मला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे .

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
2 May 2009 - 10:33 am

काल मी तळ्यावर प्रो.देसायांची वाट बघून बघून थकलो.आता घरी जावं म्हणून उठून चालायला लागलो.वाटेत एका बाकावर एक गृहस्थ पुस्तक वाचताना मी पाहिलं.वाचनात ते अगदी गर्क झाले होते. सध्या पानांच्या पडझडीचा-फॉलचा- मोसम असल्याने माझ्या पावलांची पाचोळ्यांवरून जातानाची होणारी चूरचूर ऐकून पुस्तकातून डोकं वर काढून
मान वळवून माझ्याकडे पाहून ते हंसले.सहाजिक मी ही हंसलो.हलो-हायचे सोपास्कार झाल्यावर,त्यांच नांव श्रीकांत फडके असं कळल्यावर त्यांच्या जवळचबसलो.बोलता बोलता कळलं की हे डॉ.फडके इंग्रजीतून पीएचडी करून साऊथ इंडियामधे कुठल्यातरी कॉलेजमधे प्रोफेसर राहून आता निवृत्तीत आपल्या मुलाकडे राहत होते.त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत.असं त्यांच्या बोलण्यावरून कळलं.
"मी कल्पित कथा-फिकशन- लिहितो,कधी कधी काव्यपण करतो."असं मला म्हणाले.
मला सुद्धा काव्यात आणि कथेत दिलचस्पी आहे हे मी त्याना सांगितल्यावर सहाजिकच त्यांना बरं वाटलं.

मग काय विचारता! फॉल संपून वसंत ऋतूचं आगमन होण्याच्या खूणा दिसत असल्याने सूर्यास्त जरा लांबणीवर पडायला लागला होता.कोळख होईपर्यंत गप्पा मारायला संधीच मिळाली.
"तुम्ही तुमच्या कथानका विषयी सांगाल कां?"
त्यावर ते म्हणाले,
"काही व्यक्ति भिन्न वेळी नाना विषयामधे विश्वास ठेवतात,आणि त्यासुद्धा कधी कधी एकाच दिवशी. ह्या वयातही माझ्या मनात सहज विचार आला की सृजनात्मक लेखन हा मनुष्याच्या मुल्यांकनाचा एक भाग असावा. मग ते लेखन काव्य असो किंवा कल्पित कथानक असो,किंवा यथार्थतेचा वा आत्म-अभिव्यक्तिचा प्रकार असो,किंवा कदाचीत तो
उत्पतिचा आणि चैतन्याचा जो डबल चमत्कार आहे त्याच्या सन्मानाचा प्रकार असो.
वाचकाशी संपर्क ठेवण्याच्या ह्या खास प्रकारच्या मुल्याच्या विरोधात,जर तथ्यात्मक प्रतिवेदन आणि विश्लेषण करण्याचं लेखन केलं तर तो एक सुस्पष्टता करण्याचा प्रकार होईल.
या उलट कथानक किंवा काव्य ही अनुभवाची वास्तविक रचना किंवा गुढता असून ते लेखन
वाचकाशी निकटता आणतं."
मला हे त्यांच प्रकटन आवडलं.मी त्यांना म्हणालो,
"कल्पित कथानकात काल्पनिक व्यक्ति खर्‍या वाटतात.त्याउलट एखाद्या खर्‍या कथेत नावाजलेल्या प्रतिष्टित व्यक्तिंचा नुसता आभासही एखाद्या अफवेच्या घटनेत उल्लेखलेला असला तरी त्याचा खरा मामला आणि कपटी व्यवहार अंधरात ठेवावा लागतो."
"अगदी बरोबर "
असं म्हणून मला त्यांनी छान उदाहरण दिलं.ज्याला मी ही परिचीत होतो.

ते म्हणाले,
"एखादी कल्पित रूपरेखा उदाहरणार्थ चि.वी.जोश्यांचा "चिमणराव"आणि "गुंड्याभाऊ" लक्षात ठेवण्या इतपत उजेडात राहतात.आणि त्यांच्या बरोबर त्यांच्याबद्दल वाटणारी सहानुभूति,करूणा आणि त्यांच अभिज्ञान चांगलच लक्षात राहतं.
माझ्या स्वतःच्या लेखनात फक्त कल्पित कथानक आणि क्वचित काव्य, पूर्णपणे मला काय वाटतं, आणि मला काय ज्ञात आहे हे समजण्यासाठी माझ्या मर्यादेची कसोटी पहात असतं.माझ्या एखाद्या लेखनातला साधा-स्पष्ट तपशिल ह्या लेखनाच्या पेशामधे वापरत असताना, मला सनसनाटीची आणि त्याच्या वापर करण्याच्या प्रवृत्तीला दोन हात दूर
ठेवावं लागतं."
हे ऐकून मला प्रो.देसाय़ांची आठवण आली. भाऊसाहेबांना हा आमचा संवाद आवडला असता. त्यांनीही ह्यात भाग घेतला असता.

माझा शास्त्रज्ञ जागृत झाला.मी डॉ.फडक्यांना म्हणालो,
"लौकिक दृष्ट्या पाहिलं तर माझं मन द्विधा होतं. आकाशगंगेचं अणू,परमाणू आणि त्यांच्याहून अतिसुक्ष्म कणांशी असलेल्या चालचलनाबद्दल भौतिक विज्ञानाची समजावून सांगण्याची क्षमता विवादित आहे हे मान्य करावं लागेल.आणि ही क्षमता आधुनिक बुद्धिची सर्वोपरि कीर्ति आहे हे तितकंच खरं आहे."
"तुम्हाला काय वाटतं?"
असा प्रश्नही मी त्यांना केला.त्यांना तो प्रश्न आवडला.

हातातलं पुस्तक त्यांच्या पिशवीत टाकून,
"चला आपण निघूया.कोळोख होत आला आहे.आपण चालता चालता बोलूया मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो"
असं म्हणून उठता उठता ते मला म्हणाले,
"उलटपक्षी मनातली हलचल,आकांक्षा आणि कदाचित भ्रमसुद्धा विचारात घेऊन केलेली रचना म्हणजे आपल्या अस्तित्वाचं मुळ आणि धर्मविचार ह्या गोष्टींचं निरनीराळ्या रूपातलं निवेदन आणि निर्मिती असून ते वाचकांच्या समाधानीला कारणीभूत होतं.
मला वाटतं,धर्मश्रद्धा ही मनुष्य जीवनाची एक आवश्यकता होऊन रहाणार आहे.जशी मलाही या वयात वाटते."
"नंतर आपण कधी तरी बोलूं"
असं म्हणत आम्ही दोन दिशेला गेलो.
आज तळ्यावर भाऊसाहेबांची गैरहजेरी मला भासली नाही.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

उच्चैश्रवा's picture

2 May 2009 - 4:55 pm | उच्चैश्रवा

तुम्हाला काय वाटतं याच्याशी वाचकाला कांही देणे घेणे नसते.
मात्र तुम्हाला काय ज्ञात आहे ते वाचका पर्यंत पोहोचविण्याचे तुमचे काम.
नेमके तेच तुम्हाला जमले नाही. या कथेचा अर्थच कळत नाही.