न्याय दे !

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
22 Apr 2009 - 12:53 pm

न्याय दे, देवा न्याय दे,
स्वर्गाचं उघडून तू दार ये !

गरीब मरतो उपाशी पोटी,
धनिक राबतो प्रतिष्ठेसाठी !

तुझी प्रतिष्टा कायम राहू दे,
गरीबाच्या पोटाचाही मान राहू दे !

न्याय दे ,देवा न्याय दे,
कणा कणात जन्मून तू धाव घे !

अत्याचार मुरलाय जागोजागी,
प्रामाणिक मुखवटा चेहर्‍यावरती !

तू आहेस प्रामाणिक दाखवून दे,
सज्जनपणाला आता वाव दे !

न्याय दे, देवा न्याय दे,
देव्हार्‍याचे माप ओलांडून ये !

लुटारुंच्या घरात सोन्याचा देव,
लुटलेला मांडतो नवसाचा खेळ !

नवसाच्या खेळाला न्याय दे,
न्यायदेवतेच्या डोळ्यांना दृष्टी दे !

न्याय दे, देवा न्याय दे,
नव्या शक्तीत जन्म घेऊन ये !

तुझा पण इथे बाजार मांडलाय,
दर्शनाच्या रांगेचा भाव चढलाय !

दर्शानाचे तुझ्या मांगल्य राहू दे,
प्रत्येक ह्रुदयात तुझे दर्शन होऊ दे !

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

22 Apr 2009 - 1:04 pm | मदनबाण

दर्शानाचे तुझ्या मांगल्य राहू दे,
प्रत्येक ह्रुदयात तुझे दर्शन होऊ दे !
सुंदर कविता...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 1:36 pm | विनायक प्रभू

कविता

सूहास's picture

22 Apr 2009 - 4:55 pm | सूहास (not verified)

दर्शानाचे तुझ्या मांगल्य राहू दे,
प्रत्येक ह्रुदयात तुझे दर्शन होऊ दे !

ह्या ओळी विशेष आवडल्या...

सुहास
आज "मै॑ या तो वो"

क्रान्ति's picture

22 Apr 2009 - 6:44 pm | क्रान्ति

सहमत. छान कविता.
=D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

क्रान्ति's picture

22 Apr 2009 - 6:44 pm | क्रान्ति

सहमत. छान कविता.
=D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com