,
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

12 May 2009 - 11:14 am | परिकथेतील राजकुमार

ह्म्म्म्म्म्म मिपावाल्यांचे 'समुपदेशन' गुर्जींनी चांगलेच मनावर घेतलेले दिसते.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

12 May 2009 - 5:13 pm | विनायक प्रभू

असे एका लेखात कुठल्याही निर्णयाला येउ नये परा.

निखिल देशपांडे's picture

12 May 2009 - 11:16 am | निखिल देशपांडे

जमेल तेवढी मदत करणे मेल ओपन वाल्याना हा एकच उपाय.
आणि ती फक्त आर्थिक असावी असे नाही.

ह्म्म सहमत आहे मास्तर
असेच येवुद्या एक एक गुर्जी
निखिल

सँडी's picture

13 May 2009 - 11:11 am | सँडी

आम्ही अजुनही आर्थिक निकषावरील आरक्षणाचे खंदे समर्थक आहोत.

अवांतरः भारतासारखा धर्मनिरपेक्ष देश कधी धर्म आणि जातिपातींवर आधारीत आरक्षणे आणि कायद्यांच्या फाट्यावर मारेल कोण जाणे?

वरिल प्रतिसाद : तात्यांकडुन ऍप्रुव्हड.

-संदीप.
काय'द्याच बोला.

पाषाणभेद's picture

12 May 2009 - 11:56 am | पाषाणभेद

लायकी असुनही स्कॉलरशिप मिळवणे कठीण असते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

नितिन थत्ते's picture

12 May 2009 - 12:26 pm | नितिन थत्ते

टायटल कळले नाही.

खराटा
(रंग माझा वेगळा)

ऋषिकेश's picture

12 May 2009 - 5:42 pm | ऋषिकेश

लेख काहिसा निराशाजनक वाटला तरी सत्य आहे त्यामुळे आवडला

-ऋषिकेश

सूर्य's picture

12 May 2009 - 7:43 pm | सूर्य

हक्क म्हणजे शिक्षणाचा म्हणायचे आहे का ? हम्म..
जमेल तेवढी मदत करणे.
आणि ती फक्त आर्थिक असावी असे नाही.

या बाबत सहमत आहे.

- सूर्य.

मिहिर's picture

12 May 2009 - 10:35 pm | मिहिर

आपण नक्की काय करता विनायक?
दुव्यांसाठी धन्यवाद आदिती.

सँडी's picture

12 May 2009 - 10:48 pm | सँडी

8> :?

-संदीप.
काय'द्याच बोला.

भिंगरि's picture

13 May 2009 - 12:33 am | भिंगरि

प्रभु सर,

आजच्या तीव्र स्पर्धेच्या काळातल भयाण वास्तव फार परिणामकारक मांडल आहे तुम्हि. इतक्या स्वछ्छ पणे नाहि पण ह्या वस्तुस्थितिचि कल्पना बर्‍याच जणांना असते, राजकारण, महागाइ या बरोबर हळहळण्यासाठि एक हक्काचा विषय असतो हा बर्‍याच दिवाणखाण्यांतुन. पण हि परिस्थिति बदलण्यासाठि शक्य तितके सगळे प्रय्त्न करण्याचा तुमचा निर्धार खुप आवडला. त्यासाठि माझ्याकडुन खुप खुप शुभेछ्छा. काहि मदत करण्याचि संधि दिलित तर आभारि राहिन.

पिवळा डांबिस's picture

13 May 2009 - 1:22 am | पिवळा डांबिस

मुलाने सरळ बी.एस्.सी. एम्.एस.सी चा मार्ग चोखाळावा.
हे उत्तम!
म्हणजे बीएस्सी झाल्यावर आता नाही मला सायंटिस्ट बनायचं असा जर विचार मनात आला तर अन्य मार्ग उपलब्ध होऊ शकतात.
तीव्र स्पर्धेविषयी म्हणाल तर कुठलीही "करियर" करायची झाली तर तीव्र स्पर्धा ही असतेच.....
सायंटिस्ट व्हायला स्पर्धा आहेच पण सायंटिस्ट झाल्यानंतरची स्पर्धा तर जास्त तीव्र आहे....
पण त्याचबरोबर हुशारी आणि मुख्य म्हणजे प्रचंड मेहेनत करायची क्षमता असेल तर मार्गही निघतात....
तात्कालिक अपयशांनी/ अडचणींनी निराश न होता काम करीत रहाणे हा तर सायंटिस्ट होण्यासाठी सर्वात आवश्यक गुण आहे, हुशारीपेक्षाही!!!
त्या मुलास आमच्या शुभेच्छा!!!

शास्त्रज्ञ तितुका मेळवावा |
शास्त्र विचार वाढवावा ||

चतुरंग's picture

13 May 2009 - 1:57 am | चतुरंग

स्पर्धेला घाबरुन पळण्याने भागत नाही, कुठेही जा स्पर्धा आहेच! कुठे सुप्त असेल, कुठे थेट पण आहेच!!

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 May 2009 - 10:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे बीएस्सी झाल्यावर आता नाही मला सायंटिस्ट बनायचं असा जर विचार मनात आला तर अन्य मार्ग उपलब्ध होऊ शकतात.

हुशार माणसाला कोणत्याही वयात, कितीही पदव्या घेतल्यानंतर मार्ग बदलायचा असेल तरीही फारसे प्रश्न येत नाहीत.

तात्कालिक अपयशांनी/ अडचणींनी निराश न होता काम करीत रहाणे हा तर सायंटिस्ट होण्यासाठी सर्वात आवश्यक गुण आहे, हुशारीपेक्षाही!!!
काका, अगदी लाख मोलाचा सल्ला दिलात ... धन्यवाद (व्यक्तीगत माझ्याकडूनही!)

काळा डॉन's picture

13 May 2009 - 6:43 am | काळा डॉन

मास्तर एक खुलासा करा..

सायंटिस्ट मुलाला बानयचं आहे की त्याचा आईवडीलांना त्याला बनवायचं आहे.

विनायक प्रभू's picture

13 May 2009 - 8:43 am | विनायक प्रभू

आईवडील आणि मुलांचा चर्चेनंतरचा संयुक्त प्रकल्प का.डॉ.

माया's picture

13 May 2009 - 11:51 am | माया

आपल्याकडे अजुन अर्न अँड लर्न कमी दिसुन येतं.