फुलाचं जीवन

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
18 Apr 2009 - 12:27 pm

फुलांच आयुष्य - अल्पायुष
इवल्याश्या आयुष्यातही पुर्ण जीवन !

कुणी काट्यावर कुणी चिखलावर
परी हसर्‍या रुपाने सर्वस्व फुलवत!

कर्तव्याचा संदेश सुगंधात दरवळवत
हुंगले जरी कुणी कर्मात ना मोडत!

कुणी माळेत, कुणी इश्वर चरणी,
लीन होऊन जीवन सार्थक !

कूणी बागेत, कुणी वाटेत
वाटे वाटेतुन बाग फुलवत !

कुणी गजर्‍यात, कुणी फुलदाणीत
सजवण्यासाठी सदा टवटवत!

कुणी गुच्छातून सन्मान राखतं
कुणी मृत शय्येसही श्रद्धांजली वाहत!

फुलाचं जीवन, जन्म जगण्यास शिकवतं !

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Apr 2009 - 6:04 pm | मदनबाण

कुणी माळेत, कुणी इश्वर चरणी,
लीन होऊन जीवन सार्थक !
छान कविता...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

क्रान्ति's picture

18 Apr 2009 - 6:49 pm | क्रान्ति

इवल्याशा आयुष्यातही पुर्ण जीवन! खास लिहिलय जागु.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

जियो!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/