मराठी,...... पण इन्ग्रजाळलेले

रमण's picture
रमण in जनातलं, मनातलं
25 Apr 2009 - 10:12 am

नमस्कार.

आजच्या म.टा. मधील एका दहावी इयत्तेतील विद्यार्थ्याने लिहिलेला मराठी भाषेविषयीचा लेख जरुर वाचा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4446591.cms#write

(राधारमण कीर्तने)

भाषाविचार

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

25 Apr 2009 - 11:44 am | चिरोटा

इन्ग्रजाळलेल्या मराठीचे खापर शिकणार्‍या मुलांवर कशाला फोडायचे?माझ्यामते याला कारणीभूत मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे आहेत.
सर्व भाषा भाषाभगिनी आहेत हे म्हणायला ठीक असले तरी तसे नाही.मराठी(आणि हिंदी/गुजराती) ह्या भाषा दक्षिणेतल्या/पुर्वेतल्या भाषांएवढ्या सम्रुद्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
तामिळ्,कन्नड्,तेलुगु,मल्याळम ह्या भाषांचा इतिहास हिंदी/मराठीपेक्षा खूप जुना आहे. तामिळ तर संस्क्रुतपेक्षा/एवढीच जुनी आहे.तेव्हा ह्या भाषांबरोबर बरोबरी करण्यात अर्थ नाही.
बोलायला जे शब्द सोपे ते शब्द त्या भाषेत प्रचलीत होतात.भाषांमध्ये शब्दांची देवाणघेवाण होतच असते.पाव हा शब्द पोर्तुगीज आहे.अननस हा शब्द दक्षिण अमेरिकेतला.
अडकित्ता कन्नडवरुन आलेला(अडिके म्हणजे कन्नडमधे सुपारी).
अर्थात काही लोक मराठी बोलताना जरा अतीच करतात.मराठी प्रसार माध्यमेपण अर्धे इंग्रजी,अर्धे मराठी असे काहीतरी चालु असते.
लोकांत मराठी साहित्याचा,नाटकांचा जरा चांगला प्रसार झाला की आपोआप लोक नीट बोलायला शिकतिल असे मला वाटते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Apr 2009 - 2:44 pm | llपुण्याचे पेशवेll

रमणशेठ बरोबर आहे तुमचे. पण इंग्रजाळलेल्या अशा भाषेला आपणच जास्त जबाबदार आहोत हे लक्षात घेतले पाहीजे.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

कपिल काळे's picture

25 Apr 2009 - 4:52 pm | कपिल काळे

पल्लवी जोशी कोणत्या भाषेत , सूत्र संचालन करते?
मृणाल कुलकर्णी ची एखादी मुलाखत चुकलो इंटरव्ह्यू ऐकलात ( पाहिलात !) का?

आयबीएन लोकमत नावाची एक तद्दन भिकार वाहिनी आहे. ती मराठी आहे असे सांगावे लागते.

असा सगळ्या बाजूंनी इंग्रजीचा मारा सुरु आहे. मराठीला वाण नाही पण गुण लागलाच आहे

भडकमकर मास्तर's picture

25 Apr 2009 - 5:03 pm | भडकमकर मास्तर

पुस्कर नाग्पुर्कर हुसार हाए..
सग्लेच तशे नस्तात.
तो लेक लिहू शक्तो....

आमी धावीत कस्ले लेक्ह लिहिनार?

_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

मस्त कलंदर's picture

25 Apr 2009 - 6:17 pm | मस्त कलंदर

आज स्टार माझा वर बातमी मध्ये ऐकले.. "दुधाळ जनावरे"!!!!! बहुतेक त्याना दुभती जनावरे म्हनायचे होते बहुधा...

नितिन थत्ते's picture

25 Apr 2009 - 8:31 pm | नितिन थत्ते

इंग्रजाळलेले मराठी नको हे तर बरोबरच.
पण हे ही नको.
कायदा= अधिनियम
सरकारी छापखाना= शासकीय मुद्रणालय.
हे हल्लीच कुठेतरी (बहुधा आजानुकर्ण यांच्या ब्लॉगवर?) वाचलेले.
(यातील कायदा, सरकार आणि छापखाना हे शब्द का बाद झाले हे चाणाक्ष लोकांना कळेलच)
खराटा
(रंग माझा वेगळा)

सुनील's picture

25 Apr 2009 - 10:57 pm | सुनील

शंभर टक्के = शत प्रतिशत

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2009 - 11:45 pm | बिपिन कार्यकर्ते

खराट्याच्या मूळ मुद्द्याशी शत प्रतिशत सहमत. ;) प्रचलित शब्द उगाच बदलायची गरज नाही.

पण हे शब्द का बाद झाले वगैरे जे त्याने लिहिले आहे त्याबद्दल मी पूर्णपणे असहमत. हे नवीन शब्द प्रचलित झाले तेव्हा भारतातील महान निधर्मीवाद्यांचेच राज्य होते. संबंध ओढून ताणून लावलेला आहे. खराटासाहेब, काय पटलं नाय बघा.

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

27 Apr 2009 - 7:42 pm | नितिन थत्ते

५० टक्के तर ५० टक्के.
धन्यवाद.
खराटा
(रंग माझा वेगळा)

चिरोटा's picture

25 Apr 2009 - 11:34 pm | चिरोटा

स्फोट = धमाका
अर्थ्=वित्त
अतिरेकी=आतंकवादी
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न