मृत्योर्मां अमृतं गमय !

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
11 Apr 2009 - 7:31 pm

सुर्य उगवताना खुप सुंदर दिसतो , पण
त्याही पेक्षा सुंदर दिसतो मावळताना ,
कारण तो देतो दशदिशांना...
उद्याच्या सुर्योदयाची ग्वाही...!
सरणावर मरण जळतांना ,
कुणीतरी नाजुक ढुश्या देत असतं
मातेच्या गर्भालाही...!!
मृत्योर्मा अंमृतं गमय ..
याचा अर्थ हाच असावा
बहुधा...!!!!

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

पुष्कर's picture

12 Apr 2009 - 12:46 pm | पुष्कर

आवडली... एक छोटी विनंती.. कृपया अंमृतं मधल्या अ वरचा अनुस्वार काढून टाका

नितिन थत्ते's picture

12 Apr 2009 - 12:50 pm | नितिन थत्ते

आणि तो र्मा वर घाला.

खराटा
(रंग माझा वेगळा)

पुष्कर's picture

12 Apr 2009 - 1:05 pm | पुष्कर

र्मा वर अनुस्वार कशासाठी???

नितिन थत्ते's picture

12 Apr 2009 - 2:42 pm | नितिन थत्ते

मृत्यो: (मृत्यूकडून) माम् (मला) अमृतम् (अमरत्वाकडे) गमय (घेऊन जा)

तमसो मां ज्योतिर्गमय यात सुद्धा मा वर अनुस्वार हवा. पण हल्ली सर्वत्र हे वाक्य मा वरील अनुस्वाराखेरीज लिहिलेले असते.
तमसः (अंधाराकडून) माम् (मला) ज्योति: (प्रकाशाकडे) गमय
मा या शब्दाचा अर्थ नको असा होतो.
तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाऊ नको असा अगदी उलट अर्थ होतो. (म्हणूनच आपण अंधारात आहोत काय?) ;)

स्वगतः कवितेचा आस्वद घ्यायचा सोडून हे काय भलतेच चाललंय?

खराटा
(रंग माझा वेगळा)

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 2:58 pm | मिसळभोक्ता

तमसो मां ज्योतिर्गमय

म्हणजे, तुझी आई ज्योतीकडे गेली.

तशीच मृत्यूची आई अमृतरावांकडे गेली असण्याची शक्यता आहे.

-- मिसळभोक्ता

प्रमोद देव's picture

12 Apr 2009 - 9:15 pm | प्रमोद देव

अहो साहेब तुम्ही चुकीच्या ठिकाणी तोडताय.
तमसो मा.....म्हणजे अंधाराकडे(अंधार) नको....ज्योतिर्गमय.....ज्योतिकडे(मुलीकडे नव्हे ;) ) म्हणजेच प्रकाशाकडे(मुलगा नव्हे ;) ) घेऊन चल....असा त्याचा अर्थ आहे.
मा म्हणजे नको...चुकीच्या जागी जोडला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.

कृपया आहेर आणू नये .... असे वाचण्याऐवजी....कृपया आहेर आणून ये असेही कुणी वाचू शकते. ;)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 9:57 pm | मिसळभोक्ता

काय सांगताय ? तोडण्याची जागा चुकली म्हणून अर्थाचा विपर्यास होणारी भाषा मेली, हे बरेच झाले म्हणायचे !

-- मिसळभोक्ता

प्रमोद देव's picture

12 Apr 2009 - 10:05 pm | प्रमोद देव

कर्ता,कर्म,क्रियापद ह्यांचे विशिष्ठ असे स्थान संस्कृतमध्ये नसल्यामुळे ती कशीही बोलली वाचली जाते. त्यामुळेच ज्यांना संस्कृतबद्दल जुजबी माहीती आहे अशांकडून कदाचित अशी चूक घडू शकत असेल असे वाटते(अर्थात मीही काही ह्या विषयातला पंडीत नाही. ८वी ते ११वी (शालांत परीक्षा)पर्यंतच हा विषय होता मला.
कैक वेळेला एकदा चुकीची संकल्पना डोक्यात बसली की ती तशीच कायम राहाते असा अनुभव आहे. असो.
चुभूदेघे.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 10:27 pm | मिसळभोक्ता

कैक वेळेला एकदा चुकीची संकल्पना डोक्यात बसली की ती तशीच कायम राहाते असा अनुभव आहे. असो.

म्हणजे, आपल्या दोघांनाही आता सुधरण्याची जालीम शक्यता नाही, असेच ना ?

(तुकोबारायांनी म्हटलेच आहे: "आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना". आम बोळी साठी खास सूचना "आम्हीबी घडलो, तुम्हीबी घडाना".)

-- मिसळभोक्ता

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 10:29 pm | मिसळभोक्ता

कैक वेळेला एकदा चुकीची संकल्पना डोक्यात बसली की ती तशीच कायम राहाते असा अनुभव आहे. असो.

म्हणजे, आपल्या दोघांनाही आता सुधरण्याची जालीम शक्यता नाही, असेच ना ?

(तुकोबारायांनी म्हटलेच आहे: "आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना". आम बोळी साठी खास सूचना "आम्हीबी घडलो, तुम्हीबी घडाना".)

-- मिसळभोक्ता

आंबोळी's picture

12 Apr 2009 - 10:32 pm | आंबोळी

कशाला उगाच मिस् ळ भ् ओकता ?

आंबोळी

आंबोळी's picture

12 Apr 2009 - 10:15 pm | आंबोळी

काय सांगताय ? तोडण्याची जागा चुकली म्हणून अर्थाचा विपर्यास होणारी भाषा मेली, हे बरेच झाले म्हणायचे !

मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करा.....
मी चोरी करणार, नाही केल्यास शिक्षा करा.....

भोक्तेसाहेब काय म्हणणे आहे?

आंबोळी

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 10:18 pm | मिसळभोक्ता

मरू दे तिच्या **ला.

आम बोळी
उर्फ
आम्बो ळी

-- मिसळभोक्ता

आंबोळी's picture

12 Apr 2009 - 10:21 pm | आंबोळी

मरू दे तिच्या **ला.
ठिक आहे मिस् ळभोक्ता.

आंबोळी

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 10:24 pm | मिसळभोक्ता

तोडण्यची जागा चुकली ! ता वरून ताकभात तसेच ता वरून तोडफोड देखील.

म्हणजेच,

मिसळभोक ता

कळ्ळे?

-- मिसळभोक्ता

पुष्कर's picture

19 Apr 2009 - 3:17 pm | पुष्कर

प्रमोदकाकांचा प्रतिसाद बरोबर आहे. मा वर अनुस्वार नाहीच आहे.

मिसळभोक्तांनी लिहिलेल्या विनोदाप्रमाणेच आणखीन एक विनोद प्रचलित आहे. "सर्वदेवनमस्कारः केशवम् प्रतिगच्छति" ह्याचा अर्थ कोणी दीडशहाण्याने "सर्व देवांना (इथे प्रमोद देवांना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही) नमस्कार करून केशव परत गेला" असा केला.

विनायक प्रभू's picture

12 Apr 2009 - 12:51 pm | विनायक प्रभू

कविता

रामदास's picture

12 Apr 2009 - 7:04 pm | रामदास

मला पण आवडली.

चन्द्रशेखर गोखले's picture

12 Apr 2009 - 7:09 pm | चन्द्रशेखर गोखले

सुचने बद्दल धन्यवाद , सुधारणा केली आहे.

क्रान्ति's picture

13 Apr 2009 - 8:03 pm | क्रान्ति

" मृत्योर्मा अमृतं गमय"चा अर्थ प्रभावी, तंतोतंत आणि चपखल आहे. कविता सुन्दर आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com