राज ठाकरेंनी नाशिक मुक्कामी मराठी माणसांसाठी हाक मारली

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
15 Apr 2009 - 12:11 pm

राज ठाकरेंनी नाशिक मुक्कमी मराठी माणसांसाठी हाक मारली
raaj in nashik

नाशिक दि. १३ एप्रिल ०९ (मि.पा. विशेष प्रतिनिधी ) : तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्यासाठी मनसे ला आपले मत द्या असे अवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केले.
मनसेच्या नाशकातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पवननगर - नाशिक येथील मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्र सोडले.

शरद पवारांना हि निवडणुक लढवायची नव्हती. पण ते कार्यकर्त म्हणतात म्हणुन निवडणुक निवडणुक लढवायची आहे असे सांगत आहेत. शरद पवार व शिवसेनेची युती आहे. जेथे जेथे राष्ट्र्वादीचा बलाढ्य उमेदवार उभा आहे तेथे तेथे शिवसेनेने आपला कमकुवत उमेदवार उभा केला आहे. शरद पवारांना एकेकाळी नाशिक जिल्ह्याने चौदाच्या चौदा आमदार निवडून दिले होते. या जिल्ह्याने पवारांवर भरभरून प्रेम केले. त्यावेळी पवार म्हणाले होते की, मी नाशिकचा पालकमंत्री बनून काम करेन. पण तुम्ही बारामतीचा विकास बघा आणि नाशिककडे बघा, असे ते म्हणाले.

मागच्या मनसे च्या आंदोलनात पोलीसांनी मराठीच माणसांवर अत्याचार केले. मालेगावात तर तुरूंगात मनसेंच्या कार्यकर्त्यांना लघवीतुन रक्त येईपर्यंत मारले. तेव्हा ग्रुहमंत्री मराठीच होता. मराठी मंत्र्यांनी मराठी माणसांसाठी काहीच केले नाही. मागील वर्षात रेल्वे ने २७०० लोकांना नोकर्‍या दिल्या. त्यात मराठी मुले किती? फक्त २७. तिकडे लालू पाटण्याहुन प्रत्येक ठिकाणी जाणारी रेल्वे सुरु करतो. तुमच्या नाशिक मधुन किती रेल्वे गाड्या चालू झाल्या? माहित नाही.

मला लाल दिव्याच्या गाडीचे आकर्षण नाही. असे त्यांनी प्रतिपादन केले. मराठी माणसाच्या कल्याणासाठी तुम्ही रेल्वे ईंजीनावर शिक्का मारुन मनसेचे उमेदवार विजयी करा असे आवाहन केले.

सभेच्या समोरील पाण्याच्या टाकीवरील एक माणुस 'राज ठाकरे झिंदाबाद', असे ओरडला असता, 'अरे, हा तर धर्मेंद्र दिसतोय' असे बोलुन त्यांनी हशा घेतला.

व्यासपीठावर सर्वश्री. वसंत गीते, उत्तरा खेर, अतुल चांडक व उमेदवार हेमंत गोडसे उपस्थीत होते. सभेस तोबा गर्दी असल्याने मैदान छोटे पडल्याने लोकानी रस्त्यावर, बाजुच्या इमारतींच्या छतांवर उभे राहुन सभेचा आनंद घेतला.

(खाली काही सभेतील फोटो व व्हि.डि.ओ. क्लिप्स आहेत. बघा.)


राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.


राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.


राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.


राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.


राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा व्हि.डि.ओ. क्लिप्स १

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा व्हि.डि.ओ. क्लिप्स २

समाजराजकारणबातमी

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2009 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार

उत्तम.
छानच झाला एकुण कार्यक्रम / सभा.

परा ठाकरे
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिलराव's picture

15 Apr 2009 - 12:22 pm | निखिलराव

नमस्कार पाषाणभेद,
नाशिक मध्ये राज ची चांगली पकड आहे तुमच्या बातमी नुसार सभांना चांगला प्रतिसाद पण मिळाला, मग मनसे उमेदवार हेमंत गोडसे निवडुन येतील का ?

दिपक's picture

15 Apr 2009 - 12:27 pm | दिपक

मि.पा. विशेष प्रतिनिधी पाषाणभेदराव यांचा वृतांत आवडला :)

छान.

चिरोटा's picture

15 Apr 2009 - 12:51 pm | चिरोटा

भाषण आवेशपुर्ण नक्किच आहे. स्वप्नातला महाराष्ट्र प्रत्यक्षात कसा उतरवायचा?
१)शेतकर्‍यान्च्या आत्महत्या
२)पिण्याचे पाणी
३)बालम्रुत्यु
४)नगर/महानगर पालीकान्मधे बोकाळलेला भ्रश्टाचार.
५)शहरांची झालेली बेसुमार वाढ आणि त्यामुळे बकाल्,भकास झालेली शहरे.
६)बिल्डर लॉबीची सरकारवरची घट्ट पकड आणि त्यामुळे गरीब्/मध्यमवर्गाला न परवडणारी घरे.
७)जगप्रसिध्ध लोड्शेडिंग
हे प्रश्न कसे सोडवायचे ह्याचे आराखडे मनसेकडे कागदावरतरी असतील अशी अपेक्षा आहे.("ईतरानी काय केलय ते आधी सांगा" असे उत्तर आले तर प्रशन्च मिटला)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

आपला अभिजित's picture

15 Apr 2009 - 12:59 pm | आपला अभिजित

(प्रतिक्रिया कमी आणि आक्षेप जास्त, अशी प्रतिक्रिया ग्रुहीत धरून पुढील प्रतिक्रिया नोंदवत आहे :)

वरील विषयाचे प्रयोजन काय?
मिपाकरांना राज ठाकरे किती प्रभावी बोलतात त्याची माहिती देणे, मनसेचा प्रचार करणे, की नाशिकमधील परिस्थिती सांगणे?

बरं, यापैकी कोणताही उद्देश या लिखाणातून साध्य होत नाही. मग असे विषय कशाला? सभा चांगली होती, वाईट होती, भाषण आकर्षक होते, भुक्कड होते, नवा मुद्दा मांडला, नाही मांडला, याविषयी लेखकाला काहीच म्हणायचे नाही??

नवा विषय टाकण्यामागे उद्देश काय आहे, तो तरी त्या लिखाणातून स्पष्ट व्हायला नको?

पाषाणभेद's picture

15 Apr 2009 - 1:25 pm | पाषाणभेद

"वरील विषयाचे प्रयोजन काय?
मिपाकरांना राज ठाकरे किती प्रभावी बोलतात त्याची माहिती देणे, मनसेचा प्रचार करणे, की नाशिकमधील परिस्थिती सांगणे?"

"यापैकी कोणताही उद्देश या लिखाणातून साध्य होत नाही. मग असे विषय कशाला? सभा चांगली होती, वाईट होती, भाषण आकर्षक होते, भुक्कड होते, नवा मुद्दा मांडला, नाही मांडला, याविषयी लेखकाला काहीच म्हणायचे नाही??"

----------------------------------------------------------------------------------
आपला राग नाही.
मी हा लेख एक बातमी म्हणुन टाकलेला आहे. वरील काही प्रतीसाद पाहुन काही जणांना ही बातमीच आहे हे समजलेले आहे.

पत्रकार हा निरपेक्ष (neutral) असावा. तोच प्रयत्न त्याने करावा. (नाहीतर आजकालची माध्यमे). त्याने जशी बातमी घडली तशीच छापावी ही नैतीक जबाबदारी पार पाडावी.

आपणास वरील पडलेले प्रश्न पाहून माझे लिखाण निरपेक्ष (neutral) आहे हेच सिद्ध होते.

मान्य आहे की मला राज ठाकरे यांचे विचार आवडतात. पण मी उद्या शरद पवारांच्या सभेला गेलो तर ती "बातमी "सुद्धा मी निरपेक्ष भावनेने लिहील.

मला वाटते या "बातमीमागचा" माझा उद्देश आपणाला समजला असेल.

हा एक वेगळा लेखनप्रकार मी लिहीला आहे.

बाकी राज ठाकरेंच्या राजकारणावर काय चर्चा करायची ती करा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

मराठी_माणूस's picture

15 Apr 2009 - 1:24 pm | मराठी_माणूस

मराठी माणसाशी संबधीत असल्यामुळे दीले असेल.
कित्येक भुक्कड कौला पेक्षा खुप बरे.

आपला अभिजित's picture

15 Apr 2009 - 1:26 pm | आपला अभिजित

कित्येक भुक्कड कौला पेक्षा खुप बरे.

हे बेस!

पाषाणभेद's picture

15 Apr 2009 - 1:36 pm | पाषाणभेद

"मराठी माणसाशी संबधीत ..."
तेच म्हणतो. कमीत कमी "मराठी माणसाशी " असलेल्या मुद्यांच्या बाबतीत आपले एक मत राहु द्या.
जय मराठी
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

सूहास's picture

15 Apr 2009 - 3:19 pm | सूहास (not verified)

<<कित्येक भुक्कड कौला पेक्षा खुप बरे>>
बरोबर आहे,
पण ,माझ्या मि॑त्रानो,
आपल मिपा हे मुळातच " मराठी मातीत जन्मलेल्या"समाजमनाचा आरसा आहे .मराठी माणस॑ ही अतिशय बुध्दीवादी,त्यामुळे प्रत्येकाचा एक मत-प्रवाह असतो.काळजी घ्या की आपण "आपला अभिजीत", सारख्या सदस्या॑च्या भावना दुखावणार नाही,राजभाऊ केवळ मराठी माणसासाठी काम करतात असा स॑देश जाऊ देऊ नका ,महाराष्ट्रासाठी समाजकारण करतात असा स॑देश गेला पाहीजे.त्या॑ची भाषण जरा कान देऊन एका.

मला समजलेली मनसे

सुहास
मनसे..दिलसे...

मराठी_माणूस's picture

15 Apr 2009 - 3:26 pm | मराठी_माणूस

ह्यात भावना दुखावण्यासारखे काहीच नाही, त्यानी स्वतः ही तसे म्हटलेले नाही

सूहास's picture

15 Apr 2009 - 4:11 pm | सूहास (not verified)

असे असेल तर मे माझी वाक्ये परत घेतो.

धन्यवाद...

सुहास
मिपादर्शनम सुखकारकम..