प्रिया आज माझी..

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जे न देखे रवी...
4 Feb 2008 - 9:00 pm

कवी यशवंत देव ( आणि अर्थातच माझी प्रिया) यांची क्षमा मागून

प्रिया आज माझी नसे ताप द्याया
नको बंध सारे नको टोचण्या त्या

नको धास्ती आता कशा घाबरू मी
हाकावे जरा दोस्त सारे प्रवाही
सुरेवीण का रात्र जा‌ईल वाया

जुने मित्र येता घरी बार होतो
सुखे घोट घेता कुणी पार होतो
पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या

न भिती जीवाला न प्राणास घोर
कसा आज ओठात खेळेल धूर
निळी चंद्रिका मित्र संगे पहाया

अशा रंगविता मनी स्वप्नराती
मधु मल्लिका माधुरी स्वप्नी येती
कशाला उभी ’ती’ मधे भंग व्हाया

विडंबनप्रतिभा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

4 Feb 2008 - 9:07 pm | केशवसुमार

साक्षीशेठ,
तुम्ही सुद्धा??
आता आम्हाला नवा धंदा शोधावा लागेल..( काय साला स्पर्धा वाढलीय)
असो.. एकदम कडक विडंबन. झकास..मान गये..

केशवसुमार

वा सर्वसाक्षी!
जुने मित्र येता घरी बार होतो
सुखे घोट घेता कुणी पार होतो
पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या

क्या बात है!!
"जाम" जमलेलं विडंबन!!

चतुरंग

विश्वजीत's picture

4 Feb 2008 - 9:16 pm | विश्वजीत

मस्त विडंबन.

इनोबा म्हणे's picture

4 Feb 2008 - 9:25 pm | इनोबा म्हणे

एकापेक्षा एक... सर्वसाक्षी लय जबरदस्त झाले हो!

केशवा स्पर्धा वाढली रे! आता तू ही जोरदार तयारी कर...आणि येऊ दे असेच झक्कास विडंबन.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Feb 2008 - 9:54 pm | llपुण्याचे पेशवेll

'नको धास्ती आता कशा घाबरू मी
हाकावे जरा दोस्त सारे प्रवाही
सुरेवीण का रात्र जा‌ईल वाया'
क्या बात है.... मस्तच..

असुरावादी...
डॅनी.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

4 Feb 2008 - 10:30 pm | विसोबा खेचर

साक्षीदेवा,

लेको तू, नंदन, केशव, ओगले आणि इतरही मंडळी इतकी झकास विडंबने करता की तुमची एकाहून एक फर्मास विडंबने पाहून माझ्यासारख्या गद्य माणसाच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो तसेच तुम्हा मंडळींबद्दल मनातल्या मनात 'जलनही' निर्माण होते! :)

छ्या! भेंXX आम्हाला पद्यातली एक ओळ लिहिता येत असेल तर शपथ! :)

(मिपाकरांनो, क्षमा करा. न राहवून तोंडातून शिवी निघाली! :))

साक्षीदेवा, विडंबन बाकी फर्मास हो!

जुने मित्र येता घरी बार होतो
सुखे घोट घेता कुणी पार होतो
पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या

या ओळी सर्वात आवडल्या...

आपला,
(पद्याबद्दल मनात न्यूनगंड बाळगून असलेला गद्यलेखक!) तात्या.

:)

सर्किट's picture

4 Feb 2008 - 11:11 pm | सर्किट (not verified)

वा वा वा !!!

सर्वसाक्षीजी,

आपला हा कलागुण आजवर माहिती नव्हता !!

जुने मित्र येता घरी बार होतो
सुखे घोट घेता कुणी पार होतो
पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या

सुंदर ओळी !

- (जुना मित्र) सर्किट

प्राजु's picture

5 Feb 2008 - 12:28 am | प्राजु

विडंबनकारांत आणखी एक भर पडली. मिसळपाव वर अशीच उत्तमोत्तम विडंबने येऊ देत.

साक्षि.. मस्त झालंय हे विड्म्बन

- प्राजु

चंपक's picture

6 Feb 2008 - 7:50 pm | चंपक

साक्षी,
अक्षी झकास इडंबन बगा!
काय वो? मधु मल्लिका माधुरी...समद्या ? लय ना-इन्साफी हाये
आवो,अशानं इतरांच्या स्वप्नात 'दुष्काळी कामं' काढावी लागनार!
चंपक

सख्याहरि's picture

6 Feb 2008 - 8:49 pm | सख्याहरि

लई वन्टास ...
मि.पा. वरील विडंबन हा माझ सध्याचा सर्वाअत आवडता विरंगुळा (टाईमपास) आहे.
असेच लिहा ... आम्ही ही काहि स्फुरते का ते पहतो. ..
-सख्याहरि

प्रभाकर पेठकर's picture

6 Feb 2008 - 9:34 pm | प्रभाकर पेठकर

श्री. सर्वसाक्षी,

जुने मित्र येता घरी बार होतो
सुखे घोट घेता कुणी पार होतो
पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या

अहो आमच्या सारख्या नव्या मित्रांना विसरू नका.

निमंत्रणाच्या प्रतिक्षेत.

सर्वसाक्षी's picture

7 Feb 2008 - 10:38 am | सर्वसाक्षी

सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार!
वास्तविकतः काव्य हा माझा प्रांत नाही, मी ठार गद्य माणुस. बहुधा विद्वानांच्या घरचे पाणके देखिल संस्कृत बोलु लागतात तद्वत अनेक संकेतस्थळांवरील प्रतिभावंतांच्या प्रभावामुळे काही बरे लिहिले गेले असावे. अर्थात येवो वा न येवो लिहावेसे वाटले की लिहुन टाकावे हे बरे. असे चुकुन कधी काही कुणाला आवडुन जाते:))

ॐकार's picture

7 Feb 2008 - 3:10 pm | ॐकार

निळी चंद्रिका .....
मौज आली. :)