गणित

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
11 Apr 2009 - 4:35 pm

तो आला का ग?
कशाला वाट बघत आहेस त्याची?
नाही येणार तो.
एकदाच चुकलीस तु.
बेरीज केलीस वजाबाकी झाली.
काहीही झाले नाही आहे मला.
परवा परवा तर खेळलो आपण 'चेरीचा' खेळ
आज दिसली नाहीस.
का मलाच झोप लागली होती?
दोन्ही गालावरच्या तुझ्या खळ्यात मी मला शोधतो.
गमतीने म्हणायचो तुला
तु असलीस तर पाण्याची टंचाई नाही.
दोन बालद्या पाणी तर तुझ्या गालावरच्या खळ्यात साठवता येईल.
कालच स्वप्न सांगु का तुला?
उगाच अर्थ शोधायचा नाही.
डोळ्यात पाणी आणायच नाही.
वचन दिले आहेस तु मला.
त्याची वाट तर अजिबात बघु नकोस.
अग बटण शेवटी तीसराच दाबणार ना?
तो असला काय नसला काय काहीही फरक पडणार नाही.
तु मात्र जरुर ये.
अगदी नियम मोडुन
तसे तु नियम कधीच पाळले नाहीस.
लग्नानंतर मुल नको हा निर्णय तुझा.
१३ वर्ष पाळलास.
अचानक तो तोडलास.
मी नको म्हणत होतो
पण तु हट्ट सोडला नाहीस.
तुला नाही म्हणणे मला शक्यच नव्हते.
एवढे सुख तु मला दिलेस.
आपले सहजिवन न संपणारा 'हनीमुन' होता.
अगदी नवविवाहीतांना लाजवणारा.
तो आल्यावर मात्र थोडासा फरक पडला.
तो पडणारच होता.
मी मनावर घेतले नाही.
आता बरा झालो की तो हिशोब पुरा करु.
काय म्हणताहेत ते डॉक्टर.
कसला निर्णय घ्यायला सांगत आहेत तुला.
८ वर्षापुर्वी अशाच एका जिवघेण्या दुखण्यातुन मी बरा झालो होतो ना.
ह्या वेळी पण होईन.
मला कीतीतरी बोलायचे आहे तुझ्याकडे.
'ब्रेन डेड' वगैरे काहीही नाही मी.
स्वप्न कसे पडले असते नाही तर
शेवटची गाडी, मी एकटाच कंपार्ट्मेंट मधे. वार्‍याची झुळक आली. झोप लागली. अचानक जाग आली. बघतो तर काय सर्व डबा पुर्ण भरलेला. एकाच चेहेर्‍याची सगळे पांढरे कपडे घातलेली माणसे. सर्व माझ्याकडे रोखुन बघत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या स्टेशन वर उतरण्यासाठी खुणावत आहेत.
मी कशाला जातोय त्यांच्याबरोबर इतक्यात.
तुला वर्ल्ड टुरला आणखी एकदा न्यायचे आहे ना.
जमेल तेवढा पैसा उडवु.
तु त्याची काळजी करु नकोस.
भरपुर ठेवले आहे मी त्याला.
खरे तर तुझे चुकलेच.
३ वर्षात आपल्या आईवर झालेले अनन्वित अत्याचार त्याने डोळ्याने बघितले.
आई गेल्यावर मावशीने आई व्हायचा प्रयत्न फसला.
असंख्य व्रण घेउन आलेला तो जीव आपल्यात रमलाच नाही.
अगदी नाव देउन सुद्धा.
त्याला अवघड होउ नये म्हणुन आपली सर्व वागणुक बदलली.
त्याच्या समोर एक
तो बाहेर असताना एक
दुहेरी आयुष्य जगलो आपण.
पण नराधम बापाचे गुण आलेच ना त्याच्यात.
आज त्याची बायको त्याच्या खर्‍या आईचे आयुष्य जगते आहे की.
जाउ दे. लांब आहे ना.
आपल्याला फक्त कानावर येते. तीचे नशिब. दुसरे काय
मुल होत नाही हे बरेच आहे.
कशाला ह्या डिस्फंक्शनल जगात आणखी एक डिस्फंक्शनल जीव.
आलीस का?
चेहेरा वेगळा का वाटतो आहे.
का निर्णय झाला तुझा.
बघ परत एकदा चुक करत तर नाहीस ना?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

11 Apr 2009 - 4:38 pm | दशानन

@)

विमान लैच वरुन गेलं मास्तर... :(

काय बी नाय समजलं बगा.

विनायक प्रभू's picture

11 Apr 2009 - 4:40 pm | विनायक प्रभू

मरणासन्न बापाचे कथन
बायकोच्या हट्टाकरता दत्तक घेतलेला तो

दशानन's picture

11 Apr 2009 - 4:41 pm | दशानन

ह्म्म.
आता जरा व्यवस्थीत लिंक लागली.

धन्यु !

सायली पानसे's picture

11 Apr 2009 - 4:48 pm | सायली पानसे

आता कळले.

सायली पानसे's picture

11 Apr 2009 - 4:46 pm | सायली पानसे

"विमान लैच वरुन गेलं ...." सहमत.

खरच कळल नाही. :-?

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Apr 2009 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, काय झालंय तुम्हाला? तब्येत बरी आहे ना? लिखाण, शैली सगळंच बदललंय. छानच, पण.

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

11 Apr 2009 - 4:54 pm | दशानन

राजे ने आपली अलका कुबल मास्तरांना दिली वाटते =))

निखिल देशपांडे's picture

11 Apr 2009 - 5:04 pm | निखिल देशपांडे

मास्तर दुसर्‍यांदा वाचल्या वर थोडे थोडे कळाले.....
छान लिहिले आहे!

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2009 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

गुर्जी तुमची लक्षण काय ठिक दिसेनात मला !
आमचे जुने गुर्जी बेपत्ता झाले म्हणुन तक्रार द्यायला पाहिजे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अविनाशकुलकर्णी's picture

11 Apr 2009 - 5:13 pm | अविनाशकुलकर्णी

कविता खुप लाम्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब
च्या लाम्ब आहे
:S

अविनाशकुलकर्णी's picture

11 Apr 2009 - 5:17 pm | अविनाशकुलकर्णी

कविता खुप लाम्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब
च्या लाम्ब आहे..[उभि लांब आहे...आडवि नाहि}
:S

मदनबाण's picture

11 Apr 2009 - 7:11 pm | मदनबाण

तसं बी आमचं गनित लयं कच्च हाय !!! पन् मास्तर तुम्ही लिवाता एकदम खत्रुड... :)
या गणिताच्या शर्यतीत आम्हासनी नेमी वर्तुळच मिळायचं !!!

(डिक्रीप्टर होण्याच्या प्रयत्नात असलेला...)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

जयवी's picture

12 Apr 2009 - 3:03 pm | जयवी

प्रभू...... फार फार आत, खोलवर पोचलं......!!
नि:शब्द !!

जीव लावू तसं असतं गणित! पोटचा/दत्तक फरक पडत नाही. बर्‍याचदा पोटचेच पाठीत खंजीर्....जाऊदेत!

चतुरंग

विनायक प्रभू's picture

12 Apr 2009 - 7:43 pm | विनायक प्रभू

मान्य