सख्खे शेजारी

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
17 Apr 2009 - 3:00 pm

माझ्यातली दोन मनं
अगदी सख्खे शेजारी
एक वेडं , तर एक शहाणं !

वेड्याच्या हाती तलवार
तर शहाण्याच्या ढाल !

वेडं वाट चुकत असतं
नको तिथं धावत सुटतं
शहाणं वाट शोधून काढतं
योग्य जागी नेऊन सोडतं !

वेडं सतत घाईतच असतं
संयमाशी पटतच नसतं
शहणं मात्र शांत असतं
धिराच फळ त्याला हवं असतं !

वेडं मन हट्टाला पेटतं
धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं
शहाणं त्याला जवळ घेतं
समजूतीच्या ओलाव्याने त्याला शांत करतं !

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

17 Apr 2009 - 4:55 pm | आनंदयात्री

छान !!
जागु तुमची सिंपलशी कविता छान आहे .. भावली.

सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..

मराठमोळा's picture

17 Apr 2009 - 6:36 pm | मराठमोळा

नवरा-बायको दोन जणं
एकाच घरात सख्खे शेजारी
एक वेडं , दुसरं महावेडं !

वेड्याच्या हाती लाटणं
तर महावेड्याचं हसणं !

वेडं पैसे उडवत असतं
महावेडं कमवुन आणत असतं
वेडं ताट वाढुन ठेवतं तेव्हा
महावेडं हॉटेलात असतं !

वेडं सतत संशय घेत असतं
महावेड्याशी पटतच नसतं
महावेडं मात्र भोळं असतं
वेड्याचं प्रेम त्याला हवं असतं !

वेडं मग हट्टाला पेटतं
सोडचिठ्ठीने काळीज पेटवतं
महावेडं त्याला जवळ घेतं
प्रेमाच्या मायेने परत घरा खेचुन आणतं !

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..

बाकरवडी's picture

17 Apr 2009 - 6:42 pm | बाकरवडी

आवडली कविता

:B :B :B बाकरवडी :B :B :B

क्रान्ति's picture

17 Apr 2009 - 6:46 pm | क्रान्ति

खास, अगदी खास कल्पना! कविता खूप खूप आवडली.
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्राजु's picture

17 Apr 2009 - 7:41 pm | प्राजु

दोन्ही कविता मस्त आहेत. अभिनंदन जागु आणि मराठमोळे साहेब.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागु's picture

18 Apr 2009 - 10:43 am | जागु

आनंदयात्री, सुहास, मराठमोळा,बाकरवडी, क्रांती, प्राजू तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मराठमोळा तुमची कविता आवडली.

प्रमोद देव's picture

18 Apr 2009 - 10:47 am | प्रमोद देव

जागु कविता आवडली.
ममो तुमचीही कविता छान आहे.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

उमेश कोठीकर's picture

18 Apr 2009 - 6:11 pm | उमेश कोठीकर

जागू,कविता खूप छान आहे.

शितल's picture

18 Apr 2009 - 6:24 pm | शितल

जागु, आणि मराठमोळा दोघांच्या ही कविता सुंदर आहे.
:)

सुधीर कांदळकर's picture

19 Apr 2009 - 8:19 pm | सुधीर कांदळकर

तेवढाच झकास कवितेतलाच प्रतिसाद.

वाहवा.......

सुधीर कांदळकर.