आणि माझा मारुती झाला.

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
19 Apr 2009 - 7:31 am

शेवंताने दीव्याच्या ज्योतीवर भाकरी भाजली आणि मारुतीने अचंब्याने तोंडात बोट घातले.
मुळ केसच्या ऑडीओ स्क्रिप्टमधले एफ वर्ड्स मी गाळलेले आहेत, आणि बरेचसे शब्द मवाळुन लिहीले आहेत
_____________________________________________________

आई: अहो तुम्ही लेकीकडे बोलणेच बंद केले आहे. असे हे किती दिवस चालणार. जरा तीला जवळ घेउन बसा. नीट बोला. काय म्हणणे आहे तीचे बघा. नंतरचे त्रास वाचवायचे असतील तर आत्ताच स्पष्ट बोललेले बरे.
बाबा: तु नसताना एकदा बोललेलो आहे. ती जे काही बोलते ते माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे. तु बोलुन बघ. मात्र ती बोलेल ते सहन करायची ताकद आण आधी. मी गेले महीनाभर गोळी घेतल्याशिवाय झोपु शकत नाहीये.
_____________________________________________________
उच्च मध्यमवर्गीय उच्च शिक्षित घराणे. घरात आर्थिक त्रास काहीही नाही. बाबा ४८ वर्ष, आई ४२ वर्ष, मुलगी २० वर्ष
साधारण दोन दिवसानंतर अशीच एक संध्याकाळ. मुलगी घराबाहेर निघाली आहे.
आई: आता कुठे निघालीस?
मुलगी: मित्राबरोबर फिरायला
आई: कुठे?
मुलगी: बघु, अजुन ठरले नाहीये.
आई: कीती वाजता येणार आहेस?
मुलगी: दहा पर्यंत येइन.
आई: असे दहा पर्यंत काय काम आहे?
मुलगी: उगीच नस्त्या चौकशा करु नकोस
आई: आई आहे मी तुझी
मुलगी: ते मी कधी नाकारले आहे.
आई : जरा नीट बोलशील का तु? असे बेताल वागणे बरे नाही.
मुलगी: बाहेर जाताना उगाच मुड खराब करु नकोस. उद्या बोलु. काय विचारायचे ते विचार. खोट सांगणार नाही. सर्व सांगेन.
आई: आत्ताच बोलु.
मुलगी: ठीक आहे. आजचा कार्यक्रम रद्द करते. उद्या करीन. फरक पडत नाही.
मुलगी मित्राला फोनवरुन भेट रद्द झाल्याची सुचना करते.
मुलगी: आता बोल. आक्रस्ताळे पणा करणार नसशील तरच बोलीन. हीस्टेरीक होणार असशील तर बाबा आल्यावर बोलु. मी बाबांना सर्व कल्पना दीली आहे. त्यानंतर त्यांनी माझ्याशी बोलणेच बंद केले . तु पण करशील.
कदाचीत मुलगा असते तर वेगळी परिस्थिती असती.
आई: असे काय बोललीस की त्यांची झोप उडाली?
मुलगी: तुझी पण उडेल.
आई: तो तुझ्याकडे लॅपर्टॉप आहे तो कुणाचा?
मुलगी: माझा. गिफ्ट मिळाला आहे तो मला
आई: कोण कुणाला अशी महागडी वस्तु कारण नसताना गिफ्ट देइल?
मुलगी: खरे आहे तुझे. . लॅपटॉप चे काय घेउन बसली आहेस. माझ्या बँक लॉकर मधे ४ लाखाचे हीरे आहेत.
आई : बाप रे, आता हे पण गिफ्ट का?
मुलगी: हो.
आई : नीट सांग. साधारण कळते आहे तु काय म्हणतेस ते. पण एकदा का तुझ्या तोंडाने कळाले तर बरे होईल.
मुलगी: तुला सर्व माहीत असावे. . फक्त आज विचारायचे धैर्य केलेस तु.
आई: पालक म्हणुन आमचे काय चुकले ते एकदा कळु दे.
मुलगी: तुम्ही दोघांनी मला काहीही कमी केलेले नाही. जो काही निर्णय आहे तो माझा. बर्‍या वाईटाची जबाबदारी माझी.
तुम्ही अपराधी पणाची भावना बाळगण्यात काहीच अर्थ नाही. सगळे पुर्ण समजल्यावर मला कुटल्याही सायकिऍटीस्ट कडे घेउन जायचे मनात सुद्धा आणु नका. मी येणार नाही. जबरद्स्ती केलीत तर घर सोडुन निघुन जाईन. त्याला कारण पण सांगते. ती मंडळी त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे माझ्या गत आयुष्यात माझ्यावर बाबांनी किंवा इतर नातेवाईकांनी शारीरीक अत्याचार वगैरे केले आहेत का हे शोधण्यात १ महीना घालवतील. तसे काहीच नाही. तुम्ही सर्वांनी मला भरभरुन प्रेम दीले आहे.
आई: आता काय ते एकदा बोल.
मुलगी: थांब, आपण एक ब्रेक घेउ. मला आणि तुला एक फक्कड चहा टाकते. नंतर बोलु. आणि तुझी हरकत नसेल तर एक सिगारेट ओढते. तो पर्यंत तु माझी पर्स बघ. म्हणजे फारसे बोलावे लागणार नाही. सोपे जाईल.
क्रमशः
_____________________________________________________
हा भाग मी लिहीला. दुसर्‍या भागाचे संपादन करायला एखाद्या दिग्गजाची मदत घ्यायला लागेल. संपुर्ण केस वाचल्यावर मी तोंडात घातलेले बोट अजुनही तसेच आहे.
_____________________________________________________
जाता जाता-मुलगी: तु बाबाना कधी मारले आहेस का?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

सुनील's picture

19 Apr 2009 - 7:43 am | सुनील

अंदाज येतोय पुढच्या कथानकाचा. लवकर येऊद्या.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु's picture

19 Apr 2009 - 7:47 am | प्राजु

वाट पहाते आहे पुढच्या भागाची.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवलिया's picture

19 Apr 2009 - 9:53 am | अवलिया

एग्रिकल्चर इन्कम ....नो टिडीएस...नो टॅक्स !!

--अवलिया

अनंता's picture

19 Apr 2009 - 10:15 am | अनंता

कथा मूळपदावर.

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

विनायक प्रभू's picture

19 Apr 2009 - 10:57 am | विनायक प्रभू

मुळपद हो?

छोटा डॉन's picture

19 Apr 2009 - 11:05 am | छोटा डॉन

वाचतो आहे.

जाता जाता : बडे बडे शहरों मे ऐसी छोटी छोटी घटनायें होती रहती है ...
कितीही नाही म्हटले तरी ही "फॅक्ट" आहे, स्विकारा अन्यथा माहीत नसल्याचा आव आणा ...

कथानकाचा बहुतेक अंदाज आला आहे, संपुर्ण कळल्यावर अजुन विस्तॄत लिहीन ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

स्वाती दिनेश's picture

19 Apr 2009 - 11:31 am | स्वाती दिनेश

मुलीच्या पर्स आणि सिगरेटीवरुन बराचसा अंदाज आलाच आहे,
पुढचा भाग लिहा लवकर, वाट पाहत आहे.
स्वाती

टारझन's picture

19 Apr 2009 - 12:04 pm | टारझन

हा णवा बिजणेस फारंच जुणा झालाय मास्तर्स !! :) पण मग तुमचा मारूती का ब्वॉ झाला ?
आता मास्तरने पुढच्या भागात गुगली णाही टाकली म्हणजे झालं. डि.वाय.मधे कॉलेजला असताना ह्या मुलींना एवढे महागडे शौक कसे काय परवडतात बुवा असा प्रश्न पडे .. अर्थात उत्तरही लगेच मिळे .. असो ... जिवण जगण्याच्या व्याख्या ज्याच्या त्याच्या णिरणिराळ्या ... णाही का ?

जाता जाता : आमचा जांबुवंत झालाय =))

विनायक प्रभू's picture

19 Apr 2009 - 12:14 pm | विनायक प्रभू

आणि णवे मधे फरक राहाणारच. मी जुण्या पिढीतला म्हणुन माझा मारुती झाला.
तसे हे मला पण णविण नाही.
पण मुलगी ज्या 'कुल' पद्धतीने प्रश्न मांडते आहे त्याचे आश्चर्य नक्कीच वाटले.

मदनबाण's picture

19 Apr 2009 - 1:03 pm | मदनबाण

मुलगी ज्या 'कुल' पद्धतीने प्रश्न मांडते आहे त्याचे आश्चर्य नक्कीच वाटले.
अहो मास्तर शरीर ही मालमत्ता या त्तत्वाने वागणार्‍या मुली 'कुल' असणारच !!!
काय... आहे ते दिवस मस्तीत जगावे हे यांचे विचार...आगे का आगे देखेंगे...
पुढचा भाग लवकर टंकणे.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

चतुरंग's picture

19 Apr 2009 - 5:04 pm | चतुरंग

कुठल्या दिशेने कथानक जाईल ह्याचा अंदाज येतोय. अर्थात पुढे तुम्ही अजून धक्कादायक कथानक म्हणताय त्यामुळे वाचायला नक्कीच आवडेल.

पालक समजतात त्यापेक्षा बालकं खूप काही पहात असतात. आपण त्यांच्यासाठी कोणताही काळ फ्रीज करुन ठेवू शकत नाही. आजूबाजूला पहाताना त्यांचे स्वतःविषयीचे विचार घडण्याच्या काळात आई-वडिलांबरोबरचा संवाद बंद होण्याचा मोठा धोका असतो. आई-वडिलांखेरीज दुसरं आधिकाराचं मोठं माणूस मुलांना मिळणं फार महत्वाचं - ज्याच्याकडे मन मोकळं करुन ती बोलू शकतील.
चूक आणि बरोबर ह्याचे फक्त नैतिक संदर्भ मुलांना पुरेसे नसतात तर त्यामागची धारणा महत्वाची. काल जे चूक समजलं जात होतं ते आज सर्रास घडताना आणि करणारे लोक उजळपणे हिंडताना बघितले की आपल्याही उत्तरं मिळत नाहीत तर तरुण रक्ताचे काय होणार?
पैसा हा केंद्रबिंदू ठेवून जीवनाकडे बघणे सहजसोपे असते. तो मिळवण्यासाठी मग कोणत्याही मार्गाने गेलात तरी चालते. पैसा मिळवताना ही मुलगी तिच्या शरीराच्या गरजा पूर्ण करते आहे असं तिला वाटत असेलही पण ते खरं नाही कारण तिथे सेवा-मोबदला असा संबंध आहे. तिचा फायदा घेणारे जग हे तिला कोणतेही मानसिक समाधान देऊ शकणार नाही. मनाचे होत जाणारे कुपोषण हे तिला कालांतराने निराशेकडे नेणारे आहे.
अर्थात हे सगळे तिला पटवण्यातली पहिली पायरी संवाद आहे - एकतर बाबांनी बोलणे बंद केले आहे ते आधी बदलायला हवे. संवाद बंद करुन काहीच साध्य होणार नाहीये. ती आत्ता त्या परिस्थितीत आहे हे सत्य स्वीकारणे आधी महत्वाचे. तिने स्वीकारलेला मार्ग हा कोणतेही दोषारोप न करता जाणून घेणे महत्वाचे. त्यामागची कारणे समजली तर पुढे काही होऊ शकेल अन्यथा ती मुलगी अँटिडिप्रेसंट गोळ्यांची शिकार होत जाऊन शेवटी व्यसनी आयुष्य जगणार असे आत्तातरी वाटते आहे.

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

19 Apr 2009 - 5:14 pm | भडकमकर मास्तर

प्रभू मास्तरांच्या गोष्टी फार डिप्रेसिंग असतात.
...
मास्तरांची गोष्ट वाचली की मी मग उतारा म्हणून
दोन सफल प्रेमाच्या कविता वाचतो,
साने गुरुजींच्या दोन गोग्गोड गोष्टी वाचतो ...
सूरज बडजात्यांचे दोन सिनेमे पाहतो....

तेव्हा कुठं भूत उतरतं...
नाहीतर वाईट वाईट स्वप्नं पडतात....

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आंबोळी's picture

19 Apr 2009 - 5:24 pm | आंबोळी

प्रभु,
फार वेळ वाट बघायला लाउ नका...
लवकर येउ दे पुढचा भाग.

प्रो.आंबोळी

नितिन थत्ते's picture

19 Apr 2009 - 5:21 pm | नितिन थत्ते

ती मुलगी 'जवाबदारी माझी' असं म्हणतेय तर जवाबदारी आणि परिणाम म्हणजे काय हे तिला कळतंय काय? हे पहिले जाणून घ्यायला हवे. त्यातले जेवढे भयानक परिणाम असतील ते जाणल्यावर जर ती पुन्हा असेच म्हणत असेल तर मग सोडून द्यायला हवे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

रेवती's picture

19 Apr 2009 - 5:30 pm | रेवती

बोलती बंद झाली आहे.
लवकर पुढचा भाग लिहून काळजीमु़क्त करावे ही विनंती.

रेवती

श्रावण मोडक's picture

19 Apr 2009 - 5:42 pm | श्रावण मोडक

काळजीमुक्त? मला नाही वाटत. मास्तर असे करणार नाहीत. ते अधिक काळजीत, म्हणजेच विचारांत, पाडून जातील वाचकांना.

रेवती's picture

19 Apr 2009 - 5:57 pm | रेवती

श्रावणसाहेब,
आपले म्हणणे बरोबर आहे.
काय असेल हा प्रकार साधारणपणे समजलाय.
आता अजून काही वेगळं असू नये असं वाटतय त्याअर्थी काळजी वाटते आहे (स्वत:ची).
वरच्या केसमध्ये मुलीला वाढवताना प्रेमानेच वाढवले आहे.
पैश्याची तशी काळजी करावी लागली नाही.
हे इतकं सगळं छान छानच कारणीभूत आहे असे वाटते.
वरताण म्हणजे ही मुलगी असं काही करताना आत्तासाठी का होइना पण अपराधी वाटून घेत नाही...
'हे सगळं जुनं झालय आता' असे प्रतिसाद वाचून अजून एक धक्का!
ते वडीलांना मारण्याचं वाचल्यानंतर पुरता गोंधळ....
आता मात्र 'अरे देवा 'म्हटल्याशिवाय राहवत नाही.

रेवती

मास्तर, हा प्रश्न विकृतीदर्शक असेल तर कठीण आहे.
(Marquis de Sade सारखं काही असेल तर.... असा सूर या प्रश्नात येतो म्हणून विचारले.)

शेवंताने दीव्याच्या ज्योतीवर भाकरी भाजली

भाकरी गरजेपोटी भाजायला लागली अशी काहीशी गोष्ट आहे.
या मुलीच्या बाबतीत अशी काही गरज होती का ?

विनायक प्रभू's picture

20 Apr 2009 - 7:15 am | विनायक प्रभू

पुढचा भाग वाचा आणि तुम्हीच ठरवा.
आजकाल मी जज व्हायचे सोडुन दीले आहे.

संदीप चित्रे's picture

20 Apr 2009 - 2:55 am | संदीप चित्रे

वगैरे संदर्भ यथावकाश द्याल का सर?
पुढचा अंदाज येतोय पण तुमच्या लेखनाबाबत आणि रामदास यांच्या लेखनाबाबत असे अंदाज बांधून फार उपयोग होत नाही असा स्वानुभव आहे :)

विनायक प्रभू's picture

20 Apr 2009 - 11:05 am | विनायक प्रभू

केस अगदी तुमच्या आमच्या बघण्यातील मराठी घराची. अगदी सुसंस्कृत.

सँडी's picture

20 Apr 2009 - 7:37 am | सँडी

कथानक अप्रतिम!
पुढील भाग लवकर येवु द्या.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

दशानन's picture

20 Apr 2009 - 7:49 am | दशानन

हेच म्हणतो.

आनंदयात्री's picture

20 Apr 2009 - 7:45 am | आनंदयात्री

विश्वास बसला नाही. मुलीत दाखवलेला कुलपणा कथेच्या मागणीमुळे आलेला वाटला. असो.
पुढचा भाग वाचेनच याची शाश्वती नाही.

निखिल देशपांडे's picture

20 Apr 2009 - 11:19 am | निखिल देशपांडे

लवकर पुढचाभाग टाकुन आमच्यावरचा थोडा ताण कमी करा....
भडकमकर मास्तरांचे उपाय करावे लागणार आता.
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2009 - 3:18 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर अजून पर्यंत (म्हणजे लिहिलेलं ते वाचलं) तरी धक्का वगैरे नाही बसला. खूप प्रकार बघितले आहेत असे. पुढे काय लिहिताय, वाट बघतोय.

बिपिन कार्यकर्ते

दवबिन्दु's picture

20 Apr 2009 - 7:02 pm | दवबिन्दु

डोक गरगरु लागल. आता टुर वाल्यानी अश्टविनायक सारख ११ मारुती दरशन टुर पन काढली
आहे. तिथ जाईन ;)