झाड

स्वामि's picture
स्वामि in जे न देखे रवी...
21 Apr 2009 - 10:34 pm

मी लावलं होतं एक स्थावर मालमत्तेचं झाड
त्याला कर्जाचं पाणी टाकून,
वाढवत होतो हळूहळू.

खूप निघत होता व्याजाचा घाम
चालू होतं हप्त्याचं ठिबक सिंचन
आणी रिकामी होत होती सेविंगची टाकी

वाट बघत होतो अशा एका पावसाची
ज्याने ओसंडून वाहील
पण होत नाहीत अशा गोष्टी

अचानक झाडाला पालवी फुटली
तरारुन वाढलं
एवढं की मला झोप येइना

बंद केलं ठिबक सिंचन
बास झाला घाम
आता फक्त आराम

आणि तेवढ्यात ती आली
मंदीची साथ
अगदीच अनोळखी रोग

झाड कोमेजलं
होत्याचं नव्हतं झालं
सगळं पाणी वाया गेलं

आता पुन्हा हिंमत नाही
ते झाड ते पाणी
आणि ते ठिबक सिंचन.

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

21 Apr 2009 - 10:50 pm | बेसनलाडू

कविता आवडली.
(भाडेकरू)बेसनलाडू

सुवर्णमयी's picture

21 Apr 2009 - 11:04 pm | सुवर्णमयी

कविता आवडली.

क्रान्ति's picture

22 Apr 2009 - 5:49 am | क्रान्ति

खासच लिहिलंय!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

भडकमकर मास्तर's picture

22 Apr 2009 - 7:09 am | भडकमकर मास्तर

ओहो,
मस्त कविता ..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण's picture

22 Apr 2009 - 9:54 am | मदनबाण

व्वा. एक वेगळीच कविता... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

सँडी's picture

22 Apr 2009 - 11:50 am | सँडी

वा!वा!
मस्त लिहिलीयं!

-सँडी
काय'द्याच बोला?

ठकू's picture

22 Apr 2009 - 11:57 am | ठकू

छान आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

चन्द्रशेखर गोखले's picture

22 Apr 2009 - 12:13 pm | चन्द्रशेखर गोखले

भावस्पर्शी रुप़क , खुप आवडलं

सुधीर कांदळकर's picture

22 Apr 2009 - 6:48 pm | सुधीर कांदळकर

अचूक बोट ठेवलें आहे.

सुधीर कांदळकर.

जयवी's picture

22 Apr 2009 - 6:49 pm | जयवी

अगदी.....!! सद्यपरिस्थितीवर अगदी मार्मिक काव्य !!

स्वामि's picture

23 Apr 2009 - 5:58 am | स्वामि

आपणा सर्वांचे मनापासून आभार.

प्रमोद देव's picture

23 Apr 2009 - 6:00 am | प्रमोद देव

अतिशय वास्तववादी कविता!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्राजु's picture

23 Apr 2009 - 6:02 am | प्राजु

एकदम भारीच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/