जगाची रित.

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
29 Apr 2009 - 12:32 pm

जगाची ही रितच न्यारी,
कसेही वागा निंदाच पदरी !

गुणी, सज्जन ठरतो बावळट,
स्पष्टवक्ता, म्हणे आम्हास उद्धट !

शांत व्यक्तीला 'माठाची' ची उपमा,
चतूराच्या माथी, धटिंगडाचा तुरा !

सुट्टी घेतल्यास होतो कामचुकार,
राब-राब राबल्यास ओटी चा भिकार !

सुखात नांदल्यास, बायकोचा बईल,
समाजात गुंतल्यास, ह्याचे कसे होईल ?

दान करणार्‍यावर, काळ्या पैशाचे लेबल,
काट्-कसर करणारा, कंजूष एक नंबर !

निंदकाचे घर असावे शेजारी,
शेजार्‍यालाही असतोच शेजारी !

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

अनंता's picture

29 Apr 2009 - 1:24 pm | अनंता

जागु, मनात काहीही न ठेवता, कुणाचा मुलाहिजा न बाळगता, दुतोंडी लोकांना चांगलच हाणलत की !
अगदी माझ्याच मनातल्या भावना बोलून दाखवल्यात. चांगल्या कवितेबद्दल अभिनंदन :)

JAGOMOHANPYARE's picture

29 Apr 2009 - 1:29 pm | JAGOMOHANPYARE

स्पष्टवक्ता, म्हणे आम्हास उद्धट .... बरोबर आहे....

( स्पष्टपणे प्रतिक्रिया दिल्यामुळे मला उद्धट म्हटल्यास माझी हरकत नाही !)

jenie's picture

29 Apr 2009 - 1:34 pm | jenie

"जगाची ही रितच न्यारी,
कसेही वागा निंदाच पदरी !

गुणी, सज्जन ठरतो बावळट,
स्पष्टवक्ता, म्हणे आम्हास उद्धट !"

आगदी खरं आहे... कसही वागा समाधान म्हणून नाही कुणाला...
सुंदर कविता

अभिनंदन जागु..

सँडी's picture

29 Apr 2009 - 6:46 pm | सँडी

हेच म्हणतो.

जागु, मस्त लिहलयं तुम्ही.
काव्य आवडलं. =D>

-सँडी
काय'द्याच बोला?

मनीषा's picture

29 Apr 2009 - 3:34 pm | मनीषा

निंदकाचे घर असावे शेजारी,
शेजार्‍यालाही असतोच शेजारी ! ... सर्वांनीच समजून घ्यावे असे सत्य

कविता आवडली ..

प्राजु's picture

29 Apr 2009 - 6:57 pm | प्राजु

सुखात नांदल्यास, बायकोचा बईल,
समाजात गुंतल्यास, ह्याचे कसे होईल ?

दान करणार्‍यावर, काळ्या पैशाचे लेबल,
काट्-कसर करणारा, कंजूष एक नंबर !

निंदकाचे घर असावे शेजारी,
शेजार्‍यालाही असतोच शेजारी !

वरची तीनही कडवी खूप आवडली.
मस्त उतरली आहे. निंदकांचे घर शेजारीच असते.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

29 Apr 2009 - 7:11 pm | अनामिक

व्वा मस्तं उतरली आहे कविता... अजून येऊ द्या.

-अनामिक

क्रान्ति's picture

29 Apr 2009 - 8:12 pm | क्रान्ति

अगदी खरं खरं लिहिलंस, तेही इतक्या सहजपणे. आवडली कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

शितल's picture

29 Apr 2009 - 8:32 pm | शितल

"जगाची रित" शब्द्दांत छान बांधली आहे. :)

जागु's picture

30 Apr 2009 - 11:04 am | जागु

अनंता, जगमोहन, जेनी, सँडी, मनिषा, प्राजू, अनामिक, क्रांती, शितल तुमचे खुप खुप धन्यवाद.