अनोळखी काळ

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
21 Apr 2009 - 2:04 pm

नि:शब्द होते मी तेंव्हा,
कवयत्रीही नव्हतें,
प्रतिसादाला तुझे
उत्तरही नव्हतें !

भावनांचे थवे
मनी दाटले होते,
प्रेमाचे काव्य
तेंव्हा पटलेच नव्हतें !

अनोळखी धुक्यातून
वाट शोधत होते,
काळाच्या लहरींवर
आशेची साथ देत होते !

प्रेम मिळत होते तुझे
पण माझेच म्हणून खासही नव्हतें,
चार चौघांचे प्रेम पाहून
माझे मन जळत होते !

पण धुके आता सरले आहे
आशेने साथ निभावली आहे
भावनांनी दाटलेल्या थव्यांनी
भरारी घेतली आहे
शब्द सारे कविता गुंफत आहेत
प्रेम काव्य मिच आता रचत आहे
कवितेला माझ्या
तुझा प्रतिसाद मिळत आहे
मी तुझ्यासाठी आता खासच आहे
माझे प्रेम चारचौघांपेक्षा हटकेच आहे

अनोळखी काळाच्या गैरसमजूतीचे
निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे !

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

21 Apr 2009 - 7:15 pm | क्रान्ति

अनोळखी काळाच्या गैरसमजुतीचे
निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे!
खूप खूप खास! कविता आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

सँडी's picture

21 Apr 2009 - 7:30 pm | सँडी

खासच!
खुप अर्थपुर्ण, आवडली!

-सँडी
काय द्याचं बोला.

शितल's picture

21 Apr 2009 - 7:20 pm | शितल

कविता आवडली. :)

मदनबाण's picture

21 Apr 2009 - 7:29 pm | मदनबाण

भावनांचे थवे
मनी दाटले होते,
प्रेमाचे काव्य
तेंव्हा पटलेच नव्हतें !
छान कविता... :)

(हे जागुराव झोपत केव्हा असतील ? :? )
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

सूहास's picture

21 Apr 2009 - 7:32 pm | सूहास (not verified)

सुहास
सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.

जागु's picture

22 Apr 2009 - 12:38 pm | जागु

क्रांती, शितल, सँडी, मदनबाण, सुहास. धन्यवाद.

काजुकतली's picture

22 Apr 2009 - 12:59 pm | काजुकतली

जागु तु अगदी एकापेक्षा एक सरस कविता लिहितेस..

अनोळखी काळाच्या गैरसमजूतीचे
निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे !

खुप छान..

साधना

काजुकतली's picture

22 Apr 2009 - 1:01 pm | काजुकतली

(हे जागुराव झोपत केव्हा असतील ? )

अहो बाण, हे राव नाहीत बाई आहेत...

जागु's picture

22 Apr 2009 - 1:43 pm | जागु

काजुकतली, अग काल झोपण्याच्या आधीच मी त्यांना जागूताई आहे आणि मी किती जागी असते ते सांगितलं आणि ते माझ्या आधीच झोपायला गेले.